Sunday, 10 April 2022

बुध्दी bal

Ram tere kitne naam

 *राम म्हणजे काय ?*

उगीचच झोपतो त्याला,

 *आ राम* म्हणतात.

घेतलेले माघारी देत नाही त्याला *ह राम* म्हणतात.

झोपलेला परत कधी उठतच नाही त्याला *हे राम* म्हणतात.

मित्रा सारखा वागतो म्हणून *सखाराम* म्हणतात.

जो राजालाही आदर्श  होऊन राहतो त्याला *राजाराम* म्हणतात.

हृदयीचे जाणतो म्हणून त्याला *आत्माराम* म्हणतात.

एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला *सिताराम* म्हणतात.

भगवंत ज्यांचे पाय पूजतो त्यांना *तुकाराम* म्हणतात.

प्रसंगी हाती शस्त्र वा शास्त्र धरुन अन्यायाशी लढतो त्याला *परशुराम* म्हणतात.

जो अखंडपणे भगवंताचा दास होऊन रहातो, त्याला *रामदास* म्हणतात.

हल्लीच्या युगात जो पहाटे उठवतो त्याला *आलाराम* म्हणतात.

जो सेवाव्रताने वागतो त्याला *सेवाराम* म्हणतात.

जो प्रसादाचा गोड मेवा बनवतो त्याला *मेवाराम* म्हणतात.

आणि हे ज्यांना कळलं..

त्यांच्यासाठी *"राम राम"* म्हणतात.

हे वाचणारे सोळा वेळा *राम* म्हणाले,

I'm

मोजलेत ना? राम  राम 🌹🙏

आता एकूण, वीस वेळा *राम , राम* झाले. मी

चला, एकवीस वेळा *रामनाम* तर घडले.

 🚩 *जय जय राम कृष्ण हरी* 

ऊद्याच्या रामनवमीच्या सर्वात आधी हार्दीक  शुभेच्छा 

 🙏🙏

 आज राम नवमी निमित्त अयोध्या नगरी अशी सुंदर सजवलेली आहे🚩🚩🚩🙏🙏🙏

 🌺 *पारिजातकाचा सडा* 🌺

         *भाग   ८६*

**🙏रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा ऊल्लेख आजपर्यंत फार कमी झाला आहे पण महत्वाचा आणि वाचण्यासारखा आहे👏.* 

सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसह वर्तमान *दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती*. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता; ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त *सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून आणण्याचे कार्य बाकी होते*; शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा. *कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते. त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले*. 

झाले, शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरु करण्यात आली. सगळी तयारी झाली *पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलाविण्याचा निश्चय केला.* रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे तर प्रखर शिवभक्त, प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासकसुद्धा होता. म्हणून श्री *रामाने हनुमंताला आज्ञा केली तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला ह्या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्याला दे.* 

रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. *पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही,रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते.* पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचविण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. *ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले*. ते गोंधळून गेले होते, त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी कां केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते. 

*पण रावणाने आपल्या प्रकांड पांडित्याचा, देवपूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परम भक्तीचा मान ठेवत रामाचे, आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले* आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला, *हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना पती-पत्नी यांनी एकत्र करायची असते*. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि *त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही.* 

श्रीराम ह्यावर अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले, *पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य तुला दिलेले आहे. आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस. तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे.* 

ह्या दोन अतिशय थोर आणि उदात्त अशा राजांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. *लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता.* रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, "हे रामा, मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचावीतही आहे *कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला ह्या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे,* पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस. 

*रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपला पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उरकून घेतला*. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम-सीतेला *विजयी भव* असा आशीर्वाद दिला. वास्तविक ह्याचा अर्थ युद्ध झालंच तर ह्या आशीर्वादाने रावणाने *स्वतःचा विनाश स्वतःच स्वीकार करणे हा होतो हे माहित असूनही* रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथेच *स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते*. आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हंणजे पुरोहितांचा सन्मान. 

*रामाने रावणालाच विचारले,* गुरूजी, पूजाविधी यथासांग पार पडला. आता आपण आपली दक्षिणा सांगावी. *आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता*. आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही कांहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होता. त्याने कुणाकडून कांही दक्षिणा स्विकारण्याचा प्रश्नच नव्हता पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता.दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. *यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो* हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला, *हे रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे*. म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एवढीच मागणी करतो की *माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निध असावेस. या व्यतिरिक्त मला अन्य काहीही नको.* 

आणि म्हणूनच *रावणाचा, युद्धात श्रीरामांच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढवला* तेव्हा श्रीराम रावणाच्या सन्निध उभे होते. *भगवंताच्या सान्निध्यात मृत्यू येणे ह्या सारखे दुसरे पुण्य नाही*. रावणाला हे माहित होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता! 

