सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...
चित्रपट चित्रीकरण स्थळांच्या यादीत खासगी स्थळांचा
ReplyDeleteसमावेश करून अधिक संधी उपलब्ध कराव्या
-- सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई दि. 17 : राज्यात आणि विशेषत: मुंबईत अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाते. चित्रपटांसाठी करण्यात येणाऱ्या चित्रीकरणाची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यादृष्टीने दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेअंतर्गत चित्रीकरण स्थळांची सूची उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सूचीमध्ये खासगी चित्रीकरण स्थळांचाही समावेश करण्यात यावा आणि चित्रीकरणयोग्य स्थळांची मालकी असणाऱ्या खासगी व्यक्तीनाही या माध्यमातून अधिक संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या संचालक मंडळाची १५६ वी बैठक मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनिषा वर्मा, सहव्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल, सांस्कृतिक कार्यसंचालक बिभीषण चवरे, अवर सचिव शैलेश जाधव उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले की, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी राज्यात अनेक सार्वजनिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, वारसा असणारी स्थळे, निसर्गरम्य स्थळे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे खाजगी मालकीची स्थळेही उपलब्ध आहेत. या सर्व स्थळांचा एकत्रितपणे एक खिडकी योजनेतील यादीत समावेश झाल्यास चित्रीकरणासाठी अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतील. राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून अशा स्थळांची यादी मागवून घेण्यात यावी आणि या स्थळांचाही या यादीत समावेश करण्यात यावा, अशी सूचनाही यावेळी श्री.देशमुख यांनी केली.
राज्यातील लोककलांसाठीही एक खिडकी पध्दत सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे हे लक्षात घेता अशा कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी विविध परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्याच्या दृष्टीने अशी पध्दत सुरु करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
या बैठकीत चित्रनगरी महामंडळाकडून आगामी वर्षात हाती घ्यावयाच्या नवीन प्रकल्पांसाठी तसेच कार्यरत असणाऱ्या प्रकल्पांचे अद्यावतीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सन २०२१-२२ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली.
बांगलादेशाशी असणारे आपल्या देशाचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या जीवनावर आधारित सध्या चित्रनगरीत सुरु असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ३० टक्के सवलत देण्याचा निर्णयही संचालक मंडळाने आजच्या बैठकीत घेतला. त्याचप्रमाणे सन २०२०-२१ या वित्तीय वर्षाच्या लाभांशापोटी १ कोटी ४१ लाख रुपयांच्या लाभांशाचा धनादेश महामंडळाच्या वतीने शासनास देण्यात आला.
चित्रनगरी महामंडळाकडून भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या जागांच्या भाडे आकारणी पध्दतीत सुधारणा करण्यात यावी, मराठी चित्रपटास आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेण्यात यावा, आंतरराष्ट्रीय चित्रीकरण स्थळांचा अभ्यासदौरा करण्यात यावा असेही निर्णयही बैठकीत घेण्यात आले.
गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी
ReplyDeleteपात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १७ : ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे या हेतुने केंद्र शासनामार्फत गुणवंत खेळाडू पेन्शन योजना ( SPORTS FUND FOR PENSION TO MERITORIOUS SPORTS PERSON)सुरू करण्यात आली असून राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा विभागाचे आयुक्त श्री. ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे, सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही योजना राबवत आहे.
या योजनेच्या प्रस्तावासाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवासी असावा त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त केलेले असावा. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त / गुणवंत खेळाडूस खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे.
ऑलिम्पिक / पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक दरमहा २० हजार रुपये मानधन,सुवर्ण पदक विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) १६ हजार रुपये, रौप्य व कांस्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स) स्पर्धेत समाविष्ट असलेले खेळ प्रकार) १४ हजार रूपये, सुवर्ण पदक - कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स १४ हजार रुपये आणि रौप्य व कांस्य पदक - कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पँरा एशियन गेम्स १२ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
दर चार वर्षानी आयोजित होणाऱ्या विश्वचषक/विश्व अजिंक्यपद स्पर्धा करिता योजना लागू राहणार आहे. याबाबत संबधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून विहित नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव / आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.
https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons
00000
नारवट येथील वनपर्यटन केंद्राचा
ReplyDeleteसविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा
- पालकमंत्री अशोक चव्हाण
मुंबई, दि. 18 : नांदेड जिल्ह्यातील नारवट येथे उभारण्यात येणाऱ्या निसर्ग उद्यान/वनपर्यटन केंद्र व बांबू प्रशिक्षण केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिल्या.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील नारवट येथे बांबू प्रशिक्षण केंद्र तसेच निसर्ग उद्यान उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची आढावा बैठक पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.चव्हाण म्हणाले, नारवट येथील 700 एकर जागेपैकी 100 एकर जागेवर पर्यटकांसाठी सोयी सुविधा असलेले निसर्ग पर्यटन उद्यान तसेच बांबू प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. या पर्यटन केंद्रात चांगल्या सुविधा असाव्यात, पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. या निसर्ग पर्यटन केंद्राला किती जण भेट देऊ शकतील, त्याची देखभाल दुरुस्तीसाठी उपाययोजना आदींबाबतही विचार करण्यात यावा. तसेच पर्यटन केंद्र व बांबू प्रशिक्षण केंद्र संपूर्ण सौरऊर्जा प्रकल्पावर चालविण्यात यावा. या उद्यानाच्या ठिकाणी सध्या काही सुविधा करण्यात आल्या आहेत. त्या तशाच ठेवून त्यामध्ये आणखी काही चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात. नर्सरी, बांबू प्रशिक्षण केंद्रासाठी सुविधा केंद्रे, सध्या असलेल्या तलावाची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात यावे.
या प्रकल्पासाठी राष्ट्रीय बांबू प्रकल्प, कौशल्य विकास विभाग व इको टुरिझम बोर्ड आदी विभागांचाही सहभाग घेऊन आराखडा तयार करावा. तसेच बांबू प्रशिक्षण केंद्रातील वस्तुंची विक्री व प्रदर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात यावे, असेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
निसर्ग पर्यटन उद्यान व बांबू प्रशिक्षण प्रकल्प
प्रस्तावित केंद्रामध्ये बांबू अभ्यागतांसाठी सुविधा केंद्राबरोबरच प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठीही सामान्य सुविधा केंद्राच्या दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. तसेच बांबूवरील प्रक्रिया प्रकल्प, डिझाईन सेंटर, बांबूपासून बनणाऱ्या हस्तकला साहित्यासाठी इमारत, नर्सरी, जैवविविधता उद्यान आदी सुविधा असणार आहेत. त्याचबरोबर तलावाचे पुनरुज्जीवन, जॉगिंग ट्रॅक, प्रदर्शन कक्ष, कॅफेटेरिया, खुले सभागृह, विद्यार्थ्यांसाठी व ट्रेकर्ससाठी सुविधा आदींचाही समावेश पहिल्या टप्प्यात आहे.
