Saturday, 31 July 2021

 स्वीप कार्यक्रमांतर्गत

 मतदारयादीत तृतीयपंथीयांची नावे समाविष्ट करण्यासाठी

सर्व स्तरावर प्रयत्न करावेत

                  - दिलीप शिंदे

             मुंबई, दि.30 : स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारयादीत तृतीयपंथीयांची नावे समाविष्ट करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत,अशा सूचना राज्य सल्लागार (स्वीप) दिलीप शिंदे यांनी केल्या आहेत.

            यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई उपनगर येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            यावेळी जिल्हाधिकारी, मुंबई शहर राजीव निवतकरजिल्हाधिकारीमुंबई उपनगर मिलींद बोरीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपनगर व शहर अनुक्रमे अजित साखरेमाधव पाटील,तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मतदानाच्या हक्कापासून कोणीही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील तथा आग्रही आहे. त्यासाठी सर्वांनी जागरूकतेने प्रयत्न करावेत असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी स्वीप कार्यक्रमाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

            श्री.निवतकर व श्री. बोरीकर यांनी तृतीयपंथीयांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी जिल्हयातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांना सूचित करण्यात आलेले असून मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या ठिकाणी तर मुंबई उपनगर जिल्हयात 26 मतदारसंघांच्या ठिकाणी सर्व माहिती व फॉर्म्स उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. याबाबत त्यांचेशी संपर्क साधण्यात यावा.तसेच तृतीयपंथीयांची नावे मतदारयादीत समाविष्ट करणेबाबत तृतीयपंथी यांचे प्रतिनिधी यांनीही त्यांच्या स्तरावरुन प्रयत्न करावेत, असेही आवाहन केले.

            उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदारयादीत तृतीयपंथीयांचा समावेश करणे सहज सुलभ व्हावेयासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राची माहिती दिली.

            बैठकीसाठी  समाधान इंगळेसहाय्यक आयुक्तसामाजिक न्याय विभागमुंबई,संभाजी जाधवकक्ष अधिकारीमुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय,स्वीप सदस्य  पल्लवी जाधव, साधना गोरेतसेच सलमा खान व इतर सदस्यकिन्नर ट्रस्ट,वर्षा विद्या विलाससरचिटणीसमहाराष्ट्र नशाबंदी मंडळमुंबई आदी उपस्थित होते.

००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi