Tuesday, 19 November 2024

विधानसभा निवडणूकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज

 विधानसभा निवडणूकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज

 

सुरक्षेसाठी  पोलिस उपअधिक्षक,२० पोलीस निरीक्षक,१०४ पोलिस उपनिरीक्षकासह असणार सीएपीएफच्या  तुकडया

 

१६०४ पोलिस शिपाईंसह १४५० होमगार्ड,१०३ एनसीसीचे छात्र

 

धाराशिव,दि.१८ (माध्यम कक्ष)  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.निवडणूक शांततेत पार पडावी तसेच निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेकडून  पोलिस उप अधिक्षक,१८ पोलिस निरीक्षक,१०४ सहायक निरीक्षक  पोलिस उपनिरीक्षक,१६०४ पोलिस शिपाई यांच्यासह १४५० होमगार्ड,१०३ एनसीसीचे कॅडेट यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आहे.

निवडणूका शांततेत आणि निष्पक्ष पार पाडल्या जाव्यात यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.जिल्ह्यात एकूण  विधासभा मतदारसंघ आहेत.निवडणूकांच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

त्यामुळे केंद्रीय पोलीस पथकातील  तुकड्या क्षेत्रात दाखल झाल्या आहेत.यासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात केल्या आहेतपोलिसांकडून गुन्हेगारांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहेप्रतिबंधात्मक कारवाई देखील पोलिसांनी सुरू केल्या आहेतरात्रीच्या वेळेत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून गस्ती घातली जात आहे.मागील काही दिवसांपासून पोलिसांनी बेकायदा शस्त्र पोलिसांकडून जप्त केले आहेततसेच संवेदनशील मतदारसंघात पोलिसांचा रुट मार्च काढला जात आहे.

यामध्ये २४० उमरगा विधानसभा मतदारसंघात  पोलिस उप अधिक्षक, पीआय,१७ एपीआय३३२ पोलिस शिपाई,३०५ होमगार्ड१९ एनसीसी कॅडेट, अर्धसैनिक दलाची तुकडी, पोलीस वाहने,१४ अतिरिक्त सुरक्षा रक्षकतसेच २० वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

२४१तुळजापूर विधानसभा मतदारसंघात  पोलिस उप अधिक्षक, पीआय,२३ एपीआय३७३ पोलिस शिपाई,३८४ होमगार्ड३७ एनसीसी कॅडेट, अर्धसैनिक दलाची तुकडी, पोलीस वाहने,२० अतिरिक्त सुरक्षा रक्षकतसेच २६ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

 २४२ - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात  पोलिस उप अधिक्षक पोलीस निरीक्षक,३० सहाय्यक पोलीस निरीक्षक,४०१ पोलिस शिपाई,३८६ होमगार्ड,२३ एनसीसी कॅडेट, अर्धसैनिक दलाची तुकडी,११ पोलीस वाहने,२४ अतिरिक्त सुरक्षा रक्षक,तसेच ३६ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

२४३ - परंडा विधानसभा मतदारसंघात  पोलिस उप अधिक्षक,  पोलीस निरीक्षक,३० सहाय्यक पोलीस निरीक्षक३८८ पोलिस शिपाई,३६७ होमगार्ड,२४ एनसीसी कॅडेट, अर्धसैनिक दलाची तुकडी, पोलीस वाहने,२६ अतिरिक्त सुरक्षा रक्षक,तसेच ३३ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.तर सीआरओ आणि इतर सुरक्षेमध्ये  पीआय, पोलीस उपनिरीक्षक,११० पोलीस शिपाई, होमगार्ड,१४ वाहने  अतिरिक्त सुरक्षा रक्षक,१६ वायरलेस तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

****

विधानसभा निवडणूकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज

 

सुरक्षेसाठी ५ पोलिस उपअधिक्षक,२० पोलीस निरीक्षक,१०४ पोलिस उपनिरीक्षकासह असणार सीएपीएफच्या ४ तुकडया

 

१६०४ पोलिस शिपाईंसह १४५० होमगार्ड,१०३ एनसीसीचे छात्र

 

धाराशिव,दि.१८ (माध्यम कक्ष) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.निवडणूक शांततेत पार पडावी तसेच निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेकडून ५ पोलिस उप अधिक्षक,१८ पोलिस निरीक्षक,१०४ सहायक निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक,१६०४ पोलिस शिपाई यांच्यासह १४५० होमगार्ड,१०३ एनसीसीचे कॅडेट यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आहे.

निवडणूका शांततेत आणि निष्पक्ष पार पाडल्या जाव्यात यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.जिल्ह्यात एकूण ४ विधासभा मतदारसंघ आहेत.निवडणूकांच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

त्यामुळे केंद्रीय पोलीस पथकातील ४ तुकड्या क्षेत्रात दाखल झाल्या आहेत.यासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात केल्या आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई देखील पोलिसांनी सुरू केल्या आहेत. रात्रीच्या वेळेत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून गस्ती घातली जात आहे.मागील काही दिवसांपासून पोलिसांनी बेकायदा शस्त्र पोलिसांकडून जप्त केले आहेत. तसेच संवेदनशील मतदारसंघात पोलिसांचा रुट मार्च काढला जात आहे.

यामध्ये २४० उमरगा विधानसभा मतदारसंघात १ पोलिस उप अधिक्षक,३ पीआय,१७ एपीआय, ३३२ पोलिस शिपाई,३०५ होमगार्ड, १९ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,५ पोलीस वाहने,१४ अतिरिक्त सुरक्षा रक्षक, तसेच २० वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

२४१- तुळजापूर विधानसभा मतदारसंघात १ पोलिस उप अधिक्षक,४ पीआय,२३ एपीआय, ३७३ पोलिस शिपाई,३८४ होमगार्ड, ३७ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,५ पोलीस वाहने,२० अतिरिक्त सुरक्षा रक्षक, तसेच २६ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

 २४२ - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात २ पोलिस उप अधिक्षक, ५ पोलीस निरीक्षक,३० सहाय्यक पोलीस निरीक्षक,४०१ पोलिस शिपाई,३८६ होमगार्ड,२३ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,११ पोलीस वाहने,२४ अतिरिक्त सुरक्षा रक्षक,तसेच ३६ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

२४३ - परंडा विधानसभा मतदारसंघात १ पोलिस उप अधिक्षक,४ पोलीस निरीक्षक,३० सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३८८ पोलिस शिपाई,३६७ होमगार्ड,२४ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,६ पोलीस वाहने,२६ अतिरिक्त सुरक्षा रक्षक,तसेच ३३ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.तर सीआरओ आणि इतर सुरक्षेमध्ये २ पीआय,४ पोलीस उपनिरीक्षक,११० पोलीस शिपाई,८ होमगार्ड,१४ वाहने २ अतिरिक्त सुरक्षा रक्षक,१६ वायरलेस तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

****


विद्यार्थ्यांचे जाती दावे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्ततेसाठी सोमवार व मंगळवारी उपस्थित राहावे जिल्हा जात पडताळणी समितीचे आवाहन

 विद्यार्थ्यांचे जाती दावे प्रस्ताव

 

विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्ततेसाठी सोमवार  मंगळवारी उपस्थित राहावे

 

जिल्हा जात पडताळणी समितीचे आवाहन

 

धाराशिव दि.१८ (जिमाकाजात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या विदयार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये त्रुटी आढळुन आल्या आहेत,अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या जाती दावा प्रस्तावामध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस ( SMS ) द्वारे अथवा लेखी पत्रान्वये त्रुटी असल्याचे कळविले आहे.संबंधितानी त्रुटीची पुर्तता करुन प्रस्ताव निकाली काढावा असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्री बलभीम शिंदे यांनी केले आहे .

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,धाराशिव अंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ विज्ञान  व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या ज्या मागासवर्गीय विदयार्थ्यांनी धाराशिव समितीच्या कार्यक्षेत्रातील त्यांचे जातीचे प्रमाणपत्र पडताळणी होऊन जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी समितीकडे अर्ज दाखल केले आहेतअशा सर्व जाती दावा प्रकरणांमध्ये समितीस्तरावर प्राथमिक छाननी करुन ज्या प्रकरणांमध्ये कागदपत्रे / पुरावे अभावी त्रुटी आढळून आलेली आहे,अशा प्रकरणांमध्ये विदयार्थ्यांना त्यांनी दिलेल्या जाती दावा प्रस्तावात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस ( SMS ) द्वारे अथवा लेखी पत्रान्वये त्रुटी असल्याचे कळविण्यात आले आहे,अशा विदयार्थ्यांनी तात्काळ समितीकडे आपल्या प्रकरणातील त्रुटीची पूर्तता करावी.

सन २०२५-२६ या पुढील शैक्षणिक वर्षांत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता राखीव प्रवर्गातून आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी संबंधित विदयार्थ्यास प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राअभावी गैरसोय होणार नाही तसेच कोणताही विदयार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी धाराशिव समितीमार्फत विदयार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे . अर्जदारानी त्रुटी पुर्ततेसाठी दर सोमवार  मंगळवारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपल्या जाती दावा प्रकरणांतील त्रुटीची पुर्तता करावी.असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्रीबलभीम शिंदे यांनी केले आहे

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ऑनलाईन सिंहासन पुजा नोंदणी करण्याचे आवाहन

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ऑनलाईन सिंहासन पुजा


                                 नोंदणी करण्याचे आवाहन


 


धाराशिव दि.१८ (जिमाका) महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.     


श्री देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते.ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  


        डिसेंबर २०२४ मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल याची सर्व भाविक भक्त,महंत, पुजारी,सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी.भाविकांनी सिंहासन पुजा श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://shrituljabhavani.org यावरून सिंहासन पुजा पास बुकींग या मेन्युवर क्लिक केल्यानंतर https://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी.     


        सिंहासन पुजा नोंदणी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.ती २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल.ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २७ नोव्हेंबर २०२४ रोजी १०.३० वाजता पाठविण्यात येतील.भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २७ नोव्हेंबर- रोजी सकाळी १०.३० वाजतापासून ते २८ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० वाजतापर्यंत करावे.           


सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील.भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २८ नोव्हेंबर- रोजी सकाळी १०.३० ते २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावे.प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० पर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील.भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २९ नोव्हेंबर- रोजी सकाळी १०.३० ते ३० नोव्हेंबर- रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावे.


माहे डिसेंबर -२०२४ या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी ३० नोव्हेंबर- रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.


वरीलप्रमाणे भाविकांनी सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर, संस्थान तुळजापूरचे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.


****

विधानसभेकरीता मुक्त वातावरणात,

 विधानसभेकरीता मुक्त वातावरणात

निष्पक्ष आणि शांततेत मतदानासाठी

पोलिसांकडून विविध उपाययोजना

मुंबईदि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणातनिष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावेयासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्राची तीन हजार किमीपेक्षा जास्त सीमा गुजरातमध्य प्रदेशछत्तीसगडतेलंगणाकर्नाटकगोवा अशा सहा राज्यांसह दादरा, नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाशी जोडलेली आहे. ही राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसोबत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ते पोलीस महासंचालक स्तरावर आंतरराज्यीय समन्वयगुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण बाबत आंतरराज्य समन्वय बैठका घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आंतरराज्यीय तपासणी नाक्यांवर मनुष्यबळ तैनात करून अवैध रोख रक्कमदारूअवैध अग्निशस्त्रेअंमली पदार्थमतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, बोगस मतदार यांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याकरीता उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

निवडणूक कालावधीत बंदोबस्ताकरीता सीएपीएफ/ एसएपी/ एसआरपीएफ कंपन्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेण्यात आलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस अंमलदार आणि होमगार्ड सुद्धा पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत. गुन्हेगारअसामाजिक घटक आणि निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित समस्या निर्माण करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

बीएनएसएस अंतर्गत 96,448 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदाकलम 93 अंतर्गत 5727, पीआयटीएनडीपीएस अंतर्गत 1, एमपीडीए 1981 अंतर्गत प्रतिबंधात्मक अटकेचे आदेश 104 तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत तडीपारीच्या 1343 कारवाया करण्यात आल्या आहेत.

अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणीफरारी व पाहिजे आरोपी यांना अटकबेकायदेशीर अग्निशस्त्रेअवैध दारूरोख रक्कमअंमली पदार्थफ्रिबीज जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये जमा करण्यात आलेल्या परवानाकृत अग्निशस्त्रांची संख्या 56,631 असून 28,566 अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 396 अवैध अग्निशस्त्र तर 1856 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

जप्तीच्या कारवाईमध्ये 74.89 कोटी रुपये, 36.07 कोटी रुपयांची 42.31 लाख लिटर दारू, 29.36 कोटी रुपये किमतीचे 14,224 किलो अंमली पदार्थ, 202.62 कोटी किमतीचे 16,254 किलो मौल्यवान धातू, 65.97 कोटी किमतीचे मोफत आणि इतर वस्तू असे 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 408.91 कोटी रुपये किमतीची जप्ती करण्यात आली आहे.

