Friday, 8 November 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ : 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या मतदान जनजागृतीचा आज राज्यस्तरीय शुभांरभ ‘गेटवे ऑफ इंडिया येथे होणार लेझर शो’

 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ : 'उत्सव निवडणुकीचाअभिमान महाराष्ट्राचा' या मतदान जनजागृतीचा आज राज्यस्तरीय शुभांरभ

गेटवे ऑफ इंडिया येथे होणार लेझर शो’

 

            मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गतमतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचाअभिमान महाराष्ट्राचाहे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ गेटवे ऑफ इंडिया येथे उद्या ८ नोव्हेंबर  रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ च्या मतदान पूर्वतयारीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिर्देश कुमारउप निवडणूक आयुक्त संजय कुमारसंचालक पंकज श्रीवास्तवप्रधान सचिव अविनाश कुमारसचिव सुमन कुमारअवर सचिव  अनिल कुमार हे शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत 'उत्सव निवडणुकीचाअभिमान महाराष्ट्राचाया विशेष अभियानाचा शुभारंभ होईल. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एकाच वेळी मतदार जनजागृती अभियानाची सुरुवात होणार आहे.

            मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगममुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्हा यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीसर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील या शुभारंभास उपस्थित राहणार आहेत.

            क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेदिग्दर्शक रोहित शेट्टीअभिनेता सुबोध भावेअभिनेत्री वर्षा उसगांवकरसिने कलाकार अर्जुन कपूरहास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचियागायक मिलिंद इंगळेगायिका वैशाली माडेगायक राहुल सक्सेना यांच्यासह विविध नामवंत कलाकारअभिनेते तसेच दिव्यांग अधिकार क्षेत्रातील विराली मोदीराज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत याप्रसंगी उपस्थित राहतील.

            या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे व मतदारांची सक्रिय भागीदारी सुनिश्चित करणे हा आहे. त्यादृष्टीने या शुभारंभ कार्यक्रमात विविध कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.

            यामध्ये मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाकडून सादरीकरण करण्यात येणार आहे. तरडाक कार्यालयाने निवडणूक विषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरण केले जाईल. त्याचप्रमाणे मतदान करण्याविषयी शपथ देण्यात येईल. मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई देखील समुद्रातील बोटींवर करण्यात येणार आहे. मतदार जागृती रॅलीमतदार जागृती व्हॅनचे लोकार्पणफ्लॅश मॉब देखील यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे.

गेट वे ऑफ इंडिया ते कुलाब्यापर्यंत मतदार जागृती रॅली

या कार्यक्रमानंतर गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली आयोजित करण्यात येईल. यामध्ये नागरिकांना मतदान प्रक्रियेतील महत्त्व आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जागरूक केले जाईल.

0000


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi