Tuesday, 26 April 2022


आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करतो.

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भारतातील पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी-कार्ड सुविधेचे लोकार्प

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेस्ट कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युईटीचे ४८३ कोटी रुपये क्लिकसरशी थेट खात्यात

            मुंबई, दि. 25 :- "..आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू. मुंबईत आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामे करत आहोत. प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्या दृष्टीने आज जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून, मुंबईने करून दाखवलं आहे. लोकांच्या आयुष्यातही इज ऑफ लिव्हिंग आणण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले

            मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम - बेस्टच्या "नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड" - एनसीएमसीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. बेस्टच्या कुलाबा आगारातील इलेक्ट्रीक हाऊसच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हयाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर आदी उपस्थित होते

            बेस्टने एनसीएमसी-कार्ड सुविधेच्या माध्यमातून भारतातील कुठल्याही महानगरात नसेल अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याची अभिमानास्पद कामगिरी केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आज मी येथे बेस्टचं कौतुक करायला आलो आहे. आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामे करत आहोत. मी बेस्टच्या आयुष्याचाही प्रवास अनुभवला आहे. बेस्टचे अधिकारी, कर्मचारी नेहमीच पुढे चला..पुढे चला म्हणत अथकपणे लोकांच्या सेवेत असतात. कोरोनाच्या संकटातही एस.टी. आणि बेस्टने अलौकीक असे योगदान दिले आहे. माझा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला जातो. पण हे बिरुद माझ्या नावासमोर लागण्यासाठी माझ्या या कुटुंबातील तुम्हा सर्वांचे श्रेय आहे. तुम्ही मेहनतीने बेस्टचे, मुंबई महापालिकेच्या कामाचे एक मॉडेल उभे केले आहे. या कामांचे कौतुक उच्च, सर्वोच्च न्यायालय आणि न्यू यार्क टाईम्सनेही केले आहे. या कार्डच्या सुविधेच्या माध्यमातून मुंबईकरांची सुट्ट्या पैश्यांची कटकट दूर केली आहे. उद्योगांच्या इज ऑफ डुईंग प्रमाणेच आपण नागरिकांच्या इज ऑफ लिव्हिंगचा – आयुष्याचा विचार करत आहोत. शेवटी प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्यामध्ये आरोग्यासह, पर्यावरणाचाही विचार करत आहोत. प्रदूषण वाढते आहे, उष्णता वाढते अशी नुसती चर्चा करत नाही. तर त्यावर काम ही करत आहोत. त्यामुळेच पंतप्रधान कार्यालयाकडूनही आपल्या बस थांब्याच्या उपक्रमांची दखल घेतली गेली आहे. ज्यांच्या कष्टाच्या जीवावर, घामांवर केवळ राज्यच नव्हे, तर देशाची अर्थव्यवस्था उभी आहे. त्या मुंबईकरांसाठी आम्ही काम करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगित


            बेस्ट अनेक उपक्रमांत पहिल्या क्रमांकावर आहे. या उपक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, बेस्टने अत्यंत माफक दरात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेनेही शिक्षण, आरोग्यात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. मुंबईतील महापालिकेच्या शाळेचा दर्जा हा आता अन्य शाळांत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांसाठीही आकर्षण ठरू लागले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गणवेशातील मुलांना बेस्टच्या बसने मोफत प्रवास करण्याची मुभा आहे. यापुढे खासगी शाळांतील मुलांसाठीही कमी दरातील बस पास सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. अन्य शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना जसे आपल्या मुलांनाही महापालिकेच्या शाळेत जावे असे वाटू लागले आहे. असा या शाळांचा दर्जा आहे. त्याचप्रमाणे आता सर्वांना बेस्टने प्रवास करावे असे वाटेल. आम्ही जे करतो ते बेस्टच करतो, ते यापुढेही करत राहू. या जनतेसाठीच्या सेवेत ज्या खासगी संस्थाना सेवा, ज्ञानाचे योगदान द्यायचे आहे, त्यांचे स्वागतच केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले


            यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या शालेय जीवनातील बेस्ट बस प्रवासाच्या आठवणींनाही उजाळा दि


