Monday, 21 February 2022

 *तिन्हीसांजेपूर्वी केर काढणे*

संकलक : दिवसभर घरात आलेला कचरा संध्याकाळी काढल्यास नंतर येणारी रज-तमात्मक स्पंदने वास्तूत अल्प प्रमाणात आकृष्ट होतात. यासाठी संध्याकाळीही कचरा काढतात. आपण ‘सायंकाळी केर काढू नये’, असे का सांगितले आहे ?

एक विद्वान : कलियुगातील जीव हे रज-तमप्रधान असल्याने त्यांच्या हातून घडणारे, तसेच रज-तमात्मक स्पंदनांना आकृष्ट करणारे कर्म शक्यतो सायंकाळी करू नये. सायंकाळी रज-तमात्मक लहरींचे वायूमंडलात संचारण वाढते. केर काढणे, या कृतीतून भूमीशी संलग्नता साधून होणार्‍या घर्षणात्मक कृतीतून पाताळातील त्रासदायक स्पंदनांची गती आणखी वाढते आणि केर काढून बाहेर टाकण्याच्या कृतीपेक्षा नादाच्या स्तरावर सूक्ष्म स्वरूपात वास्तूत रज-तमात्मक स्पंदने फिरत रहाण्याचेच प्रमाण वाढते.

यासाठी शक्यतो तिन्हीसांजेची वेळ टळून गेल्यावर केर काढू नये. म्हणून ‘शक्यतो सायंकाळी केर काढणे टाळावे’, असे सांगितले आहे. तिन्हीसांजेपूर्वी केर काढणे हे त्यातल्यात्यात नादातून अल्प रज-तमात्मक लहरी आकृष्ट करणारे असते. ‘तिन्हीसांजेला घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते’, असे सांगितले जाते. म्हणजेच तिन्हीसांजेपूर्वी केर काढून तिन्हीसांजेला तुळशीजवळ दिवा लावल्यास शक्तीरूपी लहरी दिव्याकडे आकृष्ट होऊन वास्तूत प्रविष्ट होतात. या तेजदायी देवत्वामुळे वास्तूचे सायंकाळच्या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi