Sunday, 2 February 2025

गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेतमाघी गणेश जयंती-१🔸*

 ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️

           *🔸माघी गणेश जयंती-१🔸*


*---------------------------------------------*

*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*

*---------------------------------------------*


*🟣०१/०२/२०२५- माघी गणेश जयंती...🙏*


*गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत... या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ‘ पुष्टिपती विनायक जयंती ‘ म्हणून आपण साजरा करीत असतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘ श्रीगणेश चतुर्थी ‘ म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला ‘ गणेश जयंती ‘ म्हणून आपण साजरा करीत असतो.....*


*माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. तसेच भाद्रपद महिन्यातील गणेशचतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेशमूर्तीची पूजा केली जाते, तशी माघातील गणेशजयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. गणेशमूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्रग्रंथात सांगितलेले नाही. काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेशजयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते.....*


*गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रत आचरून ढुंढिराजाचे पूजन करावे आणि तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आले आहे. दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर भोजन करण्याचीही प्रथा आहे.....*


*गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला ‘ तिलकुंद चतुर्थी ‘ असेही म्हणतात.....*


*या तिथीला स्नान, दान,जप व होम कर्म केल्यास गणेशकृपा राहते अशीही उपासकांची श्रद्धा असते.....*


*माघ महिन्यातील या गणेश जयंतीच्या दिवशी करावयाचे गणेशपूजन भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या गणेशपूजनासारखेच असते. या दिवशी पाण्यात तीळ घालून त्या पाण्याने स्नान करावयाचे असते. तसेच उपवास करावयाचा असतो. भाद्रपदातील गणेशचतुर्थीच्या दिवशी ‘ पार्थिव गणेश पूजन ‘ करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्या गणेशपूजनातीलल गणेशमूर्ती ही मातीचीच असावी लागते. याला तसे कारणही आहे, कारण या दिवसात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती एकप्रकारे पृथ्वीचीच पूजा असते. म्हणून मातीच्याच गणेशमूर्तीचे पूजन करावयाचे असते.....*


*माघ महिन्यातील गणेशजयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करावयाची असते. प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्त्व आणले जाते. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, यज्ञोपवीत , गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी पूजन करावयाचे असते. माघ महिन्यातील या गणेशपूजनात पत्री अर्पण न करता दूर्वा अर्पण करतात. तसेच पुरणाच्या मोदकांऐवजी तिळसाखरेच्या मोदकांचा प्रसाद अर्पण करावयाचा असतो. मूर्ती विसर्जनापूर्वी उत्तरपूजा करून देवत्त्व काढून घेतले जाते. एक गोष्ट मात्र खूप महत्त्वाची ती म्हणजे गणेशमूर्ती लहान असावी.....*


*देवाला न विसरता संसार करा...*

*ईश्वरपूजा करूनही जर आपण आपल्यात चांगला बदल केला नाही तर पूजा व्यर्थ ठरते. तसेच उत्सव साजरा करीत असतांना प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच उत्सव साजरे करणार्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी आहे. माघी गणेशोत्सवाचा काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असतात. म्हणून या उत्सवाच्या काळात ध्वनीवर्धकाचा वापर संयमाने व्हावयास हवा. श्रीगणेशाने प्रत्येक अवतारात अनेक दुष्ट राक्षसांचा नाश केला, आपणही गणेश उपासना करून आपल्यातील आळस, अज्ञान, अंधश्रद्धा, अनीती, दुराचार, अस्वच्छता इत्यादी वाईट गोष्टींचा नाश करण्याचा प्रयत्न करायला हवा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड् रिपूंवर नियंत्रण ठेवण्याची आत्मशक्ती प्राप्त करून घ्यावयास हवी. आधुनिक कालात टी.व्ही., मोबाईल, व्हाटस्अप, फेसबुक इत्यादींचा वापरही संयमाने करावयास हवा.....*

*स्रोत: आंतरजाल, दा. कृ. सोमण, esakal.com*

❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️

माघ महिन्यात माघी गणेश जयंतीअशी केली जाते पूजा..

 ❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

          *🔸माघी गणेश जयंती-२🔸*

*---------------------------------------------*

*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.**

*---------------------------------------------*


*🟣०१/०२/२०२५- गणेश जयंती...🙏*


*माघ महिन्यात माघी गणेश जयंती साजरी केली जाते... आता जयंती म्हणजे जन्म हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पण आजही अनेकांना गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती यामधील फरक पटकन कळत नाही. म्हणूनच आज आपण माघी गणेश जयंतीबद्दल सगळी काही माहिती घेणार आहोत.....*


*माघी गणेश जयंती नेमकी कशी साजरी केली जाते...  त्यामागील आख्यायिका कोणती हे आपण आता जाणून घेऊया.....*


*आपल्या लाडक्या बाप्पाचे तीन अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात... या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगळी आहे आणि वेगवेगळ्या तिथींमध्ये बाप्पाचा जन्म झाला. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा दिवस हा माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजे  गणेश जयंतीचा दिवस. असे साधारण तीन वेगवेगळे दिवस साजरे केले जातात....*


*याबद्दल आणखी एक सांगितले जाते ते असे की, गणपतीने असुराचा वध करण्यासाठी तीनवेळा वेगवेगळे अवतार घेतले ते हे तीन अवतार असे देखील मानले जाते.....*


*यातील तिसऱ्या आणि माघ महिन्यातील अवताराविषयी असे सांगितले जाते, स्कंद पुराणातही याचा उल्लेख करण्यात आला आहे... असे म्हणतात या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्याच्या वधासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतला म्हणून हा जन्म माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो.....*   


*🔸बाप्पाच्या जन्माची आख्यायिका...*

*गणपती बाप्पाच्या जन्माच्या अनेक आख्यायिका तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील... त्यापैकी एक प्रचलित आख्यायिका आपल्या सगळ्यांना माहीत आहे; ती म्हणजे पार्वतीदेवींनी चिखलापासून एक मूर्ती तयार केली. गंगा नदीच्या तीरावर जलवर्षाव झाला. त्याचे पाणी मूर्तीवर पडले आणि त्या मूर्तीमध्ये प्राण आले. पार्वती आणि गंगा नदीमुळे बाप्पाचा जन्म झाल्यामुळेच त्याला द्वैमातुर असे देखील म्हटले जाते. या शिवाय बाप्पाचा जन्म माघी शुक्ल चतुर्थी आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी दरम्यान झाला. दोन वेगवेगळ्या तिथींना बाप्पांचा जन्म झाला. हा जन्म दिवस साजरा करणे म्हणजे माघी गणेशशोत्सव किंवा माघी गणेश जयंती साजरी करणे होय.....*


*या व्यतिरिक्त बाप्पाच्या निर्मितीच्या वेगवेगळ्या आख्यायिका आजही प्रचलित आहे.....*


*बाप्पाला दाखवला जातो तिळाचा नैवेद्य...*

*गणपती बाप्पाला मोदकाचा प्रसाद दिला जातो... त्याला मोदकाचा नैवेद्य आवडतो हे आपण जाणतोच. पण माघी गणपतीच्या काळात बाप्पाला तीळाचे लाडू किंवा तीळ-साखर असा प्रसाद दिला जातो. कारण माघी जयंतीला ‘तीलकुंद चतुर्थी’ असे देखील म्हटले जाते म्हणूनच बाप्पाला तीळाचा नैवेद्य दिला जातो.....*


*🔸अशी केली जाते पूजा...*

*पूर्वी घरच्या घरी माघी गणेश जयंती साजरी केली जातं... पण आता याला सार्वजनिक स्वरुप प्राप्त झाले आहे.  हल्ली अनेक ठिकाणी मंडपांमध्ये गणेशमूर्ती आणल्या जातात. पण घरी केलेल्या गणेश मूर्तीचीही तुम्ही प्रतिष्ठापना करु शकता.( पण याचा पुराणात उल्लेख नाही) जर तुम्ही मूर्ती आणू शकत नसाल, तरी देखील तुम्ही गणेश जयंती करु शकता. या दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही प्रहरी गणपतीचे स्मरण करु शकता. अथर्वशीर्षाचे पठण करुन बाप्पाला दुर्वा वाहून तुम्ही ही पूजा मनोभावे करु शकता.....*


*स्त्रोत: आंतरजाल, Leenal Gawade*

❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

*गणेश जयंती (शब्दशः "गणेशाचा वाढदिवस"), ज्याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी, आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात...

 ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️

             *🔸माघी गणेश जयंती-३🔸*


*---------------------------------------------*

*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*

*---------------------------------------------*


*🟣०१/०२/२०२५- गणेश जयंती...🙏*


*गणेश जयंती (शब्दशः "गणेशाचा वाढदिवस"), ज्याला माघ शुक्ल चतुर्थी,  तिलकुंड चतुर्थी, आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात... हा एक हिंदू सण आहे. या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्म दिवस साजरा केला जातो. हा एक लोकप्रिय सण आहे. विशेषत: भारताच्या महाराष्ट्र राज्यात आणि गोव्यात ग्रेगोरियन कॅलेंडरशी संबंधित असलेल्या हिंदू कॅलेंडरनुसार माघा महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी (उज्ज्वल पंधरवड्याचा चौथा दिवस किंवा मेणाचा चंद्र ) साजरा केला जातो.....*


*गणेशाचा जन्मदिवस...*

*गणेश जयंती आणि अधिक लोकप्रिय, जवळजवळ संपूर्ण भारतीय गणेश चतुर्थी उत्सव यातील फरक हा आहे की नंतरचा सण ऑगस्ट/सप्टेंबर ( भाद्रपद हिंदू महिना) मध्ये साजरा केला जातो... एका परंपरेनुसार गणेश चतुर्थी हा गणेशाचा जन्मदिवसही मानला जातो. गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशात तिलो चौथ किंवा सकट चौथी असेही म्हणतात, जेथे कुटुंबातील मुलाच्या वतीने गणेशाचे आवाहन केले जाते.....*


*उत्सवाच्या दिवशी, गणेशाची प्रतिमा, प्रतिकात्मक शंकूच्या स्वरूपात हळद किंवा सिंधूर पावडर किंवा काही वेळा गोबरापासून बनविली जाते आणि पूजा केली जाते... नंतर उत्सवानंतर चौथ्या दिवशी पाण्यात विसर्जित केले जाते. तिळ ( तीळ ) बनवलेली विशेष तयारी गणेशाला अर्पण केली जाते आणि नंतर भक्तांना खाण्यासाठी प्रसाद म्हणून वाटली जाते. दिवसा उपासनेदरम्यान उपवास पाळला जातो आणि त्यानंतर रात्री विधींचा एक भाग म्हणून मेजवानी केली जाते.....*


*या दिवशी उपवास करण्याव्यतिरिक्त, गणेशाच्या ("विनायक" म्हणून ओळखले जाणारे) पूजाविधी पाळण्यापूर्वी, भक्त त्यांच्या अंगावर तिळ (तीळ) ची पेस्ट लावल्यानंतर तिळमिश्रित पाण्याने स्नान करतात... व्यक्तीचे नाव आणि कीर्ती वाढवण्यासाठी या दिवशी व्रत केले जाते.....*


*जरी गणेशाला उत्तर प्रदेशात ब्रह्मचारी देव मानले जाते (इतर ठिकाणी त्याला "विवाहित" मानले जाते), परंतु गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने, जोडपे पुत्रप्राप्तीसाठी त्याची पूजा करतात.....*


*गणेश जयंतीला, मोरगाव , पुणे जिल्हा, महाराष्ट्रातील मोरेश्वर मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात... हे मंदिर अष्टविनायक नावाच्या आठ पूज्य गणेश मंदिरांच्या यात्रेचा प्रारंभ आणि शेवटचा बिंदू आहे. अशी आख्यायिका आहे की गणेशाने या ठिकाणी मोरावर स्वार होऊन कमलासुर या राक्षसाचा वध केला (संस्कृतमध्ये मयुरा, मराठीत - मोरा ) आणि म्हणून त्याला मयूरेश्वर किंवा मोरेश्वर ("मोराचा देव") म्हणून ओळखले जाते.....*


*अष्टविनायक सर्किटवरील आणखी एक मंदिर म्हणजे सिद्धटेक... अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र येथील सिद्धिविनायक मंदिर. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात मोठी गर्दी होते. भीमा नदीच्या पूर्वेला असलेल्या या प्राचीन मंदिरात - गणेशाची मूर्ती आहे, ज्यामध्ये त्यांची पत्नी सिद्धी यांच्या बाजूने ओलांडलेल्या पायात बसलेली आहे. गणेशाची प्रतिमा भगव्या पेस्टने सुशोभित केलेली आहे आणि तिची सोंड उजवीकडे वळलेली आहे, जे दुर्मिळ चित्रण मानले जाते. अशाप्रकारे, हे अत्यंत श्रद्धेने आयोजित केले जाते आणि देवतेला संतुष्ट करण्यासाठी धार्मिक नवसांचा कडक संच पाळला जातो. गणेशाची कृपा मिळविण्यासाठी भाविक खडबडीत डोंगराळ प्रदेशात सात वेळा टेकडीची प्रदक्षिणा (प्रदक्षिणा) करतात . पौराणिक कथा सांगते की देव विष्णूने मधु-कैतभ या राक्षसांना मारण्याआधी या ठिकाणी गणेशाचे आशीर्वाद घेतले आणि त्यांची निराशा दूर केली.....*


*कोकण किनाऱ्यावर गणपतीपुळे येथे समुद्रकिनाऱ्यावरील मंदिरात गणेशाची स्वयंभू (स्वयं-प्रकट) मूर्ती आहे, जी दरवर्षी हजारो भक्तांद्वारे पुजली जाते आणि भेट दिली जाते... या मंदिरातील गणेशाला पश्चिम द्वारदेवता ("भारताचा पाश्चात्य देवता") म्हणून ओळखले जाते. या कोकण किनारी मंदिरात गणेश जयंतीही साजरी केली जाते.....*

*स्रोत: आंतरजाल, विकिपीडिया...*

❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️

आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते..

 मला एकदा एका इंग्रजाळलेल्या माणसाने हिणवण्याच्या स्वरात म्हटलं "अरे काय त्या मराठीत टाइप करता रे तुम्ही... 

किती वेळ लागतो... 

बोअरिंग काम...  

इंग्रजित कसं पटापट 

टाईप होतं... 

तुमचं मराठी म्हणजे......"


मी त्याला सांगितलं, 

"अरे बाबा श्रीमंत आणि 

गरिबामध्ये तेवढा फरक असणारच". 


तो खुश होऊन म्हणाला 

"चला म्हणजे मराठी गरीब 

हे तू मान्य केलंस तर"?? 


मी म्हटलं  

"मित्रा चुकतोयस तू..  


इंग्रजी भाषेत वर्णाक्षरं किती..?"


तो म्हणाला २६..


मी म्हटलं  


"मराठीत याच्या दुप्पट 


५२ आहेत..


इंग्रजिच्या दुप्पट मालमत्ता 

आहे आमची..


आता सांग, 

कोण गरीब आणि 

कोण श्रीमंत? 


केवळ जीन्स घालून बाहेर 

पडणारी स्त्री पटकन 

तयार होऊ शकते..

 

पण भरजरी कपडे घालून 

सर्व दागदागिने धालून 

बाहेर पडणारी स्त्री 

जास्त वेळ घेणारच..


आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते..


म्हणुनच ती समोर आल्यावर तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही, 

तिचं सौंदर्य बघून सर्व 

धन्य होतात."


 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

 मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आदिंचा वापर करुन लिहिलेली कविता नेटवर सापडली. कुणी लिहिली हे कदाचित विकी'पीडी'या लाच ठाऊक असेल. 

वाचाच, मस्त आहे..!


🌹


*शृंगार मराठीचा*                  

 

_*अनुस्वारी*_ शुभकुंकुम ते 

भाळी सौदामिनी |              


_*प्रश्नचिन्ही*_ डुलती झुमके 

सुंदर तव कानी |             


नाकावरती _*स्वल्पविरामी*_

शोभे तव नथनी |              


_*काना*_-काना गुंफुनी माला 

खुलवी तुज मानिनी |       


_*वेलांटी*_चा पदर शोभे

तुझीया माथ्याला |                 


_*मात्रां*_चा मग सूवर्णचाफा

वेणीवर माळला |          

    

_*उद्गारा*_चा तो गे छल्ला

लटके कमरेला |                   


_*अवतरणां*_च्या बटा 

मनोहर भावती चेहर्‍याला |     

      

_*उ*_काराचे पैंजण झुमझुम

पदकमलांच्यावरी |         


_*पूर्णविरामी*_ तिलोत्तम तो 

शोभे गालावरी ॥


🌹मराठी भाषेचा श्रृंगार🌹

Saturday, 1 February 2025

गंगा जलावरील एक छोटीशी वैज्ञानिक नोंद., कुंभ मेळा,pl share

 सुरेखा झिंगडे यांनी पाठवलेला...फॉरवर्ड केलेला संदेश) _


*गंगा जलावरील एक छोटीशी वैज्ञानिक नोंद.... केईएम रुग्णालयात माझ्या सेवेदरम्यान.... मी व दिवंगत डॉ. एस.आर. कामथ हे अत्यंत प्रसिद्ध चेस्ट स्पेशलिस्ट.....*_ *आम्ही तत्कालीन अलाहाबाद येथे होणाऱ्या कुंभवर चर्चा करत होतो..... सरांनी गंगाजलाचा सूक्ष्मजीवशास्त्रीय अभ्यास करण्याचे ठरवले....* _आम्ही जाणून घेण्यास उत्सुक होतो.... लाखोंच्या गंगास्नाना नंतर कोणीही *संसर्गा* सह येत नाही...._ *म्हणून सरांनी एका व्यक्तीला निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्या घेऊन पाठवले आणि 5 वेगवेगळ्या ठिकाणाहून गंगाजल गोळा करण्याची सूचना दिली....* 

1. काठावरून

    2. थोडे दूरून 

3. किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला

    4. मध्यभागी 

आणि  (सर्वात महत्वाचे) 

5. जेथे जास्तीत जास्त लोक डुबकी घेत होते तेथून... 

    त्या 5 बाटल्यांचा 

एक संच मी माझ्या प्रयोगशाळेत बॅक्टेरियोलॉजिकल अभ्यासासाठी नेला आणि दुसरा सेट 

हाफकिन्सला बॅक्टेरियोलॉजी आणि व्हायरोलॉजीच्या,*काउंटर तपासणीसाठी* पाठवण्यात आला....

*परिणाम धक्कादायक होते....माझ्या 5 नमुन्यांपैकी कोणातही जीवाणू वाढलेले  दिसले नाहीत*.... 

हाफकिन्सला पाठवलेल्या 5 नमुन्यांमध्ये देखील 

*कोणतेही बॅक्टेरिया दिसून आले नाहीत.*

 परंतु नमुन्यांमध्ये *बॅक्टेरियोफेजेसचे*

 प्रमाण खूप जास्त होते...... _*बॅक्टेरियोफेजेस* म्हणजे काय?...

ते *व्हायरस* असतात 

जे *बॅक्टेरियांना* खातात.....

त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की माझ्या नमुन्यांच्या चाचणीत कोणताही जीव का वाढलेला नाही..... 

लाखो लोकांनी डुबकी मारूनही आम्हाला आतापर्यंत कोणतीही

 *महामारी का दिसली नाही?*

 हे देखील ते स्पष्ट करते......... 

*कुंभच्या गूढशास्त्राचा हा पहिला  संशोधित अनुभव.......*

(मूळ इंग्रजीतील संदेश स्वैर भाषांतरित)

Auto rate


 

प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप

 प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार

महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप

 

मुंबई, दि. 1 : नवी दिल्ली येथे झालेल्या एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये अनेक वैयक्तिक तसेच सांघिक पारितोषिके प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीच्या कॅडेट्सना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन येथे निमंत्रित करून शाबासकी दिली.

