Wednesday, 29 May 2019

मी आहे ना

मी आहे ना 
Every thing is  fine

     आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात.. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात.. नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते?याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही..
     जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी..  आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे... रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो,पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं... . It's mutual relation... मन जुळलं की आपलेपणाचे नात होते... जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत... आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे " मी आहे ना " एवढे शब्द संजीवनी सारखे काम करतात.. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं... 

पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो...

नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण……

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi