Sunday, 11 May 2025

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा १३ मे रोजी

 विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा १३ मे रोजी

 

·        राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती.

मुंबई, दि.9 : कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे मंगळवार, दि. १३ रोजी वितरण करण्यात येणार आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील ५२ कामगारांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हेकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाकामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकरकामगार राज्यमंत्री  अॅड.आशिष जयस्वालसर्व स्थानिक खासदार व आमदारतसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनविकास आयुक्त तुकाराम मुंढेकामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोडकामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

            हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनप्रभादेवीमुंबई येथे मंगळवार दि.१३ मे रोजी सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रदान करण्यात येणारे पुरस्कार सन २०२३ मधील असून छत्रपती संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेडचे कामगार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांना कामगार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रु.५० हजारस्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच राज्यभरातील ५१ कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून पुरस्कार्थींना प्रत्येकी रु.२५ हजारस्मृतीचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

नोकरी करत असतानाच विविध सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिकक्रीडासंघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दरवर्षी एका कामगाराची कामगार भूषण पुरस्कारासाठी तर ५१ कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात येतेअशी माहिती कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी दिली आहे.

कामगार भूषण पुरस्कार :13मे

 कामगार भूषण पुरस्कार :

श्रीनिवास कोंडिबा कळमकरमल्टिस्कील ऑपरेटरबजाज ॲटो लिमिटेडबजाजनगरछत्रपती संभाजीनगर.

 

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार  :

१) नेहा विलास भांडारकरभारतीय आर्युविमा महामंडळनागपूर,

२) महेश मधुकर सावंत-पटेलसीमेन्स लिमिटेड,ठाणे-बेलापूर रोडठाणे

३) चंद्रकांत महादेव कांबळेबजाज ॲटो लिमिटेड,वाळूजछत्रपती संभाजीनगर

४) दादासाहेब सुरेंद्र भंडेस्कोडा ॲटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि.,छत्रपती संभाजीनगर

५) नरेंद्र शंकर गोखलेराष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड,  थळता.अलिबागजि.रायगड.

६) विजय रामेश्वर बोराडेहिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड खामगांवजि.बुलडाणा

७) सचिन लक्ष्मण पिंगळेमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळविभागीय कार्यालय,  बुलडाणा

८) संदीप सतीश रांगोळेटाटा मोटर्स कंपनी लिमिटेडपिंपरीपुणे

९) उमेश रामचंद्र फाळकेटाटा मोटर्स कंपनी लिमिटेडपिंपरीपुणे

10) राजकुमार गुलाबराव किर्दतअल्फा लावल इंडिया लिमिटेड,सातारा

11) नामदेव रामसा उईकेसी.आय.ई. ॲटोमोटिव्ह इंडिया कास्टींग लि.,  उर्सेगांवता.मावळजि.पुणे

12) निमीषा नितीन मोहरीरभारतीय जीवन बिमा निगमनागपूर

13) दिगंबर शंकरराव पोकळेकमिन्स इंडिया लिमिटेडकोथरुडपुणे

14) दत्तात्रय सुखदेव दगडेस्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि.निघोजे म्हाळुंगे खराबवाडीता.खेडचाकणपुणे

15) संजय जयसिंग देशमुखथरमॅक्स लिमिटेडचिंचवडपुणे

16) विकास चंद्रकांत धुमाळमहाराष्ट्र स्कुटर्स लि.सातारा लि.आकुर्डीपुणे

17) बद्रिनाथ शिवनाथ भालगडेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसिल्लोडता.सिल्लोडजि. छत्रपती संभाजीनगर

18) प्रविण बबन जाधवगोदरेज ॲण्ड बॉईजमॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.,शिंदेवाडीशिरवळता.खंडाळाजि.सातारा

19) मनोज अनंत पाटीलटाटा स्टील लिमिटेडएम.आय.डी.सी.तारापूरजि.पालघर

20) सुनिता रविंद्र परमणेमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितपोफळीता.चिपळूणजि. रत्नगिरी

21) प्रकाश बाबुराव चव्हाणटाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेईकल्स लिमिटेड चिखलीपुणे

22) शिवराज दादासो शिंदेप्रिमियम ट्रांन्समिशन प्रा.लिमिटेड,चिंचवडपुणे

23) कविता नरेश भोसलेमुंबई पोर्ट ट्रस्टमुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयवडाळा (पूर्व)मुंबई

24) मनोज देविदास गवळीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळधुळे

25) रविंद्र बाबाजी जाधवविचारे एक्सप्रेस ॲण्ड लॉजिस्टीक प्रा.लि.कांदिवली (प)मुंबई

26) मारोती सदाशिव पिंपळशेंडेचंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित,ऊर्जानगर