महाराष्ट्र एनसीसीने आजवर 17 वेळा प्रतिष्ठित असे पंतप्रधानांचे निशाण पटकावले आहेअनेकदा राज्य एनसीसी संचालनालय द्वितीय क्रमांकावर आली आहे. यंदा अनेक सांघिक प्रकारांमध्ये राज्यातील कॅडेट्सनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्याच्या कॅडेटने प्रजासत्ताक दिन परेडचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एनसीसी आजही देशात सर्वोत्कृष्ट आहे असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले. मात्र पंतप्रधानांचे निशाण पुन्हा प्राप्त करण्यासाठी एनसीसीने नव्या उत्साहाने तयारीला लागावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

जीवनात एनसीसीचा युनिफॉर्म घालण्यास भाग्य लागतेअसे सांगून आपण स्वतः सव्वा चार वर्षे एनसीसी छात्र होतो असे राज्यपालांनी सांगितले. एकदा तुम्ही एनसीसी प्रशिक्षण पूर्ण केले की आयुष्यभर तुम्ही शिस्तीने जीवन जगता असे सांगून 'विकसित भारतसाकार करण्यासाठी सर्वच क्षेत्रात शिस्तीची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले. आपण सशक्त असलो तर आपण मानवतेची सेवा करू शकतो असे सांगून एनसीसी प्रशिक्षित युवकांनी नशेसाठी वाढत्या ड्रग्स वापराविरोधात जनजागृती करावी तसेच वृक्षारोपणपर्यावरण रक्षण आदी कार्यात भाग घ्यावा असे राज्यपालांनी सांगितले.

जगातील प्रत्येक धर्म चांगला असून युवकांनी इतर धर्मांचा आदर करावा असे सांगताना युवकांनी धर्माबाबत कट्टरतावादी होऊ नये अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. राज्यपालांच्या हस्ते यावेळी एनसीसीच्या विविध जिल्ह्यांमधील प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपालांनी राज्यातील कॅडेट्सनी जिंकून आणलेल्या चषकांची पाहणी केली व विजयी कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली.

महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांनी राज्यपालांचे स्वागत केलेतर कर्नल एम डी मुथप्पा यांनी प्रजासत्ताक दिन कॅडेट्स निवड प्रक्रिया व शिबीराच्या पूर्वतयारीची माहिती दिली. यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये सहभागी झालेले राज्यातील 124 कॅडेट्सप्रशिक्षकतसेच महाराष्ट्र एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

यंदाची पदक तालिका

 

१. सर्वोत्कृष्ट नेव्हल विंग

२. एअर विंग - द्वितीय क्रमांक

३. बेस्ट कॅडेट

४. सर्वोत्कृष्ट संचालनालय - हवाई उड्डाण

५. सर्वोत्कृष्ट संचालनालय - एअर विंग स्पर्धा

६. सर्वात कृतिशील नेव्हल युनिट

७ परेड कमांडर एनसीसी तुकडी कर्तव्य पथ

0000

Maharashtra Governor pats State NCC for bringing laurels

 

Maharashtra Governor C. P. Radhakrishnan hosted a Reception to the Cadets of Maharashtra NCC who returned after winning several individual and team medals and trophies in the Republic Day Camp 2025 at a felicitation function held at Raj Bhavan Mumbai on Sat (1 Feb).

The Governor interacted with the cadets, inspected the prizes and trophies won by them, felicitated the instructors and staff and congratulated the victorious Maharashtra contingent.

 

A total of 124 cadets who participated in the RDC 2025, trainers, and senior officers of Maharashtra NCC were present.

 

Major Gen. Yogender Singh, Additional Director General of Maharashtra NCC welcomed the Governor, while Col M. D. Muthappa apprised the Governor about the cadet selection and training process of the Cadets for the Republic Day camp.

 

Trophies won by Maharashtra NCC

 

Best Directorate In Naval Wing competition

Director General  NCC Trophy Best NCC Unit

Best Cadet Senior Wing (AIR)

Best Directorate Flying

Best Directorate Air Wing Competition

Most Enterprising Naval Unit

Parade Commander of the NCC Contingent at Kartavay Path

0000

 

Featured post

Lakshvedhi