विद्यार्थ्यांचे जाती दावे प्रस्ताव
विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्ततेसाठी सोमवार व मंगळवारी उपस्थित राहावे
जिल्हा जात पडताळणी समितीचे आवाहन
धाराशिव दि.१८ (जिमाका) जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या विदयार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये त्रुटी आढळुन आल्या आहेत,अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या जाती दावा प्रस्तावामध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस ( SMS ) द्वारे अथवा लेखी पत्रान्वये त्रुटी असल्याचे कळविले आहे.संबंधितानी त्रुटीची पुर्तता करुन प्रस्ताव निकाली काढावा असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्री बलभीम शिंदे यांनी केले आहे .
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,धाराशिव अंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या ज्या मागासवर्गीय विदयार्थ्यांनी धाराशिव समितीच्या कार्यक्षेत्रातील त्यांचे जातीचे प्रमाणपत्र पडताळणी होऊन जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी समितीकडे अर्ज दाखल केले आहेत, अशा सर्व जाती दावा प्रकरणांमध्ये समितीस्तरावर प्राथमिक छाननी करुन ज्या प्रकरणांमध्ये कागदपत्रे / पुरावे अभावी त्रुटी आढळून आलेली आहे,अशा प्रकरणांमध्ये विदयार्थ्यांना त्यांनी दिलेल्या जाती दावा प्रस्तावात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस ( SMS ) द्वारे अथवा लेखी पत्रान्वये त्रुटी असल्याचे कळविण्यात आले आहे,अशा विदयार्थ्यांनी तात्काळ समितीकडे आपल्या प्रकरणातील त्रुटीची पूर्तता करावी.
सन २०२५-२६ या पुढील शैक्षणिक वर्षांत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता राखीव प्रवर्गातून आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी संबंधित विदयार्थ्यास प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राअभावी गैरसोय होणार नाही तसेच कोणताही विदयार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी धाराशिव समितीमार्फत विदयार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे . अर्जदारानी त्रुटी पुर्ततेसाठी दर सोमवार व मंगळवारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपल्या जाती दावा प्रकरणांतील त्रुटीची पुर्तता करावी.असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्री. बलभीम शिंदे यांनी केले आहे
No comments:
Post a Comment