व्हीआयपी बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कामासाठी सर्व घटकां‌द्वारे ड्रोनचा व्यापक वापर केला जात असून विधानसभा निवडणुका मुक्तनिष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्याकरीता महाराष्ट्र पोलीस सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

00000

Monday, 18 November 2024

आचारसंहिता भंगाच्या ८,६६८ तक्रारी निकाली; ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 वृत्त क्र. १५६

आचारसंहिता भंगाच्या ८,६६८ तक्रारी निकाली;

६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबईदि. १८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

 

६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसेदारूअमली पदार्थमौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

 मुंबई शहर जिल्ह्यात १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

  

   मुंबईदि. १७ : मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदार अशा एकूण २१५४ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

        मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रत्येकाचे मत मोलाचे असून कोणत्याही क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नयेयासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेतर्फे कार्यवाही करण्यात येत आहे.

        मुंबई शहर जिल्ह्यात १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले. या मतदानासाठी टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 

        या सुविधेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २० मतदार तर ०९ दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान केले. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २७ मतदार व २४ दिव्यांग मतदारवडाळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २३४ मतदार व २२ दिव्यांग मतदारमाहीम विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ५७० मतदार व २३ दिव्यांग मतदारवरळी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ११३ मतदार व १९ दिव्यांग मतदारशिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २०९ मतदार व ३२ दिव्यांग मतदारभायखळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील १६७ मतदार व ३९ दिव्यांग मतदारमलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २६९ मतदार व १० दिव्यांग मतदारमुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील १०३ मतदार व ११ दिव्यांग मतदारकुलाबा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २४४ मतदार व ०९ दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान केले. 

                                               

०००००

               

) Law and Order (कायदा व सुव्यवस्था

 4)      राज्याची माहिती:-  

अ)  Law and Order (कायदा व सुव्यवस्था):- दिनांक  17.11.2024  पर्यंतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.

तपशील

संख्या

1.

राज्यातील वितरीत केलेले एकूण शस्र परवाने

78,267

2.

जमा करण्यात आलेली शस्रास्रे

56,604

3.

जप्त करण्यात आलेली शस्रे

235

4.

जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्रात्रे

2,206

5.

परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली  शस्रे

611

6.

परवाना जमा करण्यापासून सुट देण्यात आलेली शस्त्रे

20,495

7.

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून बीएनएसएस कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या इसमांची संख्या

79,856

 

 

विधानसभा सार्व‍त्रिक निवडणूक, 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदार संघासाठी 142 सामान्य निरीक्षक (General Observer) 41 पोलीस निरीक्षक (Police Observer) व 72 खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केली आहे. तसेच, 288 मतदार संघांमध्ये 146 अतिरिक्त  मतमोजणी निरीक्षक मतमोजणीसाठी उपस्थित असणार आहेत.

 

ब)       राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती :-

            राज्यामध्ये दि. 15.10.2024 ते दि. 17.11.2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध  अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

जप्तीची बाब

परिमाण

रक्कम (कोटी मध्ये)

1

रोख रक्कम

-

153.01

2

दारु

68,51,364 लिटर

68.63

3

ड्रग्ज

1,01,42,452 ग्राम

72.00

4

मौल्यवान धातू

1,64,72,596  ग्राम

282.49

5

फ्रिबीज

57,949  (संख्या)

3.78

6

इतर

13,73,775 (संख्या)

75.60

 

एकुण

-

655.53

क)         दि. 15.10.2024 ते 17.11.2024 या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजील ॲप वर आचारसंहिता भंगाबाबतच्या 8386 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 8353 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टल वरील  13,807 तक्रारीपैकी 9,132 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

ड)       माध्यम देखरेख व संनियत्रण समिती (PRE CERTIFICATION / APPELLATE - MCMC):- राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने दि. 17.11.2024 पर्यंत 228 प्रमाणपत्रे देण्यात आली असून 1559 जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

 

Featured post

Lakshvedhi