जयहिंद मित्रांनो जयहिंद
शहीद सैनिक परिवार सन्मान सोहळा 2019
5 मे 2019 रविवार या दिवशी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे हा शहीद सैनिक परिवार सन्मान सोहळा भावनिक वातावरणात पार पडला .
सकाळी ठीक 9:30 वाजता देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम झाला , हा देशभक्तिपर गीतांनी सभागृहाचे वातावर देशभक्तिमय झाले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सर्जिकल स्ट्राइक प्रमुख आदरणीय ले. जनरल राजेन्द्र निंभोरकर सर (निवृत्त)सर आणि प्रमुख पाहुणे डी कनकरत्नम (IPS) पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई व तोमर साहेब व संस्थेचे अध्यक्ष संदिप मानेसाहेब,उपाध्यक्ष श्री अनिल अनपट साहेब यांनी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुण व दीप प्रज्वलन करुण राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरवात केली. जयहिंद फाऊंडेशन या संस्थेची स्थापना ज्या हेतूने झाली तो हेतू साध्य झाल्याचे जाणवत होते.
श्री हनुमंत मांढरे (सचिव जयहिंद फाउंडेशन) यांनी जयहिंद फाउंडेशनची उद्दिष्ठ व 2018 मधील संपूर्ण वर्षात जयहिंद फाउंडेशन ने केलेल्या कार्याचा आढावा थोडक्यात व अगदी महत्वपूर्ण दिला.
या वर्षी जयहिंद फाउंडेशन ची सोशल वेबसाइड
www.jaihind.foundation तयार केली व या वेबसाइट चे उद्घाटन आदरणीय ले. जनरल राजेंद्र नींभोरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, श्री मकरंद देशमुख यांनी या वेबसाइट बद्दल संपूर्ण माहिती दिली , यापुढे जयहिंद फाउंडेशन बद्दल संपूर्ण माहिती या www.jaihind.foundation वेबसाइट वर सर्वाना उपलब्ध होईल.
त्यानंतर लगेचच जयहिंद फाऊंडेशनचे शिर्षक गित या शहिदांना अर्पन केल, ज्यामध्ये एकजूट होऊन या कुटुंबांचा व त्या शहिदाचा जयघोष करायला सांगितलं आहे...
संपुर्ण महाराष्ट्रातील १ एप्रिल 2018 ते ३१ डिसेम्बर 2018 या एक वर्षातील 14 शहीद परिवारांचा सन्मान सोहळा व या कार्यक्रमाचे निवेदन जयहिंद फाउंडेशन चे संचालक डॉ. प्रा. श्री नितिन कदम सरांनी केले.
शहीद परिवारांचा वीर माता वीर पिता वीर पत्नी यांचा सन्मान करत असताना उपस्थित सर्वानाच अश्रु अनावर होत होते , आपल्या परिवारातील मुख्य आधार राहिला नाही तर काय अवस्था होते याची कल्पना ही कोणी करु शकत नाही .
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा वीरमाता ज्योती राणे(आईं) यांचे मनोगत 5 में ही तारिख खर तर त्यांच्या कायम लक्षात राहनारी आहे,कारण 5 मे या दिवशी त्यांचे मेजर कौस्तुभशी आपल्या मुलाशी बोलन झाल व ते बोलन हे शेवटच बोलन ठरल , किती दुखः हे या माउलीलाच माहित आहे या आईना माझे(जयहिंद) चे सांगणे आहे की आम्ही सर्व आपलीच मुल आहोत , सदैव तुमच्या सोबत आहोत 🙏 शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा परराक्रम हा खुप महान आहे अश्या या शुर वीराना सलाम आहे.
शहीद रोहित शिंगाड़े यांच्या पत्नीचे मनोगत तर हॄदयाचा ठोका चुकवनारे होते पति शहीद झाल्यानंतर या परिवाराने अवयव दानाचा निर्णय घेतला( किडनी, डोळे , हॄदय )हे अवयव दान करुण काही आपल्याच साथीदाराना जीवनदान दिले आहे , किती अभिमानाची गोष्ठ आहे या वीर पत्नी आज आपल्या पतीला मनाने जीवंत पहात आहेत खरच सलाम या परिवाराना
शहीद संतोष कुंभार या परिवारराणे देखील आपल्या मुलाचे अवयव दान केले आहेत, हे शहीद जवान जरी आज आपल्यात नसले तरी हे जग आज ते पाहत आहेत .
शहीद कपिल गुंड या परिवाराने आपली दोन्ही मुलं देशसेवेसाठी दिली आहेत सलाम या परिवाराला.
शहीद पत्नीनचे मनोगत की आज आमचे पति जरी नसले तरी आम्ही त्यांच्या आई वडिलांचा त्यांचा मुलगा म्हणूनच संभाळ करेंन कारण मि जसा पति गमावला आहे तसा त्यानी ही आपला पुत्र गमावला आहे, किती मोठी हिम्मत आहे या सैनिकांच्या पत्नीनची म्हणतात ना, कि फौजी लाखात 1 आसातो तर फ़ौजिची बायको 10 लाखात 1 असते . या सर्व ताइना सांगणे आहे की जयहिंद कायम तुमच्या सोबतच आहे .
शहीद उद्धव घनवट हे 2008 मधे आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झाले , व त्यांच्या पत्नीचा गेल्या दिवाळी मधे कार एक्सीडेंट मधे गेल्या त्यांच्या पश्च्यात त्यांची 2 मुले मुलगी सन्हेल उद्धव घनवट व मुलगा श्रेयस घनवट ही पोरकी झाली, खुपच वाइट प्रसंग या मुलांवरती आला , जयहिंद फाउंडेशन ने या मुलांची दखल घेतली व ही मुल जयहिंदचीच आहेत , उपस्थित सर्वानीच या मुलांच्या भवितव्यासाठी चांगला आर्थिक प्रतिसाद दिला ,तसेच शहीद जवान प्रमोद महाबरे यांच्या दोन्ही मुलांना कु. अथर्व आणि कन्या वेदिका यांना देखील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली, त्या बद्दल सर्वांचे आभार .
श्री कोरे सर निवृत्त शिक्षक मंगळवेढा यांनी सलाम ही कविता सादर करुण शहीद जवानांना सर्वाना सलाम केला.
प्रमुख अतिथि डी. कनकरत्नम (IPS) यांनी आपले जवानांबद्दल व शहीद परिवाराबद्दल मनोगत व्यक्त केले , साहेबांनी सांगितले की जवान ड्यूटीवर असतानाही त्यांच्या परिवाराची काळजी घ्यावी , साहेब नक्कीच जयहिंद काळजी घेत आहे व यापुढे ही घेत राहिल.
श्री संदीप माने साहेब (अध्यक्ष:-जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य) यांनी जयहिंद फाउंडेशनने जे काही करायचे बोलले ते आपन सर्व अविरत व अगदी मनापासून करु. जयहिंद भारतभर न्हवे तर भारता बाहेर ही काम करेल, सैनिक व त्यांच्या परिवाराची काळजी हे प्रथम कर्त्तव्य असेल, आपन जे कार्य हाती घेतले आहे ते सर्वांच्या सोबतीने नक्कीच पूर्ण करू.देशात शांती प्रस्तापित करू....
आपल्यासाठी जो सैनिक शहादत पत्करून देशसेवेचे वृत पूर्ण करतो त्याच्या आईवडिलांच्या ईच्छा आकांक्षा ज्यामुलाने पूर्ण कराव्यात व म्हातारपणीच्या काठीच आधार व्हावा असा त्यांचा आधारस्तंभ आपल्या सगळ्यांच्या संरक्षनार्थ शहिद होतो, त्या वीर मातापित्यांचा आधार, त्यांच्या छोट्या छोट्या ईच्छा व वृद्पकाळातील सगळा आधार देशसेवा करताना हरपतो व ते मातापिता न बोलतां आपले आयुष्य जगू लागतात...
लग्नानंतर लगेचच किंवा थोड्या दिवसात, महिन्यात वीरमरण आलेल्या वीरांची पत्नी आयुष्याचा सोबती गेल्यानंतर स्वत: एकाकी आयुष्य जगताना, मुला प्रमाने सासुसासरे यांची सेवा करते, म्हणते कि माझे पती प्रथम त्यांचा मुलगा होता, नंतर माझा पती. म्हणून मला जेवढ दुःख आहे, तेवढ किंवा जास्त त्यांनाही आहे. देशासाठी गेलेल्या पतिच्या पाठी मुलगा होऊन सासू सासर्सांची सेवा करन्याचे वृत हाती घेऊन येणार्या अनंत अडचणींवर मात करत आयुष्य जगताहेत.
लहान मुल ज्यानी आपल्या वडिलांना पाहीलही नाही, व ज्यानी पाहिलंय पण आटवत नाही, ते म्हणतात वडील गेले आम्ही सुद्धा सेनेत भरती होणार व पोशाख सुद्धा सेनेचा वापरतात.....केवढ हे देशप्रेम, विरपत्नीचा निश्चिय, व आईवडिलांच अवाढव्य ह्रृदय......
सैनिक हा आपल्या घरातला नाही किंवा सैनिकाच्या कुटुंबातील आपन नसल्याने आपन तटस्थ राहून पहातो, शहिदाबद्दल चार दिवस वाईट वाटते व नंतर आपन विसरतो.....म्हणून जयहिंद म्हणते उठा तो सैनिक आपल्यासाठी शहिद झाला आहे, आपन त्याचे राहीलेले कर्तव्य पूर्ण करू, त्या निस्वार्थ कुटुंबाची सेवा करू....
त्यांना आपल्यावर गर्व वाटावा व आपल्यासाठी दिलेले बलिदान व्यर्थ ठरू नये यासाठी एकत्र येऊन त्या परिवाराला सन्मान द्या व त्यांना जिथे लागेल तिथे मदत करून आपले कर्तव्य पूर्ण करा... असे आव्हान श्री. माने साहेबानी (अध्यक्ष- जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य) समस्त भारतवासीयांना केले.
एक दिवस आपण शहीद सैनिक परिवार सोहळा न घेता शूरवीर सैनिक व परिवार सन्मान सोहळा नक्कीच घेणार आहोत.*
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ले. जनरल राजेंद्र निंभोरकर साहेब यांचे भाषण उरी हल्यानंतर करण्यात आलेला पहिला सर्जिकल स्ट्राइक याचा थरार , छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन यशस्वी पार पाडला या विषयी उपस्थित सर्वाना सांगितले वेळे अभावि जास्त नाही बोलता आले पन जे काही त्यांनी सांगितले ते अंगावर शहारे आननारे होते , या ऑपेरशन मधील महत्वाचे मुद्दे त्यांनी सर्वाना थोडक्यात सांगितले व काहीनी या सर्जिकल स्ट्राइक वर टिका ही केली होती त्यांना त्यांनी उत्तर दिले की ही सेना तुमचीच आहे तुमच्या सेनेवर तुमचा विश्वास हवा एवढेच वाक्य बोलून भाषण संपवेल 🙏
कार्यक्रमाचा शेवट श्री अनिल अनपट(जयहिंद फाउंडेशन उपाध्यक्ष) यांनी सर्वांचे आभार मानुन केला , यात सर्वांचेच आभार होते हा कार्यक्रम पार पाडन्यासाठी सर्वानीच खुपच मेहनत घेतली त्या सर्वांचेच आभार, या कार्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचेच आभार.
जास्त नाही बोलता आले पन जे काही त्यांनी सांगितले ते अंगावर शहारे आननारे होते , या ऑपेरशन मधील महत्वाचे मुद्दे त्यांनी सर्वाना थोडक्यात सांगितले व काहीनी या सर्जिकल स्ट्राइक वर टिका ही केली होती त्यांना त्यांनी उत्तर दिले की ही सेना तुमचीच आहे तुमच्या सेनेवर तुमचा विश्वास हवा एवढेच वाक्य बोलून भाषण संपवेल.
कार्यक्रमाचा शेवट श्री अनिल अनपट(जयहिंद फाउंडेशन उपाध्यक्ष) यांनी सर्वांचे आभार मानुन केला , यात सर्वांचेच आभार होते हा कार्यक्रम पार पाडन्यासाठी सर्वानीच खुपच मेहनत घेतली त्या सर्वांचेच आभार , या कार्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचेच आभार.
जयहिंद,
ReplyDeleteखरोखर खूप सुंदर आणि नियोजन बद्ध असा कार्यक्रम होता, आणि खरोखर समाजात वावरतांना प्रत्येकांना आपल्या सैक्कांच्या प्रति आदर भाव, आनि त्यांच्या प्रति आपुलकीची भावना ही असायलाच पाहिजे, आणि हेच या कार्यक्रमातून लक्षात येते
जय हिंद ...
ReplyDeleteजय हिंद फाउंडेशन जे कार्य हाती घेतले आहे ..ते अभिमानास्पद आहे आम्हाला त्याचा गर्व आहे त्यासाठी आम्ही सदैव आभारी आणि सदैव साथ राहू असेच मदत करत राहू ..आपल्या कार्याला सलाम
जय हिंद
आपला सैनिक
अविनाश भोसले
लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही...
ReplyDeleteयाच कारणाने तिळगुळ आम्हाला आजही गोड लागत नाही,
याच कारणाने आमच्या आयाबहिनी संक्रांती सारख्या मोठ्या सणाला काळी वस्त्र परीधान करतात ...
भारतीय इतिहासात अजरामर असलेल्या पानिपतच्या रणसंग्रामाला आज तब्बल २५९ वर्षे पूर्ण झालीत.
अहमदशाह अब्दालीच्या प्रचंड फौजेशी मावळे प्राणपणाने लढले.
स्वराज्य आणि स्वधर्माच्या रक्षणार्थ हजारो मराठा वीर योध्दे या निकराच्या लढाईत कामी आले.
१४ जानेवारी १७६१ हा दिवस आम्ही कदापि विसरणे शक्य नाही.
पानिपत.....
दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या.
उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली.
पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला.
युद्ध !
युद्ध म्हटले कि त्याची परिणती विजय किंवा पराभव. पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का ?
मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले, म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का ?
या युद्धानंतर काय झाले ?
खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण.
तीन पिढ्या मराठ्यांच्या गेल्या, पण कणा मोडला तो गनिमांचा ! शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली.
अब्दालीचे कंबरडे मोडले आणि नशिबही.
घरी जाऊन तो मेला.
पुन्हा अल्लाह हु अकबर च्या आरोळ्या खिंडीपलीकडून आल्या नाहीत.
अर्यावार्ताला पुन्हा त्या सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही.
हेच तर साधायचे होते या युद्धातून !
साधले ही !
पराभव कुठे झाला !
पानिपत हि मराठ्यांनी देशासाठी दिलेली सवोत्तम आहुती होती. आहुती म्हणजे देशप्रेम.
पुन्हा मराठ्यांकडे कोणी देशप्रेमाचे दाखले मागू नयेत !
मराठे एकाकी लढले !
बचेंगे तो औरभी लढेंगे म्हणणारे दत्ताजीचे मराठे भुकेल्या पोटी आणि तहानलेल्या ओठी एकाकी लढले. राजपूत, जाट कोणी-कोणी म्हणून कोणी आले नाही! एकवेळ अब्दाली चालेल पण मरहटे नकोत !
एक होऊन लढले नाहीत सगळे,
#मराठा_एकाकी_पडला,
#पण_अडला,
#नडला_आणि_थेट_भिडला !!!!
पानिपत म्हणजे जाज्वल्य अभिमान !
सर्वोच्च कार्यक्षमता !
ज्यांच्या मातीत देशप्रेम उगवते म्हणतात त्या पंजाब सिंधच्या मातीत सर्वोच्च देशप्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटवलाय, त्याचे नाव पानिपत !
मराठा का एकाकी पडला ??
आपल्याविषयी विश्वास निर्माण कराया का कमी पडला ??
का परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका वाटला ??
आज या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे !
महाराष्ट्राला या देशाचे नेतृत्व करायचे असेल, तर अवघ्या देशाचा विश्वास आपण मिळवला पाहिजे. सर्व देशात आदराचे स्थान मिळवले पाहिजे !!
पानिपत म्हणजे दुसर्यांवर विजय, आणि आपल्याकडून पराभव !!
आपल्याच लोकांमध्ये बेबनाव, आपल्या लोकांमध्ये अविश्वास आणि त्याचा बसलेला खूप मोठा फटका !!
या अर्थी पानिपत एक शिकवण !!
आणि एक गोष्ट तुम्ही नोंद केली असेल…
आम्ही यास लढाई म्हणत नाही,
हे युद्ध !!
महाभारतासारखेच
महत्वाचे !!
मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा,
आपला अभिमान आपले देशप्रेम आपला त्याग,
ज्यावर प्रत्येक मराठ्याला गर्व वाटावा,
आपण न थकता तो सांगावा, देशाला, जगाला !
कारण पानिपत म्हणजे माझ्या राष्ट्राचा हुंकार !
एक पर्व संपले !
आक्रमणाचे, नाचक्कीचे, बलात्कारांचे…
इतिहास अभ्यासकांच्या भाषेत,
मध्ययुग संपले आणि
आधुनिक इतिहासास प्रारंभ झाला,
तो दिवस...
१४ जानेवारी १७६१ !
पानिपत!
चला त्या मर्द मराठ्यांच्या हौतात्म्यासमोर नतमस्तक होऊ या...
सार्थ अभिमान आहे आम्हास आमच्या पूर्वजांचा
पानिपत युद्धात हुतात्मा शुरवीरांना ....
शतश: नमन
🙏🏽 🙏🏽 🙏🏽
🚩॥ जय भवानी॥🚩
॥ जय शिवराय ॥
हर हर महादेव .....
हर हर महादेव ......
फेसबुकवरुन साभार 🙏🏻🌹
⚜🍁⚜🍁⚜🍁⚜🍁
छावणीत लायन्सचे 90 लाखांचे डायग्नोस्टिक सेंटर
ReplyDeleteऔरंगाबाद / प्रतिनिधी - छावणी परिषदेच्या रुग्णालयात दररोज 150 रुग्ण उपचारासाठी येतात. यापैकी 5 ते 7 जणांना सोनोग्राफी, तर 30 ते 50 जणांना विविध चाचण्यांची आवश्यकता भासते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे या चाचण्या केल्या जात नाहीत. अशा रुग्णांसाठी लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सिटीने 90 लाख रुपयांचे डायग्नोस्टिक सेंटर उभारले आहे. गुरुवारी याचे लोकार्पण झाले.
गर्भवती उशिरा रुग्णालयात पोहोचल्याने बाळ दगावले किंवा त्यामध्ये शारीरिक व्यंग असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. 2019 मध्ये छावणीतील महिला घाटीत उशिरा पोहोचली आणि वाटेतच प्रसव होऊन बाळ दगावले. त्यानंतर लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सिटीने या ठिकाणी काम करण्याचा निर्णय घेतला. येथे उभारलेल्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रक्ताच्या विविध चाचण्या, सोनोग्राफी नाममात्र दरात केली जाईल.
लोकार्पण सोहळ्याला लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनचे विश्वस्त विजयकुमार राजू, आंतरराष्ट्रीय निर्देशक डॉ. नवल मालू, ब्रिगेडियर उपेंद्रसिंघ आनंद, प्रांतपाल विवेक अभ्यंकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, कर्नल गुरप्रीतसिंह सिमो, प्रशासकीय अधिकारी विक्रांत मोरे, डॉ. गीता मालू, डॉ. विनोद धोमधारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आलोक अग्रवाल, सचिन अग्रवाल, पवन सवाईवाला, दीपक बगडिया, आशिष अग्रवाल, अनुप धानुका, अंतिम एरेन, शीतल अग्रवाल, जगदीश अग्रवाल, मनोज पाटणी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन विशाल लदनिया यांनी केले.
या उपक्रमासाठी मोठ्या आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती. यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन तसेच मुरारीलाल अग्रवाल परिवार, गुलाबचंद लदनिया परिवार, डॉ. पुरुषोत्तम अग्रवाल, विजय गोयल, आनंद भारुका, आलोक अग्रवाल, आशिष अग्रवाल, रितेश अग्रवाल, चेतन अग्रवाल, राघवेंद्र बगडिया, दीपक अग्रवाल, आशुतोष अग्रवाल, रवी राजपाल, डॉ. संतोष अग्रवाल, अजय अग्रवाल, अभिजित जैन, आशिष तायल यांनी आर्थिक पाठबळ दिले.
औरंगाबादला मोफत पाणी देता येवू शकते - डॉ. पवन डोंगरे
ReplyDeleteमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप
कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास
औरंगाबाद (प्रतिनिधी) - पैठणच्या नाथसागरावर जर सोलार प्लॅन्ट उभा केला तर औरंगाबाद शहरातील जनतेला पिण्याचे पाणी मोफत देता येवू शकते,असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ.पवन डोंगरे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात व्यक्त केला. वार्तालाप कार्यक्रमापुर्वी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष डॉ.प्रभू गोरे व पैठणचे तालुका अध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी डॉ.पवन डोंगरे यांचा सत्कार केला. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना डॉ. डोंगरे यांनी सांगितले की, शहराचे सध्याचे नाव खूपच चांगले आहे. त्यात बदल करण्याचा आग्रह वेडेपणाचा आहे. आपण आपल्या मुलांचे नाव मध्येच बदलु शकतो का? असा प्रतिसवालही डॉ.डोंगरे यांनी केला. शहरातील पाणी, कचरा, रस्त्यांची दुर्दशा या बाबत डॉ.डोंगरे यांनी सेडेतोड भूमिका मांडली. ते म्हणाले की, रस्ते निकृष्ठ असल्यामुळे ठिकठिकाणी खड़े आहेत. हे खड़े बुजविण्याचा खर्च अवास्तव आहे.त्यामुळे १० ते १२ वर्षे खड़ेच होणार नाहीत याची खबरदारी घेणाऱ्या ठेकेदारांकडेच रस्त्यांची निर्मिती करण्याचे काम दिले पाहीजे. रस्त्याचे काम झाल्यानंतर रस्त्याचे आयुष्य निश्चित झाले पाहीजे. हे रस्ते अल्पायुषी ठरणार नाहीत, याची खबरदारी घेणाऱ्या ठेकेदारांकडेच रस्त्याची कामे दिली पाहीजेत, अर्थात बॅण्डेड कंपनीकडेच ही कामे दिली पाहीजेत, असे डॉ. डोंगरे यांनी सांगितले. कचरा प्रश्नांवर बोलतांना डॉ. डोंगरे म्हणाले की, शहरातील कचरा संकलन चांगले आहे. पण संकलित कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते ? त्यावर प्रक्रिया केली जाते की नाही? हा प्रश्न सर्वात महत्वाचा वाटतो. पाणी प्रश्नांवर बोलतांना ते म्हणाले की, शहरातील जनतेला जर मोफत पाणी द्यायचे असेल तर तेही शक्य आहे, पण त्यासाठी नाथ सागरावर एक सोलार प्लॅन्ट उभा केला पाहीजे, हा प्लॅन्ट उभा करण्यासाठी तो खर्च येईल तो महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारनी केला पाहीजे. समांतर वाहीनेची काम कालबध्द कार्यक्रमातून झाले पाहिज,असे अपेक्षा डॉ.पवन डोंगरे यांनी व्यक्त केले. सध्याचे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची वाटचाल अत्यंत समाधानकारक आहे, असे सांगुन डॉ. डोगरे म्हणाले की,ठाकरे सरकारने कोरोना संकटावर खूपच चांगली मात केली आहे. अजुनही कोरोनाची भीती कायम असल्याने सामान्य जनतेने आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉश यांचा वापर केला पाहिजे अंतर राखून दैनंदिन व्यवहार केले पाहीजेत. सध्याच्या परिस्थीत जीव वाचविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. पत्रकारांच्या माध्यमांच्या स्वातंत्र्याविषयी बोलतांना डॉ.डोंगरे म्हणाले की, सध्या पत्रकारांना मनमोकळेपणे व्यक्त होता येत नाही. पत्रकारांवर बंधने नसतील तरच देश प्रगतीकडे वाटचाल करु शकेल. काँग्रेसचा कार्यकाळात पत्रकरांवर कठलीही बंधणे नव्हती.असेही डॉ. डोंगरे यांनी स्पष्ट केले. यावेळी विलास शिंगी, छबुराव ताके, मनोज पाटणी, रमेश जाबा, जॉन भालेराव, माजेद खान, जगन्नाथ सुपेकर, मानसी शिंदे, दुर्गा खरात, गणेश पवार, अंबादास रगडे, सतिष पाटील, एच.आर. लहाने, बाबा अडसूळ, अदित्य बरांडे आदिंची उपस्थिती होती.
फर्दापूर येथे उभारल्या जाणाऱ्या 'भीमपार्क' साठी
ReplyDeleteसर्वांच्या सूचनांचे स्वागत
- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. 18 : जागतिक पातळीवरील पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे, अभ्यासकांसाठी महत्वाचे आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करणारे 'भीमपार्क' उभारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इतिहास, पालीभाषा , बौद्ध धम्म आणि पर्यटन या विषयाचे अभ्यासक या सर्वांच्या सूचनांचे स्वागत करुन हा प्रकल्प उभारण्यात येईल, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून अजिंठा जवळील फर्दापूर येथे दहा एकर जागेवर भीमपार्क उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन हा प्रकल्प उभा राहणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्यातील मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आले होते.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीला औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावळे, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, औरंगाबाद येथिल भन्ते करुनानंद थेरो, नांदेडचे भन्ते विनय बोधी, पुर्णाचे भन्ते उपगुप्त, नासिकचे पाली भाषा अभ्यासक, अतुल भोसेकर, धम्म अभ्यासक डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. ऋषीकेश कांबळे, पुण्याचे डॉ. बबन जोगदंड, मुंबई विद्यापिठाचे डॉ. लक्ष्मण सोनवणे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती वंदना घेवराईकर, नाशिकचे नरेंद्र तेजाळे, लातुरचे यशवंत भंडारे व इतर संबधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी तयार होत असलेल्या स्मारकासाठी अभ्यासपूर्ण लेखी सूचना मागविण्यात येतील. या प्रकारच्या इतर स्मारकांना भेटी देण्यासाठी अभ्यासगटाची नेमणूक करण्यात येईल.
पर्यटन विभागाच्या जागेवर हा प्रकल्प उभा राहणार असून यात डॉ.बाबासाहेब यांचे जीवन ,त्यांचे कार्य आणि त्यांनी केलेली चळवळ, त्यावेळेचे मंत्री, भारतीय राज्यघटनेमधील सहभाग या सर्व बाबींचा समावेश असेल.
दहा एकर परिसरात तयार होणाऱ्या या प्रकल्पास पूर्ण होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी आणि सुमारे 25 कोटी रुपये लागतील. हा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.
मान्यवरांच्या सूचना
या प्रकारचा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे सर्व मान्यवरांनी आभार मानले. या प्रकल्पाच्या उभारणीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
मान्यवरांनी महत्वपुर्ण सूचनाही केल्या.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक भूमिकेसह धार्मिक, आर्थिक आणि राजकीय निती याचा समावेश असावा
• राज्यातील सर्व लेण्यांची माहिती देणारे दालन असावे
• डॉ.आंबेडकर संरक्षण, आंतरराष्ट्रीय धोरण, कामगार, महिला यासारख्या क्षेत्रातील कामांची माहिती इथे मिळावी
• विदेशी पर्यटकांना संशोधनासाठी अभ्यासाची, राहण्याची सोय असावी.
• महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज यांच्यासह सयाजी महाराज गायकवाड यांच्या कामाचीही माहिती मिळावी
• डॉ. आंबेडकर लिहिलेले मराठीसह भिन्न भाषेतील साहित्य उपलब्ध असावे.
• माता रमाई यांच्या विषयीचे दालन असावे
• सम्राट अशोकाने केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाची माहिती असावी
• या ठिकाणी महोत्सव आयोजित करावेत
• भगवान गौतम बुद्ध यांची पूर्णाकृती मुर्ती असावी
• पंचशिलाची माहिती द्यावी
• सातत्याने अभ्यासपूर्ण भर टाकण्यासाठी अभ्यासक नेमावेत
या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून पुन्हा बैठक घेण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री श्री.सत्तार यांनी यावेळी दिले.
समता फाउंडेशनच्या कार्याला राज्यपालांची शाबासकी
ReplyDeleteयुगांडा व झिम्बाब्वेचे मानद वाणिज्यदूत सन्मानित
मुंबई, दि. 24 : अजंता फार्मा तसेच समता फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागात आरोग्यसेवा, कुपोषण मुक्ती, शिक्षण या क्षेत्रात केले जात असलेले सेवाकार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
समता फाऊंडेशनचे विश्वस्त तसेच युगांडा देशाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत मधुसूदन अग्रवाल यांचा राज्यपालांच्या हस्ते कोरोना काळातील जनसेवेबद्दल राजभवन येथे बुधवारी (दि. 24) सत्कार करण्यात आला.
<span lang="MR" style="font-size: 12.0pt; font-family: DVOT-SurekhMR; mso-ansi-language: EN-US;" data-mce-style="font-size: 12.0pt; font-f
#AD-लघुकथा ....... ❤❤❤
ReplyDeleteनुकतेच तिच्या पतीचे निधन झालेले. कालच तेरावा पार पडला. तिच्या दीड वर्षाच्या जुळ्या मुली. शिक्षण जास्त नाही. पण दिसायला देखणी म्हणून एकविसाव्या वर्षी मागणी घालून लग्न झाले. आता पुढे काय असा विचार करुन डोके फुटायची वेळ आली होती. चौदाव्या दिवशी तिने गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवले. अंघोळ करुन बारीक काळी टिकली आणि एक साधासा ड्रेस घालून ती स्वयंपाकघरात आली. सासूबाई भाजी निवडत होत्या. "इकडे ये बाळ" अशी हाक ऐकून बिचारी चुपचाप त्यांच्या समोर उभी राहिली. हलकेच तिला जवळ घेऊन ती माऊली बोलली "जे झालं ते झालं. आता सगळे विसरायचा प्रयत्न कर. सगळ्यात आधी गळ्यात मंगळसूत्र घाल. पूर्वीसारखी टिकली लाव. जे झाले त्यात तुझा काहीच दोष नाही. तुला हवं असेल तर पुढे शीक. बाबा आणि मी आम्ही दोघे मिळून मुलींना सांभाळू. तुला नोकरी करावीशी वाटली तर जरुर कर. देवदयेने आपल्याला काहीही कमी नाही. तुझ्या कोणत्याही निर्णयाच्या आम्ही आड येणार नाही. तुला पुनर्विवाह करायचा असला तरीही आमची आडकाठी नाही. तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. एक लक्षात ठेव घरात कोणतेही शुभ कार्य असेल तर त्यात पहिला मान तुझा. आता आमच्या तीन मुली आहेत असे आम्ही समजतो."
डोळे भरुन वाहताना तिचे लक्ष देव्हा-याकडे गेले. कुलदेवीची मूर्ती जास्तच तेजस्वी वाटली तिला आणि तिच्या डोळ्यांत तिला आपल्या लहानपणी गेलेल्या आईच्या डोळ्यांचा भास झाला.
लेखक :..निरजा देशमुख ... यांनी खरी परिस्थिती लिहिली आहे... . स्त्रियांची बाजु मांडत हे लिखाण केले आहे👉👉👌👌👌
पण छान लिहिले.. आवडले म्हणून पोस्ट केले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌼
#AD-लघुकथा ....... ❤❤❤
ReplyDeleteनुकतेच तिच्या पतीचे निधन झालेले. कालच तेरावा पार पडला. तिच्या दीड वर्षाच्या जुळ्या मुली. शिक्षण जास्त नाही. पण दिसायला देखणी म्हणून एकविसाव्या वर्षी मागणी घालून लग्न झाले. आता पुढे काय असा विचार करुन डोके फुटायची वेळ आली होती. चौदाव्या दिवशी तिने गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवले. अंघोळ करुन बारीक काळी टिकली आणि एक साधासा ड्रेस घालून ती स्वयंपाकघरात आली. सासूबाई भाजी निवडत होत्या. "इकडे ये बाळ" अशी हाक ऐकून बिचारी चुपचाप त्यांच्या समोर उभी राहिली. हलकेच तिला जवळ घेऊन ती माऊली बोलली "जे झालं ते झालं. आता सगळे विसरायचा प्रयत्न कर. सगळ्यात आधी गळ्यात मंगळसूत्र घाल. पूर्वीसारखी टिकली लाव. जे झाले त्यात तुझा काहीच दोष नाही. तुला हवं असेल तर पुढे शीक. बाबा आणि मी आम्ही दोघे मिळून मुलींना सांभाळू. तुला नोकरी करावीशी वाटली तर जरुर कर. देवदयेने आपल्याला काहीही कमी नाही. तुझ्या कोणत्याही निर्णयाच्या आम्ही आड येणार नाही. तुला पुनर्विवाह करायचा असला तरीही आमची आडकाठी नाही. तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. एक लक्षात ठेव घरात कोणतेही शुभ कार्य असेल तर त्यात पहिला मान तुझा. आता आमच्या तीन मुली आहेत असे आम्ही समजतो."
डोळे भरुन वाहताना तिचे लक्ष देव्हा-याकडे गेले. कुलदेवीची मूर्ती जास्तच तेजस्वी वाटली तिला आणि तिच्या डोळ्यांत तिला आपल्या लहानपणी गेलेल्या आईच्या डोळ्यांचा भास झाला.
लेखक :..निरजा देशमुख ... यांनी खरी परिस्थिती लिहिली आहे... . स्त्रियांची बाजु मांडत हे लिखाण केले आहे👉👉👌👌👌
पण छान लिहिले.. आवडले म्हणून पोस्ट केले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌼
पशु पक्ष्यांना जीवनदान देणाऱ्या करोना योद्ध्यांचा राजभवन येथे सत्कार
ReplyDeleteजीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य - राज्यपाल
मुंबई दि १४ : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रती दया व करुणेची शिकवण दिली आहे असे सांगून ज्या लोकांनी करोना काळात पशुपक्षांची सेवा करून त्यांना जीवनदान दिले त्यांनी दैवी कार्य केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
भायंदर (पूर्व) येथील जैसल पार्क चौपाटी कल्याण समिती या समाजसेवी संस्थेच्या वतीने करोना काळात पशुपक्ष्यांच्या अन्नपाणी व आरोग्याची काळजी घेणाऱ्या १५ जीवप्रेमी करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते रविवारी (दि. १४) राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
सेवा परमो धर्म: ही भारतातील संतांची शिकवण आहे. लॉकडाऊन मध्ये जनजीवन ठप्प झाले असताना मुक्या प्राण्यांच्या खाण्यापिण्याची तसेच आरोग्याची दैना झाली. या कठीण काळात ज्या लोकांनी पशु पक्ष्यांना दाणा पाणी, दुध तसेच आजारी प्राण्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था केली त्यांनी साक्षात ईशसेवा केली आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
करोडो रुपये कमवून देखील जो आनंद मिळत नाही तो आनंद एखाद्या मुक्या प्राण्याला पाणी वा अन्न देऊन मिळतो असे सांगून भारतातील लोकांमध्ये करुणा भाव असल्यामुळेच आपण इतर देशांच्या तुलनेत करोनाचा मुकाबला अधिक चांगल्या पद्धतीने करू शकलो, असे राज्यपालांनी सांगितले.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गेले वर्षभर जैसल पार्क चौपाटी कल्याण समितीच्या जीवप्रेमी कार्यकर्त्यांनी पशुपक्ष्यांना अन्न, आजारी प्राण्यांवर उपचार, भटक्या प्राण्यांची नसबंदी तसेच मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार केल्याचे अध्यक्ष डॉ. मोतीलाल गुप्ता यांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी सक्षम फाउंडेशनचे अनुज सरावगी, सीए लीलाधर मोर, सीए नितेश कोठारी, सीए निकुंज भंगारिया, शुभांगी योगेश लाड, संतोष कुचेरिया, हेमलता सिंह, सीए पवन अग्रवाल, सीए अमित अग्रवाल, सुभाष चंद्र जांगिड़, देवकीनंदन मोदी, सुमित अग्रवाल, भरतलाल अग्रवाल, नरेंद्र गुप्ता, व मोतीलाल गुप्ता यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे महासचिव निर्मल गुप्ता यांनी आभार प्रदर्शन केले.
0000
जागतिक जल दिनाच्या निमित्ताने राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या शुभेच्छा
ReplyDeleteपाण्याचे मोल जाणा आणि पाण्याचा अपव्यय टाळा
-- राज्यमंत्री संजय बनसोडे
मुंबई दि. 22 : पाणी हे जीवन असून मानवाच्या आयुष्यात त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यामुळेच आपण सर्वांनी पाण्याचे मोल जाणून पाण्याचा अपव्यय टाळूया, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची काळजी घेणे आणि त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.युनायटेड नेशन ही संस्था जागतिक जल दिनाचे आयोजन करीत असते. त्यासाठी प्रतिवर्षी एक नवीन संकल्पना मांडली जाते. यावर्षीची संकल्पना 'पाण्याचे मोल' ही असून प्रत्येकाने पाण्याचे मोल जाणून घेऊन त्यानुसार पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजन आणि वापर करणे अपेक्षित आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सर्वांना सुरळीत पाणी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द असून त्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग नेहमीच कार्यशील राहिलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पाणी उपलब्धतेसाठी विविध कार्यक्रम, योजना राबविल्या जात असून महाराष्ट्रातील जनतेनेही या कामी शासनास सहकार्य करावे. आपण सर्वांनी आपापल्या परीने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. आजच्या या जलदिनी आपण सारे मिळून पाणी बचतीचा संकल्प करुया आणि आपला महाराष्ट्र जलसमृध्द करुया.
पाणी अनमोल संपत्ती असून या संपत्तीचे रक्षण करणे हे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे पाण्याची गळती अथवा चोरी, अनधिकृत नळजोड, भूजलाचा अत्याधिक उपसा, पाण्याचे प्रदूषण या गोष्टींवरही नियंत्रण राखणे तितकेच गरजेचे असल्याचे राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
००००
पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात
ReplyDeleteड्रोनद्वारे हवाई बीज पेरणीवर भर द्यावा
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· यंदाच्या पावसाळ्यात 4 कोटी वृक्ष लावण्याचे नियोजन
· भौगोलिक प्रदेश व हवामानानुसार वृक्ष लागवड करावी
मुंबई दि. २२ :- पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणीने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यावर वन विभागाने भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वर्षा येथील समिती कक्षात यंदाच्या पावसाळी वृक्ष लागवड नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला. एकंदर 4 कोटी रोपे लावण्यात येणार आहेत असे वन विभागाने सांगितले.
सर्वसामान्य जनतेला आपली वाटावी अशी योजना व्हावी
वृक्ष लागवड करताना पर्यावरणप्रेमी, जंगलप्रेमी तसेच स्वयंसेवी संस्था, युवक यांचा सहभाग घ्यावा .यासाठी त्यांना आवाहन करण्यात यावे. वृक्ष लागवडीसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे. जनतेला आपली वाटेल अशी ही वृक्षलागवड योजना झाली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
भौगोलिक प्रदेश व हवामानानुसार वृक्ष लागवड व्हावी
प्रत्येक भौगोलिक प्रदेशानुसार पावसाळी परिस्थिती व हवामानाची स्थिती,जमीन याचा अंदाज घेवून व जी झाडे उपयुक्त आहेत त्याप्रमाणे वृक्षारोपण करण्यात यावे.वृक्षारोपण करतांना खरे उद्दिष्ट ठरवून खरेखुरे उद्दिष्ट गाठावे.वृक्षलागवडीचा कालबद्ध कार्यक्रम आखावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
पर्यटकांना आकर्षित करणारी शोभिवंत झाडे लावावी
वृक्ष लागवड करताना पर्यटनाचाही विचार व्हावा. शहरी भागात रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांना आकर्षित करणारी शोभिवंत झाडे लावावी. तसेच जपानमध्ये ज्याप्रमाणे माऊंट येशीनो येथे नैसर्गिकरित्या दरी फुलून जाते. त्याप्रमाणे राज्यात डोंगर उतारावर काय करता येईल याचाही विचार वनविभागाने करावा.
झाडांच्या देशी प्रजाती लावण्यावर भर देण्यात यावा जेणेकरून पक्ष्यांना देखील खाद्य व आश्रय मिळेल.
जव्हार, कोल्हापूर, सावंतवाडी, वनविभाग, मेळघाट व अमरावती वनविभाग व नांदेड वन विभागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणी करताना नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळचाही त्यामध्ये समावेश करावा असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
नियोजनबद्ध वृक्ष लागवड व्हावी
वृक्ष लागवड करताना अधिक नियंत्रित पद्धतीने व नियोजनबद्धरित्या करण्यात यावी. यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वन विभागाचे सहसचिव अरविंद आपटे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्वश्री प्रवीण श्रीवास्तव, प्रदीप कुमार, एन. के. राव आदि अधिकारी नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
00000
देवेंद्र पाटील /वि. सं. अ./ दि.22.03.2021
गतिक जल दिनाच्या निमित्ताने राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या शुभेच्छा
ReplyDeleteपाण्याचे मोल जाणा आणि पाण्याचा अपव्यय टाळा
-- राज्यमंत्री संजय बनसोडे
मुंबई दि. 22 : पाणी हे जीवन असून मानवाच्या आयुष्यात त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यामुळेच आपण सर्वांनी पाण्याचे मोल जाणून पाण्याचा अपव्यय टाळूया, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची काळजी घेणे आणि त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.युनायटेड नेशन ही संस्था जागतिक जल दिनाचे आयोजन करीत असते. त्यासाठी प्रतिवर्षी एक नवीन संकल्पना मांडली जाते. यावर्षीची संकल्पना 'पाण्याचे मोल' ही असून प्रत्येकाने पाण्याचे मोल जाणून घेऊन त्यानुसार पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजन आणि वापर करणे अपेक्षित आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सर्वांना सुरळीत पाणी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द असून त्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग नेहमीच कार्यशील राहिलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पाणी उपलब्धतेसाठी विविध कार्यक्रम, योजना राबविल्या जात असून महाराष्ट्रातील जनतेनेही या कामी शासनास सहकार्य करावे. आपण सर्वांनी आपापल्या परीने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. आजच्या या जलदिनी आपण सारे मिळून पाणी बचतीचा संकल्प करुया आणि आपला महाराष्ट्र जलसमृध्द करुया.
पाणी अनमोल संपत्ती असून या संपत्तीचे रक्षण करणे हे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे पाण्याची गळती अथवा चोरी, अनधिकृत नळजोड, भूजलाचा अत्याधिक उपसा, पाण्याचे प्रदूषण या गोष्टींवरही नियंत्रण राखणे तितकेच गरजेचे असल्याचे राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
००००
अंधश्रद्धा निर्मुलन कायदा 2013 ची प्रभावीपणे
ReplyDeleteअंमलबजावणी करण्याचे निर्देश
मुंबई, दि. 23 : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे अंधश्रद्धा निर्मुलन कायदा, 2013च्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात (क्रिमिनल याचिका क्र.469/2015) 5 जानेवारी 2021 अन्वये आदेश निर्गमित केले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
यावेळी गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी, तसेच सामाजिक न्याय व गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 लागू आहे.
कोणत्याही व्यक्तीने स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अशा स्वरुपाची कोणतीही कृती केली असेल आणि या अधिनियमाच्या तरतूदीचे उल्लंघन करुन नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा याची जाहिरात, आचरण, प्रचार किंवा प्रचालन केले तर तो या अधिनियमाच्या तरतूदीखाली अपराध ठरेल आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर शिक्षेस पात्र असेल अशी तरतूद यामध्ये आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले.
या अधिनियमाची अंमलबजावणी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी प्रभावीपणे करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
अंधश्रद्धा निर्मुलन कायदा 2013 ची प्रभावीपणे
ReplyDeleteअंमलबजावणी करण्याचे निर्देश
मुंबई, दि. 26 : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे अंधश्रद्धा निर्मुलन कायदा, 2013च्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात (क्रिमिनल याचिका क्र.469/2015) 5 जानेवारी 2021 अन्वये आदेश निर्गमित केले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
यावेळी गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी, तसेच सामाजिक न्याय व गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 लागू आहे.
कोणत्याही व्यक्तीने स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अशा स्वरुपाची कोणतीही कृती केली असेल आणि या अधिनियमाच्या तरतूदीचे उल्लंघन करुन नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा याची जाहिरात, आचरण, प्रचार किंवा प्रचालन केले तर तो या अधिनियमाच्या तरतूदीखाली अपराध ठरेल आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर शिक्षेस पात्र असेल अशी तरतूद यामध्ये आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले.
या अधिनियमाची अंमलबजावणी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी प्रभावीपणे करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
000
आठवण आणि एका शतकाची
ReplyDeleteद्वारकानाथ संझगिरी
कलकत्त्यात २००१मध्ये लक्ष्मण अजरामर खेळी खेळून गेला. त्याबद्दल गेल्या स्तंभात मी लिहिलं होतं.
त्याच कलकत्त्यात स्टीव्ह वॉ एक अजरामर खेळी १९९८ साली खेळून गेला. ती क्रिकेटच्या मैदानावर नव्हती. ती ऑस्ट्रेलिया साठी नव्हती. ती मानवतेसाठी होती.ती खेळायला बॅट लागत नाही. अत्यंत उदार आणि संवेदनाक्षम मन लागतं. ते स्टीव्ह वॉ कडे होतं.
खरं तर १९९८च्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला चोप दिला होता. चार दिवसात मॅच संपली होती. तो रूमवर परतला तेंव्हा त्याला उदयन ह्या संस्थेचे एक आमंत्रण मिळालं. ती संस्था कलकत्त्यात कुष्ठ रोग्यांच्या मुलांसाठी कार्य करते.
आमंत्रण फक्त स्टीव्ह वॉ लाच का दिलं गेलं?
कारण त्याने मॅच सुरू असताना एक मुलाखत तिथल्या वर्तमानपत्राला दिली होती. त्यात म्हटलं होत " मला वंचित (underpreviliged) मुलांसाठी काम करायचंय. त्यांना मदत करायची आहे."
दुसऱ्या दिवशी उदयन संस्थेच्या शामलू दुडेजा बरोबर स्टीव्ह वाॅ उदयन मध्ये गेला. शहराच्या सीमारेषेवर बराकपुरला जायला एक तास लागला.
उदयन ही संस्था रेव्हरंड जेम्स स्टीवन्स ने
उभी केली होती. १९७० साली तिथल्या पिलखाना झोपडपट्टीतल्या कुष्ठ रोग्यांच्या ११ मुलांना घेऊन त्याने ही संस्था सुरू केली. आईबाप मुलांना सोडत नव्हते. त्यांना भीती होती, मुलं पळवली तर जाणार नाहीत? त्यांचं धर्मांतर तर केलं जाणार नाही.? या मुलांना एक चांगलं आयुष्य द्यायचं हाच त्याचा उद्देश. तो काळ असा होता की कुटुंबात एकाला कुष्ठ रोग झाला की अख्ख कुटुंब बहिष्कृत होई.मुलांना ना शिक्षण मिळे ना नोकरी.
स्टीव्ह वॉ तिथे गेला तेंव्हां उदयन मध्ये २५० मुलं होती.
स्टीव्ह म्हणाला ," जिथून ही मुलं आली ती वस्ती पहायची आहे."
त्याला तिथे नेण्यात आलं.समृध्द ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या स्टीव्हसाठी तो सांस्कृतिक धक्का होता. काळं प्लास्टिक, पत्रे, तुटलेल्या विटांनी बांधलेल्या त्या झोपड्या होत्या.चार दोन भांडी, एखादी चूल, चटई, चादर यापलीकडे तिथे काहीही नव्हतं. ना पाणी ना वीज.!
तिथले कुष्ठरोगी पाहून स्टीव्ह वॉ शहारला.
त्याने कधी कुष्ठरोगी पहिला नव्हता. अमक्याला कुष्ठ रोग्यासारखं वागवलं वगैरे वाक्प्रचार ऐकले होते.झडलेली बोटं, चेहरा, हात पाय तो प्रथमच पाहत होता.
तुटलेल्या बोटाची बाई मुलीचे केस विंचरत
होती. स्टीवने दुभाषा मार्फत तिला विचारलं, " आयुष्या कडून काय अपेक्षा आहेत?"
" काहीच नाही" ती म्हणाली.
श्वास सुरू राहू देत ह्यापेक्षा ती काय सांगणार?
बोटं झडलेली एक बाई विणत होती. स्टीव्ह ते पाहून आश्चर्यचकित झाला.
स्टीव्ह म्हणाला" हे उदर निर्वाहासाठी काय करतात."
त्याला उत्तर मिळालं, " मुलं भिक मागतात"
त्याने विचारलं, " मुली का दिसत नाहीत"
उत्तर आलं ," त्या शरीर विक्रय करतात"
मैदानावर कठीण प्रसंगात धीरोदात्त पणे उभा राहणारा हा माणूस गहिवरला. त्याच्या मनाचा बांध फुटला. त्याची मुलगी त्यावेळी फक्त अठरा महिन्याची होती. बघता बघता ती त्याच्या डोळ्यासमोर मोठी झाली. आठ वर्षाची झाली, आणि शरीर विक्रय करतानाचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. नुसत्या विचाराने त्याला घाम फुटला
त्याने तिथल्या तिथे सांगितलं, " ह्या मुलींसाठी काहीतरी करूया. त्यांना मुलाप्रमाणे, नवं, वेगळं, सन्मानाचं आयुष्य जगण्याचा हक्क आहे."
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात कुष्ठ रोग्यां बरोबरचा स्टिव्ह वाॅचा फोटो झळकला. शहरावर अशी भळभळणारी जखम आहे आणि औषध उपचार होत नाहीत, हे शहराला जाणवलं. एक सेलिब्रिटी ही गोष्ट एका नुसत्या एका फेरीने करू शकला.
स्टीव्ह वॉ तिथेच थांबला नाही. त्याने उदयन साठी पैसे उभारायचे ठरवले. तो , त्याचं नाव, त्याचा लौकिक,त्याची विश्वासार्हता, पणाला लावायला तयार झाला. तो खिशात हात घालणार होता.तो पुरस्कर्ते शोधणार होता. तो देणग्या जमावणार होता. तो मदतीसाठी कार्यक्रम आयोजित करणार होता. तो उदयन साठी जाहिरातीचे करार करणार होता. त्याने आपल्या संघाला सर्व कल्पना दिली. संघ त्याच्यामागे उभा राहिला. एक डिनर आयोजित केलं गेलं. खेळाडूंच्या विविध गोष्टींचा लिलाव केला आणि तिथल्या तिथे एक रक्कम दिली. उदयन कडे जागा होती
मुलींच्या हॉस्टेलच्या पायाचे पैसे उभे राहिले.
: त्याने एक मुलगी दत्तक घेतली. नाव लखी कुमारी. ती पोलिओमुळे पंगू झाली होती. आईवडील कुष्ठरोगी. तीचं मन पंगू झालं होते. उदयन मध्ये पाहिले सहा महिने तिच्या चेहऱ्यावर फक्त भकास भाव असत. नंतर ती नाचायला ,गायला लागली. अभ्यासातही हुशार होती.पण स्टीव्ह म्हणतो," मुले दत्तक घेऊन फार साध्य होत नाही. ज्यांची निवड होत नाही ती मुलं हिरमुसतात. त्यापेक्षा सर्वांवर पैसे खर्च करणं योग्य."पूढील पानी
आठवण आणि एका शतकाची
ReplyDeleteद्वारकानाथ संझगिरी,- ऑस्ट्रेलियातील एका दांपत्याने मुलींना ३०० बेड पाठवले. ती मुलं वेडावली. आयुष्यात पहिल्यांदा ती बिछान्यावर झोपत होती.
मग ऑस्ट्रेलियातून वैद्यकीय विद्यार्थी ह्या मुलांना वैद्यकीय मदत द्यायला स्वखर्चाने यायला सुरवात.झाली. २३ वर्ष झाली ह्या गोष्टीला. उदयन हा स्टीव्ह वॉ साठी आयुष्याचा भाग आहे.
तो म्हणतो, " उदयन च गेट उघडून आत गेलो, कि वंचित मुलांसाठी काही तरी केल्याचं समाधान मिळतं." हे समाधान पैशाने विकत मिळतं नाही. पैसे देऊन मिळतं.
स्टीव्ह वॉ साठी ही खेळी त्याने मिळवलेल्या वर्ल्ड कप एवढीच प्रिय आहे
मानवतेला झेंडा नसतो, धर्म नसतो, राष्ट्रगीत नसतं, देश नसतो, भाषा नसते हे स्टीव्ह वॉ ने दाखवलं. कुष्ठरोग्यांची सेवा करायला बाबा आमटेच व्हावं लागतं असं नाही. तो देवाचा माणूस. तो त्यांच्यातच राहिला. पण एक सेलिब्रिटी आपलं संपन्न आयुष्य जगता जगता, हृदयाचा एक कोपरा,आयुष्याचा छोटा काळ त्यांना देऊ शकतो. त्यातून शेकडोंच आयुष्य बदलू शकतो.
आजच्या, आयपीएल च्या समृध्द ताटात जेवणार्या क्रिकेटपटूंना एकच सांगायचंय.
जगा समृध्द ,जेवा भरपेट, पण दोन घास वंचितांसाठी काढून ठेवायला विसरू नका. काही कुटुंब त्यातून मीठ भाकर खातील.
मग आम्ही स्टीव्ह वॉ प्रमाणे तुमच्यासाठी म्हणू," तेथे कर माझे जुळती"
🛑 *जय सदगुरू* 🛑
ReplyDelete*एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली. एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्या सारखीच आहे असे दिसले, राजाला आश्चर्य वाटले. सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का.? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला. राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रडू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली, तेंव्हा राजा म्हणाला "अशी भेट वारंवार भेटत नाही." मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे. मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण... त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अनमोल आहे. असे सुंदर जीवन परत मिळणार नाही.*
🌴 *बोध* 🌴
*या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे*
🌸🌸
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती,
ReplyDeleteअभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा, गर्दी नकोच, शिस्तीचे दर्शन घडवा
-- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
· जयंती समन्वय समितीचा ‘ ब्रेक दि चेन’ ला प्रतिसाद
· प्रथा-परंपरेनुसार जयंती उत्सवाचे स्मारकांतून थेट प्रक्षेपण होणार
मुंबई, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केले जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित व्यापक बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.
बैठकीत जयंती समन्वय समितीच्यावतीने 14 एप्रिल या जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे आय़ोजन केले जाईल. चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी न करता अभिवादन केले जाईल आणि राज्यभरातील अनुयायांनाही जयंती साजरी करण्याच्या शासन परिपत्रकातील नियमावलींचे पालन करून साधेपणाने जयंती साजरे करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दूरदृश्य प्रणाली माध्यमातून आयोजित या बैठकीस गृह मंत्री दिलीप वळसे- पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार राहूल शेवाळे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, मुंबईचे पोलीस आय़ुक्त हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक गणेश रामदासी यांच्यासह मध्य रेल्वे, बेस्ट आणि विविध यंत्रणांचे वरीष्ठ अधिकारी तसेच जयंती समन्वय समितीचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, महेंद्र साळवे, नागसेन कांबळे, भदंत बोधी आदी मान्यवर उपस्थित होते.
Continue. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, गेल्यावर्षी पूर्ण लॉकडाऊन होते. पण विषाणूने केवळ शिरकाव केला होता. आता मात्र निर्बंध कमी केले आहेत. पण विषाणूने आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. दिवसागणिक रुग्णवाढ होऊ लागली आहे. जोपर्यंत आपण मनापासून शिस्त पाळत नाही, तोपर्यंत ही रुग्णवाढ कमी होणार नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन करावे लागत आहे. कमीत – कमी गर्दी आणि नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागेल. साधारण परिस्थितीत आपण ज्या प्रथा-परंपरा पाळून जयंती साजरी करतो, त्या सर्व गोष्टी तितक्याच सन्मानपूर्व केल्या जातील. भीमसैनिक आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सन्मान करणारे आपण सर्व डॉ. आंबेडकर यांच्या शिस्तीचे भोक्ते आहोत, हे अशा कठीण परिस्थितीत दाखवून देणे अपेक्षित आणि आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
ReplyDeleteअशा परिस्थितीतही डॉ. आंबेडकर यांचे इंदूमिल स्थित स्मारकाचे काम थांबू दिलेले नाही. तेथील पुतळ्यांची उंची आणि अनुषंगीक गोष्टींना गती दिल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, गर्दी न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांनी जयंती साजरी करता येईल. रक्तदान शिबीरांचे आयोजन करता येईल. पण त्यासाठी आरोग्य विभाग आणि शासनाच्या सर्व यंत्रणांनी पुरेशी खबरदारी आणि पुर्व नियोजन करणे आवश्यक आहे, हे ध्यानात ठेवून या शिबीरांचे आयोजन करावे लागेल. त्याबाबतचे निर्देशही संबंधित यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
जयंती समन्वय समितीने जयंती साधेपणाने साजरी करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल आणि स्वीकारलेल्या समंजस भूमिकेचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.
गृहमंत्री श्री. वळसे-पाटील म्हणाले की, ब्रेक दि चेनच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन व यंत्रणा यांना सर्व सहकार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी झालेल्या चर्चेत गृहराज्यमंत्री श्री. पाटील, खासदार श्री. शेवाळे यांच्यासह जयंती समन्वय समितीच्या सदस्यांनी सहभाग घेतला व महत्वपूर्ण सूचना केल्या.
जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकस्थळावरून थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची सुविधा तसेच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांसाठी सुविधा याबाबतही सूचना करण्यात आल्या. त्याबाबत कार्यवाहीचे निर्देशही यावेळी संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
🩸रक्तदान हेच खरं श्रेष्ठ दान🩸
ReplyDeleteसंपूर्ण देशात तसेच आपल्या महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी देशाचे नेते *आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी* संपुर्ण राज्यात रक्तदान शिबिर घेऊन राज्यात असलेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यव्यापी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत मुरूड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने तालुका अध्यक्ष *मा. मंगेशभाई दांडेकर* यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय व शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या सहकार्याने *दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत ठिकाण माळी समाज हॉल मुरूड* येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व तरुण तरुणींनी रक्तदान करण्याचे पवित्र कार्य करून राज्याच्या सेवेत आपलं योगदान देण्यासाठी सज्ज व्हायचं आहे.
हीच ती वेळ राज्याच्या सेवेत आपलं बहुमोल योगदान देण्याची.
हे राज्य माझं आहे या भावनेने आणि तितक्याच प्रेरणेने आपलं योगदान द्यायचं आहे.
#होय मी करणार रक्तदान🩸
🙏
सदैव आपला
*श्री. मनिष हरिश्चंद्र माळी*
तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुरूड तालुका.🙏
*सर्वसामान्यांसाठी कोरोना काळात भाजपा अल्पसंख्याक जैन मोर्चा तर्फे विनामुल्य वैद्यकीय समुपदेशनासाठी विशेष हेल्पलाईन*
ReplyDelete"वीर सेवक" या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रकल्प राबविणार - संदिप भंडारी
कोरोना महामारीच्या संकटकाळात सामान्य माणूस पुरता हतबल झाला असून, हॉस्पिटलमध्ये प्रवेश, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता, प्लाज्माची आवश्यकता, रुग्णाला जेवणाची व्यवस्था अशा अनेक अडचणींमध्ये रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ‘वीर सेवक’ प्रकल्प सुरू केला असून या प्रकल्पाद्वारे विविध आरोग्यविषयक समस्यांच्या समाधानासाठी वैद्यकीय समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आजाराचा संसर्ग झाल्यास काय करावे, कुठे संपर्क साधावा, नातेवाईकांना कशा प्रकारे वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा विविध प्रश्नांच्या समाधानासाठी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा (जैन)चे प्रमुख संदीप भंडारी यांच्या संकल्पनेतून भाजपा अल्पसंख्याक मोर्चा (जैन) च्या वतीने एका वॉर रूमची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये एका विशेष टास्क फोर्सच्या माध्यमातून विविध वैद्यकीय समस्यांच्या समाधान व मदतीसाठी हा वीर सेवक प्रकल्प सज्ज असेल. एका हेल्पलाईन नंबरद्वारे राज्यातील विविध क्षेत्रांतील विशेष जाणकार डॉक्टरांकडून गरजूंना समुपदेशन करण्यात येईल.
लॉकडाउनमध्ये छोट्यामोठ्या आज़ारासाठी डॉक्टरकड़े जाण्यास लोक धास्तावतात. डॉक्टरकड़े जाण्यासाठी घराबाहेर पडलेच, तर संक्रमणाचीही भीती असते. यावर उपाय म्हणुन सामान्य नागरिकांसाठी घरबसल्या स्पेशालिस्ट डॉक्टरचे ऑनलाइन मार्गदर्शन विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपा अल्पसंख्याक मोर्चा (जैन) चे प्रदेश प्रमुख संदीप भंडारी यांनी दिली. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता या संकटकाळात जनतेच्या मदतीसाठी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
या समाजोपयोगी महायज्ञाचे उद्घाटन "भगवान महावीर जन्म कल्याणक" (वीर तेरस) च्या शुभदिनी, दि. 25 एप्रिल रोजी व्हर्चुअल मिटींगच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश अध्यक्ष एजाज़ देशमुख, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
लसीकरण केंद्राला मंगेशभाई दांडेकर मित्र मंडळाचा मदतीचा हात.
ReplyDeleteआज लेडी कुलसुम बेगम हॉस्पिटल मुरूड येथे कोरोना रोगावरील लसीकरणाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी लसीकरणाची पाहणी करण्यासाठी मंगेशभाई यांनी प्रत्यक्ष भेट देत तेथील नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना चांगली सेवा मिळावी आणि कोणताही त्रास होऊ नये यासाठी नियोजनाची माहिती घेतली यावेळी लसीकरणासाठी नोंदणी करताना नेटवर्क चा व्यत्यय येत असल्याने लसीकरणासाठी नागरिकांना ताटकळत राहावे लागत होते शिवाय लसीकरणासाठी स्टाफ ची कमतरता असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची हतबलता लक्षात घेऊन लवकर नोंदणी व्हावी यासाठी नागरपालिकेकडून व पंचायत समितीकडून कर्मचारी पुरवण्यात यावे यासाठी मुख्याधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना विनंती केली आणि नेटवर्क व्यवस्थित मिळावे यासाठी मंगेशभाई मित्रमंडळाने स्वखर्चाने वायफाय बसवून दिली आहे. यामुळे लवकरात लवकर नोंदणी पूर्ण होऊन नागरिकांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. शिवाय लसीकरणासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.
येत्या 1 मे पासून यंत्रणेवरचा वाढणारा ताण यामुळे कमी होणार आहे.
आरोग्य कर्मचार्यांसोबत योग्य ती चर्चा करून पुढील लसीकरणासाठी ताण पडू नये म्हणून प्रशासनाला शक्य ती मदत करण्याचं आश्वासन मंगेशभाई यांनी दिले यावेळी मनिष माळी,अमित कवळे, विजय पैर, विजय भोय, श्रेयस सरपाटील उपस्थित होते.manish mali
बंगाल मधील तृणमूल काँग्रेसकडून होत असलेल्या हिंसाचाराविरोधात
ReplyDeleteआ. अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली येथे
भारतीय जनता पार्टीचे प्रतीकात्मक धरणे.
मुंबई, दि. 5 मे (प्रतिनिधी)
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
या वेळी बोलताना आ. अतुल भातखळकर म्हणाले की, 'पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या असून हे सहन करण्या पलीकडचे आहे. हे प्रकार तात्काळ न थांबविल्यास संपूर्ण देशातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कोरोनाच्या काळातही पश्चिम बंगाल मध्ये जाऊन मोठे आंदोलन करतील.
आपणच आपले घर लुटायला कसे आमंत्रण देतो?
ReplyDelete*आपल्या जवळचीच घडलेली सत्य घटना*
( थोडजड जाईल पण हीच सत्य परिस्थिती आहे)
*शाळेत पालकसभेला गेलो होतो, तेव्हा तेथे खास पोलिस अधिकारी ही आले होते, आमची सभा भरवली गेली व त्यांनी आपले वक्तव्य मांडले , " तुमच्यापैकी कितीजन facebook वापरतात?"*
*जवळजवळ सर्वांनी आपले हात उंचावले. तेव्हा त्यांनी एका पालकाला निर्देशून म्हटले, "तुमचे fb friends किती आहेत?"*
*तो इसम ऐटीत बोलला "साहेब पाच हजार!!" जमलेले सर्व आ वासून पाहू लागले. पुढचा प्रश्न विचारला गेला, "यातल्या किती जणांना तुम्ही प्रत्यक्षात ओळखता किंवा भेटला आहात ?"* *आता मात्र त्या व्यक्तीला कसंस वाटू लागले व बोलले," फार फार तर एक हजार"*
*अधिकाऱ्यांनी त्यांना बसायला लावले व त्यांनी आपले पुढील वक्तव्य सुरु केले,*
*"बघा, म्हणजेच चार हजार व्यक्तींचा त्यांच्याशी फक्त FB परिचय आहे. त्यावर पोलीस अधिकार बोलले आमच्या वारंवारच्या निरीक्षणात व अभ्यासातून असे आढळून आले की, दर पाच माणसांच्या मागे किमान एक criminal mind विचार असतात. आज कालच्या स्वार्थी वातावरणात जेथे काही ठिकाणी घरातल्यांवर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे व आपण सहजपणे कोणाचीही friend request सहजपणे accept करतो. आणि मानसिक सुख मिळवतो*
*काही दिवसा पूर्वी आमच्या पोलीस स्थानकात एक केस आली होती. आठ वर्षांची मुलगी बेपत्ता आहे म्हणून. खूप तपास केला व नंतर समोर एक भयंकर व धोकादायक सत्य समोर आले........... त्या मुलीचा शाळेतील पहिला दिवस होता.* *मस्तपैकी तयारी करून झाल्यावर तिच्या वडिलांनी एक मुलीचा छान फोटो काढला व FB वर टाकून लिहिलं,* *"My quite baby going to first day of school."* *चार दिवस ती मुलगी शाळेत गेली व पाचव्या दिवशी गेली ती परत आलीच नाही.* *तपासात कळले कि एक इसम शाळेत fb वरचा फोटो घेऊन आला होता व मुलीच्या घरी problem झाला आहे व त्यामुळे मी तिचा काका तिला घ्यायला आलो आहे असे म्हणून घेऊन गेला.* *अजून खोलवर detail काढल्यावर कळाले कि ही मुलगी त्यानंतरच्या चोवीस तासांच्या आत भारताबाहेर पळवली गेली.* *कारण ही criminal लोक अशी असतात की आपल्या fast साखळीने सर्व तयारी व सूत्र आधीच ready करून ठेवतात व दिवस ठरवून पळवून नेतात.*
*त्यांनंतर नाही पैशांची मागणी आली ना कुठला फोन. तीन वर्षे झाली, ती मुलगी अजून बेपत्ता आहे.*
*पालकांनो, आता यात चुकी कुणाची? आपल्याचं एका क्षुल्लक चुकीमुळे आपण मुलगी गमावून बसलो हे त्या बापाला किती खोचत असेल.*
*मुळात ह्या मानसिक समाधानात आपण का अपेक्षा करतो कि आपल्या फोटोवर किंवा तत्सम गोष्टीवर like मिळावं, बाहेरच्या व्यक्तींकडून कौतुक मिळावं व ते ही अंगठा दाखवून,दोन चार comments साठी????*
*ह्या भावनिक आणि मानसिक सोशल मीडिया खेळात आपण आपल्या कुटूंबाच्या व्यक्तीचं सुरक्षित्व हिरावून बसलोय का?? याला जबाबदार आपण आहोत, आपल्या सवयी, आवडी-निवडी एवढ्या विकोपाला पोहचल्या आहेत की त्याशिवाय जगणे व त्यावर नियंत्रण मिळवणे आपल्यालाच कठीण होऊन बसले आहे.*
बऱ्याच वेळा आपली घर लुटण्यासाठी आपण स्वतःहून देतो लुटारुना आमंत्रण!
-●-●-●-●-●-●-●-●-●-●-●-●-
*Fb, whtsapp, insta यावरील selfi, आम्ही इकडे चाललो, इकडे पोहचलो व ते ही proper time सांगून टाकणे* *म्हणजे चोरांना, लुटारूंना आ बैल मुझे मार सारखं होतय. सावरा अन आवरा स्वतःला.*
आपले वयक्तिक आयुष्य , खाजगी मर्यादित राहुद्यात, ह्यातच सुरक्षा आहे.
सायबर गुन्हे जनजागृती अभियान, मुंबई
*जागरूक व्हा, सतर्क व्हा!*
*वृद्धत्व श्रावणबाळाचे .....*
ReplyDeleteकाही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा नितांत सुंदर अभिनय असलेला "नॉट आऊट १०२" हा चित्रपट बघण्यात आला. अमिताभ १०२ वर्षांचा व त्याचा मुलगा ऋषी कपूर ७५ वर्षाचा. ऋषी कपूरला सतत आपण म्हातारे झालेलो आहोत असे वाटत असते तर अमिताभला १०२ व्या वर्षीदेखील आपण तरुण आहोत व जीवन मुक्तपणे अनुभवत मजेत जगले पाहिजे असे वाटत असते. ह्या दोघांच्या विरुद्ध मानसिकतेमधून जो गोंधळ निर्माण होता त्यामुळे चित्रपट खूप मनोवेधक बनला आहे. ह्यात अमिताभ आपल्या मुलासाठी वृद्धाश्रमाचा शोध घेत असतो. असाच काहीसा एक वेगळा अनुभव मला स्नेहसावलीत आला.
एक ७५ वर्षांचे आजोबा चौकशीकरता संस्थेत आले. त्यांना माझ्याशीच बोलायचे होते. किरकोळ देहयष्टी, शरीरावर जाणवणारा मानसिक थकवा, जाड भिंगाचा चष्मा, हातात काठी असे हे आजोबा अत्यंत चिंतातूर स्वरात विचारात होते 'डॉक्टर इथे अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाईल ना हो?' मी म्हणालो आजोबा अजिबात काळजी करू नका इथे तुमची उत्तमरीत्या काळजी घेतली जाईल. त्यावर ते म्हणाले "नाही नाही डॉक्टर मला माझ्यासाठी नाही तर माझ्या आईला इथे ठेवायचे आहे जिचे वय आता ९८ वर्षे आहे. आम्ही घरी दोघेच असतो १० वर्षांपूर्वी माझी बायको कर्करोगाने गेली. माझा मुलगा परदेशात असतो. मी आणि आई दोघेच घरी असतो. आई अगदी ठणठणीत आहे कुठलाही आजार नाही तिला फक्त आताशा कमी ऐकायला येते." मी आश्चर्यचकित होऊन विचारले अहो मग आत्ताच तुम्हाला त्यांना इथे का ठेवावे वाटत आहे?" त्याचे काय आहे डॉक्टर मला मागच्यावर्षीपासून हार्टचा त्रास होत आहे दमही लागतो आहे. मला जर काही झाले तर तिच्याकडे कोण पाहणार? माझ्या जन्मापासून आज ७५ वर्षे आम्ही एकत्र राहत आहोत. मला आईची खूप काळजी वाटते. आजकाल माझ्याच्याने तिची सेवा करणेही होत नाही. त्यांचा हा अनुभव ऐकून मी खूपच आश्यर्यचकित झालो. मी सहज आजोबांना म्हणालो मग तुम्ही आणि आई एकत्रच इथे स्नेहसावलीत का नाही राहत? त्यावर त्यांचं उत्तर खूपच मनाला भिडणारं होते "अहो माझ्या आईला जी माझी सतत सोबत असण्याची सवय आहे ती मोडायची आहे. उद्या मला काही झाले तर ह्या वयात ती हे दुःख सहन करू शकणार नाही. ती जशी आज ठणठणीत आहे तशीच शेवटपर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मलाही तिला इथे सोडताना खूप दुःख होणार आहे पण तिला माझ्याशिवाय राहण्याची पण सवय झाली पाहिजे." हे ऐकून मी अगदी सुन्न झालो. मुलांकडून आईवडिलांकडे दुर्लक्ष केल्या जात असणाऱ्या ह्या काळात एक ७५ वर्षाचा मुलगा ९८ वर्षाच्या आईच्या मनाची एवढी काळजी घेताना बघून मानवी नात्यातील घट्ट वीण आणि ती धरून ठेवताना स्वतःला विसरून ,प्रसंगी त्रास सहन करून देखील दुसऱ्यांचे मन जपण्याचा अट्टाहास करणारे लोक पहिले कि चांगुलपणाच्या पराकोटीत्वाची जाणीव होते......
डॉ बालाजी आसेगावकर
स्नेहसावली केअर सेंटर औरंगाबाद.
आरे मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोषित केल्यामुळे युवराज आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम पूर्णतः बोगस व बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले- आ. अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र."
ReplyDeleteमुंबई, दि. 11 मे (प्रतिनिधी)
आपले तथाकथित पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे मध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान चालविले आहे, हे अत्यंत संतापजनक असून युवराज आदित्य ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णतः बोगस व बेगडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
आरे मध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई असताना सुद्धा ठाकरे सरकारने आरे मधील तब्बल 32310 वर्ग फुटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला. इतकेच नव्हे तर हा परिसर परि-संवेदनशील क्षेत्र असताना सुद्धा केवळ बिल्डरांच्या सोबत असलेल्या 'आर्थिक' संवादातून हा प्रकल्प करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे. मुंबईकरांना फायद्याचा असणारा मेट्रो कारशेड प्रकल्प खोटी कारणे देत आरे येथून इतरत्र हलवून मुंबईकरांचे नुकसान केले, पण आता स्वतः सह बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठीच ठाकरे सरकारचे हे उद्योग सुरू आहेत. याविरोधात भारतीय जनता पार्टी मोठे जन आंदोलन उभारेल व गरज पडल्यास उच्च न्यायालयात सुद्धा जाणार असल्याचा इशारा सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला वाढता प्रतिसाद
ReplyDeleteमराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीजने दिली २५० बायपॅप श्वसन उपकरणे
जिल्ह्यांतील कोविड केंद्रांना वाटप सुरु
मुंबई दि १९: कोविडच्या दुसऱ्या लाटेला तोंड देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला विविध उद्योग संघटना, व्यावसायिक यांच्याकडून वाढता प्रतिसाद दिसत आहे. नुकतेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि एग्रिकल्चर, पुणे यांनी २५० बायपॅप श्वसन उपकरणे दिली असून जिल्ह्यांमधील कोविड रुग्णालयांना त्याचे वाटप सुरु झाले आहे. यापूर्वी देखील त्यांनी ३०० बायपॅप आणि ३००० ऑक्सिजन कॉन्सण्ट्रेटर दिले होते, ज्यांचे वाटप राज्यातील सर्व जिल्ह्यांना झाले आहे. या संस्थेसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची काही दिवसांपूर्वीच बैठक होऊन त्यात मुख्यमंत्र्यांनी आवश्यक वैद्यकीय उपकरणांबाबत आवाहन केले होते.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेने मिशन वायू हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत ऑक्सिजन संदर्भातील उपकरणे देण्यात येत आहेत, त्याचाच भाग म्हणून ही बायपॅप उपकरणे देण्यात आली आहेत , त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.
यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष सुधीर मेहता आणि महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन या कोरोना संसर्गाची लढाई ज्या रितीने राज्य शासन लढत आहे त्याबद्धल कौतूक केले असून मराठा चेंबर ऑफ कॉमर्ससारखी समृद्ध वारसा असणारी संस्था या काळात आपले योगदान देण्यासाठी नेहमीच राज्य शासनाच्या बरोबर राहील अशी ग्वाही दिली आहे. वन इंटरनॅशनल सेंटरकडून आणखी १ कोटी रुपये उभे करण्यात आले असून त्यातून आणखी ४४ बायपॅप उपकरणे घेणे शक्य झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
कोविडच्या या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. श्वसनाशी संबंधित विकार वाढल्याने या बायपॅप उपकरणांची उपचारात मदत होत आहे त्यामुळे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि एग्रिकल्चर सारख्या संस्थांनी पुढे येऊन केलेली या उपकरणांची मदत निश्चितच महत्वाची आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे
जिल्ह्यांमध्ये वाटप सुरु
आरोग्य विभागामार्फत ही बायपॅप उपकरणे राज्यभरातील सर्व जिल्हा आरोग्य केंद्र तसेच जिल्ह्यातील कोविड केंद्रांना देणे सुरु झाले आहे.
0000
व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड रुग्णालयांना वितरण
ReplyDeleteसामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे
कोविडविरोधी लढ्याला मोठी ताकद
-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 19 :- राज्यावरील कोरोना संकटाचा सामना करताना सर्वांची एकजूट आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्वाचे आहे. लंडन येथील डॉ. अरविंदजी शाह तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने राज्यातील कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात आलेले व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांमुळे राज्याच्या कोरोनाविरोधी लढ्याला ताकद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात डॉ. अरविंद शाह (लंडन) तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात येणाऱ्या व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी विभागीय सहनिबंधक आर. सी. शाह तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, डॉ. अरविंद शाह, मुकुल माधव फाऊंडेशन, ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन यांनी देशातील, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रुग्णांना पाठविलेली मदत कोरोनाविरोधी लढ्याला ताकद देणारी आहे. ही वैद्यकीय मदत रुग्णापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याबाबतची काळजी घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच लंडन येथील डॉ. अरविंद शाह यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधून त्यांचे आभार मानले, अभिनंदन केले.
यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील ग्रामीण रुग्णालय, संगमनेर तालुक्यातील एकलव्य आदिवासी संस्थेचे अश्विन ग्रामीण आयुर्वेदिक रुग्णालय, मांची हिल, तसेच जीवदया मंडळ, संगमनेर नगरपरिषद कॉटेज हॉस्पिटल, पुण्याचे ससून रुग्णालय, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे जगदाळे मामा हॉस्पिटल आदी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
000000
व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड रुग्णालयांना वितरण
ReplyDeleteसामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे
कोविडविरोधी लढ्याला मोठी ताकद
-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 19 :- राज्यावरील कोरोना संकटाचा सामना करताना सर्वांची एकजूट आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्वाचे आहे. लंडन येथील डॉ. अरविंदजी शाह तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने राज्यातील कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात आलेले व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांमुळे राज्याच्या कोरोनाविरोधी लढ्याला ताकद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात डॉ. अरविंद शाह (लंडन) तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात येणाऱ्या व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी विभागीय सहनिबंधक आर. सी. शाह तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, डॉ. अरविंद शाह, मुकुल माधव फाऊंडेशन, ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन यांनी देशातील, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रुग्णांना पाठविलेली मदत कोरोनाविरोधी लढ्याला ताकद देणारी आहे. ही वैद्यकीय मदत रुग्णापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याबाबतची काळजी घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच लंडन येथील डॉ. अरविंद शाह यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधून त्यांचे आभार मानले, अभिनंदन केले.
यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील ग्रामीण रुग्णालय, संगमनेर तालुक्यातील एकलव्य आदिवासी संस्थेचे अश्विन ग्रामीण आयुर्वेदिक रुग्णालय, मांची हिल, तसेच जीवदया मंडळ, संगमनेर नगरपरिषद कॉटेज हॉस्पिटल, पुण्याचे ससून रुग्णालय, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे जगदाळे मामा हॉस्पिटल आदी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
000000
नवी मुंबई, वाशी भाजीपाला मार्केट घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द
ReplyDeleteमुंबई, दि १९ : नवी मुंबई, वाशी भाजीपाला मार्केट येथील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने कोविड-१९ च्या उपचाराकरिता मुख्यमंत्री सहायता निधी साठी ११ लाख रुपयांची मदत देण्यात आली.
आज मंत्रालयात नवी मुंबई, वाशी भाजीपाला मार्केट येथील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघा संचालक, अध्यक्ष, प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
राज्यातील कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी व कोरोनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर रेमडेसीविर व इतर सर्व औषधांची मोठ्या प्रमाणात शासन उपाययोजना करीत आहे.
यापूर्वी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत आज नवी मुंबई, वाशी भाजीपाला मार्केट येथील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्यावतीने ११ लाखाचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सूपूर्द केला आहे.
यावेळी संचालक शंकर पिंगळे, अध्यक्ष कैलास ताजणे, प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, भाऊसाहेब भोर व इतर अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील 104 खाजगी मराठी शाळांचे अनुदान तात्काळ वितरित करा - आ. अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी
ReplyDeleteमुंबई, दि. 21 मे (प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानास पात्र 104 खाजगी मराठी प्राथमिक शाळांना नियमानुसार 50% अनुदान टक्के राज्य सरकार व 50% अनुदान मुंबई महानगरपालिका यांच्याकडून मिळणे अपेक्षित असताना सुद्धा मागील दहा वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेने एका रुपयांचे सुद्धा अनुदान दिले नाही. या शाळांमधील शिक्षकांवर आलेली उपासमार तात्काळ दूर करण्यासाठी या सर्व पात्र मराठी शाळांचे अनुदान तात्काळ वितरित करा अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने कायम विना अनुदानित मराठी शाळांना अनुदान सुरू करून शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न मार्गी लावला होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना सुद्धा व मागील दीड वर्षांपासून ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा मुंबईतील 104 मराठी शाळा अनुदानापासून वंचित आहेत. शासकीय अनुदान मिळत नसल्यामुळे या शाळांमधील अनेक शिक्षक विना वेतन काम करीत आहेत. काही शिक्षक तर स्वतःच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालविणे, कुरियर पोहोचविणे, घरपोच अन्न पोहोचवणे असे मिळेल ते काम करत आहेत. ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याकरिता शरमेची बाब आहे. मागील दीड वर्षांपासून मी स्वतः, भारतीय जनता पार्टी व अनेक शिक्षक संघटनांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वारंवार मागणी करून सुद्धा त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेने 2021-22 च्या अर्थसंकल्पात खाजगी शाळांच्या अनुदानासाठी 380 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तसेच राज्य सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केवळ 47.11 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, परंतु आजपावेतो एकही रुपया या मराठी शाळांना देण्यात आलेला नाही. मुंबईतून मराठी शाळा हद्दपार होत असताना सुद्धा या 104 खाजगी मराठी शाळा कशाबशा मराठी भाषेतून शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे राजकारणासाठी मराठीच्या मुद्द्याचा वापर करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या शाळांच्या अनुदानाचा व या शाळेतील शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अन्यथा आगामी अधिवेशनात या विरोधात आवाज उठविणार असल्याचा इशारा सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
कोव्हीड - 19 आपत्कालीन परिस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना विशेष अनुदान
Deleteनवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रामार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या दिव्यांग मुले व व्यक्तींची नावे नोंदणी करण्याकरीता "स्वीकार" संकेतस्थळाची www.nmmcsweekar.in निर्मिती करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दिव्यांग मुले तथा व्यक्तींकरिता कोव्हीड - 19 मुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीचा हात म्हणून विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याचा कल्याणकारी निर्णय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात येत असून 31 मे 2021 पर्यंत यासाठीचे अर्ज व कागदपत्रे दाखल करावयाची आहेत.
अन्नधान्य व आरोग्य किट खरेदी करण्याकरीता प्रति व्यक्ती रु.1221/- तसेच विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरीता अर्थसहाय्य योजनांतर्गत विशेष अनुदान रु.3000/- उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
ज्या दिव्यांग मुले व व्यक्तींनी नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी केंद्रामार्फत सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांतर्गत सहभाग घेतलेला आहे, त्या दिव्यांग व्यक्तींच्या बँक खात्याचा तपशील व रहिवाशी दाखला ईटीसी केंद्राकडे उपलब्ध आहे. त्यामुळे अशा दिव्यांग व्यक्तींनी पुन्हा अर्ज किंवा कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या बँक खात्यामध्ये विशेष अनुदान रक्कम थेट हस्तांतरित करण्यात येईल.
तथापि, ज्या दिव्यांग मुले व व्यक्तींनी महापालिकेच्या ईटीसी केंद्रामार्फत सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये सहभाग घेतलेला नाही, त्यांच्या बँक खात्याचा तपशील व आवश्यक कागदपत्रे ईटीसी केंद्राकडे जमा नाहीत. त्यामुळे अशा दिव्यांग व्यक्तींनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या "स्वीकार" संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरुन कागदपत्रांसह जमा करणे अनिवार्य आहे.
अर्ज छपाईची उपलब्धता नसल्यास अर्ज ज्या स्वरुपात आहे त्या स्वरुपात कागदावर लिहून जमा करावा. पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, आधारकार्ड, वास्तव्याचा दाखला अशाप्रकारची कागदपत्रे सोबत जोडावीत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्पष्ट उल्लेख असलेला पत्ता व त्यावर दिव्यांग व्यक्तीचे नाव असलेले आधारकार्ड / रेशनकार्ड / लाईटबील / मालमत्ता कर पावती/ बँकेचे खाते पुस्तक / निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत असणे आवश्यक आहे. या विशेष अनुदानाकरिता अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची अंतिम दिनांक 31 मे 2021 अशी आहे.
नागरिकांची सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीकोनातून अर्ज व कागदपत्रे nmmcetcscheme@gmail.com यावर Online किंवा अर्ज प्रत्यक्षरित्या जमा करावयाचा असल्यास सोमवारी कोपरखैरणे व बेलापूर विभाग कार्यालयात, मंगळवारी घणसोली व नेरुळ विभाग कार्यालयात, बुधवारी ऐरोली व तुर्भे विभाग कार्यालयात व गुरुवारी दिघा व वाशी विभाग कार्यालयात सुरक्षित अंतराच्या नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करुन अर्ज जमा करावयाचा आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील ईटीसी केंद्राचे रुगपांतर कोव्हीड केअर सेंटरमध्ये करण्यात आलेले असल्यामुळे त्याठिकाणी अर्ज सादर करण्यास येऊ नयेत असे सूचित करण्यात येत आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त दिव्यांग मुले व व्यक्तींनी या विशेष अनुदानाचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारचा ओबीसींवर पुन्हा अन्याय
ReplyDeleteओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात
आता तरी नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा : देवेंद्र फडणवीस
मुंबई, 29 मे
राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाअंतर्गत राखीव जागांच्यासंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका मा. सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे अखेर ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने अजीबात गांभीर्य दाखविले नाही. मा. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील सुनावणी सुरू असताना 15महिन्यांमध्ये किमान 8 वेळा सरकारने केवळ तारखा मागितल्या. त्याचवेळी एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले होते की, सदर आरक्षणाच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे राज्य सरकारला मागासवर्ग आयोग गठीत करून तसेच इम्पेरिकल डाटा तयार करून आरक्षणाचे समर्थन (जस्टीफाय) करावे लागेल. मात्र, त्यानंतरही यावर कोणतीही कारवाई शासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात पुढची कारवाई स्पष्टपणे विदित केलेली असताना केवळ वेळकाढू धोरण सरकारने अवलंबिले. यासंदर्भात 5 मार्च2021 रोजी सभागृहात मी विषय मांडला, आपल्याकडे बैठक झाली, त्या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग तातडीने गठीत करावा लागेल आणि इम्पेरिकल डाटा सुद्धा तयार करावा लागेल, अन्यथा ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होईल, हा विषय मी आपल्यापुढे प्रकर्षाने मांडला होता. या बैठकीत उपस्थित उपस्थित राज्याचे महाधिवक्ता, विधि व न्याय विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे माजी सचिव या सर्वांनी सुद्धा हीच बाजू उचलून धरली होती. त्यानंतर सुद्धा वारंवार यासंदर्भात मी आपल्याला स्मरणपत्रे पाठविली. पण, त्यावर राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही आणि थोडेही गांभीर्य दाखविले नाही.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली कारवाई न करता केवळ फेरविचार याचिका दाखल केली गेली. ती आता फेटाळली गेल्यामुळे आता यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी वर्गासाठी एकही जागा आरक्षित राहणार नाही. केवळ आणि केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली कारवाई पूर्ण करीत ओबीसी आरक्षणासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करून ते पुनर्स्थापित करण्यासाठी सत्वर कारवाई करावी, अशी विनंती पुन्हा या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
********
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले!
ReplyDeleteअजूनही वेळ गेली नाही, तातडीने पाऊले उचला : देवेंद्र फडणवीस
तारीखवार सांगितला घटनाक्रम
मुंबई, 31 मे
केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात यापुढे होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी एकही जागा राखीव असणार नाही. महाविकास आघाडी सरकारने आतातरी लक्ष घालून पुढच्या उपाययोजना तातडीने हाती घेतल्या पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
प्रदेश भाजपा कार्यालयात एका पत्रपरिषदेत ते बोलत होते. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, मनिषाताई चौधरी, विश्वास पाठक, केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या संपूर्ण दुर्लक्षामुळे हे ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींचा तारीखवार घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कथन केला. ते म्हणाले की, 2010 च्या कृष्णमूर्ती निकालाप्रमाणे 50 टक्क्यांच्यावर आरक्षण जाऊ शकत नाही. प्रपोर्शनल प्रतिनिधीत्त्वाचा आग्रह धरीत सरसकट 27 टक्के सुद्धा देता येणार नाही, असे या निकालात म्हटले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात आपल्या सरकारने 31 जुलै 2019 रोजी एक अध्यादेश काढला होता आणि डाटा सबमिट करण्यासाठी वेळ मागितली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 28 ऑगस्ट 2019 रोजी दोन महिन्यांची वेळ दिली.
28 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पदारूढ झाले. पण, त्यांनी हा अध्यादेश लॅप्स होऊ दिला. 13 डिसेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की, 2010 च्या निर्णयाप्रमाणे 50 टक्क्यांच्या वरचे आरक्षण जस्टिफाय करा आणि पुढच्या तारखेला त्यासंदर्भातील अहवाल सादर करा. यानंतरच्या 15 महिन्यात राज्य सरकार केवळ तारखा घेण्यात मग्न होते. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे कोणतीही कारवाई न करता उलट न्यायालयाला सांगितले की, होय हे ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाते आहे. 15 महिन्यांचा वेळ घालविल्यानंतर अखेर 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वेळकाढूपणावर ताशेरे ओढत हे आरक्षण स्थगित केले. जोवर राज्य सरकार पुढील कारवाई करीत नाही, तोवर हे आरक्षण स्थगित झाले. याच दरम्यान अधिवेशन सुरू असताना 5 मार्च 2021 रोजी मी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्याहीवेळी पुढील कारवाई राज्य सरकारने काय करायला पाहिजे, याचे सविस्तर विवेचन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली. त्याही बैठकीत आपण संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून, इम्पिरिकल डाटा तयार करण्याची प्रक्रिया तातडीने करावी लागेल, हे स्पष्टपणे सांगितले. राज्याचे महाधिवक्ता, विधी व न्याय विभागाचे सचिव आणि ग्रामविकास विभागाचे माजी सचिव यांनीही हाच मुद्दा उचलून धरला. पण, तरीही कारवाई केली नाही. यानंतर सुद्धा आपण सातत्याने पत्रव्यवहार करीत राहिलो, पण राज्य सरकारने त्याची सुद्धा दखल घेतली नाही. गेले 15 महिने केवळ राज्यातील मंत्री मोर्चे काढण्यात मग्न होते. पण, आरक्षणासंदर्भातील कोणतीही कारवाई त्यांनी केली नाही. आता दावे केले जातात की, जनगणना केली नाही म्हणून आरक्षण मिळाले नाही. पण, कृष्णमूर्ती निकालातील परिच्छेद 48 मधील निष्कर्ष-3 (प्यारा 48/कन्क्लुजन 3) मध्ये स्पष्टपणे इम्पिरिकल डाटा हा शब्द वापरला आहे, सेन्सस (जनगणना) नाही. आताही शास्त्रीय आकडेवारी गोळा करण्याचे काम तातडीने केले, तर ओबीसी समाजाला दिलासा देता येईल. ती कारवाई राज्य सरकारने तातडीने करावी, अशी आग्रही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
कृपया प्रसिद्धीसाठी
ReplyDeleteमेट्रोचा खेळखंडोबा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात ट्रायल रनच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी आ. अतुल भातखळकरांच्या नेतृत्त्वाखाली काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन, आ. अतुल भातखळकर यांना अटक”
‘कोरोना संकटकाळात जाहिरातबाजीतून जनतेच्या पैशाचा चुराडा कशासाठी?’ भातखळकरांचा सवाल
मुंबई, दि. ३१ मे (प्रतिनिधी)
संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचा खेळखंडोबा करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निषेधार्थ मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपा सरकारच्या काळात प्रगतीपथावर असलेल्या मेट्रोचे काम आधी हट्टापायी रखडवून, नंतर प्रकल्प किंमत वाढवून आता श्रेयासाठी लाखो रुपयांची जाहिरातबाजी करणाऱ्या मविआ सरकारविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी आकुर्ली मेट्रो स्टेशनबाहेर फलक दाखवून जोरदार घोषणाबाजीही केली. पोलिसांनी आ. भातखळकर यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरेच्या मेट्रो कारशेडला स्थगिती देत कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे तसेच आडमुठ्या धोरणांमुळे प्रकल्पाची किंमत तब्बल 8 हजार कोटींनी वाढली आहे. *माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात केंद्र सरकारच्या मदतीने वेगाने पूर्ण होत आलेल्या मेट्रो प्रकल्पाला ब्रेक लावण्याचे काम ठाकरे सरकारने केले.* आणि, आता *फडणवीसांच्याच प्रकल्पाचे श्रेय लाटण्यासाठी लाखो रुपयांची जाहिरातबाजी करून चाचणी मार्गिकांचे उद्घाटन करण्याचा घाट* ठाकरे सरकार घालतंय, याचा निषेध आ. अतुल भातखळकरांनी केला.
ठाकरे सरकारने आरे येथील मेट्रो कारडेपो इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला खरा पण नवीन मेट्रो कारशेड कुठे करायचा हे अद्याप ते ठरवू शकले नाही. *आरेमध्ये डेपो झाला असता तर आज कुलाबा-सिप्झ मेट्रो धावताना दिसली असती*, परंतु ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळेच अजून केवळ चाचण्या घेण्याची वेळ आली असल्याचे भातखळकर म्हणाले.
कोरोना संकटाच्या काळात मेट्रो उद्घाटनाच्या ठिकाणी लेजर शो करणे, मेट्रो स्टेशन फुलांच्या माळांनी सजविणे आणि प्रसारमाध्यमांमध्ये कार्यक्रमाच्या जाहिराती देत करोडो रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा तो पैसा कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जनतेसाठी वापरता आला नसता का? असा सवालही आ.भातखळकरांनी यावे
ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये
ReplyDelete6 जून रोजी साजरा होणार "शिवस्वराज्य दिन"
भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन करण्यात येणार अभिवादन
राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन करुन कार्यक्रम होणार संपन्न
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई, दि. १ : छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमीपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
यासंदर्भातील निर्देश ग्रामविकास विभागाने ०१ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. यानुसार शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
जिल्हा मुख्यालय येथे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये पदाधिकारी, अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधाबाबत शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करुन हा दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावे व राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करुन कार्यक्रम संपन्न करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार! शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासही मन न दाखवने, अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सतराव्या शतकात या महाराष्ट्रात भूमीपुत्रांचे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधिशांशी, वतनदारांशी अनेक लढाया, युध्दे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणण्यासाठी सर्व जातीधर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार, जिवाभावाचे मावळे एकत्र करुन हा लढा दिला. अनेक किल्ले सर केले. जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला. आपल्या राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक वटहुकुम काढले. या महाराष्ट्रातील तमाम जातीधर्माचे लोक या स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखील भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन होय. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसदरेवरून घोषित झाले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शक कर्ते ही झाले. तो हा शुभदिन होय. महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करुन रयतेची झोळी सुखसमृध्दीने भरली होती आणि याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता. तो दिवस आता दरवर्षी शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
ReplyDeleteमुंबई, दि. 4 : सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे.आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्रासाठी विहित वेळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फम करण्यात आले आहे.
त्यामुळे वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये, यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज करावा, त्यामुळे विहीत वेळेत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन श्री. धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी केले आहे.
०००००
ReplyDelete"आ. अतुल भातखळकर यांच्या माध्यमातून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकासाठी आयोजित तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहिमेचे आज उद्घाटन संपन्न"
महाविकास आघाडी सरकार व मुंबई महापालिकेच्या निष्क्रिय व हेकेखोर कारभारामुळे वंचित राहणाऱ्या 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याकरिता मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या माध्यमातून आणि अपोलो हॉस्पिटल व स्पंदन सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातुन चिल्ड्रन्स अकॅडमी, मालाड पूर्व येथे आयोजित तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहिमेचे आज आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकार व मुंबई महानगरपालिका यांनी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली खरी परंतु ग्लोबल टेंडर मधील आगाऊ भरणा करणार नसल्याच्या अटीमुळे अनेक कंपन्यांनी लस देण्यास असमर्थता दर्शवली आहे. इतकेच नव्हे तर मुंबईतील 45 पेक्षा जास्त वयोगटासाठी केंद्र सरकारकडून पाठविण्यात आलेल्या लसी आपापल्या जिल्ह्यांत व बॉलिवूड मधील लोकांसाठी वापरण्याचा प्रकार सुद्धा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून केला जात आहे. त्यामुळे मुंबईतील 18 ते 44 वयोगटातील लाखो नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळेच आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या प्रयत्नातून 4, 5 व 6 जून या तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहीमचे आयोजन केले असून या अंतर्गत 18 ते 44 वयोगटातील किमान 5000 नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे, तसेच भविष्यात अशा प्रकारचे आणखी लसीकरण अभियान आयोजित करणार असल्याचे सुद्धा आमदार अतुल भातखळकर यावेळी म्हणाले.
तसेच, या लसीकरण मोहिमेअंतर्गत माध्यमकर्मी व पत्रकारांच्या अविरत सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील 100 पेक्षा जास्त पत्रकारांचे सुद्धा मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे आ. अतुल भातखळकर यांनी सांगितले
बार्टी राबविणार वृक्षारोपण पंधरवडा कार्यक्रम
ReplyDeleteमुंबई, दि.4 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) यांच्या विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात दि. 5 ते 20 जून 2021 या कालावधीमध्ये बार्टी अंतर्गत समतादूत प्रकल्पाद्वारे वृक्षारोपण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव, प्राणवायूची होत असलेली कमतरता आणि वाढते प्रदूषण पाहता पर्यावरणाचे रक्षण करणे महत्वाचे झाले आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यात समतादुतांमार्फत कडुलिंब, वड, पिंपळ, आंबा, चिंच इत्यादी मोठ्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून हे सर्व वृक्ष प्राणवायू व सावली देणारे आहेत.
या पंधरवड्यात जे समतादूत जास्तीत जास्त रोपे लावतील व त्यांचे चांगल्याप्रकारे संगोपन करतील त्यांना जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पारितोषिके दिली जाणार आहेत. जागतिक पर्यावरण दिनी 5 हजार वृक्ष लागवड करण्याचे लक्षांक आहे. तसेच पूर्ण वृक्षारोपण पंधरवड्यात एकूण 50 हजार पर्यंत झाडे लावण्याचा बार्टीचा मानस आहे. बार्टीचे समतादूत हे लोकसहभागातून राज्यातील सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी प्रत्येक व्यक्तीने किमान 1 किंवा त्यापेक्षा जास्त झाडे लावावीत व त्याचे संगोपन करावे त्याबाबत बार्टीकडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेण्याकरिता 9404999453/9404999452 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
०००००
ठाणे मनपा, हिंगोली नगरपरिषद, शिर्डी नगरपंचायत आणि पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार
ReplyDeleteमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने माझी वसुंधरा अभियान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अमृत शहरे गटामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि बृहन्मुंबई महापालिका यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक १ हा पुणे महापालिकेने तर उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक २ हा नाशिक महापालिका आणि बार्शी नगरपरिषद (जि. सोलापूर) यांना विभागून प्रदान करण्यात आला.
नगरपरिषद गटामध्ये हिंगोली (जि. हिंगोली), कराड (जि. सातारा) आणि जामनेर (जि. जळगाव) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. परळी (जिल्हा बीड) नगरपरिषदेला उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक १ आणि वैजापूर (जिल्हा औरंगाबाद) आणि संगमनेर (जि. अहमदनगर) यांना विभागून उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक २ प्रदान करण्यात आला.
नगरपंचायत गटामध्ये शिर्डी (जि. अहमदनगर), कर्जत (जि. अहमदनगर) आणि मलकापूर (जि. सातारा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर निफाड (जि. नाशिक) आणि मुक्ताईनगर (जि. जळगाव) यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ क्रमांक १ आणि २ चा पुरस्कार पटकावला.
ग्रामपंचायतींमध्ये पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक), मिरजगाव (जि. अहमदनगर) आणि चिनावल (जि. जळगाव) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. पहुर पेठ (जि. जळगाव) आणि लोणी बुद्रुक (जि. अहमदनगर) यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ क्रमांक १ आणि २ चा पुरस्कारप्रदान करण्यात आला.
उत्कृष्ट कामगिरीसाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हाधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना विभागून प्रदान करण्यात आला. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जळगाव जि.प. चे डॉ. बी. एन. पाटील, अहमदनगर जि.प.चे राजेंद्र क्षीरसागर आणि नाशिक जि.प.च्या लीना बनसोड यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माझी वसुंधरा अभियानाविषयी….
ReplyDeleteमाझी वसुंधरा अभियान पहिल्या वर्षी अमृत शहरे, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत या चार आस्थापनांसाठी एकूण ६८६ स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत राबवले गेले. केवळ काही महिन्यातच माझी वसुंधरा ई-प्लेज (ई-प्रतिज्ञा) या उपक्रमात १.३० कोटीपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आहे. शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्याद्वारा जवळपास १८ हजार जनजागृती कार्यक्रम राज्यभर घेण्यात आले व त्याद्वारे पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचा काळजीपूर्वक वापर, शाश्वत विकास व वातावरण बदलाचे घातक परिणाम याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
अल्पावधीतच माझी वसुंधरा अभियानातून झालेले सकारात्मक बदल :
— या अभियानांतर्गत २१.९४ लाख झाडे लावण्यात आली. आरेतील जंगलाच्या ४ पट झाडे या उपक्रमाद्वारे राज्यभरात लावण्यात आली.
— १६५० हरित क्षेत्रांची निर्मिती शहरात व गावांमध्ये करण्यात आली तसेच २३७ जुनी हरित क्षेत्रे पुनर्जीवित करण्यात आली.
— माझी वसुंधरा अभियानांतर्गत शास्त्रीय पद्धतीने ओल्या कचऱ्याचे विलगीकरण, वर्गीकरण व त्यावर प्रक्रिया करण्यात आले व त्यामुळे १०,६६३ टन कंपोस्ट खत दर महिन्याला तयार करण्यात आले ज्याद्वारे ६३,९८२.५ टन कार्बन डायऑक्साईडचे सेक्वेस्टरेशन करण्यात आले.
— माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांना रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पर्कोलेशन या प्रक्रियांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले गेले. त्याचा परिणाम म्हणून जवळपास ६ हजार जुन्या इमारती व ३.५ हजार नवीन इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमचा अवलंब केला, त्याचबरोबर सुमारे पंधराशे रेन वॉटर पर्कोलेशन स्थाने तयार करण्यात आली. या प्रयत्नांमुळे ११,१४५ दशलक्ष लिटर पाणी संवर्धन क्षमता तयार करण्यात आली आहे, जी महाराष्ट्राला लागणाऱ्या १ दिवसाच्या पाण्याच्या मागणी इतकी आहे.
— सहभागी संस्थांनी राज्यातील ७७५ जलसंस्था स्वच्छ करण्याचे काम पार पाडले.
— अभियानादरम्यान १२.२३ लाख एलईडी बल्ब तसेच ७० हजार सोलर लाईट्स लावण्यात आले, ज्यामधून १.४ लाख युनीट वीज वाचवण्यास मदत झाली आहे.
— ग्रामीण भागात अभियानादरम्यान ७३६ बायोगॅस प्लांट व ७०१ सोलर पंप बसवण्यात आले, ज्यामुळे जवळपास ३२.५ टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाले.
— माझी वसुंधरा अभियानामुळे पहिल्याच वर्षात ३,७०,९७८ टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाले, जे तुलना केल्यास हे प्रमाण १.७ कोटी मोठी झालेली झाडे जेवढा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतील तितके आहे किंवा ३४ आरे जंगले जेवढा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतील तेवढे आहे.
बालगृहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी
ReplyDeleteआधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल
- ॲड. यशोमती ठाकूर
मुंबई, दि. 8 : शासनाच्या बालगृहात असणाऱ्या मुलांची देखरेख तसेच त्यांची दत्तक विधान प्रक्रिया सुलभपणे होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
सॉफ्टवेअर आणि ॲप विकसित करण्याबाबत मंत्री ॲड. ठाकूर यांच्यासमोर दोन स्वयंसेवी संस्थांनी सादरीकरण केले.
शासनाच्या बालगृहात असणाऱ्या मुलांचे चांगल्या कुटुंबात पुनर्वसनाच्या दृष्टीने दत्तक विधान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रयत्न 'व्हेअर आर इंडियाज चिल्ड्रन' ही स्वयंसेवी संस्था करत आहे. याबाबत ॲड. ठाकूर यांनी आढावा घेत संस्थेचे प्रयत्न, प्रक्रिया, सॉफ्टवेअरबाबत माहिती घेतली. मूल दत्तक घेण्यास पालक उत्सुक असतात मात्र त्यांची फसवणूक होऊ नये, अवैधरित्या दत्तक देण्याचे प्रकार होऊ नये यासोबतच दत्तक घेण्याची प्रक्रिया सहज, सुलभ होणे गरजेचे आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असे संस्थेच्या चित्रा बुझरुख यांनी सांगितले.
‘आंगण’ या संस्थेने बालगृहातील मुलांच्या देखरेखीसाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अँड्रॉईड ॲप विकसित करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता धर्माणे यांनी सांगितले, बालन्याय कायद्यानुसार शासकीय, स्वयंसेवी संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या बालगृहांची निरीक्षण समितीमार्फत वर्षभरात चार वेळा तपासणी केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्यासाठी ॲपचा वापर करता येऊ शकतो. ॲपमुळे ही माहिती तातडीने शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध होईल. मुलांच्या आरोग्याचे तपशील, शैक्षणिक प्रगतीबाबत अद्ययावत माहिती सादर झाल्याने आवश्यक मदत देणे, नवे उपक्रम राबवणे सुलभ होईल. राज्यात सध्या 450 बालगृह असून ॲपमुळे कागदोपत्री होणारी प्रक्रिया जलद होऊ शकेल.
याबाबत बोलताना मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, दत्तक प्रक्रिया सोपी, सुलभ करणे तसेच जी बालके बालगृहात आहेत त्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष देणे यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणे कौतुकास्पद आहे. अशा डिजीटल प्रयत्नामुळे किचकट काम सोपे आणि पेपरलेस होईल. याबाबत स्वयंसेवी संस्थांना शासन स्तरावरुन आवश्यक सहकार्य करण्यात येईल.
000
🌹⚜🌸🔆🌅🔆🌸⚜🌹
ReplyDelete*꧁ 🌻आनंदी पहाट🌻 ꧂*
*सर्वश्रेष्ठ दानाची*
⚜⚜⚜
*जागतिक दृष्टिदान दिन*
⚜⚜⚜
💞🔆🥀👁️❣️👁️🌸🔆💞
*जगात भलेही कुणाचा कुणावर विश्वास नसेल पण परमेश्वराचा मात्र त्याने जन्म दिलेल्या मानवी समुहावर नितांत विश्वास आहे.*
*जग विविधतेने भरलेले आहे. जगात काहींना दृष्टी पासून वंचित राहावे लागते. पण मानवी सहृदयतेवर परमेश्वराला विश्वास असतो की या बांधवांना ते नित्य जीवनात वेळोवेळी मदत करतील.*
*विज्ञानाने हे अंधत्व दूर व्हावे म्हणून शोध लावला. चांगली दृष्टी असणाऱ्याच्या मृत्यूनंतर काही तासात नेत्रदान केले तर अंधांच्या जीवनाची पहाट आनंदी होवू शकते. यामध्ये कोणताही धोका नाही*
*समाजात गावोगाव ही नेत्रदान चळवळ सुरु आहे. कॉर्निया प्रत्यारोपणाने अंध व्यक्ती हे जग बघू शकतात. आपण भरुन दिलेल्या स्वेच्छा नेत्रदान पत्राप्रमाणे हे नेत्रदान अर्थातच श्रेष्ठदान करुन जग सोडतानाही पुण्य कमावता येते.*
*आज सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा 'दृष्टीदान दिन' साजरा होतो. दरवर्षी समाज जागृतीने या दृष्टीदान चळवळीला प्रोत्साहन दिले जाते. सामाजिक कार्यकर्ते नेत्रदान जनजागृती अभियान राबवितात, तरीही होणारे मृत्यू आणि त्यानंतर होणारे नेत्रसंकलन यामध्ये मोठी तफावत आहे.*
*ही तफावत कमी करण्यास मृत्यूनंतरची नेत्रदान प्रक्रिया सुलभ आहे हे प्रबोधन हवे. नेत्रदानाचा संकल्प करा.. मृत्युंजय बना.. आपल्या डोळ्याद्वारे एखाद्यास आपल्या डोळ्यांनी जगाचे सौंदर्य बघू द्या. यासाठी जनजागृती करायची.*
*डोळस असो वा अंध मानवी भावभावना.. भरारीची स्वप्न समानच. प्रेम हे कधीच आंधळे नसते तर विश्वासावर अवलंबून असते. जसा भक्त ईश्वराला न बघताच भाविकतेने त्याच्यावर प्रेम करतो.. नदी सागराला न बघता त्याच्यावर प्रेम करते आणि एकदिवस तिथवर पोहोचतेच तसे हे प्रेम.*
*मग नेत्रदानाने जर एखाद्याला आपल्या प्रियकराचे प्रत्यक्ष रुप बघायला मिळाले, तर त्याच्या एवढा जगात आनंद दुसरा कुठलाही असूच शकत नाही.*
🌹🔆🥀👁❣👁🥀🔆🌹
*_तुला पाहते रे, तुला पाहते_*
*_तुझी मूर्त माझ्या उरी राहते_*
*_तुला पाहते रे, तुला पाहते_*
*_जरी आंधळी मी तुला पाहते !_*
*_तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे_*
*_तुझ्या हासण्याने मनीं प्रीत जागे_*
*_तुझ्या गायने मी सुखी नाहते !_*
*_किती भाग्य या घोर अंधेपणीही_*
*_दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही_*
*_उणे लोचनांचे सुखे साहते !_*
*_कधी भक्त का पाहतो ईश्वराला ?_*
*_नदी न्याहळी का कधी सागराला ?_*
*_तिच्यासारखी मी सदा वाहते !_*
🌺🥀🌸🌿🌺🌿🌸🥀🌺
*गीत : ग. दि. माडगूळकर* ✍
*संगीत : सुधीर फडके*
*स्वर : आशा भोसले*
*चित्रपट : जगाच्या पाठीवर (१९६०)*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*👁️ !! नेत्रदान श्रेष्ठ दान !! 👁️*
*!! नियम पाळा, सुरक्षित रहा !!*
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*१०.०६.२०२१*
🌻🥀🌸🌹🤝🌹🌸🥀🌻
राज्यात 16 जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा करणार
ReplyDeleteम्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई, दि. 10 : राज्यात दरवर्षी 10 जून रोजी दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यंदाही यानिमित्त आजपासून ते 16 जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. याकाळात कोरोनापश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसीस आजाराबाबत जनजागृती करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले असून गेल्या वर्षभरात कोरोनाकाळात देखील सुमारे 2 लाख 28 हजार मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा 10 ते 10 जून 2021 या कालावधीत दृष्टी दिन सप्ताह साजरा करण्यासाठी सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, नेत्र शल्य चिकित्सक व आरोग्य कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि उपचार कार्यक्रमांतर्गत मधुमेह रुग्णांकरीता नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून रुग्णांची तसेच म्युकरमायकोसिस डोळ्यांची निगा कशी राखावी याचे मार्गदर्शन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात वेबीनार अथवा दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून लहान मुलांमधील अंधत्व, कोरोनापश्चात म्युकरमायकोसिस या विषयावर वैद्यकिय महाविद्यालय / रिजनल इन्स्टीटयूट ऑफ ऑप्थल्मोलॉजी / अशासकिय स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी तज्ञ डॉक्टर यांचे मार्फत प्रतिबंधक उपचार यावर चर्चासत्र आयोजित करावेत, म्युकरमायकोसिसमध्ये डोळयाची निगा कशी करावी याबाबत जनजागृती करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
शासकीय सेवेतील नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले, खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर 80 हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहिनांचे जीवन प्रकाशमय केले. त्यांचा जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक 10 जून आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती निमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याद्वारे सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या घोषवाक्याचा आधार घेत जाणीवजागृतीचे प्रयत्न सुरु आहेत.
राज्यात आजमितीस 69 नेत्रपेढया, 77 नेत्र संकलन केंद्र, 167 नेत्र संकलन केंद्र कार्यरत आहेत. मार्च 2020 पासून कोरोना महामारीशी लढा देत आहोत. राज्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी कोविड महामारीमध्ये कार्यरत असून देखिल त्यांनी 2 लाख 28 हजार इतक्या मोतिबिंदु शस्त्रक्रिया केल्या. 1355 नेत्र बुब्बुळे संकलन करण्यात आले आहेत.
000
शहरांमध्ये प्राचीन, अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करणार
ReplyDeleteहेरिटेज ट्री ही संकल्पना राबविण्यासाठी कृती कार्यक्रम
राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येईल. “हेरिटेज ट्री” ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठीचा आवश्यक कृतीकार्यक्रम राबविण्यात येईल.
या सूधारणांमध्ये “हेरिटेज ट्री” ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी, वृक्षाचे वय, भरपाई वृक्षारोपण ( compensatory Plantation), मोठ्या प्रमाणात होणारी वृक्ष तोड, महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना, स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची रचना, कर्तव्ये निश्चित करणे, वृक्ष गणना करणे, वृक्ष लागवडीसाठी सामुहिक जमीन निश्चित करणे, वृक्षांचे पुनर्रोपण (Transplantation of Trees), वृक्ष संरक्षणासाठी पर्यायी विकल्पांचा शोध, वृक्ष उपकर आणि दंडाच्या तरतूद या ठळक बाबींचा समावेश आहे.
1) “हेरिटेज ट्री” ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृती कार्यक्रम :
· 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृक्ष हे “हेरिटेज ट्री” (प्राचीन वृक्ष) म्हणून परिभाषित केले जाईल. हे वृक्ष विशिष्ट प्रजातींचे असू शकतील. अशा प्रजातीं वेळोवेळी अधिसूचित करण्यात येतील.
2) वृक्षाचे वय :
· वृक्षाचे वय ठरविण्यासाठी वन विभागाकडे सध्या असलेल्या प्रचलित पद्धतींबद्दल त्यांच्याशी सल्लामसलत करून पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मार्गदर्शक सूचना जारी करेल.
· वृक्षांना “हेरिटेज ट्री” दर्जा देण्यासाठी व “भरपाई वृक्षारोपणांतर्गत लागवड करावयाच्या झाडाची संख्या निश्चित करण्यासाठी” वृक्षाचे वय हा एक महत्वाचा पैलू आहे.
3) भरपाई वृक्षारोपण:
· तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या वयाच्या संख्ये एवढी नवीन झाडे “भरपाई वृक्षारोपण” म्हणून लावण्यात यावीत.
· लागवड करताना किमान 6 ते 8 फूट उंचीची रोपे लावण्यात यावीत.
· हे वृक्षारोपण त्याच ठिकाणी केले जावे. जागा उपलब्ध नसल्यास हे वृक्षारोपण सार्वजनिक जमिनीवर केले जाऊ शकते.
· अशा प्रकारे लावण्यात येणाऱ्या वृक्षांचे जिओ टॅगिंग करून सात वर्षां पर्यत संगोपन करणे आवश्यक राहील.
· नुकसान भरपाई म्हणून वृक्ष लागवड करणे शक्य नसेल तर, तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या मूल्यांकनापेक्षा कमी नसेल एवढी रक्कम अर्जदार जमा करू शकतात.
) मोठया प्रमाणातील वृक्ष तोड :
ReplyDelete· पाच वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची 200 हून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठविला जाईल.
· महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाने झाडे तोडण्याची शिफारस जरी केली तरी, स्थानिक वृक्ष प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणास त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करू शकतील.
· स्थानिक वृक्ष प्राधिकरणाने याची खात्री करुन घ्यावी की, वृक्षांची संख्या निश्चत केलेल्या मर्यादेत ठेवण्यासाठी प्रकल्पांचे लहान लहान भागात विभाजन केले जाणार नाही.
5) महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापनाः
· वृक्षांच्या संरक्षणा संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर एक वैधानिक प्राधिकरण स्थापन केले जाईल.
· प्राधिकरणाची रचना वेळोवेळी अधिसूचित केल्याप्रमाणे होईल.
· स्थानिक वृक्ष प्राधिकरणाच्या कामकाजावर वेळोवेळी लक्ष ठेवणे.
· राज्यभरातील हेरिटेज वृक्षांचे संरक्षण व संवर्धन.
· हेरिटेज वृक्ष तोडीसाठीच्या अर्जांची सुनावणी.
· पाच वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची 200 हून अधिक झाडे तोडण्याच्या अर्जांची सुनावणी.
· संरक्षण आणि वृक्ष संवर्धनाशी संबंधित इतर कोणतेही कार्य
6) स्थानिक वृक्ष प्राधिकरणांची रचना :
· वृक्ष तज्ञ हे स्थानिक वृक्ष प्राधिकरणाचा भाग असतील.
· वृक्ष प्राधिकरणाने घेतलेले निर्णय वृक्ष तज्ञांच्या सल्यावर आधारित राहील.
· नगर परिषदेच्या बाबतीत वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष “मुख्याधिकारी” राहतील.
7) स्थानिक वृक्ष प्राधिकरणांची कर्तव्ये :
· दर पाच वर्षांनी वृक्षांची गणना केली जाते याची खात्री करतील
· हेरिटेज वृक्षांची गणना आणि संवर्धन
· स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड आणि त्यांचे जतन
· नागरी स्थानिक प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील सर्व भूमीवरील वृक्षांचे अस्तित्व सुनिश्चित करणे.
· शहरी स्थानिक प्राधिकरणाच्या किंवा सरकारी मालकीच्या जमिनीवर वृक्षारोपण केले जाईल हे सुनिश्चित करणे. हे वृक्षारोपण वैज्ञानिक पद्धतीने, स्थानिक प्रजातींच्या संरक्षणाच्या दृष्टीने व वृक्षारोपणांतर्गत क्षेत्र हे किमान ३३% असेल या उद्देशाने केले जाईल.
· वृक्षांची देखभाल व छाटणी (pruning) शास्त्रोक्त पद्धतीने आणि तज्ञांच्या मार्गदर्शनावर केली जाते हे सूनिश्चित करणे.
· नुकसान भरपाईसाठीची लागवड व त्याचे संगोपन सूनिश्चित करणे.
· वृक्ष उपकराचा उपयोग वृक्षांच्या संवर्धनासाठी सुनिश्चित करणे.
· महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाने वेळोवेळी नियुक्त केलेल्या इतर कामे / जबाबदाऱ्या पार पाडणे.
8) वृक्ष गणना:
· दर पाच वर्षाने किमान एकदा वृक्ष गणना करावी.
· नवीन तंत्रज्ञानाचा (GIS App) वापरासाठी प्रोत्साहन देणे.
9) लागवडीसाठी सामुहिक जमीन :
*म्हातारपण येणे* '
ReplyDelete*" हा लेख फक्त वयोवृद्ध लोकांसाठीच आहे असे नव्हे, तर सर्वांनी आवर्जून वाचावा असा आहे. म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे का आवश्यक आहे, काय करायला पाहिजे, हे समजावून सांगणाऱ्या कादंबरीची ही एक संक्षिप्त ओळख. "*
*"The Sky Gets Dark, Slowly." हळूहळू आभाळ गडद होत चालले आहे, संधिकाल होऊ लागला आहे.*
*'Mao Dun साहित्य पुरस्कार' मिळालेले "श्री Zhou Daxin" यांची नवी कादंबरी “The Sky Gets Dark, Slowly” लवकरच प्रकाशित होत आहे. वृद्धापकाळातील परिस्थितीचा संवेदनशील शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे, तसेच वेगाने वृद्ध होणाऱ्या लोकांमधील लपलेल्या पण व्यक्त न होणाऱ्या जटिल अशा भावना उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कादंबरीत केला आहे.*
त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की बरेचसे वयोवृद्ध असे वागतात बोलतात की त्यांना जणू काही सगळेच माहित आहे. पण अशा उतार वयात ते लहान मुलांइतकेच अज्ञानी असतात. बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग गुजरणार आहे, किंवा आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे माहित नसते व म्हणूनच त्या दृष्टीने त्यांनी काहीच तयारी केलेली नसते. .
*वयाची ६० वर्षे उलटल्यावर व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण सुद्धा राहणार नाही.*
*१.* :- जस-जसे वय वाढत जाते तस-तसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळू हळू कमी होतील. तुमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल, व समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यग्र-व्यस्त असेल. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरितजीवनातील आनंद कसा मिळवायचा, हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे, त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे.
*२.* :- उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करेल. तुमच्या पूर्वायुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल, अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल, तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला वार्धक्य हे येणारच आणि वार्धक्यात तुमच्या आजू-बाजूला घोटाळणारे लोक, तुमची हांजी-हांजी करणारे लोक तुमच्या पासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल. तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे त्याचे कुठलाही मत्सर न दाखवता, काहीही तक्रार न करता कौतुक करणे, त्याला पसंती दर्शवणे, हेच अशा उतार वयात तुमच्या हातात आहे.
*३.* :- वय झाल्यावर आता पुढचा रस्ता अडचणींचा व अडथळ्यांचा आहे. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूसंबंधी विविध विकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासमोर कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमचे आजार, तुमची दुखणी-खुपणी यांना तुमचे मित्र समजा, कारण यांच्याबरोबरच आता तुम्हाला उर्वरित आयुष्य काढायचे आहे. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशाभ्रमात राहूनका. पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार-विहार करणे हे तुमचे आता कर्तव्य आहे. आणि यात सातत्यठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे.
*४.* :- एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे, ह्याची तयारी ठेवा. आपण मातेच्या गर्भातून ह्या जगात आलो ते प्रथम पलंगावरच. आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढ-उतार, हेलकावे, जीवनसंघर्ष वगैरेचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे, पलंगाकडे येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार ह्या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोचतो, फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण ह्या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही. असे कोणी असले तरी ते आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते. परिचारिका 'nursing staff' वगैरेंवर अवलंबून राहण्याची वेळ वृद्धापकाळात येऊ शकते, पण त्यांच्या जवळ आईची माया कुठून असणार? चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने, कंटाळून, त्या परिचारिका तुमची सेवा करतील. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत रहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा continue next page
५.* :- आता जीवनमार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतीलच. त्यातील बहुतेक जणांना माहित असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे, आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच विचार असे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेजेस पाठवतील, ई-मेल करतील. तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील, 'लवकर श्रीमंत व्हा' यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील, दीर्घायुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील, वगैरे वगैरे. थोडक्यात म्हणजे तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोकं कुठल्याही थराला जातील. म्हणूनच सावध राहा, काळजी घ्या,आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाहीत तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही, म्हणून ह्या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा.
ReplyDeleteशेवटची घटिका येण्यापूर्वी, आयुष्यातील संधीकालात, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्वकाही अंधारून आल्यासारखे वाटेल, आणि ते साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीण होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही. आणि म्हणूनच, *एकदा का वयाची ६० वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा, आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका* व तसे इतरांना दाखवू पण नका. *उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना होईलच, पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल.* आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. *कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे.* निसर्गाचा मार्ग म्हणजेच जगण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत , जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील आपले मार्गक्रमण संतुलित करा.
आपण सर्वांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे, खूप छान, खूप सुंदर
आत्ताच दिवस सुरु झाला ... आणि बघता बघता संध्याकाळचे ६ वाजले.
काल सोमवार होता असे वाटत होते ... आणि आज शुक्रवार आला सुद्धा.
*... महिना संपत आला,*
*... वर्ष संपायला आले,*
*...आणि वयाची ५०, ६०, ७० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही*
*..आपले आई-वडील,आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे?*
चला तर मग, जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊ.
*आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...*
*आपल्या आयुष्यात रंग भरुया ...*
*छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया ...*
*हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया ...*
उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे
तरमग कुठलीही कृती पुढे ढकलू नका
*... हे नंतर करेन*
*... हे नंतर सांगीन*
*... यावर नंतर विचार करेन*
'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे .....
कारण, आपण हे समजून घेत नाही की
चहा थंड झाल्यानंतर ...
प्राधान्य बदलल्यानंतर ...
उत्साह निघून गेल्यानंतर...
आरोग्य बिघडल्यानंतर ...
मुले वयात आल्यानंतर ...
आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...
आश्वासन न पाळल्यानंतर...
दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
आयुष्य संपल्यानंतर ...
आणि ह्या सगळ्या 'नंतर' नंतर आपल्याला कळते अरे बापरे... उशीर झाला की ...
*" आणि म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका.
'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात
उदाहरणार्थ ... उत्तम अनुभव, उत्तम मित्रमंडळी, उत्तम कुटुंब "*
*दिवस आजचा ... आणि क्षण आत्ताचा ...*
*आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही, कारण आता आपले वय उतरणीस लागलेय.*
तर बघूया की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोचवत आहे? कारण, *हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ... तर कदाचित तो पुढे कधीच पाठविला जाणार नाही.*
*जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंत सुद्धा हा संदेश पोचावा.*
*सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा.
कन्येच्या जन्मानिमित्त शेतकऱ्यांना होणार रोपांचे वाटप
ReplyDeleteकन्या वन समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे आवाहन
मुंबई, दि. १५ : ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार असून त्या अनुषंगाने कन्या वन समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे.
ज्या शेतकरी दाम्पत्यास मुलगी होते त्यांना मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यामध्ये नजीकच्या सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून १० रोपे ग्रामपंचायतीमार्फत विनामूल्य दिली जातात. त्यामध्ये ५ रोपे सागाची/सागवान जडया, २ रोपे आंबा, १ फणस, १ जांभूळ आणि १ चिंच अशी रोपे असतात. भौगोलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश असतो. लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीचा कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविणे व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या ऐच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा आहे. ही योजना ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त २ मुली जन्माला येतात व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाते त्यांच्याचपुरती मर्यादित असून, १ मुलगा किंवा १ मुलगी अथवा दोन्ही मुली ज्या कुटुंबात असतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. मागील २ वर्षांत ५६ हजार ९०० लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला असून या योजने अंतर्गत ५.६९ लक्ष एवढी वृक्ष लागवड झालेली आहे.
या योजनेमध्ये संबंधित तालुक्याचे वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांनी ग्रामपंचायतीकडून माहिती घेऊन ती संकलित करून दि. ३० जून पर्यंत संबंधित ग्रामपंचायतींना रोपे उपलब्ध करून द्यावयाची आहेत. ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे त्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत १ जुलै या एकाच दिवशी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज त्वरीत भरुन ग्रामपंचायतीकडे द्यावा व सामाजिक वनीकरण विभागाच्या या योजनेचा लाभ घ्यावा. कन्या वन समृध्दी या योजनेसंबंधीचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण अथवा आपल्या गावाशी संबंधित सामाजिक वनीकरणाचे कर्मचाऱ्यांशी किंवा ग्रामपंचायतीशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाने केले आहे.
ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामूल्य देऊन प्रोत्साहित करणे; वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेतर क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणणे, पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता आदि बाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण करणे, अशा योजनेमधून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे तसेच मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे अशा प्रमुख उद्देशांनी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
विदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी
ReplyDeleteविधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करणार
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 16 : राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून अनुसुचित जातीत समावेश करण्यात यावा, या मागणी संदर्भात मुंबई येथे दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे आमदार यशवंत माने, उपसचिव दिनेश डिंगळे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, कैकाडी समाजाचे नेते लालासाहेब जाधव, हनुमंत माने, जयशंकर माने, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव आदी उपस्थित होते.
कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा याबाबत आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता, परंतु तो प्रस्ताव काही कारणांनी केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून नाकारण्यात आला होता.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत कैकाडी समाजाची लोकसंख्या, त्यांचे प्रश्न, सामाजिक स्थिती याबाबतचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात आला असून, या अहवालात कैकाडी समाजाचे मागासलेपण व अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची निकड अधोरेखित करण्यात आली आहे.
बार्टीच्या या अहवालासह प्रस्तावातील अन्य त्रुटी दूर करून येत्या पावसाळी अधिवेशनात तो मांडण्यात येईल व विधिमंडळाचा ठराव घेऊन तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती श्री.मुंडे यांनी दिली आहे.
००००
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार
ReplyDelete- शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड
पहिले पंधरा दिवस होणार उजळणी
मुंबई, दि. 16 : राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जूनपासून सुरु होतात. त्या प्रमाणे राज्यातील काही शाळांची ऑनलाईन सुरुवात झाली असून सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांसाठी पहिले पंधरा दिवस आणि पुढील एक महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.
शिक्षणमंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोरोनामुळे शाळा सुरु करतांना मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. गेल्या वर्षी नविन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. व्हॉट्सअप, युट्युब या सोबतच दूरदर्शन आणि इतर माध्यमांचा वापर करुन शिक्षण देण्यात आले. यासाठी शिक्षकांसह विद्यार्थी मित्र व इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून दिले.
या वर्षी ब्रीज कोर्सची सोय उपलब्ध केली आहे. यात दहावीच्या विद्यार्थ्याला नववीचा अभ्यासक्रम शिकून सत्र दहावी साठी लागणारा पाया मजबूत केला जाणार आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करतांना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना कालावधीत अनेक कारणांमुळे शाळा सुटलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरु असून त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कार्यरत असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता यालाच प्राधान्य देऊन आरोग्य विभागाच्या समन्वयाने येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती बघून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. असे सांगुन प्रा.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
***
👉 SRA म्हणजे Slum Rehabilitation Authority म्हणजेच मराठीतून झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प.
ReplyDelete👉 म्हणजेच एखाद्या झोपडपट्टी मधील सर्व झोपड्या हटवून अधिकृत झोपडपट्टी धारकांना नवीन इमारतीमध्ये पक्की घरे किंवा सदनिका देण्याची योजना. सदर योजना एखद्या बिल्डर मार्फत राबवली जाते. म्हणजे बिल्डर इमारत बांधतो व झोपडपट्टी धारकांना सदनिका देतो तेही फुकटात.
👉 मग आता यात बिल्डर एवढी समाजसेवा का बरे करत असेल ? तर यामध्ये बिल्डर ला तिप्पट FSI मिळतो. आणि नवीन SRA प्रोजेक्ट ला चौपट FSI करण्याचा प्रस्ताव लवकरच येणार आहे. म्हणजेच समजा एखद्याला घर बांधायचे असेल तर आपल्याला अंदाजे एक FSI मिळतो बर्याचदा तो पूर्ण एक FSI नसतो तर ०.८५ एवडाच FSI असतो. म्हणजे माझ्याकडे ३००० चोरस फुट जागा असेल तर मी फक्त ३००० चौरस फुट च बांधकाम करू शकतो. शिवाय मी जागा अगोदर विकत घेतलेली असते किंवा मला जागा विकत घ्यावी लागते . पण SRA मध्ये झोपडपट्टी धारकांची जागा बिल्डर ला फुकटात मिळते. त्याबदल्यात बिल्डर तिप्पट बांधकाम करू शकतो समजा ३००० चौरस फुट जागा असेल तर ९००० चौरस फुट बांधकाम करू शकतो, त्यातील निम्मे बांधकाम झोपडपट्टी धारकांच्या सदनिकांसाठी वापरले जाते तर निम्मे बांधकाम खुल्या बाजारात विक्रीसाठी वापरले जाते.
👉 म्हणजे बिल्डर ४५०० / ४५०० चौरस फुटाचे दोन प्रोजेक्ट बनवतो एका प्रोजेक्ट मध्ये झोपडपट्टी धारकांच्या सदनिका तर दुसर्या प्रोजेक्टमधील सदनिका बाजारभावाने विकतो . म्हणजे स्वत जागा विकत घेऊन एखादा प्रोजेक्ट करून फक्त एक FSI घेऊन बिल्डिंग बांधायची त्यापेक्षा झोपडपट्टीची जागा फुकटात घेऊन SRA प्रोजेक्ट करून बिल्डर जास्ती चा नफा कमावतो. शिवाय झोपडपट्टी धारकांना सदनिका देऊन त्यांच्यावरही उपकार करतो.
✅ एकदा का तुमचे हक्काचे घर तोडलं की बिल्डर भाडं देणं थांबवतो.
✅ वेळेवर भाडे देत नाही,
✅ अर्धवट भाडे देतो,
✅ वारंवार झोपू कार्यालयात चकरा मारूनही मदत होत नाही.
✅ बिल्डरांच्या ऑफिसला चकरा मारून मारून सर्वसामान्य माणूस अक्षरशः हैराण होतो.
👉 त्यामुळे झोपू प्राधिकरणाने 06 जून 2015 रोजी परिपत्रक काढले आहे व त्या परिपत्रकामध्ये काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
👉 बिल्डरने किमान एक वर्षाचे भाडे दिले पाहिजे, दरवर्षी कमीतकमी 5 ते 10 टक्के भाडे वाढ केली पाहिजे आशा सूचना त्यामध्ये आहेत.
👉 06 जून 2015 चे परिपत्रक अपलोड केलं आहे त्याची लिंक देत आहे पुढे ते डाऊनलोड करून वाचा,
https://m.facebook.com/groups/701981657422356/permalink/787603068860214/
👉 एखादी पात्र व्यक्ती जर का मयत झाली तर काय कार्यवाही करायची आहे याबाबत 05 जून 2015 चे परिपत्रक अपलोड केलं आहे त्याची लिंक देत आहे पुढे ते डाऊनलोड करून वाचा,
https://m.facebook.com/groups/701981657422356/permalink/787603918860129/
👉 पुढे SRA ची वेबसाईट देत आहे त्यावरून परिपत्रके डाउनलोड करून वाचावीत ही विनंती आहे.
परिपत्रके मराठीतच आहेत नावे इंग्लिश मध्ये दिसत आहेत.
👉 SRA https://sra.gov.in//circularm
☑️☑️ मित्रांनो आपण वाचत नाही, आपल्याला पत्रव्यवहार करायचे कळत नाही, आपण कसे पुरावे तयार करून ठेवावेत हे आपल्याला समजत नाही!
आणि सगळ्यात मोठे दुर्दैव आपण चर्चा करत नाही, कोणाला विचारत नाही, मार्गदर्शन घेत नाही.
आणि वेळ निघून गेल्यावर रडत बसतो...
वाचाल तर वाचाल!
मित्रांनो, सगळ्या पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, कॉपी पेस्ट जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा....
#जागोग्राहक #जागोनागरिक जागरूक होऊयात
नागपूर येथे अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी
ReplyDelete200 प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास मान्यता
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई, दि. 17 : अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींकरिता नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आवारात 200 प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता करून या वसतीगृहाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी आणि ज्यू समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना या वसतिगृहाचा लाभ होणार आहे. या विद्यार्थिनींसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच विद्यापीठ आवारांमध्ये वसतीगृह बांधण्याचा निर्णय अल्पसंख्याक विकास विभागामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे वसतीगृह बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या बांधकामासाठी 14 कोटी 82 लाख रुपये इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
नागपूर हे विदर्भ आणि परिसरातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. इथे परिसरातील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पण निवासाची सोय नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होते. किंबहुना यामुळे अनेक मुलींचे शिक्षणही थांबते. यासाठी प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या शहरांमध्ये खास मुलींसाठी वसतीगृहे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरात बांधण्यात येत असलेले वसतीगृह सर्व सुविधांनी युक्त, मुलींसाठी सुरक्षीत अशा पद्धतीने बांधण्यात येईल. नागपुरच्या शैक्षणिक कार्यात हे वसतीगृह महत्वपूर्ण ठरेल आणि विदर्भ परिसरातील अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाला यामुळे मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री श्री. मलिक यांनी व्यक्त केला.
यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राज्यात 23 ठिकाणी वसतिगृहे सुरु
अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता सध्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 23 ठिकाणी वसतिगृहे सुरु आहेत. या वसतिगृहांमध्ये मुलींसाठी सुविधा शुल्क माफ करण्याकरिता आवश्यक असलेली कुटुंब वार्षिक उत्पन्न मर्यादा नुकतीच अडीच लाख रुपयांवरून 8 लाख रुपये करण्यात आली आहे. या 23 वसतिगृहांची संपूर्ण माहिती https://mdd.maharashtra.gov.in ई-शासन आणि डाटाबेस - या लिंकवर उपलब्ध आहे.
महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे
ReplyDelete- उपसभापती डॉ.नीलम गो-हे
मुंबई, दि. 18 : पोलिस प्रशासनाने महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी लक्ष द्यावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी दिले.
विधानभवनात महिलांविषयक तक्रारीसंदर्भात दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठक पार पडली. यावेळी गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, पोलीस महासंचालक (महिला विरोधी अत्याचार प्रतिबंधक) राजवर्धन, संबधित जिल्हयांचे पोलिस अधिक्षक दूरदृश्यप्रणालीव्दारे या बैठकीला उपस्थित होते.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिला दक्षता समित्यांनी प्रभावीपणे कामकाज करावे याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस न झालेल्या बैठका ऑनलाईन स्वरूपात घ्यावात. बालविवाह,पोटगी,सोशल मिडीयामधून वेबसाईटवरून होणारी महिलांची फसवणूक,ऊसतोड कामागार जेंव्हा कामाकरिता स्थलांतरित होतात तेव्हा त्यांच्या अल्पवयीन मुलींकरिता आरोग्य विभाग,पोलिस यंत्रणा व सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून विशेष बाब म्हणून लक्ष द्यावे,त्यांच्या काही तक्रारी आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे.मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटनांचा तात्काळ तपास होणे गरजेचे आहे.जात पंचायतींकडून होणा-या काही घटनांमध्ये तक्रारी येत आहेत वरील सर्व बाबतीत महिलांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याच्या सूचना डॉ.नीलम गो-हे यांनी केल्या.
महिलांविषयक तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी - राज्यमंत्री शंभूराज देसाई
गृहराज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधाचे निकष पाळून महिला दक्षता समित्यांच्या बैठका सर्व जिल्हयात आयोजित कराव्यात. उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या सूचनांसाठी जिथे गृह विभागातील सुधारणांची आवश्यकता आहे तिथे शासनाच्या नियंमानुसार योग्य ती कार्यवाही गृह विभागाने करावी, तसेच सातारा जिल्हयात फक्त पत्राव्दारे आलेल्या तक्रारींवरही पोलिसांनी कार्यवाही केली आहे हा उपक्रम स्तुत्य आहे. महिलांविषयक आलेल्या तक्रारींवर कुठल्याही प्रकारची दिरंगाई न होता तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी दिले.
यावेळी पोलीस ठाणेनिहाय महिलांच्या दक्षता समित्यांची पुनर्रचना करणे,ग्रामीण भागातील कोविड सेंटर मधील महिला रुग्णांची सुरक्षा, कोविडमुळे अनाथ झालेली बालके,महिला अत्यांचार घटनांची घेण्यात येणारी तात्काळ दखल,महिलांसाठी सुरक्षेच्या योजना, प्रत्येक जिल्हयाने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती पोलिस विभागाने दिली.
कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट
ReplyDeleteमुंबई, 18: कोविड पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे 21 जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवेल असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये कळविले आहे.सध्या राज्यात 16 हजार 570 ऑक्सिजन बेडसवर रुग्ण असून ही संख्या 35 हजारापेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही.
राज्यात त्या क्षेत्रातील कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजनसुविधायुक्त खाटा यांच्या आकडेवारीच्या आधारे बंधनांचे कोणते स्तर लागू करण्यात यावेत याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाने 4 जून रोजी जारी केले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 जून 2021 रोजी संपूर्ण राज्यात रुग्णांद्वारे वापरात असलेल्या ऑक्सिजनसुविधायुक्त खाटांची एकूण संख्या 16,570 इतकी असून ही संख्या घट दर्शवणारी आहे.ही संख्या 35,000 पेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दिलेल्या आकडेवारीनुसार 17 जून 2021 रोजी विविध जिल्ह्यांतील ऑक्सिजनसुविधायुक्त खाटा आणि पॉझिटीव्हीटी दर तक्ता नमूद केला आहे.या आकडेवारीच्या आधारे, 4 जून 2021 रोजीच्या शासन आदेशाचा संदर्भ घेऊन त्या त्या प्रशासकीय क्षेत्रात कोणत्या स्तराची बंधने लागू करावीत, याबाबतचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी घेऊ शकतील. एखाद्या जिल्ह्यात एकापेक्षा अधिक प्रशासकीय क्षेत्रे असल्यास त्यांनी या आकडेवारीचे प्रमाणबद्ध विभाजन करून एक एका क्षेत्राचा निर्देशांक निश्चित करावा आणि त्यानुसार निर्णय घ्यावा.
वरील आदेशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याला या आदेशात उल्लेख केलेल्या विविध कामकाजावर बंधने लागू करण्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याच्या संमतीने बदल करण्याची मुभा दिलेली आहे. पायाभूत स्तरात बदल न झाल्यास आणि सध्या लागू असलेल्या आदेशानुसार बंधनांमध्ये कोणताही बदल प्रस्तावित नसल्यास अशाप्रकारच्या बदलांसाठी नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.बंधनाच्या स्तरात कोणताही बदल झालेला असल्यास आणि नव्या स्तरानुसार बंधनांत बदल प्रस्तावित केले असल्यास किंवा स्तर बदलला नसल्यास परंतु लागू असलेल्या बंधनांमध्ये बदल करायचा असल्यास, अशी पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. बंधनांचा कोणताही स्तर कोणत्याही बदलाविना लागू करावयाचा असल्यास संमतीची आवश्यकता नाही अशा सूचना आदेशात दिलेल्या आहेत.
स्थानिक प्रशासनाने प्रत्येक क्षेत्रासाठी घोषित करण्यात आलेल्या स्तरांची अंमलबजावणी सोमवार दिनांक 21 जून 2021 पासून लागू करावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याला 30 जून पर्यंत मुदतवाढ
ReplyDelete- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि.23 : राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत 30 जून पर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत परदेशी नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी 18 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांच्याकडे मुदत वाढ देण्याबाबत विनंती केली होती.
त्यानुसार धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश देत ही मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जूनच्या आत आपले अर्ज दाखल करून घ्यावेत असे आवाहन समाज कल्याण आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
नवनवीन संकल्पनांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून
ReplyDeleteमाझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई, दि. 23 : ‘माझी वसुंधरा अभियान’च्या अंमलबजावणीतील अनुभव आणि अभियानाच्या पुढील टप्प्यांची अधिक प्रभावी अंमलबजावणी याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. ‘वातावरणीय बदल’ घडवून आणण्यासाठी हे अभियान सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असून त्यासाठी नवनवीन संकल्पनांचा अवलंब करण्याची सूचना श्री.ठाकरे यांनी यावेळी केली.
‘माझी वसुंधरा अभियान’च्या कार्यालयात मंगळवारी आयोजित या बैठकीस पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ‘सिआ’ प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय नाहटा, अभियान संचालक सुधाकर बोबडे आदी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, प्रत्येक कार्यात अडथळे असतात परंतु त्याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांच्यावरील उपाययोजनांकडे लक्ष देऊन काम करावे. माझी वसुंधरा अभियान ही एक लहान सुरूवात आहे, आता पुढील टप्यात वातावरणात चांगले बदल घडविण्यात हातभार लावण्याची सर्वांना सवय व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याकरिता जनजागृती होणे आणि विशेषत: तरूणाईला यामध्ये सामावून घेणे आवश्यक आहे. याचा एक भाग म्हणून तरूण पिढीने आपल्या वाढदिवशी आपल्या वयाएवढी झाडे लावावीत, असे आवाहन त्यांनी केले.
माझी वसुंधरा अभियानाचा पुढील टप्पा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती, संस्थांची मदत घेण्याची सूचनाही श्री.ठाकरे यांनी यावेळी केली. समाजमाध्यमांबरोबरच विविध सेवाभावी संस्था तसेच चळवळींच्या माध्यमातूनही याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. माझी वसुंधरा हे अभियान एकूणच वातावरणात चांगला बदल घडवून आणण्यासाठी राबविण्यात येत असल्याने यात आणखी कोणकोणत्या बाबींचा समावेश करता येईल, याचा अभ्यास करण्याची सूचनाही त्यांनी केली. श्री.ठाकरे यांनी माझी वसुंधरा अभियानासाठी कार्य करणाऱ्या आंतरवासितांसोबतही संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
प्रधान सचिव श्रीमती म्हैसकर यांनी यावेळी माझी वसुंधरा अभियानाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आणि यापुढील अंमलबजावणीचा आराखडा मांडला
मॅट्रीकपूर्व केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना आता ऑफलाईन पद्धतीने
ReplyDeleteमुंबई, दि. 23 : कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध पातळ्यांवर निर्बंध आहेत. त्यामुळे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचा शासननिर्णय नुकताच नियोजन विभागाकडून काढण्यात आलेला आहे.
इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाने गठित केलेल्या समितीने मान्य केल्यामुळे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना दि. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेतून वगळण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थाळावर हा शासन निर्णय उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202105241247441916 असा आहे.
******
हरीत उर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणार चालना
ReplyDeleteयुके शासनाच्या एफसीडीओ आणि राज्य नाविन्यता सोसायटी यांच्यामध्ये सामंजस्य करार
हरीत उर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाला मिळेल गती
- कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक
मुंबई, दि. 24 : राज्यात स्वच्छ तथा हरीत उर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. यासाठी युनायटेड किंगडम शासनाच्या फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलमेंट ऑफिस (एफसीडीओ) आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्यामध्ये आज कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक आणि पश्चिम भारताचे ब्रिटीश डेप्युटी हायकमिशनर ॲलन गेमेल यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, एफसीडीओच्या उपसंचालक श्रीमती क्यारन मॅकलुस्की आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲक्ट फॉर ग्रीन (Act for Green) कार्यक्रमांतर्गत हरीत उर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याअंतर्गत युके आणि भारतातील हरीत उर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या निवडलेल्या २४ स्टार्टअप्सना विकसीत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विकसीत स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेच्या संधी देणे, त्यांना गुंतवणुकदारांसमोर सादरीकरणाची संधी उपलब्ध करुन देणे, राज्यात कार्यरत असलेल्या इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. एफसीडीओ आणि राज्य नाविन्यता सोसायटी यांच्या संयुक्त प्रयत्नातून या क्षेत्रातील स्टार्टअप्सना विशेष मदत करण्यात येणार आहे.
मंत्री श्री. मलिक म्हणाले की, पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने हरीत उर्जेला प्रोत्साहन देणे गरजेचे झाले आहे. ॲक्ट फॉर ग्रीन कार्यक्रमांतर्गत यासाठी चालना देण्यात येत आहे. राज्यातील अनेक तरुण नवनवीन संकल्पना पुढे आणून स्टार्टअप्स विकसीत करत आहेत. हरीत उर्जा क्षेत्रातही अनेक जण काम करीत आहेत. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे हरीत उर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ब्रिटीश डेप्युटी हायकमिशनर श्री. गेमेल म्हणाले की, युके आणि भारतामध्ये मैत्रीचे संबंध दिर्घकाळापासून आहेत. वातावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी दोन्ही देश एकत्रीतरित्या कार्य करीत आहेत. आज झालेल्या सामंजस्य करारातून हे कार्य अधिक गतीने पुढे जाऊ शकेल. युके आणि महाराष्ट्र राज्यामार्फत हरीत उर्जा क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, संशोधन, स्टार्टअप्सना चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अनुप मंडळ वर तात्काळ बंदी साठी स्वतः प्रयत्न करणारः देवेंद्र फडणवीस
ReplyDeleteराष्ट्रीय जैन संघठनेच्या शिष्टमंडळासमवेत घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
अनुप मंडळाच्या देश द्रोही व धर्म विरोधी कारवाया अजिबात सहन केल्या जाऊ शकत नाहीत. जैन धर्म आणि हिंदू धर्मा संदर्भात चालत असलेल्या अपप्रचार तात्काळ थांबणे आवश्यक आहे, यासाठी या राष्ट्रदोही संघठन वर देशभरात बंदी घालण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन असे आश्वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राष्ट्रीय जैन संघठनेच्या शिष्टमंडळास दिले, ते पुढे म्हणाले की ह्या कामासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळाच्या समवेत भेट घेऊन आपण तातडीने पुढील कारवाई करण्यास त्यांना विनंती करू.
राष्ट्रीय जैन संघठनेने संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे स्थानिक प्रशासकीय अधिकार्यांच्या मार्फत 500 हून अधिक ठिकाणी निवेदन देण्याचे आंदोलन केले होते त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रा मध्ये जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी ललित गांधी यांच्या नेतृत्वात आमदार मंगलप्रभात लोढा व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्यासमवेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या शिष्टमंडळात संदीप भंडारी डी.सी सोळंकी, महेंद्र जैन, रिषभ मारू आदी जैन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदन प्रस्तुतीकरणाच्या राष्ट्रीय आंदोलनाला संपूर्ण भारतात चांगला प्रतिसाद मिळाला असून
नागालैंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपुर, मेघालय, यासारखी पूर्वोत्तर राज्ये, केरळ, गोवा सारखी दक्षिणी राज्ये ,तसेच जम्मू कश्मीर, उड़ीसा असे जैन समाजाची कमी संख्या असलेल्या राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, झारखंड, बिहार अशा बहुसंख्याक जैन समाज असलेल्या राज्यांमध्ये सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत एकून 529 ठिकाणी निवेदन देण्यात आलेली आहेत. आणि हा क्रम यापुढेही 30 जून पर्यंत असाच चालू राहणार आहे अशी माहितीही राष्ट्रीय जैन संघठनेचे समन्वयक ललित गांधी व अतुल शहा यांनी दिली.
फोटो कॅप्शन - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन चर्चा करताना राष्ट्रीय जैन संघठनेचे ललित गांधी सोबत आमदार मंगलप्रभात लोढा, संदीप भंडारी व अन्य जैन समाजाचे पदाधिकारी.
राज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
ReplyDeleteविशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला, निशिगंधा वाड, कविता राऊत, पलक मुच्छल सन्मानित
मुंबई,दि.27 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्व गायिका पलक मुच्छल यांसह 11 गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुणे येथील सुर्यदत्त समुह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात सुर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले. मातृत्व म्हणजे केवळ आई होऊन बाळाला जन्म देणे नाही, तर मातृत्व म्हणजे सहनशीलता, प्रेम व कारुण्यभाव असे सांगताना स्त्रीशक्ती अद्भूत असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.
