सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 23 April 2022
इ commerce
प्रस्तावित ई-कॉमर्स धोरणावर महाराष्ट्र चेंबरतर्फे
ललित गांधी यांनी भूमिका मांडली.
……………………………………………………………
भारत सरकारच्या प्रस्तावित ई-कॉमर्स धोरणावर संसदीय समितीची बैठक संपन्.
भारत सरकार तर्फे येऊ घातलेल्या ई-कॉमर्स पॉलिसी संदर्भात देशातील ई-कॉमर्स विषयाशी निगडित संघटना, संस्था यांची मते जाणून घेण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या स्थायी संसदीय समितीच्या महाराष्ट्र दौरा प्रसंगी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव अन्य वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर व अन्य संस्थांच्या प्रतिनिधी समवेत संयुक्त बैठक 22 एप्रिल २०२२ रोजी हॉटेल ट्रायडंट मुंबई येथे संपन्न झाली.
देशाच्या वेगवेगळ्या भागातून १० खासदार या बैठकीस उपस्थित होते. स्थायी संसदीय समितीचे चेअरमन श्री. व्ही. विजयसाई रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ई-कॉमर्स पॉलिसी संदर्भात देशातील ई-कॉमर्स विषयाशी निगडित संघटना, संस्थाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ई-कॉमर्स पॉलिसी संदर्भात महाराष्ट्र चेंबरची भूमिका परखडपणे मांडली. देशातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगासमोरील विविध समस्या व आव्हानांची माहिती दिली.
महाराष्ट्रातील व देशातील रिटेल, होलसेल व्यापारी यांच्या व्यापारास संरक्षण केंद्रीभूत ठेवून ई-कॉमर्स धोरण आखण्याची मागणी केली. सूक्ष्म, लघु विक्रेते आणि पुरवठादारांसाठी ई-कॉमर्स रिटेल प्लॅटफॉर्म सार्वजनिक-खाजगी भागीदारी मध्ये स्थापन करणे तसेच औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, कोकण, नागपूर या विभागातील MSME क्लस्टर्समधील उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीसाठी प्रायोगिक उपक्रम राबवण्यात भर देण्यात यावा असे अध्यक्ष ललित गांधी यांनी सुचविले. एमएसएमई विक्रेत्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म नोंदणी करीता प्रोत्साहन देणे आणि ऑन-बोर्डिंग प्रक्रिया सुलभ करणे व ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे देशांतर्गत उत्पादित वस्तूंच्या विक्रीला परवानगी देऊन प्रोत्साहन देणे, ज्यामध्ये 100% भारतात तयार झालेली उत्पादने प्लॅटफॉर्मद्वारे विकली जातील. या स्वरूपाच्या मागण्या अध्यक्ष ललित गांधी यांनी उपस्थित केल्या.
याप्रसंगी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या अपेक्षा व भूमिका मांडल्या. स्थायी संसदीय समितीचे चेअरमन श्री. व्ही. विजयसाई रेड्डी यांनी समिती समोर विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या भूमिकाची दखल घेऊन प्रस्तावित ई-कॉमर्स धोरण तयार करण्यात येईल असे सांगितले.
बैठकीत खासदार पी. भट्टाचार्य, खासदार अनिल देसाई, खासदार श्रीमती रूपा गांगुली, खासदार प्रसून बॅनर्जी, खासदार राजकुमार शहर, खासदार मनोज कोटक, खासदार श्रीमती मंजूलता मंडळ, खासदार अशोक कुमार रावत, खासदार हेमंत श्रीराम पाटील उपस्थित होते. तसेच उद्योग विभाग अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, महाराष्ट्र चेंबरचे प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे आदि सहभागी झाले होते.
आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी
87 कोटी रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेकडे सूपूर्द
पुणे, दि. 22 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नियोजित स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाकडील 87 कोटी 11 लाख रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
स्मारकाबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, समाज कल्याण उपायुक्त रवींद्र कदम पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण संगीता डावखर, स्मारक समितीचे अध्यक्ष विजय बापू डाकले, समितीचे सदस्य बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, रामभाऊ कसबे, डॉ. राजू अडागळे, शांतीलाल मिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाबाबत जागेचे भूसंपादन, स्मारकाचा नियोजित आराखडा, बांधकाम, त्याकरिता लागणारा निधीबाबत चर्चा करण्यात आली. भूसंपादनाची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
0000
मुंबईत 28 एप्रिल रोजी ‘पेन्शन अदालत’l
मुंबई, दि. 22 :- पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या निवारणासाठी प्रधान महालेखापाल (ले. व ह.) - 1, महाराष्ट्र, मुंबई व पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्यावतीने ‘पेन्शन अदालत’ आयोजित केली आहे.
सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांनी पोलीस संकुल हॉल, नायगांव, दादर, मुंबई, येथे दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वा. उपस्थित रहावे, असे पोलीस उपआयुक्त (मुख्यालय-१), (अतिरिक्त कार्यभार) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
००००
120 अश्वशक्तीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या यांत्रिकी मासेमारी नौकांचा डिझेल कोटा व डिझेल परतावा पूर्ववत करा - मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख.
डिझेल कोटा व परताव्यासाठी शासन शुद्धीपत्रक काढणार.
मुंबई, दि. 23 : 120 अश्वशक्तीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या यांत्रिकी मासेमारी नौकांना 120 अश्वशक्तीची मर्यादा काढून डिझेल कोटा व डिझेल परतावा पूर्ववत करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.
मच्छीमार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंत्री श्री. शेख म्हणाले की, राज्यातील यांत्रिकी नौकांसाठी सन 2005 पासून मूल्यवर्धित कर प्रतिपुर्ती योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील 170 मच्छीमार सहकारी संस्था या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेनुसार मच्छीमार सहकारी संस्थाना यांत्रिकी मासेमारी नौकांसाठी खरेदी केलेल्या डिझेलच्या मूल्यवर्धित कराची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे मच्छीमार लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा करण्यात येते. परंतु दि. 14 जानेवारी 1997 च्या अर्धशासकीय शासन पत्रानुसार या योजनेस पात्र होण्यासाठी 6 सिलेंडर व 120 अश्वशक्ती क्षमतेच्या मर्यादेची अट टाकण्यात आली होती.
दि.15 ते 22 फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये ठाणे/पालघर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयाचे महालेखापाल यांच्याकडून लेखापरिक्षण करण्यात आले. लेखापरिक्षण अहवालामध्ये सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ठाणे-पालघर कार्यालयाकडून 120 अश्वशक्तीवरील सहा सिलेंडर क्षमतेच्या नौकांना डिझेल कोटा व त्यानुसार कर परतावा मंजूर केला असल्याबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता.
परंतु सद्यस्थितीत मासेमारी पद्धतीमध्ये झालेले बदल, मासेमारीचे क्षेत्र, मासेमारी सफरीचे दिवस व इतर सर्व बाबींचा विचार करता 120 अश्वशक्तीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या नौकांना डिझेल कोटा व प्रतिपूर्ती मंजुर करण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये करण्याची आवश्यकता आहे. याबाबत शुद्धीपत्रक काढुन लवकरच 120 अश्वशक्तीवरील यांत्रिकी नौकांना करमुक्त डिझेल परतावा सुरु करण्याचे निर्देश विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, अशी माहिती मंत्री अस्लम शेख यांनी शेवटी दिली.
00000
*विमानातलं जेवण*
विमानात मी माझ्या सीटवर बसलो. दिल्लीला जायचे अंतर अडीच तासांचे आहे. पुस्तक वाचणे, तासभर झोप घेणे ..
या गोष्टी मी माझ्या प्रवासात
बहूधा करतो.
टेक ऑफच्या अगदी आधी १० सैनिक आले आणि माझ्या आजूबाजूच्या सीटवर बसले. सर्व जागा भरल्या.
मी माझ्या शेजारी बसलेल्या सैनिकाशी संवाद साधला …
"कुठे जात आहात ?"
"आग्रा, सर ! दोन आठवडे तिथे प्रशिक्षण घेणार आहोत. त्यानंतर, आम्हाला ऑपरेशनसाठी पाठवले जाईल," तो म्हणाला.
तासभर गेला. घोषणा ऐकू आली. ज्यांना पाहिजे ते पैसे भरून जेवणाची पॅकेट्स मागवू शकतात. दुपारच्या जेवणाचा ताप संपला असे मला वाटले, मी पर्स घेऊन माझे दुपारचे जेवण बुक करण्याचा विचार करत असताना एका सैनिकाचे बोलणे ऐकू आले.
"आपणही जेवण मागवूया का ?"
एका सैनिकाने विचारले,
"नाही ! त्यांचे जेवण महागडे आहे. आपला प्रवास पुर्ण झाला की विमानातून उतरून नेहमीच्या हॉटेलमध्ये जेवू या !"
"ठीक आहे !" इतर सैनिकांनी लगेच मान्य केले.
मी फ्लाइट अटेंडंटकडे गेलो व तिला सर्व सैनिकांच्या जेवणाचे पैसे दिले अन् म्हटले "सगळ्यांना जेवायला द्या." मला तिच्या डोळ्यात अश्रू दिसले. "माझा धाकटा भाऊ कारगिलमध्ये आहे, सर ! तुम्ही त्याला जेवण दिल्यासारखं वाटतंय सर."
मी माझ्या सीटवर येऊन बसलो.
अर्ध्या तासात सर्वांसाठी जेवणाची पॅकेट्स आली... मी जेवण संपवून विमानाच्या मागे वॉशरूमला जात होतो. मागच्या सीटवरून एक वृद्ध गृहस्थ आला, "माझ्या सगळं लक्षात आलंय, तुझं अभिनंदन, मला या चांगल्या कामात वाटा घ्यायचा आहे” असे म्हणून माझ्याशी हस्तांदोलन केले व 500 रुपयांच्या काही नोटा त्याने माझ्या हातात ढकलल्या ... "मला तुझ्या आनंदात सहभागी होऊ दे."
मी परत आलो व माझ्या सीटवर बसलो. अर्धा तास गेला. विमानाचा पायलट माझा सीट नंबर शोधत माझ्याकडे आला. तो माझ्याकडे बघून हसला. तुमच्याशी हस्तांदोलन करायचे आहे असे तो म्हणाला. मी माझा सीट बेल्ट सोडला आणि उभा राहिलो.
तो माझा हात हलवत म्हणाला,
"मी फायटर पायलट होतो. तेव्हा तुझ्यासारख्या कोणीतरी मला जेवण विकत आणले. ते तुझ्यातील प्रेमाचे प्रतीक आहे. ते मी कधीच विसरणार नाही."
विमानातील प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या. मी थोडा संकोचलो.
मी केली ती चांगली गोष्ट होती पण मी ते कौतुकासाठी केलेले नव्हते.
प्रवास संपला. मी उठलो आणि पुढच्या सीटकडे गेलो व उतरण्यासाठी दाराजवळ उभा राहिलो. एका तरुणाने माझे नाव टिपुन घेतले आणि माझ्याशी हस्तांदोलन केले. दुसऱ्या एका व्यक्तीने माझ्या खिशात काहीतरी ठेवले आणि न बोलता निघून गेला. दुसरी टीप.
विमानातून उतरताना माझ्यासोबत उतरलेले सैनिक एका ठिकाणी जमा झाले होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि विमानातील सहप्रवाशांनी मला दिलेल्या नोटा काढल्या आणि त्यांच्या हातात दिल्या, "तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी हे पैसे तुम्हाला काहीही खाण्यासाठी उपयोगी पडतील. *आम्ही जे काही देतो ते कमी आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या संरक्षणापेक्षा …"*
माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले.
ते दहा सैनिक विमानातील सर्व प्रवाशांचे प्रेम आपल्यासोबत घेऊन जात आहेत. माझ्या गाडीत चढताना, "जे या देशासाठी प्राण देणार आहेत त्यांच्या दीर्घायुष्याची काळजी घे, परमेश्वरा !” अशी मी मनापासून देवाला प्रार्थना केली.
*एक सैनिक असा असतो जो भारताला दिलेल्या कोऱ्या चेकप्रमाणे आयुष्य घालवतो.*
तरीही त्यांचे मोठेपण न जाणणारेही आहेत !
तुम्ही शेअर करा किंवा नका करू तुमची निवड !
भारतमातेच्या या प्रेमळ बालकांचा आदर करणे म्हणजे आपल्या स्वतःचा आदर करणे होय !
जय हिंद 🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
(आवडल्यास नक्की फॉरवर्ड करा)
👮♂️👮♂️👮♂️👮♂️👮♂️
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...