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, देशाच्या आर्थिक राजधानीत सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी अशी महत्त्वपूर्ण आणि चांगली सुविधा सुरू होते आहे, याचा विशेष आनंद आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून मुंबई मिळवली आहे. या मुंबईचे मुंबईपण टीकवून, येथील मराठीपण जपत मुंबईकराच्या श्रमाला मोल मिळालं पाहिजे, त्यांच्या कष्टाचं फळ मिळाले पाहिजे या दृष्टीने विकास केला जात आहे. मुंबईने घोडागाडी ते मेट्रो पर्यंतचा प्रवास पाहिला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या दोघांनीही या शहराच्या विकासासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, अशा तरूणांनी लक्ष घातले तर काय होऊ शकते, हे मुंबईकर अनुभवत आहेत. मुंबईत रस्ते, मेट्रो, उड्डाण पुल अशी विविध विकास कामे, प्रकल्प सुरु आहेत. मुंबईच्या बेस्ट सेवाचा जागतिकस्तरावर उल्लेख केला जातो. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे. मुंबईत वरळी परिसरात जागतिकस्तरावरील पर्यटन प्रकल्प , मराठी भवन, जीएसटी भवन उभे राहत आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा येथे देशातील सर्वोत्तम असे वसतिगृह उभे करण्यात येईल. ज्यामध्ये सारथी, महाज्योती आणि राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ स्तरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले


            पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, ‘पुढे चला’ हा मुंबईचा मंत्र आहे. हे पुढे चला देशभर नाही, तर जगभर घेऊन चालेल असा प्रय़त्न आहे. "नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड" - एनसीएमसी ही सुविधा उपलब्ध करून देणारा "बेस्ट" हा भारतातील पहिला सार्वजनिक परिवहन उपक्रम आहे. बेस्टने मुंबईकरांना अविरतपणे सेवा दिली आहे. संकट कुठलेही असो, बेस्ट लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत राहीली आहे. कोरोनाच्या काळातही बेस्ट धावत होती. जगातील सर्वात स्वस्त आणि मस्त असा बेस्टचा लौकीक आहे. कमीत कमी तिकीट दरात, उत्कृष्ट बस सेवा देणारी आपली बेस्टच आहे. बेस्ट हा उपक्रम नावाप्रमाणे बेस्ट आहे. परिवहन आणि वीजेचा पुरवठा ही सर्व कामे बेस्ट उत्कृष्टरित्या करत आहे. सात लाख वीज ग्राहकांना ई-बिल्स दिली जात आहेत. शहरातील ४५० मार्गांवर बेस्ट धावते, हे कौतुकास्पद आहे. त्याबाबत लंडनच्या महापौरांनीही कौतुक केले आहे. हरित थांबे, सौर ऊर्जा छतांचे थांबे असे मेड इन मुंबई असे उपक्रम आम्ही राबवत आहोत. मुंबईतील नागरिक आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्कृष्ट सुविधा आणि सेवा देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी बेस्टच्या ताफ्यात ई बसेसची संख्या वाढविण्यात येत आहे. येत्या काही वर्षात बेस्टच्या ताफ्यात दहा हजार बसेस असतील. त्यामध्ये डबल डेकर बसेसचाही समावेश असेल. मुंबईत मेट्रो जाळ्याचा विकास करत आहोत. रस्तेमार्गांनी जास्तीत जास्त नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न आहे. मोफत आणि दर्जेदार शिक्षणासोबतच महापालिकेच्या शाळांतील मुलांना मोफत बस सेवा देणारी बेस्ट हा एकमेव उपक्रम आहे. या कार्डच्या रुपाने आपण मुंबईकरासाठीची वचनपूर्ती केली आ


            या सोहळ्यात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीच्या ४८३ कोटी रुपयांच्या निधीचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून डिजिटली वितरण करण्यात आले. बेस्टचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रा यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते एनसीएमसी कार्डचे अनावरणाद्वारे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बेस्टच्या व्हिजन डॉक्युमेंटचेही प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यास महापालिका, बेस्ट उपक्रमाचे अधिकारी, कर्माचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 25 :- महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो, सर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागते, हे लक्षात घेऊन राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत केले

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकासंदर्भात दिलेला निर्णय  सर्वांसाठी बंधनकारक असून त्यासंदर्भात केंद्र सरकार त्यांच्या तर राज्य सरकारे त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करतील. राज्याचा गृहविभाग नियम, कायद्यानुसारच कार्यवाही करेल. कायद्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांच्या सहकार्याने एक चांगला मार्ग निघावा, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था, जातीय सलोखा राहावा, सौहार्दाचे वातावरण बिघडू नये, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले

            राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, बहुजन‍‍ विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार क्षितीज ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, समाजवादी पक्षाचे रईस पठाण, एमआयएमचे वारिस पठाण, वंचित बहुजन पक्षाच्या रेखा ठाकूर, आम आदमी पक्षाच्या प्रिती मेनन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर, आरपीआय (गवई गट) राजेंद्र गवई आदींसह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते

कायदा सर्वांसाठी समान - गृहमंत्री दिलीप वळसे-पा

           गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, ध्वनीक्षेपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्व राज्यांसाठी बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधारे राज्य शासनाने जुलै 2017पर्यंत वेळोवेळी शासननिर्णय जारी केले आहेत. त्या शासननिर्णयांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही गृहविभागाची प्राथमिकता आहे. समाजात तेढ वाढेल, कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशी वक्तव्ये कुणी करु नयेत. कायदा सर्वांसाठी समान असून, कुणीही कायद्याचा भंग करु नये. आजच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. ती विचारात घेऊन राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल. शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. यावेळी  बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोगते व्यक्त केली.    

*********

फोटो ओळ

            राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, बहुजन‍‍ विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार क्षितीज ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, समाजवादी पक्षाचे रईस पठाण, एमआयएमचे वारिस पठाण, वंचित बहुजन पक्षाच्या रेखा ठाकूर, आम आदमी पक्षाच्या प्रिती मेनन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. उदय नारकर, आरपीआय (गवई गट) राजेंद्र गवई आदींसह विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते

००००००



             





 राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ‘यू ॲण्ड मी अनप्लग्ड’ या कादंबरीचे प्रकाशन

            मुंबई, दि. 25: भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर आनंद सॉ लिखित ‘यू ॲण्ड मी अनप्लग्ड’ या कादंबरीचे प्रकाशन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी नुकतेच केले.

            मुंबईतील महाराष्ट्र नेवल एरियामध्ये आय.एन.एस. आंग्रे, फोर्ट येथे लेफ्टनंट कमांडर या पदावर कार्यरत असलेले या कादंबरीचे लेखक ए.के. सॉ यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या अनुभवांचे इंग्रजी भाषेतील विविध कथांतून वर्णन केले आहे.

            देशसेवेचे व्रत अविरतपणे जोपसतांना आपल्या अनुभव, कल्पनांमधून साकारण्यात आलेले हे पुस्तक वाचकवर्गासाठी साहित्याची भेट ठरेल, असे सांगून राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी लेफ्टनंट कमांडर ए.के. सॉ यांना या पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या.

            यावेळी लेफ्टनंट अशोक कुमार, नेवल अधिकारी तृप्ती शर्मा आदी या पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित होते.

००००

 राज्यपालांच्या हस्ते, क्रीडा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली

राज्यपुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन

            मुंबई, दि. 25 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते व क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत राज्यपुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            मागील गेल्या दोन वर्षांपासून कोविड मुळे प्रमाणपत्र वितरण सोहळा होवू शकला नव्हता.यावर्षी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्यसंस्थेतर्फे दि. २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.३० वा.राज्य प्रशिक्षण केंद्र स्काऊट गाईड पॅव्हिलियन, शिवाजी पार्क, दादर (प) मुंबई येथे राज्यस्तरीय राज्यपुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र प्रदान समारंभ होणार आहे.

00000



Pension अदालत

 मुंबईत 28 एप्रिल रोजी ‘पेन्शन अदालत’

            मुंबई, दि. 25 :- पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या निवारणासाठी प्रधान महालेखापाल (ले. व ह.) - 1, महाराष्ट्र, मुंबई व पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्यावतीने ‘पेन्शन अदालत’ आयोजित केली आहे.     

            सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांनी पोलीस संकुल हॉल, नायगांव, दादर, मुंबई, येथे दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वा. उपस्थित रहावे, असे पोलीस उपआयुक्त (मुख्यालय-१), (अतिरिक्त कार्यभार) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


००००


 

 भवताल कट्टा ४३


विषय -उष्णतेच्या लाटा, उष्माघात आणि आपण

(उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र होरपळून निघालाय. या लाटांमागची कारणे, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम, उष्माघाताची लक्षणे, घ्यावयाची काळजी, उपाय याबाबत सजग करणारा कट्टा...

वक्ते -

डॉ. कृष्णानंद होसाळीकर

(अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान विभाग)

डॉ. प्रकाश देव

(अध्यक्ष, नागपूर मेडिकल असोसिएशन)

शुक्रवार, २९ एप्रिल २०२२सायं. ७ ते ८.३०

सहभागासाठी -झूम लिंक https://bit.ly/3vaESgs

किंवा

भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह

पेजची लिंक - 

https://facebook.com/bhavatal

--

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


सुव्यवस्था

 राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन.

            मुंबई, दि. 25 :- महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो, सर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागते, हे लक्षात घेऊन राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत केले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकासंदर्भात दिलेला निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असून त्यासंदर्भात केंद्र सरकार त्यांच्या तर राज्य सरकारे त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करतील. राज्याचा गृहविभाग नियम, कायद्यानुसारच कार्यवाही करेल. कायद्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांच्या सहकार्याने एक चांगला मार्ग निघावा, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था, जातीय सलोखा राहावा, सौहार्दाचे वातावरण बिघडू नये, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

            राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, बहुजन‍‍ विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार क्षितीज ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, समाजवादी पक्षाचे रईस पठाण, एमआयएमचे वारिस पठाण, वंचित बहुजन पक्षाच्या रेखा ठाकूर, आम आदमी पक्षाच्या प्रिती मेनन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर, आरपीआय (गवई गट) राजेंद्र गवई आदींसह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

कायदा सर्वांसाठी समान - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

            गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, ध्वनीक्षेपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्व राज्यांसाठी बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधारे राज्य शासनाने जुलै 2017पर्यंत वेळोवेळी शासननिर्णय जारी केले आहेत. त्या शासननिर्णयांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही गृहविभागाची प्राथमिकता आहे. समाजात तेढ वाढेल, कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशी वक्तव्ये कुणी करु नयेत. कायदा सर्वांसाठी समान असून, कुणीही कायद्याचा भंग करु नये. आजच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. ती विचारात घेऊन राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल. शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. यावेळी बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोगते व्यक्त केली.    


***********

फोटो ओळ :

            राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, बहुजन‍‍ विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार क्षितीज ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, समाजवादी पक्षाचे रईस पठाण, एमआयएमचे वारिस पठाण, वंचित बहुजन पक्षाच्या रेखा ठाकूर, आम आदमी पक्षाच्या प्रिती मेनन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. उदय नारकर, आरपीआय (गवई गट) राजेंद्र गवई आदींसह विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

०००



Monday, 25 April 2022

 “आई - वडिलांचे आशीर्वाद”


✍️"ज्याच्या डोक्यावर ही दोन हात असतील तो माणूस जगातील अत्यंत श्रीमंत असतो. कारण , देव प्रत्येकालाच हे दोन हात देत नाही . देत असतो पण काही लोक तो हात काढण्याचा प्रयत्न करत आहेत . तर काही नी तो काढला पण आहे . पण ते लोक जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत .कारण , हे दोन हात म्हणजे साधेसुधे थोडीच आहेत . हे तर स्वयम देवाची देणगी आहे. जे याला जपतात ते लोक पहा किती यशस्वी आहेत/ असतात . उदाहरणार्थ:- मोटेगावकर सर हे अत्यंत गरीब होते पैशाने तर होतेच . पण , हे सर कधीच म्हणत नाहीत मी गरीब होतो . कारण ते म्हणतात माझ्या डोक्यावर कायम माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद होता तर मी गरीब कशामुळे असेल . माझे आई-वडील हे माझे धन आहे . असे ते प्रत्येक भाषणात सांगत असतात . माझे आई - वडील माझ्या सोबत आहेत म्हणून, “ मी खूप श्रीमंत आहे”. हे सर ( gold medals in chemistry) या विषयात आहेत . यांच्या आई वडिलांचे स्वप्न होते कि सरांनी डॉक्टर व्हायला पाहिजे . पण सर डॉक्टर झाले नाहीतर शिक्षक झाले . अनेक विद्यार्थी त्यांनी डॉक्टर आणि इंजिनिअर केले . अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली . दरवर्षी 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ते मदत करतात . अत्यंत उत्तम शिक्षण ते देतात आणि डॉक्टर आणि इंजिनियर घडवतात . त्यांच्या या मदतीमुळे अनेक डॉक्टर , अनेक इंजिनिअर घडले . गरीब आणि हलाखीचे जीवन जगणार्‍या आई-वडिलांचे त्यांनी स्वप्न पूर्ण केले . त्यांच्या मुला - मुलींना डॉक्टर , इंजिनिअर घडवले . आणि त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली . त्यांच्या या मदतीमुळे गरीब विद्यार्थी डॉक्टर होऊ शकले . कारण, त्यांचे आई वडिलांचे स्वप्न होते की सरांनी डॉक्टर व्हावे , पण सरांनी डॉक्टर न होता शिक्षक झाले आणि आता खूप डॉक्टर घडवले . व त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले . सरांसारखे खूप मोठे- मोठे लोक फक्त आई-वडिलांचे आशीर्वाद आणि कष्ट यांच्या जोरावर मोठे होतात . त्यामुळे कष्ट करा पण मोठे झाल्यावर आपल्या आई वडिलांना मात्र विसरू नका . कारण देव देतो तसे घेतो पण . त्यामुळे मंदिरात हात जोडण्या पेक्षा घरातल्या आई-वडिलांच्या पाया पडा . कधीच मंदिरात जाण्याची वेळ येणार नाही.

 त्यामुळे आई वडील माझे देव असे जो म्हणतो ,“तो जगात अत्यंत श्रीमंत व्यक्ती असतो.” आणि तोच व्यक्ती जीवनात यशस्वी होतो.. "✍️

💯

Featured post

Lakshvedhi