Monday, 3 June 2019

बोधकथा


व्यवसायात काहीच प्रगती होत नसल्याने बॉस वैतागला होता. ऑफिसमध्ये स्टाफ भरपुर होता पण काम होत नसे.  एके दिवशी त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावले अन सांगितले की मी तुमच्या सोबत एक खेळ खेळणार आहे, यात जो जिंकेल त्याला फॉरेन टूरला पाठविले जाईल. सर्व स्टाफ खुश झाला अन खेळ काय आहे, हे जाणण्यास उत्सुक झाला.

बॉसने सर्वांच्या हातात एक फुगा दिला अन सांगितले की शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल, त्यालाच विजयी ठरविले जाईल आणि फॉरेन टूरला पाठविले जाईल. 


एवढं सांगताच एकच कल्ला झाला. जो तो आपल्या शेजारच्याचा फुगा फोडू लागला. काही आपला फुगा कोणी फोडू नये म्हणून, वाचविण्याचा प्रयत्न करू लागली पण कोणी ना कोणी ते फोडत असत. 
असे करता करता सर्व फुगे फुटले कोणाच्याच हातात फुगा उरला नाही आणि कुणीच विजेता होऊ शकले नाही.

सर्व शांत झाल्यावर बॉसने सांगितले की, शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल, तोच विजयी ठरेल, असे मी बोललो. याचा अर्थ प्रत्येकाने दुसऱ्याचा फुगा फोडावा, असा होत नाही. 
तुम्ही इतरांचा फुगा फोडला नसता तर , प्रत्येकाच्या हातात आता फुगा असता आणि सर्वच विजयी ठरले असते. 

तात्पर्य :- यश मिळविण्यासाठी व जिंकण्यासाठी इतरांना हरविणे गरजेचे नाही. इतरांना हरविण्याच्या नादात आपण सर्वच हरवून बसतो. 

इतरांना जिंकण्यास मदत करा, आपोआप सर्वजण जिंकू शकाल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi