Tuesday, 19 April 2022

सुंदर संदेश, मातृ पितृ देवो

  *राजकीय नेत्याला बाप मानणाऱ्या*

*मुलाच्या कानाखाली जाळ*

*काढणारा बाप माणूस.......*

साधारणपणे ५-१० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग! दिवाळीची सुट्टी लागली म्हणून गावाकडे निघालो होतो. 

दिवाळीमुळे प्रचंड गर्दी होती. 

माझ्या शेजारी जागा रिकामी होती. 

एक पन्नाशीला टेकलेला मनुष्य घाम पुसत माझ्या जवळ आला. 

जागा रिकामी आहे का चौकशी केली. 

मी अगदी मनमोकळेपणाने बॅग वर टाकून जागा करून दिली.

गाडी नगरहून निघाली आणि 

गावाच्या दिशेने निघाली. 

माझं तरुण वय आणि हातात अग्निपंख पुस्तक पाहून न राहवून त्या सद्गृहस्थाने माझी चौकशी केली.

मी सांगितलं की, कॉलेजमध्ये आहे. सुटीला घरी जातोय.

गप्पांच्या ओघात ती व्यक्ती शिक्षक असल्याचं कळलं! मी पण उत्सुकतेने शाळेतल्या गमतीजमती विचारायला सुरुवात केली

 आणि

 त्यांनी पण त्या मोठ्या आवडीने सांगायला सुरुवात केली.

बोलता बोलता त्यांनी मला विचारलं, तू कोणता व्यवसाय करणार?

मी म्हटलं - मला व्यवसाय करायला आवडेल पण मला शिकवायला आवडतं!

*माझ्या उत्तरावर त्यांनी कुतूहलाने माझ्याकडे पाहिलं. 

आणि

 म्हणाले - "शिक्षक होणं ही साधी गोष्ट नाही.

 त्यासाठी पाठ हे स्वतः जगावे लागतात 

आणि 

विद्यार्थ्यांना जगायला शिकवावे लागतात."

कोणत्या तरी धड्याचा संदर्भ देऊन हे त्यांनी सांगितलं. 

वाक्य आवडलं म्हणून लक्षात राहिलं.

 पण पुढे त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल याची अजिबात कल्पना नव्हती.

आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. 

नगरपासून ४०-५० किलोमीटर वर गाव होतं त्यांचं! 

गेली २० ते २५ वर्षे एसटी ने अप डाऊन करुन नोकरी केली होती.

 माणूस प्रचंड मेहनती आणि प्रामाणिक होता. 

पोरगा नुकताच १२ वी झाला. 

मार्क पण चांगले पडले होते. 

नगरला यायला त्रास होऊ नये, म्हणून सरांनी मुलाला दुचाकी गाडी घेऊन दिली होती. 

साहजिकच पोराच्या हुशारीचं कौतुक बापाच्या डोळ्यातून पाझरत होतं.

गाव १० किमीवर आलं, तसा सरांनी मुलाला एसटी स्टॅन्डवर घ्यायला ये असा फोन केला. 

पोराने पण लगेच तत्परता दाखवून येतो असं उत्तर दिलं 

आणि 

एसटी स्टॅण्डकडे निघाला. गाव आलं..

एसटी थांबली. 

तसा पोरगा 

आणि 

त्याचे मित्र सरांना घेण्यासाठी गाडीवर आले होते.

सर खाली उतरले. 

नवीन कोऱ्या गाडीवर एका राजकीय पक्षाचे चिह्न आणि 

त्याचा फोटो चिकटवलेला दिसला. 

पुढच्या क्षणी एसटी स्टॅन्ड मुस्काडात मारल्याचा आवाजाने चपापले!

सरांनी पोराच्या जोरदार कानाखाली वाजवलीं होती. सरांचा आवाज 

आणि 

राग दोन्ही चढत होते.

*तुझा बाप गेली वीस वर्षे तुझ्या बुडाखाली गाडी असावी, या करिता झिजतोय आणि तू मात्र नव्या कोऱ्या गाडीवर अनोळखी नेत्याचा फोटो लावून हिंडतोय?*

 *तुझ्या बापापेक्षा भारीय का रे .... तो?*

तो पण जिवंत आहे 

आणि 

तुझी आई 

आणि 

बाप पण! 

मग *आईबाप विसरुन तुला त्याचा फोटो का लावावा वाटला?*

राजकारण करायचंय जरुर कर! 

मास्तरांचा पोरगा मास्तर व्हावा असा काही नियम नाही. 

*पण कर्तृत्व असं घडवं की नेता तुझ्या दारात येऊन म्हंटला पाहिजे - "साहेब माझ्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे. ह्या वेळी तिकीट तुम्हाला द्यायचं ठरलं आहे.*"

सरांच्या डोळ्यातून आग

 आणि

 मुखातून शिशाचा रस कानात ओतला जात होता.

*जो पोरगा त्याच्या आईबापाच्या रक्ताच्या कमाईला कुणा नेत्याच्या प्रचाराचं लेबल लावत असेल, तर ती औलाद हरामखोर म्हणावी लागेल*

 अशी औलाद असण्यापेक्षा नसलेली परवडली.

*छत्रपती शिवाजी महाराजांनी पण स्वराज्याचं तोरण बांधलं, पण माता आणि* 

*मातृभूमीला वंदन करून, *

 *आणि*

*माता पित्याला विश्वासात घेवून* *लाचारी आणि*

 *लाळघोटेपणा करून नाही*

 घरी येईपर्यंत जर गाडीवरची ठिगळ जर निघाली नाहीत तर गाडी जाळून टाकेन.

 " असं म्हणून सर पायीचं घराकडे निघाले.

मी म्हटलं, साधी गोष्ट होती. जी घरी पण समजावून सांगणे शक्य होते. इतकं आक्रमक होण्याची गरज नव्हती. 

सर

 पायीच घरी निघाले. 

तसं पोराने आधी भराभर स्टिकर फाडले. 

पुढचं दृश्य फार पाहण्या सारखं होतं.

सर 

फक्त त्यांच्या मुलाला बोलले, पण त्याच्या मित्रांना पण ते लागलं होतं. पोरांनी भराभर स्टिकर फाडली. सरांच्या शब्दांत दम होता.

 उद्या हा प्रसंग आपल्या कुणाच्या वाट्याला येणार नाही असं नाही.

 आणि 

त्यात चूक काहीच नाही. पोरांनी नीट घरचा रस्ता धरला.

 पोरगा मात्र घरी जायला धैर्य एकवटत होता.

*सरांनी स्वतःच्या मुलाच्या थोबाडात वाजवून वेदना मात्र सगळ्यांच्या हृदयात जागवल्या होत्या*. 

पाठ जगणे कशाला म्हणतात हे सरांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं होतं.

गप्पा आणि अचानक घडलेला पुढचा प्रसंग यात सरांचं नाव विचारायचं राहून गेलं. 

इतक्यात कंडक्टरने डबल बेल मारली आणि गाडीतल्या अनेक बापांच्या मनात एक नवीन विचार

 आणि

 *पोरांच्या मनात कृतज्ञतेच्या जाणिवा जाग्या करून गाडी गावाच्या दिशेने निघाली*

*वेळीच घातलेला एक टाका पुढचे शंभर टाके वाचवतो ते असं* 

*नातं वृद्धाश्रमात पोहोचण्या इतकं फाटल्यानंतर त्याला सहानुभूतीचे टाके घालण्यापेक्षा वेळीच जबाबदारीच्या जाणिवा थोडं कठोर होऊन जाग्या केलेल्या उत्तम नाही का?*

*© श्री. अमेय कानडे.*


*नेत्याला बाप समजणाऱ्या सगळ्या गाढव तरुणांना आवर्जून पाठवा.. कदाचित अक्कल येईल आणि त्यांच्या आयुष्याचे मातेरे होणार नाही...* 


🌸

  सुंदर संदेश, मातृ पितृ देवो

 "मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरुन मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा आभार मानू शकेन."

जेंव्हा नायजेरियन अब्जाधीश फेमी ओटेडोला यांना टेलिफोन मुलाखतीत रेडिओ प्रेजेंटरने विचारले, "सर तुम्हाला कोणत्या गोष्टीने जीवनातील सर्वात आनंदी माणूस बनवले आहे?"

फेमी म्हणाले:

"मी आयुष्यातील आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."

पहिला टप्पा संपत्ती आणि साधन जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.

मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे माझ्या लक्षात आले.

त्यानंतर मोठा व्यवसाय मिळविण्याचा तिसरा टप्पा आला. तेव्हा मी नायजेरिया आणि आफ्रिकेत 95% डिझेल पुरवठा करत होतो. मी आफ्रिका आणि आशियातील सर्वात मोठा जहाज मालक होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.

चौथा टप्पा तेंव्हा आला जेंव्हा माझ्या एका मित्राने मला 200 अपंग मुलांसाठी व्हीलचेअर घेऊन देण्याची विनंती केली.

मित्राच्या विनंतीवरून मी लगेच व्हीलचेअर विकत घेतल्या.

पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन स्वतः व्हीलचेअर मुलांच्या हाती द्यावी. म्हणून मी मित्रा सोबत गेलो.

तिथे मी स्वतःच्या हाताने त्या अपंग मुलांना व्हील चेअर दिल्या. त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची विचित्र चमक मला दिसली. त्या मुलांना मी व्हीलचेअरवर बसून फिरताना आणि मजा करताना पाहिले.

जणू ते पिकनिक वर आले आहेत आणि जॅकपॉट जिंकत आहेत.


मला यात खरा आनंद वाटला. मी तेथून निघत असताना एका मुलाने माझे पाय धरले. मी हळूवारपणे माझे पाय सोडवायचा प्रयत्न केला पण त्या मुलाने माझ्या चेहऱ्याकडे पाहत माझे पाय घट्ट पकडले.

मी खाली वाकून त्या मुलाला विचारले "तुला आणखी काही हवे आहे का?"

या मुलाने मला दिलेल्या उत्तराने मला आनंद तर दिलाच पण जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलला. तो मुलगा म्हणाला:

"मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा आभार मानू शकेन."

तुमचा चेहरा पुन्हा पाहण्याची इच्छा करणारे कोणी आहेत का?

😊🙏


- Swati Jagtap ©

 युवकांमधील नाविन्यतेस चालना देण्यासाठी अभ्यास,

 माहिती सत्रांचे आयोजन.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचा उपक्रम.

            मुंबई, दि. १८ : राज्यातील युवकांच्या नाविन्यतेस चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व Cisco Launchpad यांच्या संयुक्त विद्यमाने “इंडिया टेक्नोप्रेन्योरशिप सिरीज” चे आयोजन करण्यात आले आहे. या सिरीजमध्ये प्रारंभिक टप्प्यातील तरुण विद्यार्थी, नवउद्योजक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी व्यवसाय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील अभ्यास व माहिती सत्रे आयोजित केली जाणार आहेत. हे सत्र उद्योग व नाविन्यता परिसंस्थेतील तज्ञांद्वारे घेतले जाणार असून ज्यामधे कल्पना तयार करणे, कल्पना संरक्षित करणे आणि कल्पनेचा विस्तार करणे याविषयी विशेष प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी दिली.

            उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२२ आहे.

            इच्छुक उमेदवारांनी https://msins.in/events या संकेतस्थळावर अर्ज करावे, असे आवाहन श्री. कुशवाह यांनी केले.

            व्यवसाय सत्रे २५ ते २९ एप्रिल २०२२ रोजी होणार असून सत्रांमध्ये उत्पादन विकास, डिझाइन विचार, आर्थिक व्यवस्थापन, निधी उभारणे, त्याचा वापर यासारख्या विस्तृत विषयांचा समावेश असेल. तसेच तंत्रज्ञान सत्रे २ मे ते ६ मे २०२२ रोजी होणार असून सत्रांमध्ये AI, IoT, क्लाउड कम्प्युटिंग आणि ब्लॉकचेन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा समावेश असेल.

            या सिरीज अखेरीस एक “पिच डे” आयोजित केला जाणार असून सहभागी झालेल्या नवउद्योजकांना त्यांच्या कल्पना गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्यासमोर सादर करण्याची संधी मिळेल. सत्र पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल. विजेत्या आणि उत्कृष्ट कल्पनांना सिस्को लाँचपॅडतर्फे विशेष मार्गदर्शन तसेच क्रेडिट्स आणि १.५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळेल. “इंडिया टेक्नोप्रेन्योरशिप सिरीज” उपक्रमामुळे राज्‍यातील होतकरु विद्यार्थी, उद्योजक, नवउद्योजक आणि प्रारंभिक टप्‍प्‍यातील स्टार्टअपचे संस्थापक यांना विशेष लाभ होणार आहे.

            महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्ण संकल्पनांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण” जाहीर केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात.

0000

                                                            वृत्त क्र. 1233


मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट.

            मुंबई, दि. 18 : मत्स्य व्यवसाय विकास मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख व माजी आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

००००

Delegation of fishermen meets Governor

            Delegation of fishermen led by Minister Aslam Sheikh and Bhai Jagtap meets Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai.

०००

 *प्रारब्धाचा हिशेब*



एक दिवस एक माणूस पूर्व सुचना न देता कामावर गेला नाही.


मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा मन लावून काम  करेल ....🤔


म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ....😲


तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले ....😋


काही महिन्यानंतर परत तसच घडलं ...

तो पुर्वसुचना न देता गैरहजर राहीला ...🙄


मालकाला त्याचा खूप राग आला😡

आणि त्याने विचार केला कि,

याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???🤔


हा काही सुधारणार नाही .....

पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला ....😜


त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला ...😊

मालकाला खूप आश्चर्य वाटलं.😱


अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , 

''मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला ..."

तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहीलास

 म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला ....


तरीही तू काही बोलत नाही,,,, असं का ???🤔


त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..

.

''तो म्हणला ,

मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता ...😊


तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला ....🤗


दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते😢

आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात ....😟


मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .🤔


मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ??🙄

ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ...🙏


.

तात्पर्य -

जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,

बेशक सांगा ,

जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.🙏

.

''खूप सुंदर नाते आहे माझ्यात व देवामध्ये ....''


"जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही ...🙏


यालाच प्रारब्ध म्हणतात...

जीवन खुप सुदंर आहे, कष्ट करा अनं आनंदाने जगा


एक दिवस एक माणूस पूर्व सुचना न देता कामावर गेला नाही.


मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा मन लावून काम करेल ....🤔


म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ....😲


तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले ....😋


काही महिन्यानंतर परत तसच घडलं ...

तो पुर्वसुचना न देता गैरहजर राहीला ...🙄


मालकाला त्याचा खूप राग आला😡

आणि त्याने विचार केला कि,

याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???🤔


हा काही सुधारणार नाही .....

पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला ....😜


त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला ...😊

मालकाला खूप आश्चर्य वाटलं.😱


अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , 

''मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला ..."

तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहीलास

 म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला ....

तरीही तू काही बोलत नाही,,,, असं का ???🤔

त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..

''तो म्हणला ,

मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता ...😊

तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला ....🤗

दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते😢

आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात ....😟

मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .🤔

मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ??🙄

ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ...🙏

.

तात्पर्य -

जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,

बेशक सांगा ,

जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.🙏

''खूप सुंदर नाते आहे माझ्यात व देवामध्ये ....''

"जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही ...🙏

यालाच प्रारब्ध म्हणतात...

जीवन खुप सुदंर आहे, कष्ट करा अनं आनंदाने जगा

Monday, 18 April 2022

 फक्त १२ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानला ऑलिम्पिक मध्ये १०० पदकं मिळतात,आणि १०० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला फक्त एका पदकावर समाधान मानावे लागते.....

हे वाक्य एकेकाळी मी नितीन बानुगडे पाटील ह्यांच्या व्याख्यानात ऐकलं होतं पण आज ते अनुभवतो आहे ...

  जगातील सात खंडातील सात शिखर सर्वात कमी वयात सर करण्याचा मानस आहे,त्याची सुरुवात देखील केली आहे,पण आर्थिक मदतीसाठी कोणीच पुढे यायला तयार नाही...गेले दोन महिने रायगड जिल्ह्यातील नेत्यांच्या घराची उंबरठे झिजवत आहोत..पण अजूनही यश येत नाही आहे ...

