फक्त १२ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानला ऑलिम्पिक मध्ये १०० पदकं मिळतात,आणि १०० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला फक्त एका पदकावर समाधान मानावे लागते.....
हे वाक्य एकेकाळी मी नितीन बानुगडे पाटील ह्यांच्या व्याख्यानात ऐकलं होतं पण आज ते अनुभवतो आहे ...
जगातील सात खंडातील सात शिखर सर्वात कमी वयात सर करण्याचा मानस आहे,त्याची सुरुवात देखील केली आहे,पण आर्थिक मदतीसाठी कोणीच पुढे यायला तयार नाही...गेले दोन महिने रायगड जिल्ह्यातील नेत्यांच्या घराची उंबरठे झिजवत आहोत..पण अजूनही यश येत नाही आहे ...
मघाशी फेसबुक वर महाराष्ट्रातील एका कर्तृत्ववान केंद्रीय मंत्र्यांची पोस्ट पाहीली,ज्यामध्ये ते एका साऊथ इंडियन आठ वर्षाच्या लहान मुलाचे कौतुक करत आहेत ह्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे... शर्विकाच्या नावावर तर दहा रेकॉर्ड आहेत ते सुद्धा चौथ्या वर्षातच...पण केंद्रीय मंत्री बाजूलाच राहिले,साधं महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा ह्याची दाखल घेतली नाही....अश्या वेळी आदरणीय सिंधुताई सकपाळ ह्यांचे वाक्य आठवले, महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागत..आम्हाला मोठं व्हायचं नाही तर स्वतःला सिद्ध करायचं आहे..त्यासाठी ही धडपड सुरू आहे....क्रिकेट सारख्या खेळात करोडो रुपये ओतणारे आयोजक आज इतर खेळांच्या बाबतित का बरे मागे राहत असतील?
असो,मला कोणावर टीका करायची नाही..पण एक सल मनात कायम राहत होती,ती आज व्यक्त केली...
कोणी मदत करो अथवा न करो...आम्ही थांबणारे नाहीत....प्रसंगी दागिने विकू इतर काही विकू...पण स्वतःला सिद्ध करू...
जय शिवराय....
वारसा शिव शंभू छत्रपतींचा आहे ....थांबणार नाही🙏
No comments:
Post a Comment