मनुष्य कितीही यशस्वी झाला, संपन्न झाला व यशवंत झाला तरीही सुख-दुःख प्रसंगी त्याला आईचीच आठवण येते, असे सांगून माता, मातृभाषा व मातृभूमीचे स्मरण ठेवल्यास प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अधिक प्रगती करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिस्टर ल्युसी कुरियन, डॉ स्वाती लोढा, आरती देव, ॲड. वैशाली भागवत, तृशाली जाधव तसेच सुर्यादत्ता समूहाच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना देखील सुर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुर्यदत्त संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय चौरडिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ निशिगंधा वाड, विशाखा सुभेदार व वैशाली भागवत यांनी सत्काराला उत्तर दिले. पलक मुच्छल यांनी गीत सादर केले तर उर्वशी रौतेला यांनी गढवाली गाणे गायले.
000
सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने
ReplyDeleteगृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई दि. 29 : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव(२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
‘ब्रेक दि चेन’च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधपातळीबाबत (Level of Restrictions for Break the Chain) वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही असेही या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.
श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील असेही गृहविभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यपालांच्या उपस्थितीत भारत विकास परिषदेच्या
ReplyDeleteमुलुंड शाखेचे उद्घाटन
मुंबई, दि. 30 : भारत विकास परिषदेचे संस्थापक डॉ सुरज प्रकाश यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त महाराष्ट्र कोकण प्रांताच्या वतीने बुधवारी (दि. ३०) आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत परिषदेच्या मुलुंड शाखेचे उद्घाटन पार पडले.
संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा व समर्पण ध्येय्य असलेल्या भारत विकास परिषदेचे सदस्य आत्मनिर्भर असून समाजातील उपेक्षित लोकांसाठी कार्य केल्यास देश शीघ्रगतीने प्रगती करेल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. संस्थेचे संस्थापक डॉ सुरज प्रकाश तसेच भाऊराव देवरस यांना राज्यपालांनी यावेळी आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाला भारतीय विकास परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष गजेंद्र सिंह संधू, राष्ट्रीय कोश्याध्यक्ष संपत खुर्दीया, संघटन मंत्री सुरेश जैन, महाराष्ट्र कोंकण प्रांताचे अध्यक्ष महेश शर्मा, महासचिव यतीश गुजराथी उपस्थित होते. यावेळी मुलुंड शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष रत्नेश जैन, महासचिव धर्मेश मोदी व वित्त मंत्री जिग्नेश पण्डया यांचे पदग्रहण संपन्न झाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी)
ReplyDeleteमार्फत अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज मागविणे सुरू
मुंबई, दि. 30 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या एम.फिल व पीएच.डी च्या विद्यार्थ्यांकरिता BANRF-२०१९ व २०२० करिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ५ जुलै २०२१ ते ३१ जुलै २०२१ पर्यंत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती BANRF -२०१९ व २०२० साठी प्रतीवर्ष २०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. अधिक विस्तृत माहितीसाठी बार्टी पुणे च्या संकेतस्थळावर https://barti.maharashtra.gov.in> Notice Board ला भेट द्यावी. अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
*****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
मुंबई, दि. 30 : राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख रु. याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” राबविण्यात येत आहे.
ही योजना MH-CET, NEET, JEE, मेडिकल, इ. सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी असून ज्या विद्यार्थ्यांचे पालक दारिद्र्यरेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2,50,000/-(अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पेक्षा कमी आहे व मुख्यत: लाभ हा त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांचे पालक असंघटीत क्षेत्रात, कंत्राटी पद्धतीने कामे करतात.
सन -2021 इयत्ता 10 वी च्या निकालानंतर जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून बार्टी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील तसेच संबंधीत निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना “बार्टी “ मार्फत प्रपत्र पाठवून कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात येतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास SSC, CBSE, ICSE बोर्डांमध्ये मध्ये 90% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आई - वडील शासकीय नोकरीत आहेत ते विद्यार्थी शिष्यवृत्ती करीता पात्र राहणार नाही. योजना ही सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व यापुढे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ देय असेल.अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, पुणे यांच्यामार्फत प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
ReplyDeleteमुंबई, दि. 30 : राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख रु. याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” राबविण्यात येत आहे.
ही योजना MH-CET, NEET, JEE, मेडिकल, इ. सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी असून ज्या विद्यार्थ्यांचे पालक दारिद्र्यरेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2,50,000/-(अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पेक्षा कमी आहे व मुख्यत: लाभ हा त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांचे पालक असंघटीत क्षेत्रात, कंत्राटी पद्धतीने कामे करतात.
सन -2021 इयत्ता 10 वी च्या निकालानंतर जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून बार्टी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील तसेच संबंधीत निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना “बार्टी “ मार्फत प्रपत्र पाठवून कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात येतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास SSC, CBSE, ICSE बोर्डांमध्ये मध्ये 90% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आई - वडील शासकीय नोकरीत आहेत ते विद्यार्थी शिष्यवृत्ती करीता पात्र राहणार नाही. योजना ही सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व यापुढे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ देय असेल.अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, पुणे यांच्यामार्फत प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
****
खाटिक समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात कार्यवाही करणार
ReplyDelete- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 30 : खाटिक समाजाच्या मागण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेवून या समाजबांधवांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शासन प्रयत्न करेल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
मंत्रालयातील दालनात अखिल भारतीय खाटिक समाजाच्या विविध मागण्यांबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सहसचिव दिनेश डिंगळे यासह वरिष्ठ अधिकारी तसेच अखिल भारतीय खाटीक समाजाचे अध्यक्ष संजय घोलप,सरचिटणीस सुजित धनगर यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे म्हणाले, खाटिक समाजाच्या विविध मागण्या या धोरणात्मक निर्णयांच्या आहेत. त्यासाठी पूर्ण अभ्यासानंतर याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून निर्णय घेतला जाईल. या समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती, जात पडताळणी करताना येणाऱ्या अडचणी, विविध योजना तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.मुंडे यांनी सांगितले.
अनुसूचित जातीतील खाटिक समाज बांधवाना चर्मकार समाजातील गटई कामगारांप्रमाणेच स्टॉल मिळावा, या समाजाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमावा, हिंदु खाटिक मागासवर्गीय महामंडळ सुरू करावे, अखिल भारतीय खाटिक समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै.रघुनाथराव (नाना) जाधव यांची जयंती शासनस्तरावर साजरी करावी, कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेळी मेंढी आठवडा बाजार सुरू करणे यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय खाटिक समाजाचे अध्यक्ष संजय घोलप व सरचिटणीस सुजित धनगर यांच्यासह सदस्यांनी दिले.
विभागीय, जिल्हा व तहसील स्तरावर भ्रष्टाचार निर्मूलन समित्या व दक्षता पथके स्थापन कराव्या - रघुनाथदादा पाटील
ReplyDeleteमराठवाडा विभागात विभागीय, जिल्हा व तहसील स्तरावर भ्रष्टाचार निर्मूलन समित्या व दक्षता पथके अस्तित्वात असल्याची माहिती नाही. अशा समित्या आणि पथके अस्तित्वात असतील तर त्याबाबत पुरेशी माहिती जनमाणसाला उपलब्ध नाही. अशा समित्या स्थापन केल्या नसतील तर एक प्रकारे हा भ्रश्टाचाराला मोकळे रान सोडल्यासारखा प्रकार आहे. व्यवस्थेतील भ्रश्टाचार, काम टाळण्याची प्रवृत्ती, चालढकल, दफ्तर दिरंगाई यासोबत अपुरे मनुष्यबळ असल्याचा कांगावा, अशा नानाविध मार्गाने सामान्य नागरिकाला वेठीस धरण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. याच प्रवृत्तीच्या कारणामुळे नांदेड जिल्ह्यात लोहा येथील शेतकऱ्याने तहसील कार्यालयात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समजले.
आणि अशा समित्या अस्तित्वात असतील तर त्या समित्या आणि दक्षता पथकांच्या किती बैठका झाल्यात, आणि किती प्रकरणे दाखल झाली, त्यावर काय कार्यवाही झाली हे तपासून पाहणे गरजेचे वाटते!
सरकारी काम अन सहा महिने थांब हे कोणत्या शतकात थांबणार आहे हे सामान्य माणसाला उमगेना!
विभागीय आयुक्तांनी संवेदनशीलपणे या विषयाच्या गाम्भीर्याला समजून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथदादा पाटील ह्यांनी केली.
विभागीय, जिल्हा व तहसील स्तरावर भ्रष्टाचार निर्मूलन समित्या व दक्षता पथके स्थापन कराव्या - रघुनाथदादा पाटील
ReplyDeleteमराठवाडा विभागात विभागीय, जिल्हा व तहसील स्तरावर भ्रष्टाचार निर्मूलन समित्या व दक्षता पथके अस्तित्वात असल्याची माहिती नाही. अशा समित्या आणि पथके अस्तित्वात असतील तर त्याबाबत पुरेशी माहिती जनमाणसाला उपलब्ध नाही. अशा समित्या स्थापन केल्या नसतील तर एक प्रकारे हा भ्रश्टाचाराला मोकळे रान सोडल्यासारखा प्रकार आहे. व्यवस्थेतील भ्रश्टाचार, काम टाळण्याची प्रवृत्ती, चालढकल, दफ्तर दिरंगाई यासोबत अपुरे मनुष्यबळ असल्याचा कांगावा, अशा नानाविध मार्गाने सामान्य नागरिकाला वेठीस धरण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. याच प्रवृत्तीच्या कारणामुळे नांदेड जिल्ह्यात लोहा येथील शेतकऱ्याने तहसील कार्यालयात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समजले.
आणि अशा समित्या अस्तित्वात असतील तर त्या समित्या आणि दक्षता पथकांच्या किती बैठका झाल्यात, आणि किती प्रकरणे दाखल झाली, त्यावर काय कार्यवाही झाली हे तपासून पाहणे गरजेचे वाटते!
सरकारी काम अन सहा महिने थांब हे कोणत्या शतकात थांबणार आहे हे सामान्य माणसाला उमगेना!
विभागीय आयुक्तांनी संवेदनशीलपणे या विषयाच्या गाम्भीर्याला समजून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथदादा पाटील ह्यांनी केली.
2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना राज्य शासनाचा दिलासा
ReplyDeleteअशोक चव्हाण यांची विधानसभेत घोषणा
मुंबई, दि. 5 : 2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना राज्यशासनाने मोठा दिलासा दिला असून, उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी झालेल्या नियुक्त्या तसेच स्थगिती आल्यानंतर ११ महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय अशोक चव्हाण यांनी विधानसभेत जाहीर केला.
याबाबत माहिती देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यामुळे रखडलेल्या नोकर भरती प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हेतूने हे निर्णय घेण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी नियुक्त झालेल्या तसेच स्थगिती आल्यानंतर खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना या निर्णयाचा लाभ मिळेल.
मराठा आरक्षणाचे न्यायालयीन प्रकरण, त्यावर आलेली स्थगिती व अंतिम निकाल, तसेच कोरोनामुळे अनेक नोकर भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. त्यातील अनेक एसईबीसी उमेदवारांचे वय विहित मर्यादेपलिकडे चालले होते, शिवाय एसईबीसी आरक्षण रद्दबातल झाल्यामुळेही अनेक विद्यार्थी वयोमर्यादा ओलांडणार होते. एसईबीसीच्या अशा उमेदवारांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यासाठी वयोमर्यादा ४३ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातील सवलतीचा लाभही अनुज्ञेय केल्याचे त्यांनी सांगितले.
९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर निर्बंध येण्यापूर्वी एसईबीसी मधून निवडीसाठी शिफारस झालेल्या परंतु, अद्याप नियुक्त्या न मिळालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात ज्येष्ठ विधीज्ञांचे कायदेशीर मत मागवण्यात आले असून, त्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
अपूर्णावस्थेतील अर्थात अद्याप निवड यादी न लागलेल्या नोकर भरती प्रक्रियांमधील एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गातून पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला असून, उमेदवारांनी निवडलेल्या पर्यायानुसार या निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना राज्य लोकसेवा आयोग तसेच अन्य निवड मंडळांना देण्यात आल्याचे अशोक चव्हाण पुढे म्हणाले.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक
ReplyDeleteविधिमंडळात मंजूर
मुंबई, दि. 5 : नागरी भागात नवीन वृक्षांची लागवड करण्याबरोबरच अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणे तसेच प्राचीन व अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करून वनसंपत्ती वाढविणे ही काळाची गरज आहे. तसेच, कुठल्याही पायाभूत सुविधा वाढविण्याकामी अथवा नवीन पायाभूत सुविधा निर्माण करताना त्याचे आरेखन वृक्षांचे जतन करून पायाभूत सुविधा / प्रकल्प राबविले जाणे आवश्यक आहे. याकरिता वृक्षांच्या संरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर वैधानिक प्राधिकरण असावे यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, 1975 मध्ये सुधारणा करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सादर केलेले विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले.
यानुसार, सध्याच्या अधिनियमात मंजूर झालेल्या ठळक सुधारणा पुढीलप्रमाणे आहेत:-
'हेरिटेज ट्री' संकल्पना
५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृक्ष हे 'हेरिटेज ट्री' (प्राचीन वृक्ष) म्हणून परिभाषित केले जातील. त्या वृक्षाचे वय ठरविण्यासाठी वनविभागाकडे सध्या असलेल्या प्रचलित पद्धतींबद्दल त्यांच्याशी सल्लामसलत करून पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मार्गदर्शक सूचना जारी करेल.
स्थानिक वृक्ष प्राधिकरणाद्वारे दर पाच वर्षांनी वृक्षांची गणना करून स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड आणि जतन त्याचबरोबर वृक्षांची छाटणी शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते हे सुनिश्चित केले जाईल. स्थानिक वृक्ष प्राधिकरण शास्त्रीय पद्धतीने वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहन देईल तसेच त्यासाठी मियावाकी वृक्षारोपण, अमृत वन, स्मृती वन, शहरी वने या पद्धतींचा अवलंब करू शकेल.
वृक्षांच्या संरक्षणासाठी प्रकल्पांचे आरेखन करताना कमीत कमी झाडे तोडण्यात यावीत या अनुषंगाने विचार केला जाणे अपेक्षित आहे. पाच वर्षांहून अधिक वयाची २०० हून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठविला जाईल. परवानगीनंतर अशा तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या वयाच्या संख्येएवढी नवीन झाडे भरपाई वृक्षारोपण म्हणून लावण्यात यावीत. तसेच अशाप्रकारे लावण्यात येणाऱ्या वृक्षांचे जिओ टॅगिंग करून सात वर्षांपर्यंत संगोपन करणे आवश्यक राहील.
सर्व 106 आमदार निलंबित केले तरी ओबीसींसाठी संघर्ष थांबणार नाही : देवेंद्र फडणवीस
ReplyDeleteआम्ही पाठिंबाच दिला पण विधानसभेतील ठराव ही ओबीसींची दिशाभूल
मुंबई, 5 जुलै
ओबीसी आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारचे अपयश सप्रमाण सिद्ध केल्याने महाविकास आघाडी सरकारने भाजपाचे 12 आमदार निलंबित केले. हवे तर सर्व 106 आमदार निलंबित करा. पण, ओबीसींसाठी आमचा संघर्ष संपणार नाही, असा स्पष्ट इशारा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात न्यायालयाच्या निकालाचे सिलेक्टिव्ह वाचन केले. के. कृष्णमूर्ती प्रकरणात 2010 मध्ये न्यायालयाने काय सांगितले? शिक्षण आणि रोजगारात 15 (4) आणि 16 (4) च्या अंतर्गत जे आरक्षण दिले आहे, त्याच्यापेक्षा वेगळे हे आरक्षण आहे. ते वेगळे असल्याने प्रत्येक राज्याने एक आयोग गठीत करून राजकीय अनुशेषाचा डेटा तयार करायचा आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा 13 डिसेंबर 2019 रोजी हा डेटा मागितला. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्टपणे सांगितले की, राज्य सरकारने मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी कुठलेही परिश्रम घेतले नाही. 15 महिने कोणतीही कारवाई केली नाही. जनगणनेचा डेटा नव्हे तर एम्पिरिकल डेटा मागितला गेला. आज सभागृहात जो ठराव आला आहे, त्याला आम्ही पाठिंबा देतो. पण, माझी कळकळ यासाठी कारण, यामुळे ओबीसी समाजाला कोणताही फायदा होणार नाही. एम्पिरिकल डेटा गोळा न करता केवळ असे राजकीय ठराव घेतले तर ती समाजाची दिशाभूल ठरेल. एसईसीसीचे सर्वेक्षण ज्यावेळी झाले, तेव्हा त्यातील सामाजिक आणि आर्थिक डेटा केंद्र सरकारने दिला. पण, जातनिहाय डेटा दिला नाही. कारण, त्यात 8 कोटी चुका होत्या. एकट्या महाराष्ट्राच्या माहितीत 69 लाख चुका आहेत. त्यामुळे डॉ. मनमोहनसिंग सरकारनेच ही माहिती न देण्याचा निर्णय घेतला. आपण मराठा आरक्षण दिले, तेव्हा जनगणना कुठेही नव्हती. आपला एम्पिरिकल डेटा हा न्यायालयांनी मान्य केला. त्यावेळी आपण केंद्राकडून डेटा मागितला कारण, ते 50 टक्क्यांच्या वरचे आरक्षण होते. पण, आता तर 50 टक्क्यांच्या आतला प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निकालात सांगितलेली कारवाई करणे अपेक्षित आहे. केवळ राजकारण करण्यापेक्षा ती कारवाई आधी करावी.
विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी आरक्षणात सरकारचे अपयश दाखविल्यामुळे आमच्या आमदारांना खोटे आरोप लावून निलंबित करण्यात आले. ओबीसी आरक्षण जोवर परत येत नाही, तोवर आमचा लढा सुरू राहील. एक वर्ष काय, 5 वर्ष निलंबित करण्यात आले तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. भाजपाच्या एकाही सदस्यांनी शिवी दिली नाही. तेथे शिवी देणारे कोण होते, हेही सर्वांना माहिती आहे. त्यानंतर सर्व विषय संपला होता. तरीसुद्धा कथानक तयार करण्यात आले आणि मग 12 आमदारांना निलंबित करण्यात आले. विरोधकांची संख्या कमी केली, तर त्यांची ताकद कमी होईल, असे सरकारला वाटत असेल. पण, तसे होणार नाही. 12 आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग आहे. ओबीसी आरक्षण असो की, मराठा आरक्षण हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. याच सरकारने गठीत केलेल्या न्या. भोसले समितीने अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की, राज्य सरकारसमोर एकमेव पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे तत्काळ मागासवर्ग आयोग गठीत करणे. सर्वोच्च न्यायालयाने जी कार्यवाही करायला सांगितली, ती करणे आणि त्यासाठी एम्पिरिकल डेटा तयार करणे. तरीसुद्धा केवळ राजकीय कारणांसाठी ठराव करणे, यातून सरकारला निव्वळ वेळ मारून न्यायची आहे, हेच दिसून येते. टोलवाटोलवीच्या पलिकडे यातून काहीही साध्य होणार नाही. या सरकारला आरक्षण द्यायचेच नाही.
**********
राज्यपालांच्या हस्ते देशपांडे पंचागाचे प्रकाशन
ReplyDeleteमुंबई, दि. 5 : पंचांगकर्ते गौरव रवींद्र देशपांडे यांनी तयार केलेल्या सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांगाच्या 10 व्या वार्षिक आवृत्तीचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे अनावरण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.
सूर्यसिद्धांत पंचांग गणित पद्धती ही भारतीय खगोलशास्त्राची अचूक अशी पंचांग निर्माण पद्धती असून मागील 60-70 वर्षांपासून या पद्धतीनुसार पंचांगनिर्मितीची परंपरा महाराष्ट्रात बंद पडली होती, ती मागील 10 वर्षांपासून महाराष्ट्रात पुन्हा सुरु केली आहे असे यावेळी संगणक अभियंता असलेल्या गौरव देशपांडे यांनी राज्यपालांना सांगितले.
या कार्यक्रमास गौरव देशपांडे यांचेबरोबर हेमांगी देशपांडे, सुरेखा देशपांडे व ऋतंभरा देशपांडे उपस्थित होते.
0000
Governor releases Deshpande Panchang
Mumbai, 5 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari released the 10th annual edition of the ‘Deshpande Panchang’ at Raj Bhavan, Gaurav Deshpande, Hemangi Deshpande and Surekha Deshpande were present.
0000
विधीमंडळ पावसाळी अधिवेशन 2021
सुधारित :
विधानभवनात 3 ऑगस्ट रोजी 'समर्पण ध्यानयोग शिबिर'
मुंबई, दि. 5 : विधानमंडळाच्या सदस्यांसाठी 3 ऑगस्ट 2021 रोजी विधानभवनात सकाळी 11.00 ते दुपारी 1.30 या वेळेत मध्यवर्ती सभागृह येथे 'समर्पण ध्यानयोग शिबीर' आयोजित करण्यात आले आहे. शिवकृपानंद स्वामी यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.
मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याची
ReplyDeleteकेंद्र शासनाला शिफारस करणारा ठराव
आरक्षणाची ५० टक्के इतकी मर्यादा शिथील करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे.
Ø सरकार कायदा पूनर्जिवीत करण्याचे प्रयत्न प्रामाणिकपणे करते आहे
Ø ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथील करण्याची मागणी केवळ महाराष्ट्राची नाही.
Ø महाराष्ट्रासह इतर राज्यांची भावना लक्षात घेता संघ-राज्य व्यवस्थेतील प्रमुख म्हणून केंद्रानेही स्पष्ट भूमिका घ्यावी.
घटनाक्रम:
Ø दि. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकांना एकमताने शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया व शासकीय नोकर भरतीत आरक्षण देणारा कायदा मंजूर.
Ø सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमुर्तींच्या घटनात्मक खंडपीठाने दि. ५ मे २०२१ रोजी कायद्याला स्थगिती.
Ø सर्वोच्च न्यायालय निकाल - सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाअंतर्गत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेले आरक्षण घटनाबाह्य आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीन्वये एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना राहिलेले नसून, ते आता केंद्राकडे आहेत.
Ø महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग म्हणजे गायकवाड आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष काढला होता. परंतु, त्या आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला.
Ø इंद्रा साहनी निवाड्याचा पूनर्विचार करण्याची विनंती राज्य शासनाने सुनावणी दरम्यान केली होती. परंतु, त्याची आवश्यकता नसल्याचे सांगून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ती विनंती देखील फेटाळून लावली.
Ø सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर दि. ११ मे २०२१ रोजी राज्य शासनाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विधी तज्ज्ञांची ८ सदस्यीय समिती स्थापन
Ø त्यानंतर दि. १३ मे २०२१ रोजी केंद्र सरकारने १०२ व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयात पूनर्विलोकन याचिका दाखल केली. ती सुद्धा दि. १ जुलै २०२१ रोजी फेटाळून लावली आहे.
Ø आजच्या कायदेशीर परिस्थितीनुसार एसईबीसी प्रवर्ग जाहीर करण्याचे अधिकार सर्वस्वी केंद्र सरकारकडे आहेत. ते अधिकार राज्यांना राहिलेले नाहीत.
Ø भोसले समितीच्या दि. ४ जून २०२१ रोजीच्या अहवालानुसार राज्य शासनाने दि. २२ जून २०२१ रोजी आपली पूनर्विलोकन याचिका दाखल केली आहे आणि अद्याप ती प्रलंबित आहे.
Ø केंद्राने पूनर्विलोकन याचिकाही केली. पण, राज्याने केंद्राला विनंती करूनही मराठा आरक्षण प्रकरणी केंद्राने आपली भूमिका केवळ १०२ व्या घटना दुरुस्तीपुरतीच मर्यादित ठेवली. त्यांची याचिका फक्त १०२ व्या घटना दुरुस्तीपुरती म्हणजे एसईबीसीचे मागासलेपण निश्चित करण्याचे अधिकार केंद्राचे की राज्याचे? एवढ्याच मर्यादित हेतुने दाखल करण्यात आली होती.
ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा
ReplyDeleteमिळविण्याचा ठराव विधिमंडळ ठराव
केंद्र शासनाकडून राज्य शासनास नागरिकांच्या मागास प्रवर्गाची सर्व माहिती ( इंम्पेरिकल डाटा ) त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी शिफारस ही विधानसभा केंद्र सरकारला करीत आहे असा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने "राज्य मागासवर्गीय आयोग" गठीत करण्यात आलेला असून राज्य मागासवर्ग आयोगास सुलभ संदर्भाकरिता आवश्यक असणारी सामाजिक, आर्थिक व जात निहाय जनगणना २०११ मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जाती निहाय सर्व माहिती केंद्र शासनाकडे उपलब्ध आहे असे असताना, राज्य शासनाने वारंवार विनंती करुनही केंद्र शासनाने सदर माहिती अद्याप उपलब्ध करुन दिलेली नाही. सबब मागासवर्ग आयोगास इंम्पेरिकल डाटा उपलब्ध करुन देणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे न्यायाधीश श्री. खानविलकर यांच्या बेंचने निर्णयाच्या १२व्या परिच्छेदात सांगितले की, आपण भारत सरकारकडे जाऊ शकता, त्यांच्याकडे मागणी करु शकता. आपण हा डेटा मिळवून आयोगाच्या समोर आणा, आणि म्हणूनच हा महत्वपूर्ण ठराव घेण्यात आला आहे.
