Tuesday, 30 January 2024

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष व्याख्यानमालिका

 मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त दिलखुलास’ कार्यक्रमात

विशेष व्याख्यानमालिका

 

            मुंबईदि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'मराठी भाषा पंधरवड्यानिमित्तमराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी अभिजात मराठी पुस्तक परिचयाची विशेष व्याख्यान मालिका प्रसारित होणार आहे. ही विशेष व्याख्यानमा आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

            मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. दरवर्षी मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयामार्फत 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन केले जाते. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेतील साहित्यसंस्कृती आणि इतिहास भावी पिढीला कळावेयासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात आले. या निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व भाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'दिलखुलासकार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तकांचा परिचय करून देणारी विशेष व्याख्यानमाला प्रसारित करण्यात येणार आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात होणारे व्याख्यानमालेचे प्रसारण असे :

 मंगळवार 30 जानेवारी 2024 रोजी कवी बा. सी. मर्ढेकरांच्या कविता’ या विषयावर लेखक/ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ माहिती देतील.

 बुधवार 31 जानेवारी 2024 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा.डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीवर काव्य समीक्षक डॉ.रणधीर शिंदे यांचे विवेचन.

 गुरुवार 1 फेब्रुवारी 2024 रोजी साहित्यिक नरहर कुरुंदकर यांच्या जागर’ या वैचारिक लेखांच्या संग्रहावर लेखक विनोद शिरसाठ विवेचन सादर करतील.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi