“आई - वडिलांचे आशीर्वाद”
✍️"ज्याच्या डोक्यावर ही दोन हात असतील तो माणूस जगातील अत्यंत श्रीमंत असतो. कारण , देव प्रत्येकालाच हे दोन हात देत नाही . देत असतो पण काही लोक तो हात काढण्याचा प्रयत्न करत आहेत . तर काही नी तो काढला पण आहे . पण ते लोक जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत .कारण , हे दोन हात म्हणजे साधेसुधे थोडीच आहेत . हे तर स्वयम देवाची देणगी आहे. जे याला जपतात ते लोक पहा किती यशस्वी आहेत/ असतात . उदाहरणार्थ:- मोटेगावकर सर हे अत्यंत गरीब होते पैशाने तर होतेच . पण , हे सर कधीच म्हणत नाहीत मी गरीब होतो . कारण ते म्हणतात माझ्या डोक्यावर कायम माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद होता तर मी गरीब कशामुळे असेल . माझे आई-वडील हे माझे धन आहे . असे ते प्रत्येक भाषणात सांगत असतात . माझे आई - वडील माझ्या सोबत आहेत म्हणून, “ मी खूप श्रीमंत आहे”. हे सर ( gold medals in chemistry) या विषयात आहेत . यांच्या आई वडिलांचे स्वप्न होते कि सरांनी डॉक्टर व्हायला पाहिजे . पण सर डॉक्टर झाले नाहीतर शिक्षक झाले . अनेक विद्यार्थी त्यांनी डॉक्टर आणि इंजिनिअर केले . अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली . दरवर्षी 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ते मदत करतात . अत्यंत उत्तम शिक्षण ते देतात आणि डॉक्टर आणि इंजिनियर घडवतात . त्यांच्या या मदतीमुळे अनेक डॉक्टर , अनेक इंजिनिअर घडले . गरीब आणि हलाखीचे जीवन जगणार्या आई-वडिलांचे त्यांनी स्वप्न पूर्ण केले . त्यांच्या मुला - मुलींना डॉक्टर , इंजिनिअर घडवले . आणि त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली . त्यांच्या या मदतीमुळे गरीब विद्यार्थी डॉक्टर होऊ शकले . कारण, त्यांचे आई वडिलांचे स्वप्न होते की सरांनी डॉक्टर व्हावे , पण सरांनी डॉक्टर न होता शिक्षक झाले आणि आता खूप डॉक्टर घडवले . व त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले . सरांसारखे खूप मोठे- मोठे लोक फक्त आई-वडिलांचे आशीर्वाद आणि कष्ट यांच्या जोरावर मोठे होतात . त्यामुळे कष्ट करा पण मोठे झाल्यावर आपल्या आई वडिलांना मात्र विसरू नका . कारण देव देतो तसे घेतो पण . त्यामुळे मंदिरात हात जोडण्या पेक्षा घरातल्या आई-वडिलांच्या पाया पडा . कधीच मंदिरात जाण्याची वेळ येणार नाही.
त्यामुळे आई वडील माझे देव असे जो म्हणतो ,“तो जगात अत्यंत श्रीमंत व्यक्ती असतो.” आणि तोच व्यक्ती जीवनात यशस्वी होतो.. "✍️
💯
No comments:
Post a Comment