Tuesday, 27 July 2021

 बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील

- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

·       अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी....

·       ....त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार

 

मुंबईदि. 26 : बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या विकल अवस्थेत तिला बालगृहात आणण्यात आले. खरे तर सगळेच संपलेय अशी तिची अवस्था.. मात्र या अवस्थेवरयातनावर मात करीत तिने आज भरारी घेतली. दहावीच्या शालांत परीक्षेत तिने चक्क 97 टक्के गुण मिळवलेया यशाचे महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले.

ही गोष्ट एकटीची नाही, तिच्यासारख्याच बालगृह आणि अनुरक्षण गृहातील अन्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याची ग्वाही मंत्री ॲड.ठाकूर यांनी दिली  आहे.

शासनाच्या बालगृहात तसेच अनुरक्षण गृहात असणाऱ्या 574 मुला-मुलींनी दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे. त्यांचे हे यश एक महत्वाचा टप्पा असून महिला व बालविकास विभाग यापुढेही त्यांच्या उच्चशिक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रयत्न करणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून या मुलांच्या पंखात बळ देण्याचे काम शासन निश्चितच करेलअशी ग्वाही ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

राज्यातील विविध कारणास्तव आधाराची गरज असलेली मुले बालगृहात तर विधीसंघर्षग्रस्त बालके (चाईल्ड इन कॉन्फ्ल‍िक्ट विथ लॉ) पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते. अत्याचार झालेल्या किंवा अन्य कारणांमुळे बालगृहात यावे लागलेल्या तसेच वाट चुकल्यामुळे अनुरक्षण गृहात यावे लागलेल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत घेतली जाते. त्यासाठी या मुलांना शालेय तसेच उच्च शिक्षण यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते.

दहावीच्या परीक्षेला राज्यातील विविध बालगृह आणि अनुरक्षण गृहातील सुमारे सहाशे विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते यापैकी 574 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 284 मुली आणि 290 मुले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे यातील सुमारे 60 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या श्रेणीत अथवा विशेष श्रेणीत प्राविण्य मिळवले आहे. या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

००००

 मागासवर्गीय उद्योजकांचे प्रश्न सोडवणार : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मागासवर्गीय समाजात उद्योजक निर्माण व्हावेत

 

            मुंबईदि. 26 राज्यातील मागासवर्गीय उद्योजकांचे अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक संस्था महासंघातर्फे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मागासवर्गीय उद्योजकांना वीजपुरवठ्याशी संबंधित विविध योजनांचा लाभ व्हावा आणि त्यांना अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी एक कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

लोकशाहीची पाळेमुळे आर्थिक व सामाजिक समतेवर आधारलेली आहेतअसे सांगून डॉ. राऊत म्हणालेराज्यघटनेने जरी राजकीय समतेची हमी दिली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यावर समाधान झाले नव्हते. त्यांना अपेक्षित असलेली आर्थिक व सामाजिक समता निर्माण होण्याची गरज आहे. डॉ.आंबेडकरांना अपेक्षित आर्थिक व सामाजिक लोकशाही वास्तवात आणण्यासाठी मागासवर्गीयांचे आर्थिक सक्षमीकरण महत्वाचे असून मागासवर्गीयांच्या उद्योगांना शासकीय पाठबळ लाभल्याशिवाय हे शक्य होणार नाहीअसे स्पष्ट प्रतिपादन डॉ.राऊत यांनी केले.

मराठवाडा व विदर्भातील उद्योगांना देण्यात येणाऱ्या वीज सवलतीच्या धर्तीवर मागासवर्गीय उद्योजकांना देखील वीज सवलत व जोडणी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच मागासवर्गीय उद्योजकांना कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे थकलेल्या वीज बिलाचे हप्ते पाडून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले.

राज्यातील प्रत्येक जिह्यात मागासवर्गीय समाजातून उद्योजक निर्माण झाले पाहिजे.  त्यासाठी लवकरच एक कृती दल (टास्क फोर्स) स्थापन केले जाईल. आतापर्यंतच्या मागासवर्गीय सहकारी संस्थांचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येतील व भविष्यातील मागासवर्गीय उद्योजकता विकासाचा  आराखडा (रोडमॅप) तयार केला जाईल. मागासवर्गीय उद्योजकांना योग्य दर्जाचा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी काय पावले उचलावित याचाही विचार कृती दलातर्फे केला जाईल. यासाठी प्रसंगी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा करू,’ असे उर्जामंत्र्यांनी सांगितले.

 उर्जा विभागांतर्गत अनुसूचित जाती व जमातीतील घटकांना घरगुती वीज जोडणी देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ महाविकास आघाडी सरकारने आणली असून इतर घटकांनाही त्यात सामावून घेण्यासाठी याची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी उद्योजकांना दिली.

राज्य शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणा अंतर्गत उभारण्यात येणारे सौर ऊर्जा प्रकल्पइलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनसॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीगृहनिर्माणगटशेतीपायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्योगात मागासवर्गीय उद्योजकांना खास संधी निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलअसेही डॉ. राऊत म्हणाले.

या बैठकीला बाबासाहेब आंबेडकर सर्व्हिसेस अँड इंडस्ट्रीज चेंबर्सचे अध्यक्ष अरुण खोब्रागडेमहावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडेमराविम सूत्रधार कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टेमहाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक संस्थाच्या महासंघाचे कार्याध्यक्ष मोहन मानेउपाध्यक्ष प्रमोद कदमसरचिटणीस गौतम गवई आणि मागासवर्गीय उद्योजकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

००००

 महाड दुर्घटनेतील जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू;

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जखमींची केली विचारपूस

 

 जखमींचा सर्व उपचार राज्य शासन करणार

 संकटात शासन पाठीशी असल्याची दिली ग्वाही

 

            मुंबईदि. 26 : अतिवृष्टीमुळे महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १६ जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असूनवैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जे. जे. रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमींचा सर्व उपचार राज्य शासन करणार असून अशा संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिली.

             सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जे. जे. रुग्णालयाला भेट दिली. महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींवर येथे उपचार सुरू असून सर्व जखमींची यावेळी त्यांनी विचारपूस केली. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून ज्या जखमींवर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहेत्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही जखमींवर अतिदक्षता रुग्णालयात योग्य उपचार सुरू असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            दरडग्रस्तांना सर्व आवश्यक ती मदत पोहोचविण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलून उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही श्री. अमित देशमुख यांनी सांगून या नैसर्गिक संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

            कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून सर्व आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्याशिवाय पूरग्रस्त भागात रोगराई पसरणार नाही यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. डेंग्यूसह इतर रोगांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्था तत्पर ठेवण्यात आली आहे.  या संकटाच्या काळात मदतीसाठी धावून जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांचे अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

००००


 

पावसामुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीची पाहणी करण्याचे

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते बंद,

469 रस्त्यांवरची वाहतूक खंडित तर 140 पूल पाण्याखाली

 

            मुंबईदि. 26 : राज्यातील कोकण व पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना दौरा करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

            राज्यात गेल्या काही दिवसात पुणे तसेच कोकण विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक रस्ते व पूल नुकसानग्रस्त झाले आहेत. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसारसातारा व पुणे जिल्ह्यात पुण्याचे मुख्य अभियंता श्री. साळुंखेसांगली जिल्ह्यात औरंगाबादचे मुख्य अभियंता श्री. उकिर्डेकोल्हापूरमध्ये मुंबईचे मुख्य अभियंता के.टी. पाटीलसिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोलेपालघर व ठाणेमध्ये नाशिकचे मुख्य अभियंता पी.बी. भोसले आणि रायगडमध्ये सहसचिव श्री. रामगुडे हे भेट देणार आहेत. या अधिकाऱ्यांनी शासनास दररोज अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

            राज्यातील अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार290 रस्ते बंद झाले आहेत. तर 469 रस्त्यांवरची वाहतूक खंडित झाली आहे. 140 पूल व मोऱ्या हे पाण्याखाली गेले आहेत.

