Friday, 8 November 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ : 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या मतदान जनजागृतीचा आज राज्यस्तरीय शुभांरभ ‘गेटवे ऑफ इंडिया येथे होणार लेझर शो’

 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ : 'उत्सव निवडणुकीचाअभिमान महाराष्ट्राचा' या मतदान जनजागृतीचा आज राज्यस्तरीय शुभांरभ

गेटवे ऑफ इंडिया येथे होणार लेझर शो’

 

            मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गतमतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचाअभिमान महाराष्ट्राचाहे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ गेटवे ऑफ इंडिया येथे उद्या ८ नोव्हेंबर  रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ च्या मतदान पूर्वतयारीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिर्देश कुमारउप निवडणूक आयुक्त संजय कुमारसंचालक पंकज श्रीवास्तवप्रधान सचिव अविनाश कुमारसचिव सुमन कुमारअवर सचिव  अनिल कुमार हे शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत 'उत्सव निवडणुकीचाअभिमान महाराष्ट्राचाया विशेष अभियानाचा शुभारंभ होईल. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एकाच वेळी मतदार जनजागृती अभियानाची सुरुवात होणार आहे.

            मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगममुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्हा यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीसर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील या शुभारंभास उपस्थित राहणार आहेत.

            क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेदिग्दर्शक रोहित शेट्टीअभिनेता सुबोध भावेअभिनेत्री वर्षा उसगांवकरसिने कलाकार अर्जुन कपूरहास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचियागायक मिलिंद इंगळेगायिका वैशाली माडेगायक राहुल सक्सेना यांच्यासह विविध नामवंत कलाकारअभिनेते तसेच दिव्यांग अधिकार क्षेत्रातील विराली मोदीराज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत याप्रसंगी उपस्थित राहतील.

            या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे व मतदारांची सक्रिय भागीदारी सुनिश्चित करणे हा आहे. त्यादृष्टीने या शुभारंभ कार्यक्रमात विविध कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.

            यामध्ये मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाकडून सादरीकरण करण्यात येणार आहे. तरडाक कार्यालयाने निवडणूक विषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरण केले जाईल. त्याचप्रमाणे मतदान करण्याविषयी शपथ देण्यात येईल. मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई देखील समुद्रातील बोटींवर करण्यात येणार आहे. मतदार जागृती रॅलीमतदार जागृती व्हॅनचे लोकार्पणफ्लॅश मॉब देखील यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे.

गेट वे ऑफ इंडिया ते कुलाब्यापर्यंत मतदार जागृती रॅली

या कार्यक्रमानंतर गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली आयोजित करण्यात येईल. यामध्ये नागरिकांना मतदान प्रक्रियेतील महत्त्व आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जागरूक केले जाईल.

0000


 


Thursday, 7 November 2024

आचारसंहिता भंगाच्या ३११२ तक्रारी निकाली; ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता

 आचारसंहिता भंगाच्या ३११२ तक्रारी निकाली;

३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

            मुंबईदि. ७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ३१२८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३११२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

            नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूअंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

*What a photography!* How did they even manage to shoot this? Patience is the key. 👌👌👌☝️

 *What a photography!* How did they even manage to shoot this? Patience is the key. 👌👌👌☝️


आदिवासी विकास विभागाच्या पदांकरिता अर्ज करण्याची मुदतवाढ १२ नोव्हेंबरपर्यंत

 आदिवासी विकास विभागाच्या पदांकरिता

अर्ज करण्याची मुदतवाढ १२ नोव्हेंबरपर्यंत

 

मुंबई दि. ६ : आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे.

आदिवासी विकास विभागाने ५ ऑक्टोबर २०२४ ला विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर ठेवली होती. त्यास आता १२ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच २३ नोव्हेंबर २०२३ रोजी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.  त्यानुसार अर्जाचे शुल्क विभागाने परत करण्यासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती. त्याला १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आदिवासी विकास आयुक्तालय नाशिकआदिवासी विकास भवनपहिला मजलाजुना आग्रा रोड नाशिक येथे अथवा  टोल फ्री 1800 267 0007 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

०००

Wednesday, 6 November 2024

नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता

 नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता

निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मतदार आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी ऑनलाइन पोर्टल आणि मोबाइल अॅप्स वापरू शकतात. मतदार जागरूकता मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मतदारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील.

गृहनिर्माण संस्थांमध्येही मतदान केंद्र

  गृहनिर्माण संस्थांमध्येही मतदान केंद्र

            शहरी भागांमध्ये जसे की मुंबईपुणेठाणे सारख्या शहरामध्ये अतिउंच इमारती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये 1 हजार 181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे. तसेच झोपडपट्टीमध्ये 210 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे.

आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष

 आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष

यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोलीगोंदियानंदुरबारधुळेआणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने मतदार सुविधांमध्ये सुधारणा केली आहेजसे की मतदार सहाय्य केंद्रे,  मतदार हेल्पलाईनआणि सूचना फलक यांचा समावेश आहे. तरुण मतदारमहिला मतदारांना लक्षात ठेवून हे उपाय योजले आहे.

Featured post

Lakshvedhi