27) साखरचंद मारुती लोखंडेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्यवर्ती कार्यशाळादापोडीपुणे

28) देविदास पंडीत पवारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळधुळे

29) किसन दामोधर नागरकर,महाराष्ट्र राज्य विद्दुत पारेषण कंपनी मर्यादित बल्लारशाह

३०) रविंद्र किसनराव रायकरकमिन्स इंडिया लिमिटेडकोथरुडपुणे

31) वंदना अशोक मनपेचंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितऊर्जानगरचंद्रपुर

32) विवेक सर्जेराव रावतेमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितइस्लामपुर,ता.वाळवाजि.सांगली

33) देवकी ओमप्रकाश कोकासबिल्ट पेपर ग्राफिक्स प्रॉडक्ट लिमिटेडबल्लारपूरपेपर मिल्सचंद्रपूर

34) एकनाथ रमेश उगलेथरमॅक्स लिमिटेडचिंचवडपुणे

35) राजेंद्र ज्ञानदेव कांबळेदि कराड को-ऑप.बँक लिमिटेडकराड

36) संजय दगु गोराडेकिमप्लास पाईपिंग सिस्टीम प्रा.लिमिटेड,अंबडनाशिक

37) नितीन आनंदराव देडगेवनाझ इंजिनिअर्स लिमिटेडकोथरुडपुणे

38) सुनिल गुंडू दळवीविभाग नियंत्रक यांचे कार्यालय मध्यवर्ती बसस्थानककोल्हापूर

39) पोपट चंदु रसाळस्टरलाईट टेक्नॉलॉजीछत्रपती संभाजीनगर

40) अजित अनंत कामतेकरराष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडथळता.अलिबागजि.रायगड

41) गुणवंत वसंतराव भारस्करमहाराष्ट्र राज्यफ विद्युत वितरण कंपनी लि.वाशिम

42) नंदकुमार साहेबराव पाटीलगोदरेज ॲण्ड बॉईज मॅ.कंपनी लिमिटेडफिरोजशहा नगरविक्रोळीठाणे

43) संजय दिनकर चव्हाणकिर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेडखडकीपुणे

44) सचिन मारुती पवारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळठाणे आगारजि.ठाणे

45) विजय काशीराम नंदागवळीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनागपूर रोडभंडारा

46) भारत गोरख मांडेकेबल कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमाळेगावता.सिन्नरजि.नाशिक

47) शिवाजी नागनाथराव राऊतमेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड,वाळुजछत्रपती संभाजीनगर

48) अमोल अशोक आळवेकरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,  कोल्हापूर आगारजि. कोल्हापूर

49) दिपक वसंतराव पाटीलहिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड,ओझर (मिग)ता.निफाडजि. नाशिक

50) विलास मोरेश्वर पंचभाईमहिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेडसातपूर नाशिक

51) अनंत अशोक शिंदेमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळजळगाव

याबस्टार्टअप्सना मिळणार शासनाच्या विविध विभागासोबत काम करण्याची संधी

 याबस्टार्टअप्सना मिळणार शासनाच्या विविध विभागासोबत काम करण्याची संधी


         द्दल सविस्तर माहिती दिली.

स्टार्टअप्सना मिळणार शासनाच्या विविध विभागासोबत काम करण्याची संधी

         यावेळी विविध क्षेत्रातल्या २४ स्टार्टअप धारकांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादन किंवा सेवेची शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रायोगिक स्वरूपात अंमलबजावणी करण्यासाठी ज्या विभागासोबत काम करणार आहे त्या विभागासोबत काम करणार आहेत या सर्व स्टार्टअप्सना प्रत्येकी १५ लाखांचा कार्यादेशही दिला जाणार असल्याची माहिती यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी  दिली. 

सहभागी स्टार्टअप्समध्ये हेल्थटेकएजटेकअ‍ॅग्रीटेकगव्हटेकपर्यावरणपूरक तंत्रज्ञानवाहतूक व्यवस्था यांसारख्या क्षेत्रांतील स्टार्टअप्सचा देखील समावेश होता. मरीन टेक, दिव्यांग,ॲग्रीटेक, दिव्यांगाचे जीवन सुसाह्य करणारी एआय सांकेतिक भाषा, कृषी रोबोटिक्स,प्रगत नॅनो बबल तंत्रज्ञानाद्वारे जल उपचार व शुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणासौर पॅनल्सवर नॅनो कोटिंगद्वारे कार्यक्षमतेत वाढएआय प्रणालीद्वारे रस्त्याच्या स्थितीचे रिअल-टाइम विश्लेषण व खड्ड्यांचे शोधदृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना सक्षम करण्यासाठी स्मार्ट व्हिजन चष्मेस्वच्छ ऊर्जा (ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे)कचरा व्यवस्थापन आणि सर्क्युलर इकॉनॉमी (पर्यावरण जैवतंत्रज्ञान)मातीपाणी व शेती स्वच्छ व सुधारण्यासाठी पर्यावरणपूरक बायोटेक सोल्युशनजलद जखम भरून काढण्यासाठी न चिकटणारीशोषणक्षम वॉउंड ड्रेसिंग उत्पादनेतीव्र थंडावा देणारी जॅकेटसेफ्टी हेल्मेट कुलरहायपर कूलिंग टॉवेल इत्यादी, IoT-आधारित सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीनदिव्यांग व्यक्तींना संकेतस्थळावरील कंटेंट सुलभपणे उपलब्ध करून देणारे डिजिटल सोल्युशनकृषी प्रक्रिया व अ‍ॅरोमॅटिक्सउपग्रह रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे भूस्तरावरील हालचालींमधील धोके ओळखणेजिओस्पेशियल विश्लेषणउपग्रह रिमोट सेन्सिंग आणि डेटा अ‍ॅनालिटिक्ससाठीकचरा व्यवस्थापन आणि सर्क्युलर इकॉनॉमीपर्यावरणपूरक व नैसर्गिक गृह स्वच्छता उपायड्रोन व सर्वेक्षण तंत्रज्ञान आदी क्षेत्रातील संपूर्ण देशभरात उत्कृष्ट असलेले स्टार्टअप्स म्हणून नोंद असलेल्या या स्टार्टअप्सनी आपल्या कामाची माहिती यावेळी दिली.

यावेळी या कार्यक्रमात डॉ. युवराज परदेशी लिखित 'स्टार्टअप रोड मॅपया पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले

स्टार्टअप ही लोकचळवळ झाली पाहिज़े - मंत्री मंगल प्रभात लोढा "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक"मध्ये 24 स्टार्टअपनी केले सादरीकरण

 स्टार्टअप ही लोकचळवळ झाली पाहिज़े

- मंत्री मंगल प्रभात लोढा

 

  • "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक"मध्ये 24 स्टार्टअपनी केले सादरीकरण

 

  • 'स्टार्ट अप रोड मॅपया माहितीपर पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन 

 

मुंबई, दि. ९ : एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचेत्यामुळेच भारताला  'सोने की चिडियाम्हटले जात होते. देशाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्टार्टअप ही लोकचळवळ व्हायला हवी, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. आज सहभागी झालेल्या कार्यक्रमात शासनाच्या सहा विभागांनी र्स्टाटअप्स सोबत काम करण्यास अनुमती दर्शवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

         महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण  करण्याच्या उद्देशाने सामान्य  प्रशासन विभागामार्फत "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक " हा  5 ते ९ मे दरम्यान कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात महाराईज-र्स्टाअप पिचींग सेशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते.

कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा,उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी,आयुक्त आर.विमला, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसासटीचे आयुक्त नितीन पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव गणेश पाटील, वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव अंशू सिन्हामहाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण कल्याण सहकारी संस्थेच्या पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी उपस्थित होते.

 

      प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला विकसित करण्याच्या दृष्टीने स्टार्टअप सारख्या योजना आणल्या आहेत. यात अनेकांनी देशाचे नाव उंचावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रानेही स्टार्टअप मध्ये देशात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पण शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात स्टार्टअपची संख्या कमी असल्याची खंतही मंत्री श्री.लोढा यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागात स्टार्टअपची संख्या वाढण्यासाठी कौशल्य आणि नावीन्यता विभाग प्रयत्न करत असून मुख्यमंत्री फडणवीस स्वतः यात लक्ष घालत असल्याचे मंत्री श्री.लोढा यांनी  यावेळी स्पष्ट केले.

 

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे कामकाज गतीमान पद्धतीने सुरू आहे याची माहिती देताना अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या. देशात सर्वाधिक स्टार्टअप्स  महाराष्ट्रात असून २८ हजार ४०६ र्स्टाटअप्सच्या माध्यमातून  ३ लाख पेक्षा अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. यामध्ये १४००० पेक्षा जास्त स्टार्टअप महिला नेतृत्वाखाली आहेत. महाराष्ट्र स्टार्ट अप २०२५ हे नवीन येणारे धोरण, महाराष्ट्र स्टार्टअप विक याबद्दल सविस्तर माहिती दिली.

