Tuesday, 19 November 2024

माझ्याकडे जे आहे त्यातून सर्वोत्तम काय नेहमी सकारात्मक रहा...

 *नेहमी सकारात्मक रहा.....*🌹


1) एक मुलाने २० वर्षानंतर त्याच्या एका मित्राला मर्सिडीज चालवताना पाहिलं. त्याला स्वतःबद्दल खुप वाईट वाटलं, की तो आयुष्यात नापास झाला आहे.


पण 

त्याला हे माहित नव्हतं की तो मित्र त्या गाडीवर ड्रायव्हर होता व तो त्याच्या बॉस ला घ्यायला निघाला होता.


2) एक स्त्री तिच्या नवऱ्यावर नाराज होती की तो अजिबात रोमॅन्टिक नाही, त्याने गाडीतून उतरताना तिच्यासाठी दरवाजा उघडावा जसा तिच्या मैत्रीणीचा नवरा उघडतो.


पण 

तिला हे माहीत नव्हतं की मैत्रीणीच्या गाडीचा दरवाजा खराब आहे व तो फक्त बाहेरूनच उघडला जातो.


3) एक व्यक्ती शेजारील घरातील तीन मुले खेळताना बघून नाराज होत होता की त्याला फक्त एकच मुलगा आहे.


पण 

त्याला हे माहीत नव्हतं की त्या तीन मुलांपैकी एक दुर्धर रोगाने आजारी आहे व बाकीची दोन मुले  दत्तक घेतलेली आहेत.


आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकाच तराजूत मोजली नाही जाऊ शकत. म्हणून बाकीच्या लोकांकडे बघून तुमच्या आयुष्याबद्दल तक्रार करू नका.

कारण तुम्हास हे माहीत नसेल की इतरांपेक्षा तुम्हीच जास्त नशीबवान असू शकता.

तुम्ही जसे आहात तसेच आयुष्य मजेत घालवा कारण तुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे.


आनंद हा *माझ्याकडे सर्वकाही आहे* यातून येत नसून, *माझ्याकडे जे आहे त्यातून सर्वोत्तम काय मिळेल* यामध्ये आहे...😊


🙏

६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 ;

६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबईदि. १८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

 

६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसेदारूअमली पदार्थमौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.


विधानसभेकरीता मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदानासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना

 विधानसभेकरीता मुक्त वातावरणातनिष्पक्ष आणि शांततेत मतदानासाठी

पोलिसांकडून विविध उपाययोजना

मुंबईदि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणातनिष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावेयासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्राची तीन हजार किमीपेक्षा जास्त सीमा गुजरातमध्य प्रदेशछत्तीसगडतेलंगणाकर्नाटकगोवा अशा सहा राज्यांसह दादरा, नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाशी जोडलेली आहे. ही राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसोबत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ते पोलीस महासंचालक स्तरावर आंतरराज्यीय समन्वयगुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण बाबत आंतरराज्य समन्वय बैठका घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आंतरराज्यीय तपासणी नाक्यांवर मनुष्यबळ तैनात करून अवैध रोख रक्कमदारूअवैध अग्निशस्त्रेअंमली पदार्थमतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, बोगस मतदार यांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याकरीता उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

निवडणूक कालावधीत बंदोबस्ताकरीता सीएपीएफ/ एसएपी/ एसआरपीएफ कंपन्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेण्यात आलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस अंमलदार आणि होमगार्ड सुद्धा पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत. गुन्हेगारअसामाजिक घटक आणि निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित समस्या निर्माण करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

बीएनएसएस अंतर्गत 96,448 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदाकलम 93 अंतर्गत 5727, पीआयटीएनडीपीएस अंतर्गत 1, एमपीडीए 1981 अंतर्गत प्रतिबंधात्मक अटकेचे आदेश 104 तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत तडीपारीच्या 1343 कारवाया करण्यात आल्या आहेत.

अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणीफरारी व पाहिजे आरोपी यांना अटकबेकायदेशीर अग्निशस्त्रेअवैध दारूरोख रक्कमअंमली पदार्थफ्रिबीज जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये जमा करण्यात आलेल्या परवानाकृत अग्निशस्त्रांची संख्या 56,631 असून 28,566 अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 396 अवैध अग्निशस्त्र तर 1856 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

जप्तीच्या कारवाईमध्ये 74.89 कोटी रुपये, 36.07 कोटी रुपयांची 42.31 लाख लिटर दारू, 29.36 कोटी रुपये किमतीचे 14,224 किलो अंमली पदार्थ, 202.62 कोटी किमतीचे 16,254 किलो मौल्यवान धातू, 65.97 कोटी किमतीचे मोफत आणि इतर वस्तू असे 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 408.91 कोटी रुपये किमतीची जप्ती करण्यात आली आहे.

व्हीआयपी बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कामासाठी सर्व घटकां‌द्वारे ड्रोनचा व्यापक वापर केला जात असून विधानसभा निवडणुका मुक्तनिष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्याकरीता महाराष्ट्र पोलीस सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विधानसभा सार्व‍त्रिक निवडणूक, 2024 च्या

  

 

विधानसभा सार्व‍त्रिक निवडणूक2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदार संघासाठी 142 सामान्य निरीक्षक (General Observer) 41 पोलीस निरीक्षक (Police Observer) व 72 खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केली आहे. तसेच288 मतदार संघांमध्ये 146 अतिरिक्त  मतमोजणी निरीक्षक मतमोजणीसाठी उपस्थित असणार आहेत.

ब)            राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती :-

                राज्यामध्ये दि. 15.10.2024 ते दि. 17.11.2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध  अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसेदारुड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.  

अ.क्र.

जप्तीची बाब

परिमाण

रक्कम (कोटी मध्ये)

1

रोख रक्कम

-

153.01

2

दारु

68,51,364 लिटर

68.63

3

ड्रग्ज

1,01,42,452 ग्राम

72.00

4

मौल्यवान धातू

1,64,72,596  ग्राम

282.49

5

फ्रिबीज

57,949  (संख्या)

3.78

6

इतर

13,73,775 (संख्या)

75.60

 

एकुण

-

655.53

 

क)         दि. 15.10.2024 ते 17.11.2024 या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजील ॲप वर आचारसंहिता भंगाबाबतच्या 8386 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 8353 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टल वरील  13,807 तक्रारीपैकी 9,132 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

ड)       माध्यम देखरेख व संनियत्रण समिती (PRE CERTIFICATION / APPELLATE - MCMC):- राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने दि. 17.11.2024 पर्यंत 228 प्रमाणपत्रे देण्यात आली असून 1559 जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

००००

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज

- मुख्य निवडणूक अधिकारी एसचोक्कलिंगम

 

 

मुंबईदि. 18 : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी 7:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत राहील. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2024 बाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे :-

 

अ.क्र.

मतदार संघांची संख्या

मतदान केंद्रे

सहाय्यक मतदान केंद्र

 

क्रिटीकल मतदान केंद्रे

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या

बॅलेट युनिट (बीयु)

कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट

1

288

100186

241

990

4,136

1,64,996

1,19,430

1,28,531

 

 

राज्यातील एकूण 1,00,427 इतक्या मतदान केंद्रांपैकीविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान 67,557 इतक्या मतदान केंद्रांवर वेबकास्टींग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग करणार कडक कारवाई

 शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या 

राजकीय प्रचारप्रसारावर बंदी

नियमांचे उल्लंघन झाल्यास 

निवडणूक आयोग करणार कडक कारवाई

 

मुंबईदि. 18 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवारदि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू झाला आहे. मतदान संपेपर्यंतच्या 48 तासांमध्येलोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभामिरवणुका आयोजित करण्यासउपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत मुद्रित माध्यमांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने किंवा विरोधात कोणतीही जाहिरात/ निवडणूकविषयक आशय- मजकूर दिला गेला असल्यास त्याबाबत संबंधित प्रकाशकाचे नाव आणि पत्तातसेच संबंधित आशय - मजकूर / जाहिरातीवर नमूद करावा. या निर्देशांसोबतच आयोगाने भारतीय दंड संहितेच्या कलम 171 एच विचारात घेण्याबाबतही निर्देशित केले आहे. या कलमाअंतर्गत उमेदवाराच्या अधिकृत परवानगीशिवाय संबंधित उमेदवाराच्या निवडणुकीचा प्रचार किंवा निवडणुकीसाठी खर्च करण्याच्या हेतूने इतर सर्व गोष्टींसह जाहिरातीप्रचार किंवा प्रकाशनासाठी खर्च करण्यास मनाई केली गेली आहे.

निवडणूक प्रचाराच्या शांतता काळामध्ये मुद्रीत माध्यमांमध्ये छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीस जाहिरात पूर्व प्रमाणिकरण समितीची मान्यता असल्याशिवाय या जाहिराती वृत्तपत्रामध्ये छापू नयेअशा आयोगाच्या सूचना आहेत. दृकश्राव्ये माध्यमे (टेलिव्हिजनकेबल नेटवर्करेडिओ आणि सोशल मीडिया)  यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहीरातींना मनाई आहे.

राजकीय जाहिरातीसाठी पूर्व-प्रमाणीकरणाबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाच्या दि.24 ऑगस्ट, 2023 च्या आदेशान्वये देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रचाराच्या शांतता कालावधीतील मुद्रित माध्यमे आणि त्यापूर्वीच्या कालावधीसाठी दृकश्राव्य माध्यमे (टेलिव्हिजनकेबल नेटवर्करेडिओ आणि सोशल मिडिया) ह्यावरील राजकीय जाहिरातींचा समावेश आहे.

पूर्व प्रमाणीकरणासाठीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत स्पष्ट तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने किंवा केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा, 1995 मधील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झाल्यासअसे उल्लंघन करणाऱ्याने आपली उल्लंघन करणारी कृती तात्काळ थांबवावी. निवडणूक आयोगामार्फत असे उल्लंघन करणाऱ्याच्या उपकरणांची थेट जप्तीही केली जाऊ शकते. यासंदर्भात दिल्या गेलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन न केल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरतो व  तसे न्यायालयीन प्रकरण दाखल होऊ शकते.

सर्व केबल नेटवर्कटी.व्ही. चॅनलरेडिओसोशल मीडिया याद्वारे राजकीय जाहिरातीचे प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातीचे प्रमाणीकरण असल्याचे खातरजमा करणे आवश्यक आहे. जाहिरातीचे प्रमाणकिरण असल्याशिवाय राजकीय जाहिराती प्रसारीत करण्यात येवू नये. तसेच कोणत्याही केबल नेटवर्कटी.व्ही. चॅनल यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष किंवा छुप्या पध्दतीने राजकीय पक्षांच्या जाहिरातीचे प्रमाणिकरण नसल्यास या जाहिराती प्रसारित न करण्याची दक्षता घेण्यात यावी या निर्देशांचे उल्लंघन केल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ग्राह्य धरून कार्यवाही करण्यात येईलअसेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

0000

मतदान केंद्रात मोबाईलसह प्रवेश करण्यास मनाई

 मतदान केंद्रात मोबाईलसह प्रवेश करण्यास मनाई

 

धाराशिव,दि.१८ (माध्यम कक्षमहाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - २०२४ कार्यक्रम घोषीत केला आहे.त्या अनुषंगाने  जिल्हयातील सर्व चारही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.मतदानाच्या दिवशी उमेदवार,उमेदवारांचे प्रतिनिधी,मतदान प्रतिनिधी  मतदार यांना मोबाईल (भ्रमणध्वनी ) घेवून मतदान केंद्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.तरी मोबाईल घेवून मतदान केंद्रात प्रवेश करण्यात येवू नये.असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉसचिन ओंम्बासे यांनी केले आहे .

****

Featured post

Lakshvedhi