 शूरवीर जवानांचे शौर्य व वीरमातांचे धैर्य यामुळेच देश सुरक्षित

- राज्यपाल कोश्यारी

·       कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल योद्ध्यांचा राजभवन येथे सन्मान

·       वीरमाता अनुराधा गोरे यांच्या ‘अशक्य ते शक्य’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

 

            मुंबई, दि. 26 : हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते हे आपण प्रत्यक्ष पाहिले आहेदेशाचे शूरवीर जवान व  अधिकारी यांचे शौर्य तसेच वीरमाता व हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या धैर्य व त्यागामुळेच देश सुरक्षित आहेअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            कारगिल विजय दिनाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) कारगिल योद्ध्यांचा तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता अनुराधा गोरे लिखित 'अशक्य ते शक्य'...कारगिल संघर्षया पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.

            कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, भारताला शांती हवी असली आहे. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून देशाच्या सुदूर सीमावर्ती भागात चांगले रस्ते व सुसज्ज हवाई तळ उभारण्यात आले आहेत. सन १९६२ मध्ये आपण विद्यार्थीदशेत असल्यापासून आजपर्यंत देशाचे अनेक जवान व अधिकारी हुतात्मा झालेले पहिले, खुद्द आपल्या २२ वर्षीय बहिणीचे पती १९६२ च्या युद्धात शहिद झाले, असे राज्यपालांनी सांगितले.

            कारगिल युद्धात भारताची रणनीतीही जिंकली आणि कूटनीतीही जिंकली असे सांगून डोकलाम व गलवान या ठिकाणी चीनने नव्या भारताचे सामर्थ्यवान रूप पाहिले असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 'अशक्य ते शक्यहे पुस्तक केवळ युद्धकथा नाही तर तो कारगिल युद्धाकडे पाहणारा समग्र ग्रंथ आहे असे त्यांनी सांगितले.

            राज्यपालांच्या हस्ते महावीर चक्र विजेते हवालदार दिगेन्द्र सिंहहवालदार दीप चंदघातक पलटणचे हवालदार मधुसूदन सुर्वेहवालदार पांडुरंग आंब्रे व हवालदार दत्ता चव्हाण,  स्क्वाड्रन लीडर राहुल दुबेकॅप्टन रुपेश कोहलीकॅप्टन विद्या रत्नपारखीसविता दोंदेकर्नल सुशांत गोखले यांच्या आई रोहिणी आनंद गोखले व कर्नल संदीप लोलेकर यांच्या भगिनी कोमल शहाणे यांचा सत्कार करण्यात आला. 

            लेखिका अनुराधा गोरे यांनी अशक्य ते शक्य’ हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा व भूमिका स्पष्ट केली. ग्रंथाली प्रकाशन संस्थेचे दिनकर गांगल व सुदेश हिंगलासपुरकर यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.    सुरुवातीला राज्यपालांनी कारगिल युद्धविषयक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

            कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढालोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढाअनुराधा गोरे व मुंबई प्रभागाचे प्रमुख एअर व्हाईस मार्शल एस आर सिंह प्रामुख्याने उपस्थित होते. व्हॉइस ऑफ मुंबई व लोढा फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हर्शल कंसारा यांनी सूत्रसंचलन केले.

००००


Governor felicitates Kargil war heroes on Kargil Vijay Diwas

Releases book on Kargil conflict by Veermata Anuradha Gore

 

            Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated the warriors of the Kargil War and family members of the martyr jawans and officers on the occasion of the 22nd anniversary of the Kargil Vijay Diwas at Raj Bhavan Mumbai on Monday (26 July).

            The Governor also released the book ‘Ashakya Te Shakya…Kargil Sangharsh’ (Impossible to Possible) authored by Veermata Anuradha Gore, mother of late Captain Vinayak Gore on the occasion.