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

 दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून

सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

मुंबई, दि. 9 : संचालनालयलेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालयमुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते कीनिवृत्तीवेतन सुरू करणेनिवृत्तीवेतन बंद करणेनिवृत्तीवेतन फरक अदा करणे अथवा अतिरिक्त रक्कम वसुल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे / मोबाईलद्वारे निवृत्तीवेतनधारकांना कळविले जात नाही. तसेच व्हॉट्स अॅपद्वारे अथवा इतर सोशल मिडियावरून निवृत्तीवेतन बंद होऊ नयेयाकरिता लिंक ओपन करून फॉर्म भरण्याबाबतही कळविले जात नाही.

तसेच कोषागार कार्यालयामार्फत कोणत्याही कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकाच्या घरी पाठविले जात नाही. कोषागारामार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांकरिता पत्रव्यवहार केला जातो. सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात येते कीत्यांनी फोन पे / गूगल पे/ ऑनलाईन रक्कम भरण्याच्या अथवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये. अशा प्रकारे दूरध्वनीद्वारे / मोबाईलद्वारे संदेश प्राप्त झाल्यास संबंधित कोषागार कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी/ कोषागार अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी · सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार

 राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

·        सवलतीच्या दरात वीज पुरवठाकिसान क्रेडिट कार्ड,

 बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार

 

मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छीमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने आणि पुढाकाराने मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा शासन निर्णय तातडीने जारी करण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील मच्छीमार व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीबरोबरच कृषीसंलग्न पशुपालनमत्स्यपालनफळेभाजीपाला या क्षेत्रांवर देखील मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. राज्यातील मत्स्य व्यवसायिकांचे हे योगदान लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आला होता. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयामुळे राज्यातील मच्छिमारमत्स्यकास्तकारमत्स्य उत्पादकमत्स्य व्यवस्थापनमत्स्यबीज संवर्धकमत्स्य बोटुकली संवर्धन करणारे घटक तसेच यामध्ये प्रतवारीआवेष्टनसाठवणूक करणारे घटक अशा व्यक्तींना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सोयीसुविधा व सवलती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार आहे तसेच स्थानिक पातळीवर मत्स्य व्यवसायाद्वारे रोजगारनिर्मितीत मोठा हातभार लागणार आहे. त्याकरिताच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कृषी क्षेत्राला मिळणाऱ्या विविध सुविधा आणि सवलती या आता मत्स्य व्यवसाय क्षेत्रालाही या शासन निर्णयामुळे मिळणार आहेत.

या निर्णयामुळे मत्स्य शेतकरीमत्स्य संवर्धन प्रकल्प यांना कृषी दराने सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येणार आहे. मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड याचा लाभ दिला जाणार आहे. बँकांकडून कृषी दराने कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रानुसार अल्प दराने विमा संरक्षणाचा लाभही मत्स्य क्षेत्रात देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना सौर ऊर्जा संदर्भात  देण्यात येणारे लाभ यापुढे मत्स्य व्यवसायिकांना देण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

या शासन निर्णयात मच्छिमारमत्स्यसंवर्धक,  मत्स्य व्यवसायिक मत्स्यकास्तकारमत्स्यबीज,  मत्स्य बोटुकली संवर्धकमत्स्य व्यवस्थापन अशा मत्स्य व्यवसायाशी संबंधित संज्ञांच्या प्रथमच सुस्पष्ट व्याख्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मत्स्य उत्पादक त्याचबरोबर मत्स्य व्यावसायिक आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या कामगार क्षेत्राला या शासन निर्णयाचा मोठा लाभ मिळणार आहे.

जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य

 जातपंथधर्म विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य

 संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. संतांची ही मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. जातपंथधर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो. वारकारी संप्रदायने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे.

भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही तर मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. संत परंपरेमुळेत्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे. अध्यात्मिक बैठकीशिवाय मनःशांती मिळत नाही. या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत देश भारत आहे आणि ही श्रीमंती संतांनी टिकवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

वारीमध्ये स्वयंशिस्त असतेवारी करणाऱ्यांच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण होतो. गितेतला विचार वारीद्वारे रुजविण्याचा प्रयत्न होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी गितेतील हा विचार ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीतून मांडला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाविताना ज्ञानेश्वरी ग्रंथ उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्यात आलाअसेही श्री. फडणवीस म्हणाले. अशा अध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून विचारांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान योगी निरंजननाथ यांनी प्रस्ताविकात सोहळ्याची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या 'नमो ज्ञानेश्वराया ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

00000

Featured post

Lakshvedhi