मघाशी फेसबुक वर महाराष्ट्रातील एका कर्तृत्ववान केंद्रीय मंत्र्यांची पोस्ट पाहीली,ज्यामध्ये ते एका साऊथ इंडियन आठ वर्षाच्या लहान मुलाचे कौतुक करत आहेत ह्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे... शर्विकाच्या नावावर तर दहा रेकॉर्ड आहेत ते सुद्धा चौथ्या वर्षातच...पण केंद्रीय मंत्री बाजूलाच राहिले,साधं महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा ह्याची दाखल घेतली नाही....अश्या वेळी आदरणीय सिंधुताई सकपाळ ह्यांचे वाक्य आठवले, महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागत..आम्हाला मोठं व्हायचं नाही तर स्वतःला सिद्ध करायचं आहे..त्यासाठी ही धडपड सुरू आहे....क्रिकेट सारख्या खेळात करोडो रुपये ओतणारे आयोजक आज इतर खेळांच्या बाबतित का बरे मागे राहत असतील?

असो,मला कोणावर टीका करायची नाही..पण एक सल मनात कायम राहत होती,ती आज व्यक्त केली...

कोणी मदत करो अथवा न करो...आम्ही थांबणारे नाहीत....प्रसंगी दागिने विकू इतर काही विकू...पण स्वतःला सिद्ध करू...

जय शिवराय....

वारसा शिव शंभू छत्रपतींचा आहे ....थांबणार नाही🙏

 गिरगाव चौपाटीवरील "दर्शक गॅलरी"चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण


मुंबईकर, पर्यटकांना विहंगम दृश्याचा आनंद घेण्याची सुविधा


          मुंबई, दि. 17 : गिरगांव चौपाटीवरील "दर्शक गॅलरी"चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आले.


          याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार आदी उपस्थित होते.

          यावेळी माध्यम प्रतिनिधीसोबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मंत्रालयातून राजभवनाकडे जात असतांना इथे या कोपऱ्यात स्वच्छता पाहायला मिळत नव्हती. या परिसराकडे दुर्लक्ष झाले होते. मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केले. त्यातूनच इथे खूप चांगला स्पॉट तयार झाला आहे. मुंबईकर किंवा बाहेरचे पर्यटक गिरगाव चौपाटी बघायला येतात. त्यांना इथे या गॅलरीत आल्यावर नक्कीच खूप आनंद मिळेल. भरतीच्यावेळी आपण समुद्रात उभे आहोत असा आनंद देणारा हा स्पॉट आहे. चैत्यभूमी भागातही अशीच सुंदर दर्शक गॅलरी उभी करण्यात आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून अनेक चांगली कामे मुंबईत सुरु आहेत,असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विहंगम दृश्याचा अनुभव

          स्वराज्यभूमी लगत गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला वाळकेश्वर मार्ग व कवीवर्य भा.रा. तांबे चौकालगत ही गॅलरी उभी करण्यात आली आहे. पावसाचे पाणी समुद्रात वाहुन नेणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनीवर सुमारे 475 चौ.मि. आकाराचा ‘व्हिविंग डेक’ - दर्शक गॅलरी उभारण्यात आली आहे. या ठिकाणावरून अरबी समुद्राचे, गिरगांव चौपाटीचे व क्विन्स नेकलेस अशी ओळख असणाऱ्या मरीन ड्राईव्हच्या विहंगम दृश्याचा अनुभव घेता येणार आहे. हा डेक समुद्राच्या लाटांची ऊंची, दाब आदी सर्व बाबींचा तांत्रिक दृष्टीकोनातून अभ्यास करुन त्याअनुरुप उभारण्यात आला आहे.


000



Sunday, 17 April 2022

 मॉरिशसचे प्रधानमंत्री यांचे मुंबईत आगमन

            मुंबई, दि. 17: मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांचे सपत्नीक आज मुंबईत पहाटे 1.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

            त्याच्या स्वागतास परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.


0 0 0

Featured post

Lakshvedhi