सुविधा केंद्रात बांबूचा बांधकाम क्षेत्रातील उपयोगासंबंधीचा प्रमाणपत्र वर्ग, बांबूपासून फर्निचर तयार करणे, हस्तकला वर्ग आदी प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले
क्रीडा विषयक कामगिरी व उंचावण्याकरिता
ReplyDeleteक्रीडा विभाग, लष्कर आणि एन.सी.सी.यांनी समन्वयाने काम करावे
- क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार
मुंबई,दि. 30 : राज्याची क्रीडा विषयक कामगिरी अधिक उंचावण्याकरिता राज्य क्रीडा विभाग, लष्कर आणि एन.सी.सी.यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
लष्कर आणि एन.सी.सी.यांच्यासमवेत मंत्रालयातून दृकश्राव्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, सेवानिवृत ब्रिगेडीअर सुधीर सावंत, एन.सी.सी. महाराष्ट्रचे अतिरिक्त महासंचालक वाय.पी.खांडुरे यांची उपस्थिती होती.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले,ऑलंम्पिक क्रीडा स्पर्धांसह राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक देश क्रीडा क्षेत्राकडे व्यापक दृष्टीकोन ठेवून शालेय शिक्षणाबरोबर खेळाला महत्व देत आहेत. महाराष्ट्रात क्रीडा विषयक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक आणि त्या दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सेवानिवृत ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी दिलेल्या निवेदनाविषयी बोलतांना श्री. केदार म्हणाले राज्याला क्रीडा प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. लष्करातील तिन्ही दलांकडे विभागात उत्कृष्ट प्रशिक्षक आणि पायाभुत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच एन.सी.सी.विभागाकडेही विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. लष्कर आणि एन.सी.सी.विभागाकडे असणा-या यासुविधा राज्यातील विविध भागामध्ये उपलब्ध आहेत.या सुविधांचा राज्यातील तरुण खेळाडूंकरीता उपयोग करण्यासाठी क्रीडा विभाग, लष्कर आणि एन.सी.सी.यांचा समन्वय महत्वाचा आहे. आज झालेल्या बैठकीत सर्वांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग येथील क्रीडा संकुल एन.सी.सी.कडे प्रायोगिक तत्वावर देण्याविषची माहिती घेवून निर्णय घेण्यात येणार असून या ठिकाणी खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.
0000
दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून रजनीकांत यांचे अभिनंदन
ReplyDeleteरजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक
- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 1 :- ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, “रजनीकांत यांनी त्यांच्या शैलीदार अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टी कसदार, समृद्ध बनवली. चित्रपटाच्या पडद्यावर कल्पनेपलिकडचा ‘महानायक’ सादर केला. अभिनयाच्या बळावर ‘अशक्य ते शक्य’ करुन दाखवले. चित्रपटातंच नव्हे तर, जनमनातही ते ‘महानायक’ ठरले. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणाऱ्या स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्या नावाचा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर होणे आणि या दोघा चित्रकर्मींचं ‘मराठी’ असणे ही आनंदाची, अभिमानाची, गौरवाची बाब आहे. मी रजनीकांत यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या अभिनय व व्यक्तिमत्वाचे गारुड चित्रपट रसिकांच्या मनावर चिरंतन राहील, असा विश्वास व्यक्त करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
००००००
समाजाबरोबर चालणाऱ्या मराठी रंगभूमीची वाटचाल
ReplyDeleteकलादालनातून प्रेक्षकांना अनुभवता यावी
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठी रंगमंच कलादालन स्वयंपूर्ण-सक्षम होईल असा आराखडा निश्चित
मुंबई, दि. 5 : मराठी रंगभुमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभुमी समाजाबरोबर चालणारी आहे. त्यामुळे मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना मराठी रंगभूमीची वाटचाल अनुभवता येईल, असे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. गिरगांव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगमंच कलादालनाच्या उभारणीचा आराखडा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निश्चित करण्यात आला.
कलादान स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील अशी अपेक्षा आहे, त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्याचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे तसेच बिर्ला क्रिडा केंद्राच्या वास्तूचा पुनर्विकास व कलादालनाच्या निर्मितीकरिता स्थापन समितीचे सदस्य अभिनेते सर्वश्री आदेश बांदेकर, विजय केंकरे, सुबोध भावे, राजन भिसे, ऋषिकेश जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्यासह अन्य शासकीय सदस्य आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मराठी रंगभूमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभूमी समाजाबरोबर चालणारी आहे. त्यामुळे मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना मराठी रंगभूमीची वाटचाल अनुभवता येईल, असे नियोजन व्हावे. याठिकाणी नाटक पाहता येईल, पण प्रेक्षकाना मराठी रंगभूमीची वाटचालही अनुभवता येईल. ते पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र तर व्हावेच, पण त्याचबरोबर रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखवणारे उत्तम असे संग्रहालय साकारण्यात यावे. संग्रहालय आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हावे असे नियोजन आतापासूनच करण्यात यावे.
कलादालनामध्ये अत्य़ाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास दृकृ-श्राव्य संग्रहालय, त्रिमिती सादरीकरणाची व्यवस्था याबराबरोच रंगभूमीच्या वाटचालीशी निगडीत शासनाच्या विविध विभागांकडे उपलब्ध संदर्भ, दस्तऐवज आदी गोष्टींबाबत समन्वय साधण्याचे आणि या कामाला वेग देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले.
या कलादालनासाठी 175 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आराखडा निश्चिती तसेच विविध संकल्पना आणि कार्यान्वयनांसाठी 10 कोटीं रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
अठरा दालने आणि अद्ययावत सभागृह, ग्रंथालय अशा विविध सुविधांनी युक्त असा या कलादालनाबाबचा आराखडा वास्तू रचनाकार शशांक मेहंदळे, पराग केंद्रेकर यांनी सादर केला, चर्चेअंती हा आराखडा निश्चित करण्यात आला.
पशुपालक हा महाराष्ट्राचा आद्यवसाहतकार
ReplyDeleteतर सातवाहनांनी केली पायाभरणी
– प्रसिध्द विचारवंत संजय सोनवणी
नवी दिल्ली, दि. 5 : उत्खननातील पुराव्यांनुसार पशुपालक हे महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार असल्याचे सिध्द झाले असून सातवाहन राजवटीने महाराष्ट्राची पायाभरणी करून राज्याला वैभव मिळवून दिले, अशी माहिती प्रसिध्द विचारवंत व कादंबरीकार संजय सोनवणी यांनी दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 18 वे पुष्प गुंफताना “महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास” या विषयावर श्री. सोनवणी बोलत होते.
महाराष्ट्राच्या पुरातन इतिहासाच्या ज्ञात साधनांतून महाराष्ट्रात परर्जन्यमान चांगले असल्याने पशुपालन हा येथील मुख्य व्यवसाय होता व धनगर,गवळी आदी पशुपालकांचे येथे वास्तव्य असल्याचे दिसते. म्हणूनच पशुपालक हे महाराष्ट्राचे आद्य वसाहताकर ठरतात. या मातीत महत्वाचे मानवी वंश राहायला आले, त्यांनी वसाहती केल्या याच वसाहतींनी निर्माण केलेल्या विरोबा, विठोबा, ज्योतिबा, जगदंबा, तुळजाभवानी, काळुबाई आदी देवी-देवता पुढे महाराष्ट्राच्या लोकदेवता झाल्या. या लोकदेवतांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जोपासला, असे श्री सोनवणी यांनी सांगितले.
सातवाहनांनी केली महाराष्ट्राची पायाभरणी
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात घराणे होय. सिमुख सातवाहनाने इसपूर्व 220 मध्ये जुन्नर येथे सत्ता स्थापन केली. या राजवंशाने 450 वर्षे राज्य करून गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश पर्यंत राज्य विस्तार केला. प्राकृत मराठी भाषेला हाल सातवाहन राजाने साहित्यिक भाषा बनवले. ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथात हाल सातवाहनाने 700 ग्रंथांचे संकलन केले. गौतमीपूत्र सातकर्णी ने मराठी माणसांचा पहिला स्वातंत्र्य लढा उभारला. सातवाहन काळात रायगड, राजगड, राजमाची आदी किल्ले बांधले गेले. नाशिक येथील पांडवलेणी, कार्ले भाजे लेण्याही याच काळात बांधल्या गेल्या. बंदरे उभारली. सातवहानांच्या काळात महाराष्ट्रातील कला साधने, शेती उत्पादनांचा व्यापार रोम मध्ये होत असे. सातवाहन काळात महाराष्ट्राला मोठे वैभव प्राप्त झाले होते, असे त्यांनी सांगितले.
सातवाहनानंतर खान्देशात स्थिर झालेल्या ‘अहिर वंशा’ने सव्वाशे वर्ष राज्य केले. 6 व्या ते 8 व्या शतकात महाराष्ट्रात ‘चालुक्यांची राजवट’ आली. 8 व्या ते 10 व्या शतकात ‘राष्ट्रकुट राजवट’ आली त्यांनी जैन धर्माला राजाश्रय दिला त्यामुळे महाराष्ट्रात अहिंसा,मानवता आदी मुल्यांची पायाभरणी झाली.कोकणातील ‘शिलाहार राजवंशा’ची राजवट, त्यांचा प्रभाव व त्यांनी कोकणास मिळवून दिलेले वैभव यावर श्री सोनवणी यांनी प्रकाश टाकला.
राजा भिल्लम याने 12 व्या शतकात यादवांची सत्ता स्थापन केली. अडिचशे वर्ष राज्य करणा-या यादव काळात यादव घराणे म्हणजे महाराष्ट्र अशी ओळख निर्माण झाली. यादव घराण्याने आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीवर अनेक प्रकारे प्रभाव टाकला. यादवकाळात ‘रुख्मीनी स्वयंवर’, ‘ज्ञानेश्वरी’ या साहित्य रचना जन्माला आल्या. संतांची मांदीयाडी निर्माण होण्यासाठी यादवकाळात मनोभूमिका तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
सातवाहनांनी मराठी भाषेचा, साहित्य संस्कृतीचा,किल्ले़, शेती,व्यापाराचा पाया घातला. पुढच्या राजवटींनी तो वाढवत नेत यादवकाळात तो शिखरावर पोहचला आणि आजचा महाराष्ट्र तयार व्हायला सुरुवात झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत महाराष्ट्र दास्यात राहिला. तरिही येथील जनतेची मानसिक जडणघडण बदललेली नव्हती. राजकीय दास्य असले तरी सामाजिक दास्य लोकांनी स्वीकारलेले दिसत नाही.
महाराष्ट्राची संत परंपरा, वैचारिक परंपरा, राजकीय परंपरा हे राज्याचे व्यापक चित्र दर्शविते. विदर्भ, पवनी, चंद्रपूर, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विशाल भूप्रदेशावर राज्य करणा-या राजवटींनी एका वैशिष्टयपूर्ण संस्कृतीची निर्मिती केली. हा आपला समृध्द वारसा सर्वांनी समजून घेतला पाहिजे व तो जपला पाहिजे असा आशावाद श्री सोनवणी यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
ReplyDelete15 एप्रिल पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे
मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन
मुंबई, दि.६: मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०१८-१९ . २०१९-२० व २०२०-२१ या तीन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणा-या संस्थांकडून अर्ज १५ एप्रिल २०२१ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन २०१८-१९, २०१९-२० व २०२०-२१ या तीन वर्षाकरिता प्रत्येकी १ युवक, १ युवती आणि १ संस्था असे प्रतिवर्षी एकूण ०३ पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्कार पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
(अ) युवक/युवती पुरस्कार
(१) पुरस्कार वर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थीचे वय १३ वर्ष पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.
(२) अर्जदार हा मुंबई उपनगर जिल्ह्यात सलग ५ वर्ष वास्तव्यास असला पाहिजे.
(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, फोटो इ. जोडावेत. (गत तीन वर्षाच्या १ जून ते ३१ मे या कालावधीतील कार्याबाबतच्या माहितीसह सादर करावेत.)
(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
(ब) संस्था युवा पुरस्कार
(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे.
(२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार पंजीबद्ध असावी.
(३) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, फोटो इ. जोडावेत.
वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता विहीत नमुन्यातील अर्ज पाठविण्याची मुदत वाढविली असून इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज, दि. १५ एप्रिल, २०२१ पर्यंत सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुलीरोड, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२२ - २८८७११०५ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करणार
ReplyDelete- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख
मुंबई, दि. 4 : कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरि मदत करण्यात येईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने ताबडतोब प्रस्ताव सादर करावेत", अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिल्या. सांस्कृतिक कार्य विभागातील अधिकाऱ्यांच्या, दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे व अंशतः टाळेबंदीमुळे जवळपास वर्षभर कलाकारांना कला सादर करता आली नसून ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याची निवेदने प्राप्त होत आहेत. तसेच काही कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे आवश्यक आहे. या सगळ्यांचा सहानुभतीपूर्वक विचार करून त्यांना दिलासा मिळेल, अशा उपाययोजना प्रस्तावित कराव्यात, अशा सूचनाही मंत्रीमहोदयांनी दिल्यात. याकाळात नाट्य, चित्रपट कलावंतांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांचे अनुदानाचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा, असेही मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले. अन्य प्रयोगात्मक क्षेत्रातील कलावंतांच्या समस्या सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे बैठकीला उपस्थित होते.
000
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर स्थापन करणार
ReplyDeleteक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पाठपुराव्याला यश
· राज्यात एकाच वेळी ३६ जिल्ह्यांमध्ये सेंटर स्थापन होणार
· केंद्र शासनाकडून रु.३.६० कोटी इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार
मुंबई दि.२८: राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर (केआयसी) सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रिडामंत्री सुनील केदार यांनी दिली.नुकतेच श्री.केदार यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीड़ा मंत्री श्री किरेन रिजिजू यांची भेटू घेऊन महाराष्ट्रातील क्रीड़ा धोरण व आंतरराष्ट्रीय क्रीड़ा विद्यापीठा बाबत चर्चा केली होती.
याबाबत माहिती देतांना श्री. केदार म्हणाले, देशभरात तळागाळातील क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याने क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया सेंटर्स सुरू करण्यात येत आहेत, त्यानुसार देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक खेलो इंडिया सेंटर मान्य करण्यात येणार आहे, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १००० खेलो इंडिया सेंटर उघडण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या या मोठ्या योजनेत महाराष्ट्रामध्ये सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडून रु.३.६० कोटी इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे.
केंद्र व राज्य शासनाने एकमेकांच्या सहकार्याने, राज्यातील व देशातील तळागाळातील खेळाडूंना उत्तमोत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा खेलो इंडिया सेंटर उभारणीचा उद्देश आहे, असे श्री. केदार यांनी सांगितले. त्याद्वारे लहान वयातील प्रतिभावान खेळाडूंना या योजनेतून चांगले प्रशिक्षक आणि उपकरणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे, मला खात्री आहे की, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करण्यासाठी ही केंद्रे सहाय्यभूत ठरणार आहेत. राज्यात जास्तीत खेलो इंडिया अंतर्गत अधिक सेंटर्स सुरु करुन खेळाडूंना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दिनांक 2 जून 2021
ReplyDeleteसाहसी जलतरणपट्टू नील शेकटकरचा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार
मुंबई, दि. 2 : एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १५ किलोमीटरचे अंतर अकरा वर्षाच्या नील सचिन शेकटकर याने अवघ्या दोन तास पंचेचाळीस मिनीटात पोहून पार केले. त्यांच्या या जलतरण विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. नील शेकटकरच्या या साहसी जलतरण कामगिरीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्याचा सत्कार करुन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात नील शेकटकरचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीलच्या जलतरण कामगिरीचे कौतुक केले. तज्ज्ञ प्रशिक्षकाकडे पुढील प्रशिक्षण घेऊन जलतरण क्षेत्रात आणखी दमदार कामगिरी करत व्यवसयिक स्पर्धेत भाग घेत राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला केले. नीलसह त्याचे प्रशिक्षक, पालकांचेही अभिनंदन करत उपमुख्यमंत्र्यांनी त्याला जलतरण क्षेत्रात उज्ज्वल कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष
अजित पवार यांच्याकडून जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा
राज्याच्या गावागावात क्रीडासंस्कृती पोहचवण्याचा
जागतिक ऑलिंपिंक दिनाच्या निमित्ताने निर्धार
-- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 22 :- “खेळ हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. खेळ माणसाला सुसंस्कृत बनवतात, आनंदाने जगायला शिकवतात. खेळ माणसाला शरीराने, मनाने तंदुरुस्त ठेवतात. एकता, समता, बंधुता, खिलाडूवृत्तीनं वागण्याची शिकवण खेळांमुळे मिळते. सुसंस्कृत, समर्थ, सशक्त समाज निर्माण करण्याची ताकद खेळांमध्ये असल्याने महाराष्ट्राच्या शहरात, गावखेड्यात, वाडीवस्तीवर क्रीडासंस्कृती पोहचली, रुजली, वाढली पाहिजे. असे झाले तरंच देशाला ऑलिंपिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येन निर्माण होतील. महाराष्ट्राचे नाव उज्वल करतील. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचा निर्धार जागतिक ऑलिंपिक दिनी करुया” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील जनतेला जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, आज जागतिक ऑलिंपिक दिन साजरा करत असताना, १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव साहेबांची मला आठवण होते. पैलवान खाशाबा जाधवांच्या रुपाने देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक महाराष्ट्राने मिळवून दिले होते. ही बाब आनंदाची, अभिमानाची आहे. येत्या जुलै महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्रातून सात खेळाडू सहभागी होत आहेत. हे मोठे खेळाडू आहेत. त्यांनी मेहनत घेतली आहे. पदक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची त्यांची जिद्द आहे. राज्य सरकार पूर्ण ताकदीने या खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे. महाराष्ट्राचे खेळाडू टोकियो ऑलिंपिकमध्ये उत्तम कामगिरी करुन देशासाठी पदक जिंकतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी टोकियो ऑलिंपिकमधील यशासाठी महाराष्ट्राच्या, देशाच्या ऑलिंपिक संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याच्या जिद्दीनं जात असताना, सर्व खेळाडूंनी, प्रशिक्षक, मॅनेजर, संपूर्ण टीमने कोरोनापासून बचावाची काळजी घ्यावी. जपानमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी असलं तरी अनेक देशातून तिथे खेळाडू येणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूंन, सपोर्ट टीमच्या सदस्यांनी आपली व सहकाऱ्यांची काळजी घ्या. कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करा. स्वत:ला, सहकाऱ्यांना कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
राज्यावर, देशावर दीड वर्षापासून कोरोनाचं संकट आहे. खेळाची मैदानं, जिम, क्रीडास्पर्धांचं आयोजन अनेक गोष्टींवर वर्षभरापासून निर्बंध आहेत. काही ठिकाणी निर्बंध शिथील झाले असले तरी गेले वर्षभर, अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. मैदानात खेळता आले नाही. जिममध्ये व्यायाम करता आला नाही. सतत घरात आणि एकाच जागेवर दीर्घकाळ बसून राहण्याचे जे दुष्परिणाम असतात, ते अनेकांच्या शरीरावर दिसू लागले आहेत. जागतिक खेळाडू असू देत की, तुमच्या-माझ्यासारखी सामान्य व्यक्ती. प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे. घरात-अंगणात-गच्चीवर सोशल डिस्टन्सिंग राखून व्यायाम सुरु ठेवा. चालणे, धावणे यासारखे हालचाल वाढवणारे व्यायाम शरीर, मन तंदुरुस्त ठेवतात. योगा-प्राणायामाने हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते. पैशापेक्षा आरोग्य महत्वाचे आहे हे कोरोना संकटाने आपल्याला सांगितले. जान है तो, जहाँ है.. हे सुद्धा पटवून दिले. तेव्हा प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, स्वत:ला फिट-तंदूरुस्त ठेवावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.
माझं कुटुंब... माझी जबाबदारी. माझी सोसायटी, माझं गाव, माझं शहर, माझा तालुका, जिल्हा, माझं राज्य, माझा देश ही सुद्धा माझी जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवा. राज्याला, जगाला, कोरोनामुक्त करायचे असेल तर, सुरुवात, मी स्वत:पासून, स्वत:च्या कुटुंबापासून केली पाहिजे. आजच्या जागतिक ऑलिंपिक दिनी आपण स्वत:ला व कुटुंबाला कोरोनामुक्त ठेवण्याचा संकल्प करुया, असे सांगत टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या संघासाठी चीनी प्रायोजक कंपन्यांना टाळावे, अशी देशवासियांची लोकभावना आहे. त्या लोकभावनेचा आदर होईल आ
ब्रह्मपुरी येथील अद्ययावत क्रीडा संकुल उभाण्याकरीता
ReplyDeleteनगरविकास विभागाने क्रीडा विभागास जागा
हस्तांतरित केल्यास सुविधा उपलब्ध करु
मुंबई, दि.23 : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी नगरविकास विभागाने प्रस्तावित जागा क्रीडा विभागास तत्काळ हस्तांतरित केल्यास विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुका क्रीडा संकुलातसाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती. क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होती.
मंत्री श्री.केदार म्हणाले,नविन प्रस्तावित जागा जी खेळासाठी राखीव आहे ती नगरपरिषद, ब्रम्हपुरीकडे हस्तांतरीत व्हावी व त्याठिकाणी नगरपरिषद मार्फत नगर क्रीडा संकुल उभारता येईल. सदर कामासाठी लागणारा निधी रु.२०.१६ कोटी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन घेवून क्रीडा संकुल बांधकाम पूर्ण करता येईल.
बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे चंद्रपूर पालकमंत्री विजय वडट्टीवार म्हणाले, तालुका क्रीडा संकुल, ब्रम्हपुरी येथे सद्यस्थितीत असलेली जागा अद्यावत क्रीडा सुविधांच्या विस्तारीकरणा करिता अपूरी असल्याने माझ्या निर्देशानुसार तालुका क्रीडा संकुलाचे विस्तारीकरिता अंतर्गत मौजा बोंडेगांव येथील भुमापन क्रमांक ४०५ मधील ४.८५ हे. आर जागा खेळाचे मैदानाकरीता राखीव ठेवण्यात आलेली आहे. सदरच्या जागेवर अद्यावत क्रीडा सुविधा निर्मिती करणे शक्य होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ क्रीडा शिक्षणास प्राधान्य देणारे
ReplyDeleteठिकाण म्हणून विकसित करणार- क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार
पुणे, दि. 26:- नवीन पिढी क्रीडा पूरक घडविण्यासाठी 'आरोग्य हीच संपत्ती' या तत्वावर आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणीवर भर आहे. राज्याचे नाव राष्ट्रीय तसेच आतंरराष्ट्रीय पातळीवर झळकविण्यासाठी या विद्यापीठातून प्रतिभावंत खेळाडू घडविण्याचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या माध्यामातून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन राज्य व देशात क्रीडा शिक्षणास प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून विकसित करणार असल्याचे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी केले.
ज्येष्ठ खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे 'आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र' या विषयांवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील , पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, 'पीएमआरडीएचे' मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्यासह क्रीडा विभागातील नामवंत तज्ज्ञ, खेळाडू तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.
प्रास्ताविक भाषणात क्रीडा व युवक कल्याणमंत्री श्री.केदार म्हणाले, शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथील परिसर जगाच्या नकाशावर येण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. संशोधन, प्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणी करु, असा विश्वास व्यक्त करत क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी विद्यापीठ उभारणी करीता आपले मार्गदर्शनपर योगदान द्यावे, असे आवाहनही क्रीडा व युवक कल्याणमंत्री श्री. केदार यांनी केले. आर्थिकदृष्टया गरीब असलेल्या खेळाडूंना या विद्यापीठाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खासदार शरद पवार म्हणाले, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मदत घेवून त्यांचा ज्ञानाचा उपयोग करुन घ्यावा. या विद्यापिठाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर येण्यासाठी प्रयत्न करावे. या सर्वांचा परिणाम म्हणून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रतिभावंत खेळाडू घडविणारे केंद्र म्हणून या विद्यापीठाकडे बघितले गेले पाहिजे. उद्योग जगतातील लोकांना सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सहभागी करुन घ्यावे, असेही खासदार श्री. पवार यावेळी म्हणाले.
क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आपल्या आभारप्रदर्शन भाषणात म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हा राज्यशासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या विद्यापिठाच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे प्रतिभावंत खेळाडू घडविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तायक्वांदोपट्टू मृणाल वैद्य हिचा व्हियतनाम येथे झालेल्या दुसऱ्या एशियन कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशीप स्पर्धेत कास्यपदक जिकंल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
क्रीडा विभागातील नामवंत तज्ज्ञांनी आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यापिठाच्या विविध विषयांवर महत्वपूर्ण सूचना केल्या.
प्रांरभी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथील विविध विकास कामांची मान्यवरांनी पाहणी केली.
साताऱ्याच्या प्रवीण जाधवला शुभेच्छा दिल्याबद्दल
Deleteराज्यपालांकडून पंतप्रधानांचे आभार
मुबई दि.27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या 'मन की बात' मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रवीण जाधव या धनुर्विद्या क्रीडापटूचा गौरवपूर्ण उल्लेख केला, ही राज्याकरिता अभिमानाची बाब आहे. मा.पंतप्रधान महोदयांचे या गौरवपूर्ण उल्लेखाबाबत मी आभार व्यक्त करतो तसेच संपूर्ण राज्याच्या वतीने प्रवीण जाधवला ऑलिम्पिकमध्ये दैदिप्यमान यशासाठी शुभेच्छा देतो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.
आज प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की:
"मित्रांनो, जेव्हा बुद्धिमत्ता, समर्पण, निश्चय आणि खिलाडू वृत्ती एकत्र येतात, त्यावेळी चॅम्पियन घडत असतात. आपल्या देशातील बहुतांश क्रीडापटू लहान गाव किंवा छोट्या शहरांमधून येतात. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या आपल्या पथकामध्ये देखील अशा अनेक प्रेरणादायी खेळाडूंचा समावेश आहे. प्रवीण जाधव यांच्याबद्दल ऐकल्यावर तुम्हाला देखील तसेच वाटेल. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवीणने किती तरी अडी-अडचणींचा सामना केला आहे. प्रवीण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील आहे. तो धनुर्विद्येत फार चांगली कामगिरी करतोय. त्याचे आई-वडील उपजीविकेसाठी रोजंदारीवर काम करीत आहेत, आणि त्यांचा मुलगा आपल्या पहिल्या वाहिल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी टोकियो येथे जात आहे. ही केवळ त्याच्या पालकांकरिताच नव्हे, तर आपण सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
मा.पंतप्रधान महोदयांचे या गौरवपूर्ण उल्लेखाबाबत मी आभार व्यक्त करतो तसेच संपूर्ण राज्याच्या वतीने प्रवीण जाधवला ऑलिम्पिकमध्ये दैदिप्यमान यशासाठी शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेचे आयोजन
ReplyDeleteआशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात
- क्रीडा मंत्री सुनील केदार
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्रात फुटबॉल खेळाला चालना मिळावी या उद्देशाने आशिया खंडातील सर्वात मोठी एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.
सह्याद्री अतिथीगृहात आशिया एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेच्या तयारी बाबतीत आयोजित आढावा बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार बोलत होते. यावेळी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई जिल्हा फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष श्री.आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते.
क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, एएफसी महिला आशिया कप 2022 या स्पर्धेमुळे राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे. आपल्या राज्यात फुटबॉल खेळाला चालना मिळावी आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील स्टेडियम सर्व मापदंडांवर सुसंगत आहेत. राज्यात स्पर्धेसाठी आणि सरावासाठी अद्ययावत खेळपट्टी उपलब्ध असल्याचेही श्री.केदार यांनी सांगितले.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध यंत्राणांना सूचित करण्यात येईल. यामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, रस्ते, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, निवास अशा सर्व सुसज्ज सुविधा पुरविण्यात येईल. सर्व स्टेडियमच्या इमारतींची जर काही डागडुजी करणे गरजेचे असेल तर ती वेळेत करून घ्यावी, असे निर्देशही श्री.ठाकरे यांनी दिले.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, फुटबॉल स्पर्धा २० जानेवारी २०२२ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. यासाठी राज्य शासनाने योग्य नियोजन करावे. स्पर्धा जागतिक स्तरावरील असल्याने फुटबॉलप्रेमींना खेळाचा आनंद घेता यावा यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी करावी.प्रशिक्षण आणि सरावासाठी खेळपट्ट्या तयार करण्यात याव्यात असेही श्री.पटेल यांनी सांगितले.
राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी येथे सामने होणार आहेत. ही स्पर्धा आशिया खंडातील महिलांसाठीची सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असून या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी सहभागी होणार आहेत. - ऑस्ट्रेलिया , जपान आणि चीन आधीच पात्र ठरले आहेत. इतर संभाव्य सहभागींमध्ये कोरिया आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होणार आहे. याकरिता खेळाचे मैदान सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
टोकीयो ऑलिंम्पिक -२०२०
ReplyDeleteराज्यातील निवड झालेल्या खेळाडूंना
क्रीडा मंत्री केदार यांनी दिल्या शुभेच्छा
मुंबई दि. १ : टोकीयो ऑलिंम्पिक - २०२० साठी राज्यातील निवड झालेल्या ८ खेळाडूंनी आप-आपल्या खेळामध्ये विक्रमांची उंच शिखरे गाठावीत,राज्य आणि देशासह माता-पित्यांचे नाव मोठे करावे अशा शुभेच्छा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्या.
टोकीयो ऑलिंम्पिक -२०२० चे आयोजन २३ जुलै ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान करण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंना शासन आर्थिक मदतीसह सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. राज्यशासन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी आवश्यक ती मदत करीत असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.
निवड झालेल्या खेळाडूंची वैयक्तिक माहिती
१)राही जीवन सरनोबत-कोल्हापूर, खेळ-शुटींग-२५ मीटर पिस्तूल, महाराष्ट्र शासनात थेट नियुक्तीद्वारे उपजिल्हाधिकारीपदी नेमणूक, महाराष्ट्र शासनाच्या अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू.
२)श्रीमती तेजस्वीनी सावंत-कोल्हापूर, खेळ शुटींग-५० मीटर ,थ्री रायफल पोजिशन, शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्तीद्वारे विशेष कार्यकारी अधिकारी (उपसंचालक दर्जा) पदी नेमणूक, महाराष्ट्र शासनाच्या अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू
३)श्री. अविनाश मुकुंद साबळे- बीड. खेळ- अॅथलेटिक्स ३००० मीटर स्टिपलचेस, सेनादल मध्ये नायब सुभेदार पदी कार्यरत, महाराष्ट्र शासनाच्या निवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू
४)श्री. प्रविण रमेश जाधव-सातारा, खेळ- आर्चरी- रिकर्व्ह, सेनादल मध्ये नायब सुभेदारपदी कार्यरत, महाराष्ट्र शासनाच्या निवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू
५) श्री. चिराग चंद्रशेखर शेट्टी-मुंबई, खेळ बॅडमिंटन पुरुष दुहेरी "अ" श्रेणी अधिकारी, इंडियन ऑईल
६)श्री विष्णू सरवानन, मुंबई, खेळ -सेलिंग- लेजर स्टँडर्ड क्लास, सेनादलात नायब सुभेदारपदी कार्यरत
पॅराऑलिंम्पिक पात्र खेळाडू
७) श्री स्वरुप महावीर उन्हाळकर, कोल्हापूर, खेळ-पॅरा शुटिंग-१० मीटर रायफल
८) श्री सुयश नारायण जाधव, सोलापूर खेळ-पॅरा स्विमर-५० मीटर बटर फ्लाय, २००मीटर वैयक्तिक मिडले, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्ती व्दारे "अ" श्रेणी क्रीडा मार्गदर्शक नियुक्ती
0000
मुड्स' Unpredictable' या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉच
ReplyDeleteपुणे : नात्यातील काही प्रश्न अनुत्तरित राहिले, योग्य वेळी योग्य सुसंवाद झाला नाही तर त्या नात्यातील सुंदरता आपण गमावून बसतो, वेळप्रसंगी नात्यात टोकाचा दुरावा निर्माण होतो. विसंवादातून एखाद्या व्यक्तीचे जीवन नीरस होऊ शकते. अशाच एका नाते संबंधांतील संवेदनशील विषयावर सकारात्मक भाष्य करणारा सायको थ्रीलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मुड्स - Unpredictable' असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी केले आहे.
एस स्क्वेअर एन्टरटेनमेंट प्रस्तुत 'मुड्स - Unpredictable' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज पुण्यात लॉंच करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते संतोष अंकुश चव्हाण,श्रावणी संतोष चव्हाण,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर, अभिनेता रितेश नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
'मुड्स - Unpredictable' या चित्रपटाची निर्मिती एस स्क्वेअर एन्टरटेनमेंट या बॅनर खाली निर्माते संतोष अंकुश चव्हाण यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी केले आहे. त्यांचे या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत असले तरी बोरकर हे मागील 20 वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक नाटक तसेच विविध मालिकांचे लेखक, दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळविली आहे.
आगामी 'मुड्स - Unpredictable' या चित्रपटाबद्दल बोलताना लेखक, दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर म्हणाले, आयुष्याला पॉझिटिव्ह एनर्जी देणारी ही कथा आहे.हल्ली आपण फार यांत्रिक म्हणजे रोबोट सारखे जीवन जगतोय. संवेदशीलता हरवून चाललीय.कोणतेही नाते टिकण्यासाठी, फुलण्यासाठी संवाद खूप महत्वाचा असतो,नात्यात सुसंवाद नसेल तर ते नाते, रिलेशनशिप फक्त नावाला असते. एखादी घटना वाईट घडली म्हणजे संपूर्ण आयुष्यच वाईट नाही, आयुष्य अधिक सुंदर कसे करता येईल, नाते कसे फुलवता येईल हे मनोरंजक पद्धतीने सांगितलेली गोष्ट म्हणजे हा चित्रपट होय. हा चित्रपट प्रत्येकाला नात्याबद्दल नवीन विचार देईल.मुडस या सायको थ्रिलर नंतर महेन्द्र बोरकर, या तरुणाईला समर्पित बॉईज वर्सेस गर्ल्स हा नवीन चित्रपट घेऊन येणार आहेत.बॉईज वर्सेस गर्ल्स ही धमाल कॉमेडी आणि फुल मनोरंजनाची मेजवानी असेल.आपल्याला वय विसरून प्रेमात पाडणारी गोष्ट असेल.
अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, कोरोना काळानंतर आता नवनवीन चित्रपट तयार व्हावेत, निर्मात्यांनी पुढे यावे आणि चित्रपटसृष्टीचे काम पुन्हा जोमावे सुरू व्हावे अशी आमची इच्छा आहे. चित्रपट महामंडळ सर्व चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.
चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई
ReplyDelete- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
§ दोषींवर कठोर कारवाई करण्याचे यांचे निर्देश
§ चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि इतर कर्मचाऱ्यांना चित्रपट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाच्या अनुषंगाने आढावा बैठक
मुंबई दि.7 : मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
मंत्रालयातील समिती सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येसंदर्भात व मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ व निर्माता यांना चित्रपट युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस विभागाकडून करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, विद्याताई चव्हाण, गृह विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, फिल्मसिटी च्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, कामगार आयुक्त, महेंद्र कल्याणकर यांसह गृह विभागाचे व पोलीसदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चित्रपट सृष्टीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे आहे. यापूर्वी च्या सर्व गुन्ह्यांसंदर्भातील दोषींवर कठोर कारवाई करावी ज्यायोगे सर्वावर वचक निर्माण होईल. आवश्यकता भासल्यास विशेष चौकशी समिती नेमण्यात यावी असे निर्देश श्री वळसे पाटील यांनी यावेळी दिले.
कामगार विभागाने या क्षेत्रातील कामगारांना थेट बँकामार्फत वेतन अदा करण्यासाठी आवश्यक ती धोरणात्मक कार्यवाही करावी. कामगारांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या मध्ये जागरुकता आणण्यासाठी नवीन धोरण तयार करावे अशा सूचनाही त्यांनी कामगार आयुक्तांना दिल्या.
गृहविभागाच्या नियंत्रणाखाली सर्व संबंधित विभागाची एका स्वतंत्र समिती कायमस्वरूपी गठीत करण्याच्या सूचनाही गृह विभागास देण्यात आल्या. यावेळी गृह राज्य मंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई आणि गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी ही दडपशाहीला आळा घालण्यासाठी गृहविभागाने ठोस कार्यवाही करावी असे यावेळी सांगितले. पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे - पाटील यांनी गोरेगाव फिल्मसिटी परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली.
श्रीमती वर्मा यांनी फिल्मसिटी अंतर्गत सुरु असलेल्या चित्रीकरणासाठी राज्यशासनाकडून देण्यात येणाऱ्या सवलती आणि केलेल्या उपाययोजना याबाबत सांगितले. यावेळी उपस्थित निर्माता, दिग्दर्शक यांनी या क्षेत्रात वाढलेली गुन्हेगारी व त्यांच्यावर वाढलेला दबाव आणि समस्या व त्यांच्या मागण्या गृहमंत्र्याकडे मांडल्या. या बैठकीला सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, कलादिग्दर्शक नितीन देसाई, मेघराज भोसले, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग
ReplyDeleteया ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू
- क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार
आवश्यक पदांची भरती व पायाभूत सुविधा निर्मिती वेगाने करावी
- ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार
मुंबई, दि. 24 : देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून या विद्यापिठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. त्याचबरोबर विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पदांची भरती प्रक्रिया व पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबत आवश्यक बाबींची पुर्तता करावी, असे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले.
राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या अनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार रोहीत पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, वास्तू शास्त्रज्ञ शशी प्रभू, सिम्बायोसिसच्या प्रमुख संचालक डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आदी महत्त्वपूर्ण जागा भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रकिया तातडीने पूर्ण करावी, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पुर्तता करावी, असेही श्री. पवार म्हणाले. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री श्री. केदार म्हणाले. तसेच या विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले प्रशिक्षक तयार होतील, राज्यातून चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास व्यक्त करत कुलगुरू व प्राध्यापकांची निवड तातडीने करून प्रवेश प्रक्रियेला वेग द्यावा, अशा सूचना मंत्री श्री. केदार यांनी प्रशासनाला दिल्या.
पर्यटनमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, ‘क्रीडा विद्यापिठाने ‘ऑन फिल्ड’ व ‘ऑफ फिल्ड’वर काम करून प्रशिक्षणावर अधिक भर द्यावा, तसेच चांगले प्रशिक्षक तयार करून त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील असे नियोजन करणे आवश्यक आहे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण या विद्यापिठाच्या माध्यमातून येथे उपलब्ध होईल, या विद्यापिठांतर्गत शालेय स्तरावरील क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देता येईल’.
खासदार श्री. राऊत म्हणाले, या विद्यापिठाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयांमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय विद्यापिठाची उपकेंद्रे राज्यातील विविध विभागांसह देशाची राजधानी दिल्लीतही असावे व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंचा सहभाग अधिक असावा यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना श्री. राउत यांनी केल्या. क्रीडा व युवक कल्याण सेवा आयुक्त श्री. बकोरिया यांनी प्रास्ताविक करून क्रीडा विद्यापिठाबाबत सादरीकरण केले.
दोन अभ्यासक्रम होणार सुरू
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापिठांतर्गत पहिल्या टप्प्यात दोन अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात येणार आहे. बी.बी.ए (स्पोर्ट मॅनेजमेंट) व बी.एससी (स्पोर्ट सायन्स) या दोन अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 60 एवढी विद्यार्थीसंख्या असेल.
टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे
ReplyDeleteउपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. 24 :- टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. मीराबाई चानू यांनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मिळवलेलं यश भारतीय संघातील अन्य खेळाडूंना उत्तम कामगिरी करुन पदक जिंकण्यासाठी प्रेरणा, विश्वास देईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीराबाई चानू यांचं कौतुक केलं.
2016 च्या रिओ ऑलिंपिकमधल्या अपघाती अपयशावर मात करुन मीराबाई चानू यांनी यंदाच्या टोकियोमध्ये जिंकलेलं पदक हे अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेनं जीवनात कसं यशस्वी व्हावं, याचं आदर्श उदाहरण असल्यांचही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. भारतीय हॉकी संघानं आपला पहिला सामना न्यूझिलंडविरुद्ध 3-2 असा जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघातील खेळाडूंचं अभिनंदन केलं असून अन्य खेळाडूंनाही उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
०००००००
सत्य घटना ( प्रेरणास्पद )*
ReplyDeleteजब अमेरिकी राष्ट्रपति ने खाया एक गरीब भारतीय लड़की का जूठा चावल
*मीराबाई चानू की कहानी है यह*
उस समय उसकी उम्र 10 साल थी। इम्फाल से 200 किमी दूर नोंगपोक काकचिंग गांव में गरीब परिवार में जन्मी और छह भाई बहनों में सबसे छोटी मीराबाई चानू अपने से चार साल बड़े भाई सैखोम सांतोम्बा मीतेई के साथ पास की पहाड़ी पर लकड़ी बीनने जाती थीं।
🅓
एक दिन उसका भाई लकड़ी का गठ्ठर नहीं उठा पाया, लेकिन मीरा ने उसे आसानी से उठा लिया और वह उसे लगभग 2 किमी दूर अपने घर तक ले आई।
शाम को पड़ोस के घर मीराबाई चानू टीवी देखने गई, तो वहां जंगल से उसके गठ्ठर लाने की चर्चा चल पड़ी। उसकी मां बोली, ''बेटी आज यदि हमारे पास बैल गाड़ी होती तो तूझे गठ्ठर उठाकर न लाना पड़ता।''
''बैलगाड़ी कितने रूपए की आती है माँं ?'' मीराबाई ने पूछा
''इतने पैसों की जितने हम कभी जिंदगीभर देख न पाएंगे।''
🅓
''मगर क्यों नहीं देख पाएंगे, क्या पैसा कमाया नहीं जा सकता ? कोई तो तरीका होगा बैलगाड़ी खरीदने के लिए पैसा कमाने का ?'' चानू ने पूछा तो तब गांव के एक व्यक्ति ने कहा, ''तू तो लड़कों से भी अधिक वजन उठा लेती है, यदि वजन उठाने वाली खिलाड़ी बन जाए तो एक दिन जरूर भारी—भारी वजन उठाकर खेल में सोना जीतकर उस मैडल को बेचकर बैलग़ाड़ी खरीद सकती है।''
''अच्छी बात है मैं सोना जीतकर उसे बेचकर बैलगाड़ी खरीदूंगी।'' उसमें आत्मविश्वास था।
🅓
उसने वजन उठाने वाले खेल के बारे में जानकारी हासिल की, लेकिन उसके गांव में वेटलिफ्टिंग सेंटर नहीं था, इसलिए उसने रोज़ ट्रेन से 60 किलोमीटर का सफर तय करने की सोची।
शुरुआत उन्होंने इंफाल के खुमन लंपक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स से की।
एक दिन उसकी रेल लेट हो गयी.. रात का समय हो गया। शहर में उसका कोई ठिकाना न था, कोई उसे जानता भी न था। उसने सोचा कि किसी मन्दिर में शरण ले लेगी और कल अभ्यास करके फिर अगले दिन शाम को गांव चली जाएगी।
एक अधूरा निर्माण हुआ भवन उसने देखा जिस पर आर्य समाज मन्दिर लिखा हुआ था। वह उसमें चली गई। वहां उसे एक पुरोहित मिला, जिसे उसने बाबा कहकर पुकारा और रात को शरण मांगी।
🅓
''बेटी मैं आपको शरण नहीं दे सकता, यह मन्दिर है और यहां एक ही कमरे पर छत है, जिसमें मैं सोता हूँ । दूसरे कमरे पर छत अभी डली नहीं, एंगल पड़ गई हैं, पत्थर की सिल्लियां आई पड़ी हैं लेकिन पैसे खत्म हो गए। तुम कहीं और शरण ले लो।''
''मैं रात में कहाँ जाउँगी बाबा,'' मीराबाई आगे बोली, ''मुझे बिन छत के कमरे में ही रहने की इजाजत दे दो।''
''अच्छी बात है, जैसी तेरी मर्जी।'' बाबा ने कहा।
वह उस कमरे में माटी एकसार करके उसके उपर ही सो गई, अभी कमरे में फर्श तो डला नहीं था। जब छत नहीं थी तो फर्श कहां से होता भला। लेकिन रात के समय बूंदाबांदी शुरू हो गई और उसकी आंख खुल गई।
🅓continue
मीराबाई ने छत की ओर देखा। दीवारों पर उपर लोहे की एंगल लगी हुई थी, लेकिन सिल्लियां तो नीचे थी। आधा अधूरा जीना भी बना हुआ था। उसने नीचे से पत्थर की सिल्लिया उठाई और उपर एंगल पर जाकर रख दी और फिर थोड़ी ही देर में दर्जनों सिल्लियां कक्ष की दीवारों के उपर लगी एंगल पर रखते हुए कमरे को छाप दिया।
ReplyDeleteउसके बाद वहां एक बरसाती पन्नी पड़ी थी वह सिल्लियों पर डालकर नीचे से फावड़ा और तसला उठाकर मिट्टी भर—भरकर उपर छत पर सिल्लियो पर डाल दी। इस प्रकार मीराबाई ने छत तैयार कर दी।
बारिश तेज हो गई,और वह अपने कमरे में आ गई। अब उसे भीगने का डर न था, क्योंकि उसने उस कमरे की छत खुद ही बना डाली थी।
अगले दिन बाबा को जब सुबह पता चला कि मीराबाई ने कमरे की छत डाल दी तो उसे आश्चर्य हुआ और उसने उसे मन्दिर में हमेशा के लिए शरण दे दी, ताकि वह खेल की तैयारी वहीं रहकर कर सके, क्योंकि वहाँं से खुमन लंपक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निकट था।
🅓
बाबा उसके लिए खुद चावल तैयार करके खिलाते और मीराबाई ने कक्षों को गाय के गोबर और पीली माटी से लिपकर सुन्दर बना दिया था।
समय मिलने पर बाबा उसे एक किताब थमा देते,जिसे वह पढ़कर सुनाया करती और उस किताब से उसके अन्दर धर्म के प्रति आस्था तो जागी ही साथ ही देशभक्ति भी जाग उठी।
इसके बाद मीराबाई चानू 11 साल की उम्र में अंडर-15 चैंपियन बन गई और 17 साल की उम्र में जूनियर चैंपियन का खिताब अपने नाम किया।
लोहे की बार खरीदना परिवार के लिए भारी था। मानसिक रूप से परेशान हो उठी मीराबाई ने यह समस्या बाबा से बताई, तो बाबा बोले, ''बेटी चिंता न करो, शाम तक आओगी तो बार तैयार मिलेगा।''
🅓
वह शाम तक आई तो बाबा ने बांस की बार बनाकर तैयार कर दी, ताकि वह अभ्यास कर सके।
बाबा ने उनकी भेंट कुंजुरानी से करवाई। उन दिनों मणिपुर की महिला वेटलिफ़्टर कुंजुरानी देवी स्टार थीं और एथेंस ओलंपिक में खेलने गई थीं।
इसके बाद तो मीराबाई ने कुंजुरानी को अपना आदर्श मान लिया और कुंजुरानी ने बाबा के आग्रह पर इसकी हर संभव सहायता करने का बीड़ा उठाया।
जिस कुंजुरानी को देखकर मीरा के मन में विश्व चैंपियन बनने का सपना जागा था, अपनी उसी आइडल के 12 साल पुराने राष्ट्रीय रिकॉर्ड को मीरा ने 2016 में तोड़ा, वह भी 192 किलोग्राम वज़न उठाकर।
🅓
2017 में विश्व भारोत्तोलन चैम्पियनशिप, अनाहाइम, कैलीफोर्निया, संयुक्त राज्य अमेरिका में उसे भाग लेने का अवसर मिला।
मुकाबले से पहले एक सहभोज में उसे भाग लेना पड़ा। सहभोज में अमेरिकी राष्ट्रपति मुख्य अतिथि थे।
राष्ट्रपति ने देखा कि मीराबाई को उसके सामने ही पुराने बर्तनों में चावल परोसा गया, जबकि सब होटल के शानदार बर्तनों में शाही भोजन का लुत्फ ले रहे थे।
राष्ट्रपति ने प्रश्न किया, ''इस खिलाड़ी को पुराने बर्तनों में चावल क्यों परोसा गया, क्या हमारा देश इतना गरीब है कि एक लड़की के लिए बर्तन कम पड़ गए, या फिर इससे भेदभाव किया जा रहा है, यह अछूत है क्या ?''
नहीं महामहिम ऐसी बात नहीं है,'' उसे खाना परोस रहे लोगों से जवाब मिला, '' इसका नाम मीराबाई है। यह जिस भी देश में जाती है, वहाँं अपने देश भारत के चावल ले जाती है। यह विदेश में जहाँ भी होती है, भारत के ही चावल उबालकर खाती है। यहाँ भी ये चावल खुद ही अपने कमरे से उबालकर लाई है ।''
ReplyDelete''ऐसा क्यों ?'' राष्ट्रपति ने मीराबाई की ओर देखते हुए उससे पूछा।
''महामहिम, मेरे देश का अन्न खाने के लिए देवता भी तरसते हैं, इसलिए मैं अपने ही देश का अन्न खाती हूँ।''
''ओह् बहुत देशभक्त हो तुम, जिस गांव में तुम्हारा जन्म हुआ, भारत में जाकर उस गांव के एकबार अवश्य दर्शन करूंगा।'' राष्ट्रपति बोले।
🅓
''महामहिम इसके लिए मेरे गांव में जाने की क्या जरूरत है ?''
''क्यों ?''
''मेरा मेरा गांव मेरे साथ है, मैं उसके दर्शन यहीं करा देती हूँं।''
''अच्छा कराइए दर्शन!'' कहते हुए उस मूर्ख लड़की की बात पर हंस पड़े राष्ट्रपति।
मीराबाई अपने साथ हैंडबैग लिए हुए थी,उसने उसमें से एक पोटली खोली, फिर उसे पहले खुद माथे से लगाया फिर राष्ट्रपति की ओर करते हुए बोली, ''यह रहा मेरा पावन गांव और महान देश।''
''यह क्या है ?'' राष्ट्रपति पोटली देखते हुए बोले, ''इसमें तो मिट्टी है ?''
''हाँ यह मेरे गांव की पावन मिट्टी है। इसमें मेरे देश के देशभक्तों का लहू मिला हुआ है, इसलिए यह मिट्टी नहीं, मेरा सम्पूर्ण भारत हैं...''
''ऐसी शिक्षा तुमने किस विश्वविद्यालय से पाई चानू ?''
''महामहिम ऐसी शिक्षा विश्वविद्यालय में नहीं दी जाती, ऐसी शिक्षा तो गुरु के चरणों में मिलती है, मुझे आर्य समाज में हवन करने वाले बाबा से यह शिक्षा मिली है, मैं उन्हें सत्यार्थ प्रकाश पढ़कर सुनाती थी, उसी से मुझे देशभक्ति की प्रेरणा मिली।''
''सत्यार्थ प्रकाश ?''
''हाँं सत्यार्थ प्रकाश,'' चानू ने अपने हैंडबैग से सत्यार्थ प्रकाश की प्रति निकाली और राष्ट्रपति को थमा दी, ''आप रख लीजिए मैं हवन करने वाले बाबा से और ले लूंगी।''
''कल गोल्डमैडल तुम्हीं जितोगी,'' राष्ट्रपति आगे बोले, ''मैंने पढ़ा है कि तुम्हारे भगवान हनुमानजी ने पहाड़ हाथों पर उठा लिया था, लेकिन कल यदि तुम्हारे मुकाबले हनुमानजी भी आ जाएं तो भी तुम ही जितोगी...तुम्हारा भगवान भी हार जाएगा, तुम्हारे सामने कल।''
🅓
राष्ट्रपति ने वह किताब एक अधिकारी को देते फिर आदेश दिया, ''इस किताब को अनुसंधान के लिए भेज दो कि इसमें क्या है, जिसे पढ़ने के बाद इस लड़की में इतनी देशभक्ति उबाल मारने लगी कि अपनी ही धरती के चावल लाकर हमारे सबसे बड़े होटल में उबालकर खाने लगी।''
चानू चावल खा चुकी थी, उसमें एक चावल कहीं लगा रह गया, तो राष्ट्रपति ने उसकी प्लेट से वह चावल का दाना उठाया और मुँह में डालकर उठकर चलते बने।
''बस मुख से यही निकला, ''यकीनन कल का गोल्ड मैडल यही लड़की जितेगी, देवभूमि का अन्न खाती है यह।''
🅓
और अगले दिन मीराबाई ने स्वर्ण पदक जीत ही लिया, लेकिन किसी को इस पर आश्चर्य नहीं था, सिवाय भारत की जनता के...
अमेरिका तो पहले ही जान चुका था कि वह जीतेगी,बीबीसी जीतने से पहले ही लीड़ खबर बना चुका था ।
जीतते ही बीबीसी पाठकों के सामने था, जबकि भारतीय मीडिया अभी तक लीड खबर आने का इंतजार कर रही थी।
इसके बाद चानू ने 196 किग्रा, जिसमे 86 kg स्नैच में तथा 110 किग्रा क्लीन एण्ड जर्क में था, का वजन उठाकर भारत को 2018 राष्ट्रमण्डल खेलों का पहला स्वर्ण पदक दिलाया।
इसके साथ ही उन्होंने 48 किग्रा श्रेणी का राष्ट्रमण्डल खेलों का रिकॉर्ड भी तोड़ दिया।
2018 राष्ट्रमण्डल खेलों में विश्व कीर्तिमान के साथ स्वर्ण जीतने पर मणिपुर के मुख्यमंत्री एन बीरेन सिंह ने ₹15 लाख की नकद धनराशि देने की घोषणा की।
2018 में उन्हें भारत सरकार ने पद्म श्री पुरस्कार से सम्मानित किया।
यह पुरस्कार मिलने पर मीराबाई ने सबसे पहले अपने घर के लिए एक बैलगाड़ी खरीदी और बाबा के मन्दिर को पक्का करने के लिए एक लाख रुपए उन्हें गुरु दक्षिणा में दिए।
🌷
'वेद वृक्ष की छांव तले पुस्तक का एक अंश, लेखिका फरहाना ताज।