Ø सन २०११ पासून भारत सरकारची जनगणना सुरु होणार आहे त्यामध्ये हा डेटा त्यांना जमा करण्यास सांगण्यासाठी आग्रह होता.
Ø गोपीनाथरावजी मुंडे यांनी सर्व खासदारांशी चर्चा करून १०० खासदारांना उभे करून सांगितले की, पुढच्या होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींचा डेटा जमा करण्यात यावा.
Ø जनगणनेमध्ये ओबीसींची जनगणना. जनगणना सन २०१४-२०१५ पर्यंत चालली. सन २०१६ मध्ये हा डेटा भारत सरकारकडे जमा झाला.
Ø सन २०१७ ची केस असताना दिनांक ३१ जुलै, २०१९ रोजी अध्यादेश काढला. परंतु, सन २००५ मध्ये के कृष्णमूर्ती यांनी सांगितलेल्या मूळ टिपणाप्रमाणे हा अध्यादेश नव्हता.
Ø अध्यादेशामध्ये ट्रिपल टेस्टला संरक्षण मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी ताबडतोब दिनांक १ ऑगस्ट, २०११ रोजी डाटा देण्यासंदर्भात नीती आयोगाला पत्र लिहिण्यात आले.
Ø डाटा आपल्याकडे नसल्याने तो भारत सरकारला मागितला पाहिजे, म्हणून तो मागविण्यात आला होता
Ø हा डाटा इतर बाबींसाठी वापरण्यात येतो, ओबीसी आरक्षणासाठी देण्यात येत नाही.
Ø रोहिणी आयोग तयार करण्यात आला आहे. उक्त आयोग ओबीसींचे तुकडे करणारा आहे. वंजारी, धनगर, माळी, कुणबी, यांना २ टक्के आरक्षण मिळणार आहे.
Ø या डेटामध्ये ८ कोटी चुका झाल्या आहेत व महाराष्ट्रात ७५ लाख चुका झाल्या असे विरोधी पक्ष नेते म्हणतात. विरोधी पक्ष सत्तेत असताना त्यांनी राज्यातील ओबीसींची जनगनणा करावयाची होती.
Ø केंद्र सरकारने ओबीसींची जनगनणा का केली नाही ?
Ø राज्यात देखील मागील ५ वर्षे विरोधी पक्षाचे सरकार होते. ओबीसींचा डाटा का जमा करण्यात आला नाही
Ø सन २०२१ पासून भारत सरकारची जनगणना प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती. परंतु, ती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.
Ø भारत सरकार जर जनगणना सुरू करू शकत नाही . तर पंधरा महिन्यांमध्ये ही सर्व माहिती कशी गोळा करणार?
Ø सन २०२१ ची जनगणना केंद्र सरकार अजूनही सुरू करू शकलेले नाहीत किंवा आजही करू शकत नाहीत. म्हणून जी माहिती केंद्र सरकारकडे तयार आहे ती आम्हाला देण्यात यावी.
Ø ही माहिती राज्य शासनाला प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने तयार केलेला आयोग त्या माहितीची छाननी करेल व त्यानंतर कोणाला किती आरक्षण देता येऊ शकते याचा अभ्यास करील.
Ø राज्य शासन याबाबतचा निर्णय दोन महिन्याच्या आत घेईल.
Ø माननीय श्री. प्रणव मुखर्जी यांनी सांगितल्यानंतर युपीए सरकारने हा डाटा गोळा केलेला आहे. हा सर्व डाटा आता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.
Ø न्यायधीश श्री. खानविलकर यांचा ट्रिपल टेस्ट संदर्भातील निकाल हा केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर हा निकाल संपूर्ण देशाला लागू होणारा आहे. It has become the Law of the land. त्यामुळे आता तो सगळ्यांना लागू झालेला आहे.
वक्फ मंडळाकडून निवडणुकीबाबत आवाहन
ReplyDeleteमुंबई, दि. ६ : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर मुतवल्ली प्रवर्गातील सदस्याची निवडणुकीद्वारे निवड करण्याकरिता वक्फ संस्थांच्या पात्र मुतवल्लीची/व्यवस्थापकीय समितीच्या नामनिर्देशित सदस्याची मतदारयादी अद्ययावत करण्याबाबत मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी आवाहन केले आहे.
एक लाख रूपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मुतवल्ली/नामनिर्देशित सदस्याचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्याकरीता सन २०२०-२१ या वर्षापर्यंतचे संबंधित वक्फ संस्थेचे लेखापरीक्षण करून वार्षिक लेखे व त्या अनुषंगिक वर्गणी जमा करावयाची आहे. यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे. ही कार्यवाही संबंधीत वक्फ संस्थांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे. राज्यातील सर्व वक्फ संस्थांचे मुतवल्ली/ व्यवस्थापकीय समितीचे सदस्य यांना हे आवाहन करण्यात आले आहे.
००००
जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी
ReplyDeleteपद्म पुरस्काराकरिता शिफारसयोग्य प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना
मुंबई, दि. ७ : पद्म पुरस्काराकरिता (सन २०२२) विविध निकषांच्या आधारे शिफारसयोग्य असतील असे प्रस्ताव जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी सामान्य प्रशासन विभागाकडे ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठवावेत. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त वगळता सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांचे प्रस्ताव संबंधित मंत्रालयीन विभागामार्फत पाठवावेत, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागामार्फत परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.
प्रजासत्ताक दिन दिनांक २६ जानेवारी, २०२२ रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्काराकरिता (पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण) शिफारशी केंद्र शासनाकडे पाठवावयाच्या आहेत. पद्म पुरस्कार हे सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते अतिशय प्रतिष्ठेचे असतात. हे पुरस्कार विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय सेवेबद्दल दिले जातात. याबाबतचे अधिनियम आणि नियम केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाच्या www.padmaawards.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. त्यांचे अवलोकन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पद्म पुरस्कारांकरिता शिफारशी करताना केंद्र शासनाने विविध निकष सुचविले आहेत. शिफारस करताना संबंधित क्षेत्रातील अत्युत्कृष्ट कार्य (Excellence Plus) हा निकष असावा. या उल्लेखनीय कार्यामध्ये समाजसेवा हाही एक घटक असावा. पद्म पुरस्कार हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान असल्याने मान्यवरांची शिफारस करताना शिफारस केलेल्या मान्यवरास त्याच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी कोणते राष्ट्रीय, राज्य पुरस्कार मिळाले आहेत काय याचा विचार व्हावा. पुरस्कारासाठी नावे सुचवताना समाजातील अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, इतर मागासवर्ग, महिला, अपंग व कमकुवत घटकांमधील प्रतिभासंपन्न व्यक्तींचाही विचार व्हावा. मरणोत्तर पुरस्काराची शक्यतो शिफारस करू नये. मात्र उच्चतम गुणवत्तेच्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये जानेवारी २०२० नंतर निधन झालेल्या व्यक्तींची शिफारस करता येईल. त्यापूर्वी निधन झालेल्या व्यक्तींची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करू नये. पद्मभूषण पुरस्कारासाठी मान्यवरांची शिफारस पद्मश्री पुरस्कार प्राप्त केल्यानंतर ५ वर्षांनी करता येईल. तसेच पद्मविभूषण पुरस्कारांसाठी मान्यवरांची शिफारस पद्मभूषण प्राप्त केल्यानंतर ५ वर्षांनी करता येईल. तथापि, ही मर्यादा अपवादात्मक प्रकरणांमध्ये शिथील करण्याचा विचार करता येईल. शासकीय सेवेतील तसेच सार्वजनिक उपक्रमातील डॉक्टर व वैज्ञानिक वगळता अन्य कर्मचारी, अधिकारी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाहीत.
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविताना काही सूचना विचारात घ्याव्यात. पात्र व्यक्तींचा शोध घेताना वृत्तपत्रे किंवा इतर कोणत्याही प्रसिद्धी माध्यमांद्वारे जाहिराती देऊन नावे मागविण्यात येऊ नयेत. तथापि, ज्या व्यक्तींचे कार्य अत्यंत प्रशंसनीय स्वरूपाचे आहे व जे हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी खरोखरच पात्र आहेत, मात्र अशा व्यक्ती प्रसिद्धीच्या वलयात नाहीत, त्यांचा पुरस्कारासाठी नामनिर्देशन करण्याच्या दृष्टीने शोध घेण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न व्हावेत. विहित नमुन्यामध्ये दोन प्रतीत प्रस्ताव पाठवावेत. तसेच त्यांच्या कार्याची माहिती सायटेशनच्या स्वरुपात इंग्रजीमध्ये पाठवावी. प्रत्येक प्रस्ताव स्वतंत्ररीत्या पाठवावा. प्रस्तावासोबत संबंधित व्यक्तीची छायाचित्रे, पुस्तके, वृत्तपत्रीय कात्रणे व इतर साहित्य पाठवू नये. विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्तावाची मायक्रोसोफ्ट वर्ड फाईल abhay.bhandari@nic.in या ईमेल पत्त्यावरही पाठवावी. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून, पद्म पुरस्कारासाठी विहित केलेल्या निकषांची छाननी न करता जसेच्या तसे प्रस्ताव शासनास सादर केले जातात, असे निदर्शनास आले
००००
Continue
ReplyDeleteपुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविताना काही सूचना विचारात घ्याव्यात. पात्र व्यक्तींचा शोध घेताना वृत्तपत्रे किंवा इतर कोणत्याही प्रसिद्धी माध्यमांद्वारे जाहिराती देऊन नावे मागविण्यात येऊ नयेत. तथापि, ज्या व्यक्तींचे कार्य अत्यंत प्रशंसनीय स्वरूपाचे आहे व जे हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी खरोखरच पात्र आहेत, मात्र अशा व्यक्ती प्रसिद्धीच्या वलयात नाहीत, त्यांचा पुरस्कारासाठी नामनिर्देशन करण्याच्या दृष्टीने शोध घेण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न व्हावेत. विहित नमुन्यामध्ये दोन प्रतीत प्रस्ताव पाठवावेत. तसेच त्यांच्या कार्याची माहिती सायटेशनच्या स्वरुपात इंग्रजीमध्ये पाठवावी. प्रत्येक प्रस्ताव स्वतंत्ररीत्या पाठवावा. प्रस्तावासोबत संबंधित व्यक्तीची छायाचित्रे, पुस्तके, वृत्तपत्रीय कात्रणे व इतर साहित्य पाठवू नये. विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्तावाची मायक्रोसोफ्ट वर्ड फाईल abhay.bhandari@nic.in या ईमेल पत्त्यावरही पाठवावी. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून, पद्म पुरस्कारासाठी विहित केलेल्या निकषांची छाननी न करता जसेच्या तसे प्रस्ताव शासनास सादर केले जातात, असे निदर्शनास आले आहे. यास्तव ज्या व्यक्तींची शिफारस करावयाची आहे त्या व्यक्तीच्या चारित्र्य पडताळणीसह पात्र व्यक्तींचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी आपल्या अभिप्रायासह विहीत प्रपत्र व इंग्रजीमध्ये सायटेशन यासह शासनास पाठवावेत. सर्व विभागीय आयुक्तांना सुचित करण्यात आले आहे की, त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव शासनास विहित मुदतीत प्राप्त होतील याची दक्षता घ्यावी. पद्म पुरस्कारासंदर्भातील प्रस्ताव ६ ऑगस्ट २०२१ पूर्वी सहसचिव (राजशिष्टाचार, साप्रवि ३१), सामान्य प्रशासन विभाग, मुख्य इमारत, तिसरा मजला. मंत्रालय, मुंबई या पत्त्यावर मिळतील याची दक्षता घ्यावी. यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव, अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडील प्रस्ताव शासनास ६ ऑगस्ट २०२१ नंतर या विभागाचे कार्यासन, नोंदणी शाखेत प्राप्त झाल्यावर त्याबाबत कोणतीही कार्यवाही न करता विहित कालावधीनंतर प्राप्त प्रस्ताव म्हणून असे प्रस्ताव थेट संबंधित कार्यालयाला परत केले जातील, असे परिपत्रकात म्हटले आहे.
यासंदर्भातील शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०७०६१७११४७१२०७ असा आहे.
००००
महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी
ReplyDeleteस्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीसांनी समन्वयाने धोरण आखावे
- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 7 : महिलांची आणि बेपत्ता बालकांची सुरक्षितता हा प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण असून सार्वजनिक तसेच निर्जन स्थळी होणाऱ्या महिला अत्याचार, चोरी आणि हल्ले अशा घटनांना आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा आणि मनुष्यबळाचा वापर करणे आवश्यक आहे. प्रशासन आणि पोलीस यांनी समन्वय साधुन महिला सुरक्षा धोरण आखावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
कल्याण, जि.ठाणे येथील मुकबधिर मुलीवर तसेच कोळसेवाडी येथे मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत व फटका गँगच्या चोरीच्या घटनांसंदर्भात, महिलांवर सार्वजनिक ठिकाणी होणारे हल्ले, बालकांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण यावर निर्बंध घालण्यासाठीच्या उपायोजनांबाबत विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस रेल्वेचे महानिरीक्षक कैसर खलीद, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त श्री श्रीवास्तव, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस उपनिरीक्षक मंजुषा शेलार आदीसह अधिकारी उपस्थित होते.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ताळेबंदीवर शिथीलता आल्यावर सार्वजनिक ठिकाणी तसेच रेल्वे परिसरातील निर्जन स्थळी महिलांवर अत्याचार, चोरी आणि हल्ले होण्याच्या घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. तसेच, रेल्वेतून काही बालके पळून जाणे अथवा त्यांची तस्करी होऊन त्यांच्यासोबत अत्याचाराच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने या घटनांना आळा बसावा यासाठी स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस यांनी समन्वय साधून सुरक्षेसाठी धोरण ठरवावे, असे निर्देश उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
निर्जन स्थळी सुरक्षेसाठी मनुष्यबळ आणि सीसीटीव्ही कॅमेराचा वापर करण्यात यावा. ज्या वास्तु वापरात नाही किंवा त्या वास्तु धोकादायक अवस्थेत आहेत त्या पूर्णत: बंद कराव्यात अथवा पाडून टाकण्यासाठीच्या प्रक्रिया करण्यात याव्यात. रेल्वेतील प्रवाशांना फटका मारून मोबाईल चोरण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. याबाबत कडक कारवाई करण्यात यावी असेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
कोविड पार्श्वभुमीवर असलेल्या टाळेबंदीच्या काळात कुटुंबियांकडून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. ताळेबंदीमुळे महिला तक्रार निवारण समिती आणि महिला दक्षता समिती यांच्यात दृकश्राव्य पद्धतीने संवाद होणे गरजेचे आहे. तसेच, तक्रारदार महिलांशीही दृकश्राव्य पद्धतीने संवाद साधून त्यांचे समुपदेशन करावे. पुणे येथे महिलांच्या सुरक्षेसाठी नोकरदार महिलांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले होते. याच धर्तीवर मुंबई, ठाणे शहरी आणि ग्रामीण येथेही प्रायोगिक तत्वावर ग्रुप तयार करण्यात यावेत.
याचबरोबर रेल्वे प्रशासनाने गुन्ह्याच्या हेतुने सुरक्षेला बाधा आल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई अथवा विमा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्यासाठीचे प्रयत्न करावेत. महिलांच्या सुरक्षेसाठी होमगार्ड कार्यरत असावेत यासाठीच्या कार्यवाहीस गती द्यावी, अशा सूचनाही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.
उपस्थित अधिकारी यांनी रेल्वे पोलीस आणि पेालीस यांच्या समन्वयाने महिलांवरील हल्ले आणि निर्जन स्थळी होणा-या अत्याचारासंदर्भात कारवाई करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील धोकादायक इमारतींचे पाडकाम करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. आतापर्यंत घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा सीसीटीव्ही कॅमेराच्या सहायाने मागोवा घेण्यात आला असून, ९५ टक्के आरोपींना अटक करण्याचे प्रमाण असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली
कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी
ReplyDelete- कामगार मंत्री हसन मुश्रीफ
कामगार आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेल्या बोध- चिन्हाचे कामगार मंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई, दि. 8 : राज्याच्या विकासात कामगार महत्वाचा वाटा देत असतात. त्यामुळे राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कामगार आयुक्तालय येथे कामगार आयुक्तालय स्थापनेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेल्या बोध- चिन्हाचे अनावरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद- सिंघल, कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, कामगार सह आयुक्त शिरीन लोखंडे यांच्यासह कामगार आयुक्तालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कामगार मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ब्रिटीशकालीन काळात कामगारांच्या हक्कासाठी अनेक कायदे अमलात आणले गेले. देशाच्या जडणघडणीत कामगारांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. येणाऱ्या काळात कामगार विभागामार्फत कामगारांचे हित जोपासण्याला प्राधान्य देण्यात येईल.कामगार आयुक्तालय १९२१ मध्ये स्थापन करण्यात आले होते. यावर्षी म्हणजे २०२१ आली यांचे शताब्दी वर्ष आहे. याच निमित्ताने कामगार आयुक्तालयामार्फत बोधचिन्ह तयार करण्यात आले असून याबाबत आपल्याला आनंद होत आहे.
यावेळी बालकामगार म्हणून काम करत असलेल्या मुलांनी बालकामगारी सोडून देत पुन्हा एकदा शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केलेल्या ७ मुलांचा सत्कार कामगार मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास
ReplyDelete75 कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल
- अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
· महामंडळाचे एकुण भागभांडवल होणार 700 कोटी रुपये
· विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, महिला बचतगटांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होणार
मुंबई, दि. 9 : नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी 75 कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामधून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असून अल्पसंख्याकबहुल महिला बचतगटांनाही व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महामंडळास एकुण 700 कोटी रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थापनेनंतर महामंडळाच्या अधिकृत भागभंडवलाची मर्यादा 500 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होती. त्यापैकी ४८२ कोटी रुपये इतके भागभांडवल महामंडळास उपलब्ध झाले आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पिय तरतुदीद्वारे 25 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, म्हणजेच 500 कोटी रुपयांच्या मर्यादेत महाराष्ट्र शासनाने महामंडळासाठी भागभांडवल उपलब्ध करुन दिले आहे. वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानमंडळात सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर करताना महामंडळाच्या अधिकृत भागभांडवलामध्ये 200 कोटी रुपयांची वाढ होणार आहे, असे आश्वासीत केले होते. त्यानुसार महामंडळाचे भागभांडवल आता 700 कोटी रुपये होणार आहे. आता विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात महामंडळाच्या भागभांडवलासाठी 75 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सभागृहात मंजूर करून घेतली आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
वाढीव भागभांडवलाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना तांत्रिक, व्यावसायिक तसेच उच्च शिक्षणासाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून भागभांडवल स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत वैद्यकीय शिक्षणासाठी २.५० लाख रुपये इतके कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते तर राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम यांच्याकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या रक्कमेतून राबविण्यात येणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत ५ लाख रुपये इतके कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा मानस आहे. राज्य शासनाच्या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेकरिता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले.
राज्यातील अल्पसंख्याक बहुल महिला बचतगटांना व्यवसायासाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी 15 कोटी रुपये इतक्या रकमेची तरतूद केली आहे. या योजनेस संबंधित बचतगटाकडून प्रतिसाद वाढल्यास आणि अधिक कर्जाची मागणी आल्यास अधिक निधी उपलब्ध करुन देण्याबाबत देखील शासन विचार करीत आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
योजनांविषयी माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात किंवा जुने जकातगृह, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. महामंडळाच्या https://www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
वैजयंता आणि रामदास जोशी दाम्पत्याचा अनोखा आदर्श
ReplyDeleteदेवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन एनसीआयला दोन लाखांची देणगी
मुंबई, 10 जुलै
वरळी, मुंबई भागात राहणार्या वैजयंता आणि रामदास जोशी या दाम्पत्याने समाजसेवेचा अनोखा आदर्श स्थापित केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रेरित होऊन दोन लाख रूपयांची देणगी त्यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला दिली आहे.
झाले असे की, ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तक त्यांच्या वाचनात आले आणि त्यात शून्यातून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट ही मध्यभारतातील संस्था निर्माण करण्यात त्यांनी दिलेले योगदान याचा सविस्तर उल्लेखही त्यांच्या वाचनात आला. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या मार्फत हे कॅन्सर रूग्णालय चालविले जाते. याशिवाय, अलिकडेच देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथील भाषण सुद्धा त्यांनी ऐकले, ज्यात कोरोनामुळे पालकत्त्व गमावलेल्या अपत्यांना दत्तक घेण्याचा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला होता. जोशी दाम्पत्याने लगेच या उपक्रमाला मदत करण्याची तयारी दर्शविली आणि देवेंद्र फडणवीस यांचा शोध सुरू केला. कुठून तरी त्यांनी भाजपा कार्यालयाचा संपर्क मिळविला आणि तेथून फडणवीस यांच्या कार्यालयाचा. या आणि नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या माध्यमातून होत असलेल्या कामासाठी थोडीथोडकी नव्हे, तर दोन लाख रूपयांची देणगी त्यांनी दिली.
मुंबईच्या वरळी भागात राहणार्या सौ. वैजयंता जोशी या 82 वर्षांच्या. मंत्रालयातील शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या! त्यांचे पती रामदास जोशी, हे मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेले, त्यांनी वयाची 89 वर्ष पूर्ण केली आहेत. या मदतीचा धनादेश देण्यासाठी ते या वृद्धापकाळात येऊ शकणार नव्हते. मग व्हीडिओ कॉलवर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या घरून धनादेश घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी घरी बोलावून तो धनादेश दिला. एक प्रेमळ आशिर्वादरूपी पत्र सुद्धा त्यांनी सोबत दिले.
याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामाजिक कार्यासाठी मदत करायला चांगले विचार असावे लागतात. जोशी काका आणि काकूंशी बोलून जे आत्मिक समाधान मिळाले, त्याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही! कुणाच्या व्यथा, वेदना जाणून त्यावर प्रेमाची, वात्सल्याची फुंकर घालणारे अनेक लोक आजही समाजात आहेत आणि त्याआधारावरच मानवतेची- मानवधर्माची भींत अतिशय भक्कम उभी आहे. अशीच एक दातृत्त्वाची अनुभूती मला आली. मी एवढेच म्हणेन की, आपल्यासारख्यांच्याच आशिर्वादावर वाटचाल सुरू आहे. या दोघांचे आभार मानू तरी कोणत्या शब्दात? अशा दानशूरांच्या बाबतीत संत तुकोबाराय म्हणतात...
सेवितो हा रस वाटितो आणिका ॥
त्यांच्या दातृत्त्वाला सलाम!
मुंबईत सुरक्षेचे धिंडवडे निघत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?”‘राज्यात आणखी एक 26/11 होण्याची वाट पाहिली जात आहे का?'-आ. अतुल भातखळकर यांचा सवाल
ReplyDeleteमुंबई, दि. 10 जुलै (प्रतिनिधी)
मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत सापडलेले ड्रग्स व हत्यारांच्या कारखान्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईत विक्रीस बंदी असताना सुद्धा बेकायदेशीररित्या ड्रोन विक्रीचे रॅकेट उघड झाले आहे. मुंबईत अशा प्रकारे दिवसाढवळ्या अंमली पदार्थ, हत्यारे, ड्रोनची विक्री सुरू असताना व मुंबईत सुरक्षेचे धिंडवडे निघत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?” ‘मुंबईत आणखी एक 26/11 होण्याची वाट पाहिली जात आहे का?' असा खडा सवाल भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
एका आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाचे विशेष पथक मागील वर्षी ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रात आले होते. या पथकाकडून वर्षभराच्या काळात राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या रॅकेट चा भांडाफोड करण्यात आला, तसेच मुंबईच्या डोंगरी, मुंबई शेजारील पनवेल, भिवंडी यांसारख्या परिसरात धाडी टाकून अंमली पदार्थ व हत्यारांचे कारखाने असल्याचे उघड केले होते. या संदर्भात मी स्वतः मागणी करून मुंबईसह राज्यात वाढत चाललेल्या आतंकवादी व देशविघातक कृत्यांकडे लक्ष वेधले होते, किमान त्यांनंतर तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थ व बेकायदेशीर हत्यार विक्रीची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती.
काल एका प्रमुख वृत्तपत्राने मुंबईतील बोरा बाजार, लमिंग्टन रोड, गोरेगावच्या मोतीलाल नगर परिसरात स्टिंग ऑपरेशन करून बेकायदेशीररित्या विक्री केल्या जाणाऱ्या ड्रोन रॅकेटचा पडदा फाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशा प्रकारे ड्रोन विक्री करणाऱ्या दलालांचे रॅकेट सुद्धा या स्टिंग ऑपरेशन मधून उघड करण्यात आले आहे. एका वर्तमानपत्राच्या स्टिंग ऑपरेशन मधून एवढे मोठे रॅकेट उघडकीस होऊ शकले तर राज्याच्या गृहविभागाला याची माहिती नसेल काय? मुंबई सारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. वाझे प्रकरणावरून 'वसुली' सरकार अशी बिरुदावली मिळालेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, दिवसा ढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे. राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली आतंकवादी कृत्ये, हत्यारे, अंमली पदार्थ व ड्रग्स ची खुलेआम विक्री थांबवून गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला सुद्धा आ. भातखळकर यांनी दिला आहे.