मतदान केंद्रात मोबाईलसह प्रवेश करण्यास मनाई
धाराशिव,दि.१८ (माध्यम कक्ष) महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - २०२४ कार्यक्रम घोषीत केला आहे.त्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व चारही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.मतदानाच्या दिवशी उमेदवार,उमेदवारांचे प्रतिनिधी,मतदान प्रतिनिधी व मतदार यांना मोबाईल (भ्रमणध्वनी ) घेवून मतदान केंद्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.तरी मोबाईल घेवून मतदान केंद्रात प्रवेश करण्यात येवू नये.असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी केले आहे .
****
No comments:
Post a Comment