*ही गोष्ट फ़ार लोकांना माहिती आहे असे वाटत नाही,* हल्ली परत वाचनात आली...म्हटले तुम्हाला देखील आवडेल वाचायला.(  रसाळ वाणी .)

बऱ्याच जणांना माहित नसलेली रामायणातील ही कथा खास आपल्या ग्रुप साठी !*

🚩🙏🚩🙏जय श्री राम 🙏🚩🙏🚩

 चला आपण 25 कोटी लोकांची साखळी बनवूया *।।श्रीराम जय राम जय जय राम।।* हा मंत्र फक्त 3 वेळा वाचा आणि पुढे 6 लोकांना पाठवूया. जगाच्या कल्याणासाठी व *श्री राम दर्शनासाठी* ही साखळी तुटता कामा नये;श्री.प.पू. ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची आज्ञा 🌺🙏🌺

Saturday, 9 April 2022

 कबड्डीचे 100 महायोद्धे" पुस्तकाचे प्रकाशन

 कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान

            मुंबईदि. 9:  कबड्डी खेळात राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी  करणाऱ्या खेळांडूचा प्रेरणादायी प्रवास अधोरेखित करणाऱ्या  "कबड्डीचे 100 महायोद्धे" या पुस्तकाचे प्रकाशन आणि कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारक्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बिकेसी येथील एम.सी.ए.  क्लब येथे  हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

            ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यावेळी म्हणाले कीहूतुतू ते कबड्डी हा प्रवास प्रत्यक्ष मातीत खेळून राज्याच्या या लोकप्रिय खेळाचा इतिहास गाजविणारे पुस्तक व कबड्डीचा प्रत्येक योद्धा घडविणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा आहे. कबड्डी महर्षी शंकरराव बुवा साळवी यांच्या सारखे मार्गदर्शक व प्रशिक्षकांनी या खेळास मोठ्या उंचीवर नेण्यास मोलाची कामगिरी  बजावली आहे. अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशा 99 पुरुष व महिला खेळाडू ज्या एका व्यक्तीने भक्कम आधार देऊन घडविलेत्यांचा हा सन्मान आहे. खेळाडूंना जगभरातील वातावरणात खेळण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशने इनडोअर अकादमीची स्थापन केलीअशा अकादमी सर्व भारतीय खेळांसाठी निर्माण करता येऊ शकतात. राज्य शासन त्या धर्तीवर आघाडीचे कार्य करीत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठाची उभारणी एक उत्तम उदाहरण आहे. कबड्डी महायोद्धा पुरस्कार विजेत्यांनी उत्तम खेळाडू घडविण्यासाठी यापुढेही सहकार्य करावेअसे आवाहन श्री. पवार यांनी   केले.

            यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार अभिनंदनपर संदेशातून म्हणाले कीमातीतील खेळाचा गौरवशाली इतिहास मांडणारे हे पुस्तक भविष्यात नवे खेळाडू घडविण्याचे कार्य करेल. कबड्डी या खेळाला सातासमुद्रापार नेण्यात पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे,  असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

            राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले कीजागतिक दर्जाचे खेळाडू हेच राज्याला व देशाला सर्वच क्षेत्रात निरोगीसुदृढ  मनुष्यबळ  उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणी हे मनुष्यबळ निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नक्कीच योगदान देणारे ठरेलअसा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.

           ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदारखासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनात राज्य क्रीडा क्षेत्रात मोठी प्रगती करेलअसे सांगून पुरस्कार विजेते व आयोजकांचे  क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आभार व्यक्त केले. 

            खासदार सुनील तटकरे म्हणाले कीगेल्या पन्नास वर्षात या खेळासाठी व खेळ सातासमुद्रापार नेण्यात मोलाची कामगिरी  पुरस्कार विजेत्या खेळाडूंची आहे. त्याचप्रमाणे खासदार श्री पवार यांनीही सर्व स्तरांवर सकारात्मक भूमिका आजपर्यंत घेतली असल्याचे श्री. तटकरे यांनी सांगितले.

            महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकरमुंबई कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष भाई जगतापप्रशिक्षक शंकरराव साळवी अर्जुन पुरस्कार व शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू यावेळी उपस्थित होते. 

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी केले.

०००००

Featured post

Lakshvedhi