आपल्या पिढीला विधात्याचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत..
•आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासेसना गेलो नाही.
शाळा सुटल्यावर छान रमत गमत, खेळत घरी गेलो आहोत..
आपण आपल्या खर्या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो, नेट फ्रेंड्स सोबत नाही..
तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते,
आपल्याला कधी बिसलेरी घ्यवी लागली नाही..
आपण चार जणांत एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो,
पण आजारी नाही पडलो..
आपण रोज पोटभर भात खाऊनही कधी स्थुल नाही झालो..
आपण कितीदा अनवाणी फिरलो तरी कधी पायांना दुखापत झाली नाही..
आपल्याला हेल्दी राहण्यासाठी कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..
आपली खेळणी आपणच बनवली. दोन रिकाम्या काडेपेट्या सुध्दा आपल्यासाठी गाडी,फोन किंवा पिस्तूल बनायच्या..
आपला भरपुर वेळ आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला..
आपल्या जवळ मोबाइल, फेसबुक फ्रेंड, काँप्युटर, इंटरनेट वगैरे नव्हते....
कारण आपल्या जवळ खरेखुरे मित्र-मैत्रिणी होते..
*आपण मित्रमैत्रिणींच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचोही.. *
आपण कधी फोन करुन येऊ का म्हणून विचारले नाही..
आपण एक अद्भुत रसायन आहोत, कारण आपणच आहोत एक अशी पिढी,
ज्यांनी आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या आणि तरी खूप मस्तीही केली...
आपण भले स्पेशल नसु पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!!
*आपली एकच पिढी अशी आहे, ज्यांनी कमी श्रीमंतीत बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला, *
*व्हर्चुअल लाईफ ऐवजी खरे तारूण्य अनुभवले... *
आणि आता उतार वयात आधुनिक विज्ञानाचाही आनंद घेत आहोत ...
आपणच फक्त "कमतरतेतली गंमत आणि मुबलकतेतली जंमत" अनुभवली..
आणि शेवटी.....
आठवतंय का....आपण 'मदर्स डे' कधी साजरा केल्याचं ???
नाही........ना ?
कारण आईच आपलं जग होतं....
No comments:
Post a Comment