राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग येथे आगमन
नाशिक, दि. 12 : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग येथील हेलिपॅडवर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते.
यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे रोड शो आणि 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले आहेत.
0000
वृत्त क्र. 136
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावर आगमन
नाशिक, दि. 12 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने निलीगिरी बाग हेलिपॅडकडे रवाना झाले.
0000
No comments:
Post a Comment