दु:शासन
आंधळा राजा,
मुकी प्रजा।
बहिरे आहे प्रशासन,
तर कसे असेल सुशासन?
पसरला आहे अंधकार,
सर्वकडे फिरताहेत दुशासन।
राम यावा, कृष्ण यावा, शेजारच्या घरी
राहू सुरक्षित ,आम्ही आमुच्या दारी।
शिखंडी बनून तरी, आता घडवा नवभारत
नकोच आंता महाभारत।
श्ुरता विरता आता विसरा,
जगा आता षंढ जिवन।
जल्लोश करा,
मेरा
भारत, नंबर वन।
No comments:
Post a Comment