Monday, 21 February 2022

 हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा उद्या राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा.

            मुंबई, दि. २१ महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत घेण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा उद्या, दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणार असून या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि १९ जिल्ह्यांमधील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.

            कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धा घेता आली नव्हती. यंदाचे वर्ष हे स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने व आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत असल्याने त्यास विशेष महत्त्व असल्याचे देशमुख म्हणाले.  

            सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा हौशी मराठी, बाल, हिंदी, संगीत, संस्कृत, दिव्यांग बाल नाट्य अशा सहा विविध प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.

जवळपास तीन महिने अविरत चालणाऱ्या या स्पर्धांमधून एकूण ६७४ संघ भाग घेणार आहेत अशी माहिती देत सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघ व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

00000


 

 तेलंगणा सख्खा शेजारीत्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवणाऱ्यावर भर देणार

                                               – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

 

आंतरराज्यीय जलसिंचन प्रकल्पांविषयी चर्चा

 

            मुंबईदि. 20 : - तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदाउद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येईलअसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या समवेत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आंतरराज्यीय संयुक्त जलसिंचन प्रकल्पांविषयीही विस्तृत चर्चा झाली. 

            या शिष्टमंडळासमवेतच्या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाईनगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेखासदार संजय राऊतखासदार अरविंद सावंतमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते.

            बैठकीत बाभळी बंधारा,  तुम्मीदीहेटीमेडीगड्डा बॅरेजचन्खा-कोरटा बॅरेज या सिंचन प्रकल्पांच्या अनुषंगाने चर्चा झाली. तसेच उभय राज्यात सुरु असलेल्या उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध योजनाप्रकल्पांचीही चर्चा करण्यात आली. जलसिंचन प्रकल्पांतील आंतरराज्यीय सहकार्य आणि त्यातील विविध तरतुदींबाबतही यावेळी विस्ताराने उहापोह करण्यात आला. दोन्ही राज्यांदरम्यानचे विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवणाऱ्या उपाययोजनांवर भर देण्याबाबतही चर्चा झाली. 

            मुख्यमंत्री श्री. राव यांच्या समवेतच्या शिष्टमंडळात खासदार रणजित रेड्डीखासदार संतोष कुमारखासदार बी. पी. पाटीलआमदार पल्ला राजेश्वर रेड्डीआमदार श्रीमती के. कवितातेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे महासचिव श्रवण रेड्डीतसेच ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज आदींचा समावेश होता.

            सुरूवातीला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री. राव यांचे पुष्पगुच्छशाल तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री श्री. राव यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचाही सत्कार केला. मुख्यमंत्री श्री. राव यांच्यासमवेतच्या शिष्टमंडळातील सदस्यांचेही पुष्पगुच्छ आणि तसेच महाराष्ट्र देशा’, ‘पहावा विठ्ठल देऊन स्वागत करण्यात आले.      

oooo


 एक होतं गाव. "महाराष्ट्र" त्याचं नाव. 


गाव खूप छान होतं,

लोक खूप चांगले होते. 

"मराठी" भाषा बोलत होते,

गुण्यागोविंदानं  नांदत होते. 

त्यांचं मन  खूप मोठ्ठं होतं. 

वृत्ती खूप दयाळू होती.

दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे. 

आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ

देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे,

महाराष्ट्रात होता एक भाग. 

"मुंबई" त्याचं नाव.

मुंबईसुद्धा छान होती;

महाराष्ट्राची शान होती.

सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.

आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते.

इथं आले, की इथलेच होऊन

राहत होते.

"अतिथी देवो भव...!" 

या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.

पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.

हळूहळू परिस्थिती बदलू

लागली. "अतिथी" 

जास्त आणि "यजमान" कमी झाले.

मुंबई  कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.

मराठी आपली वाटत नव्हती.

प्रश्न ?मोठा गहन होता,पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.

त्यांना एक युक्ती सुचली.

दूरदेशीची परदेशातील

भाषा त्यांना जवळची वाटली.

त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील,  परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील. सर्वांचाच,अगदी "महाराष्ट्राचा" ही  विकास होईल, म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.

आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली. 

आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली,

आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना,

बोलीभाषा ही बदलली.

सगळ्याचा नुसता काला झाला. 

शुद्ध, सुंदर मराठीचा लोप झाला.

?

अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर

माफ करा हं........

आपल्या 'मम्मी' बरोबर एकदा वाचनालयात गेला.

चुकून त्याचा हात एका  पुस्तकावर पडलं, त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं,

पानं फडफडली, आनंदित झाली.

त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल. 

इतक्यात त्या मुलानं

विचारलं, (त्याच्या भाषेत) 

"मम्मी" कोणत्या भाषेतलं  पुस्तक आहे गं हे ?''

'मम्मी' खूप सजग होती,

मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.

पुस्तक  परत जागेवर ठेवत म्हणाली, "अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस,

"मराठी भाषा" प्रचलित होती;

आता कोणी नाही ती बोलत.

पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली,

पानांपानांतून अश्रू ठिबकले; 

पण...................

हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण, आता मराठी साठी दुःखी  होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं.!! 

महाराष्ट्राची शान "मराठी"भाषा!!!

मला एकानी विचारले तू मराठीत का 'पोस्ट' टाकतो....??? आणि,

मी त्यांना एवढंच म्हटलं, 

आमच्या घरात "तुळस"आहे,

 'Money plant'नाही.

आमच्या घरच्या स्त्रीया  "मंदीरात" जातात,

'PUB' मध्ये नाही.

आम्ही मोठ्यांच्या  पायाच पडतो, त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत नाही.

आम्ही "मराठी" आहोत,

आणि मराठीच राहणार !!!

तूम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय

मराठीतूनच देतो,

याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही,

अर्थ असा आहे की, मी आपल्याला मराठी शिकवतोय.

अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा...

"तुळशी" ची जागा आता

'Money Plant' ने घेतलीय...!!

"काकी" ची जागा आता 'Aunti' घेतलीय...!!!

'वडील' जिवंतपणीच "डेड" झालेत. 

अजुन बरंच काही आहे, आणि तुम्ही आत्ताच Glad झाले....???

"भाऊ" 'Bro' झाला...!!

आणि "बहीण " 'Sis'...!!!

दिवसभर मुलगा "CHATTING" च करतो... नाही तर रात्री झोपताना Mobile वर 'SETTING' पण करतो...!!!

दुध पाजणारी "आई" जिवंतपणीच 'Mummy'झाली.!!

घरची "भाकर" आता कशी आवडणार हो...

५ रु. ची 'Maggi' आता किती "Yummy" झाली...!!!

माझा मराठी माणूसच "मराठी" ला विसरू लागलाय....

 आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करा !!!

विनंती आहे ,,, सगळयांना पाठवा.

 *२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पोचवा*

 गुरुचरित्र महिलांनी वाचवे का?गुरुचरित्र आणि पूर्वा ग्रह

श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला आहे अत्यंत उत्कट अनुभव देणारा हा ग्रंथ सर्वत्र वंदनीय आहे. काही लोकांचे असे गैरसमज आहेत की गुरुचरित्र फक्त ब्राह्मणांनीच वाचावे अशा अफवा पसरवणारे लोक अर्धशिक्षित आणि कसलाही अभ्यास नसलेले असतात.मात्र काहीतरी पिल्लू सोडून देण्याने समाजात विनाकारण गैरसमज होतात आणि गोंधळ निर्माण होतो. स्वतः दत्त महाराजांनी जात-पात कधीही मानली नाही. त्यांच्या भक्त मंडळींत कितीतरी जातींची मंडळी होती. प्रत्येकाला त्यांनी अत्यंत सुंदर प्रबोधन केले. मात्र श्री गुरुचरित्रांतील काही अध्याय समजण्यास अत्यंत कठीण आहेत. विशेषता छत्तिसावा अध्याय किंवा वेदांचे अध्याय यांचे अर्थ संस्कृत जाणणाऱ्याला किंवा धर्माच्या अभ्यासकाला जेवढे लवकर कळतील तेवढे सामान्यांना कळणार नाहीत मात्र दत्तप्रभूंच्या भक्तांवर त्यांनी केलेली कृपा याचे जे अध्याय आहेत ते अत्यंत उच्च प्रकारची भक्ती निर्माण करणारे आहेत म्हणून स्त्रियांनीसुद्धा गुरुचरित्र वाचू नये हा स्त्रियांना कमी लेखण्याचा हेतू नाही तर परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबे स्वामी महाराज यांनीही स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा उपदेश करण्यामागे शास्त्रीय कारणे आहेत.एक म्हणजे स्त्रियांची शरीर रचना रोज साडेतीन तासांची विशिष्ट बैठक घालण्यासाठी योग्य नसते तसेच संसारात अनेक जबाबदाऱ्या स्त्रियानाच पार पाडायच्या असतात आणि अशा पद्धतीने रोज तीन तास असे सात दिवस त्यांना बसणे शक्य नसते तसेच त्यांचा मासिक धर्म अमुक दिवशी येईल अशी खात्री नसते आणि पारायणाला बसल्यानंतर अशी अडचण आल्यास पारायण अर्धवट राहते व पुन्हा सुरू करावे लागते तसेच श्री गुरुचरित्र हा ग्रंथ विरक्ती निर्माण करणारा आहे आणि स्त्रियांना अशा प्रकारची विरक्ती येणे हे कुटुंबासाठी योग्य नसते.मात्र "स्त्रियांना नाही वेगळे कर्म पती देतो अर्धा धर्म"या न्यायाने बायका संसारातच खूप पुण्य जोडीत असतात म्हणून स्त्रियांनी संपूर्ण पारायण करण्यापेक्षा महाराजांनी ज्यांच्यावर कृपा केली अशा भक्तांच्या मधुर कथा जरूर वाचाव्यात त्यामुळेही गुरुचरित्र वाचल्याचे फळ मिळू शकते मात्र जे अध्याय समजत नाहीत त्यावरून नुसती नजर फिरवणे आणि अर्थबोध न होणे हे टाळण्यासाठी स्त्रियाच नव्हे तर पुरुषांनाही कथा वाचण्याचा सल्ला टेंबे स्वामिंनी दिला आहे.वारंवार " स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का का वाचू नये "असे प्रश्न महिला विचारतात म्हणून आज विस्ताराने उत्तर दिले आहे मात्र ज्या स्त्रीचा मासिक धर्म थांबला आहे आणि ती बैठकीस सक्षम आहे तसेच संस्कृतचा अभ्यास असून अर्थबोध होण्याची विद्वत्ता आहे तिने गुरुचरित्र वाचल्यास तार्किक दृष्ट्या अडचण नाही. दत्त महाराज संन्यासी असल्याने पावित्र्य,सोवळे-ओवळे पाळले जावे ही अपेक्षा असते बायकांना सर्व अवधाने सांभाळून तेवढा वेळ व स्वास्थ्य मिळणे कठीण असते.हा सगळा विचार करूनच काही नियम घातले आहेत.म्हणून स्त्रियांनी गुरुचरित्राचे अध्ययन करावे पण सप्ताह पारायण करू नये असा सल्ला दिला आहे. दत्तप्रभू सर्वांचे आहेत म्हणून आणि गुरुचरित्रात त्यांनी अनेक स्त्रियावरही 

कृपा केली आहे हे लक्षात घेता ते स्त्रियांचा किती मान ठेवत होते हे लक्षात येते म्हणून अर्धवट अभ्यास केलेल्यांनी मनात येईल तसे अपप्रचार करू नयेत.धर्माने सर्वत्र स्त्रियांना अत्यंत मान दिला आहे त्या समाजाचे भूषण आहेत एकदा लोकमान्य टिळकांच्या नातीने विचारले,"स्त्रियांना सीता व्हा असे सांगतात, पुरुषांना राम वासे का सांगत नाहीत?"त्यावर लोकमान्य म्हणाले," बाळा सीतेच्या जीवनातूनच राम निर्माण होतो."आपली आई आजी पत्नी मुलगी ह्या पुरुषांचे श्रद्धास्थान असतात म्हणून स्त्रियांसाठी शास्त्रकारांनी घातलेले काही नियम हे त्यांच्या आयुष्याचा विचार करूनच आणि जबाबदाऱ्या पाहूनच घातले आहेत कुठल्याही महापुरुषाने स्त्रियांना धर्मात सहकारी करून घेऊ नये असे म्हटलेले नाही. उलट पुजेला बसताना सुद्धा स्त्रियांना स्वतंत्र उपचार करावे लागत नाहीत.फक्त पतीच्या हाताला हात लावून पुण्यप्राप्ती करता येते. कारण संसार उत्तम रीतीने करणाऱ्या स्त्रिया महान पुण्य जोडत असतात म्हणून श्रीगुरूचारित्रा संबंधी कोणतेही विकल्प स्त्रियांनी मनात ठेवू नयेत व पुरुषांनी पसरवू नयेत ही विनंती. श्री गुरुचरित्र हा महान अनुभव देणारा परम पवित्र ग्रंथ आहे.तो सर्वांनाच वंदनीय आहे म्हणून पारायण करणाऱ्या लोकांनाही नियम सांगितले आहेत की त्यांनी एकभुक्त रहावे, सप्ताह काळात अत्यंत पवित्र राहावे,ब्रह्मचर्य पालन करावे, दिवसभर गप्पा-टप्पा न करता चिंतन करावे रात्री डावा कान भुईला लावून झोपावे आणि पहाटे लवकर स्नान करून शास्त्रोक्त रीत्या भस्म लावून वाचन सुरू करावे आणि अर्थबोध होईल इतक्या सावकाशपणे प्रत्येक ओवी हृदयात रुजवावी सप्ताह समाप्तीचे वेळी निश्चये दत्तमहाराज शुभ अनुभव देतात दत्त महाराजांना बर्फी फार आवडते म्हणून नैवेद्याला बर्फी आणावी आणि सप्ताह समाप्तीनंतर शक्यतो एका ब्राह्मणाला आणि सवाष्णीला भोजनास बोलावून त्यांना दक्षिणा द्यावी. अशाप्रकारे नियमाला अनुसरून आणि सप्ताह करावा.मात्र स्त्रियांनीसुद्धा कथा जरूर वाचाव्यात.नमस्कार.(शरद उपाध्ये

 *तिन्हीसांजेपूर्वी केर काढणे*

संकलक : दिवसभर घरात आलेला कचरा संध्याकाळी काढल्यास नंतर येणारी रज-तमात्मक स्पंदने वास्तूत अल्प प्रमाणात आकृष्ट होतात. यासाठी संध्याकाळीही कचरा काढतात. आपण ‘सायंकाळी केर काढू नये’, असे का सांगितले आहे ?

एक विद्वान : कलियुगातील जीव हे रज-तमप्रधान असल्याने त्यांच्या हातून घडणारे, तसेच रज-तमात्मक स्पंदनांना आकृष्ट करणारे कर्म शक्यतो सायंकाळी करू नये. सायंकाळी रज-तमात्मक लहरींचे वायूमंडलात संचारण वाढते. केर काढणे, या कृतीतून भूमीशी संलग्नता साधून होणार्‍या घर्षणात्मक कृतीतून पाताळातील त्रासदायक स्पंदनांची गती आणखी वाढते आणि केर काढून बाहेर टाकण्याच्या कृतीपेक्षा नादाच्या स्तरावर सूक्ष्म स्वरूपात वास्तूत रज-तमात्मक स्पंदने फिरत रहाण्याचेच प्रमाण वाढते.

यासाठी शक्यतो तिन्हीसांजेची वेळ टळून गेल्यावर केर काढू नये. म्हणून ‘शक्यतो सायंकाळी केर काढणे टाळावे’, असे सांगितले आहे. तिन्हीसांजेपूर्वी केर काढणे हे त्यातल्यात्यात नादातून अल्प रज-तमात्मक लहरी आकृष्ट करणारे असते. ‘तिन्हीसांजेला घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते’, असे सांगितले जाते. म्हणजेच तिन्हीसांजेपूर्वी केर काढून तिन्हीसांजेला तुळशीजवळ दिवा लावल्यास शक्तीरूपी लहरी दिव्याकडे आकृष्ट होऊन वास्तूत प्रविष्ट होतात. या तेजदायी देवत्वामुळे वास्तूचे सायंकाळच्या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होते.

 *फ्रीजचा  वापर आणि आपले आरोग्य* 

          अन्नाची सगळी पोषण मूल्य फ्रीजमध्ये ठेवून ठेवून नाश पावतात. अनेक फ्रीज कंपनी आपल्या फ्रीजचे ज्या पद्धतीने मार्केटिंग करत असते त्याची अनेकांना भूल पडत असते. फ्रीज मध्ये ठेवले याचा अर्थ बिलकुल असा होत नाही की ते अन्न ताजे राहते. सगळी पोषणमूल्य गेल्यावर राहिलेला गार चोथा फक्त आपण पोटामध्ये ढकलत राहतो.

        असे अन्न आयुर्वेदाने “तामसिक” प्रकारात वर्ग केलेले आहे. असे अन्न सतत खावून शरीरातील उत्साह नष्ट होतो. आळशीपणा वाढतो. कुठलेही काम करण्यात रस वाटत नाही. शरीर आणि बुद्धी दोन्ही ला मांद्य येते. सतत चिडचिडेपणा वाढीस लागणे ही याच अन्नाची परिणीती असते. अगदी रात्री चिरून फ्रीज मध्ये ठेवलेली भाजी देखील सकाळी आपण काढतो तेव्हा तिच्या मधले vitamin, minerals नाश पावलेले असतात.

           जेव्हा आपण कुठल्याही हॉटेल मध्ये कधी खाण्यास जातो तेव्हा कधी निरीक्षण केल तर लक्षात येईल की पंजाबी , continental , North Indian च्या नावाखाली ज्या १७६० डिशेश ची यादी दिलेली असते त्या मध्ये वस्तुत: फरक काहीच नसतो, या डिशेश चे मसाले कित्येक दिवस बनवून हॉटेल च्या विशालकाय भटार खाण्यातील महाकाय फ्रीज मध्ये विराजमान झालेले असतात. ऑर्डर दिल्यानंतर हेच मसाले/ करी परतून त्यात पनीर चे तुकडे आणि भाज्या टाकून मखनवाला, हंडी, कोल्हापुरी, कढाई, अशा गोंडस नावाखाली हे पदार्थ समोर येतात.

असे प्रचंड तापमानाला थंड केलेले आणि पुन्हा प्रचंड तपामानला गरम केलेले दर्जाहीन, पोषणमूल्य शून्य असलेले तरीही चटकदार, मसालेदार, पदार्थ भले शरीराला स्थौल्य देत असतील, जठराग्नी मंद करून टाकत असतील, आम्लपित्ता सारखे, आमवाता सारखे त्रास देत असतील पण जिभेच सुख ज्यांना महत्वाच वाटत त्यांना हेच पदार्थ परब्रम्ह प्रतीत होतात आणि – घरच्या अन्नपूर्णे ने प्रेमाने रांधून बनवलेले ताजे, कमी मसालेदार तरीही रुचकर अन्न “So tasteless!” म्हणून घरच्या फ्रीज मध्ये अन तिथून कचऱ्याच्या डब्यात जातात.

चुलीवर शिजवलेला स्वयंपाक so unhyginic म्हणणारे लोक मायक्रोवेव्ह मध्ये तास तास भर ठेवून मैदा, अंडी आणि ५० प्रकारचे वेगवेगळे चीज घालून बनविलेला काला मुलांना प्रेमाने खावू घालतात त्या वेळी त्यांच्या मनात असा प्रश्न कधीच येत नाही की, हे अन्नाच्या नावाखाली आपण स्वत:वर आणि आपल्या मुलांवर एक प्रकारे अन्याय करत असतो.

शरीर ही एक देणगी आहे आणि त्याला स्वस्थ ठेवण्यासाठी फार काही अट्टाहास करण्याची गरज नाही. स्वच्छ, ताजे, आपल्या मातीत उगवणारे आणि कमीत कमी प्रक्रियांचा वापर करून शिजवलेले अन्न शरीर बलवान करण्यास समर्थ असते. त्यासाठी महागडी उपकरणे वापरलीच पाहिजेत अशी अट नाही. अर्थात आधुनिकीकरणाला विरोध असण्याचे काही कारण नाही.


 

Featured post

Lakshvedhi