            Former Chief Minister Devendra Fadnavis, MLA Mangal Prabhat Lodha, Chairperson of the Lodha Foundation Manju Lodha, Anuradha Gore and Air Vice Marshal S R Singh were present.

            The felicitation of Kargil heroes was organized by The Voice of Mumbai and Lodha Foundation.

**

 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस

घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर

           

            मुंबईदि. 26 : कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला.

            दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे. 

            सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे.

            लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झालाअसे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

            राज्यात आज सुमारे 4100 लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी 4 वाजेपर्यंत तीन लाख 75 हजार 974 नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकतेअसे डॉ.व्यास यांनी सांगितले.

 मुंबई उपनगर जिल्ह्यात आपत्ती रोखण्यासाठीच्या उपायांचा

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

 

            मुंबईदि. 26 : महाराष्ट्र सध्या विविध आपत्तींचा सामना करीत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे आणि दरड कोसळल्याने आपत्ती ओढवली आहे. ज्या ठिकाणी संरक्षक भिंती असूनही नुकसान झालेअशा आणि इतर धोकादायक ठिकाणी आयआयटीच्या तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध पर्याय सादर करावेतअशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्या.

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांचा श्री.ठाकरे यांनी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकरनिवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईकसबंधित विभागातील महानगरपालिकेचे सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी पावसामुळे आपत्ती ओढवलेल्या मुंबई उपनगरातील ठिकाणांची मागील आठवड्यात प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर आयोजित बैठकीत त्यांनी या जागा अतिशय धोकादायक असल्याने जेथे मागणी आणि आवश्यकता आहे तेथे तातडीने संरक्षक भिंत बांधण्याची सूचना केली. तसेच जेथे संरक्षक भिंतींचा उपयोग होणार नाही अशा ठिकाणी तज्ज्ञांमार्फत इतर पर्यायांचा अभ्यास करावाअसे सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह महानगरपालिकाएमएमआरडीएवन विभागम्हाडा आदी विभागांनी समन्वयाने काम करावे आणि वस्त्या असलेल्या ठिकाणांना प्राधान्य द्यावेअशी सूचनाही त्यांनी केली.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री बोरीकर आणि महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी धोकादायक असलेल्या जागा आणि तेथे सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती दिली.

 

 

महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून

बाल न्याय निधीला दोन लाख रुपयांची देणगी

 

            मुंबईदि. 26 बालकांसाठी स्थापित बाल न्याय निधीसाठी मंत्रालयातील महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने वर्गणी करुन जमा केलेल्या लाख हजार 500 रुपये रकमेचा धनादेश प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांच्या हस्ते महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

            बाल न्याय अधिनियम, 2015 च्या कलम 105 अन्वये, राज्य शासन बाल न्याय अधिनियमांतर्गत बालकांचे कल्याण व पुनर्वसनाकरिता निधी निर्माण करण्याबाबत तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम, 2018 मधील नियम 85 अन्वये राज्य शासन बाल न्याय निधीनावाचा निधी निर्माण करील अशी तरतूद आहे. त्यानुसार जून 2018 मधील शासन निर्णयानुसार बाल न्याय निधी स्थापित करण्यात आला आहे.

 

व्यक्तिगत देणगीदारसंस्थाकंपन्यांनी देणगीद्वारे योगदान द्यावे

प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांचे आवाहन

            बाल न्याय निधीमध्ये व्यक्तिगत तसेच संस्थांकडूनही ऐच्छिक देणग्याकंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) निधी मधूनही देणग्या स्वीकारण्याची तरतूद असून बालकांचे कल्याण आणि पुनर्वसनाचा दृष्टीकोन लक्षात घेता सामाजिक उत्तरदायित्व म्हणून अधिकाधिक व्यक्तिगत देणगीदारसंस्थाकंपन्या यांनी या उदात्त कामात आपले योगदान द्यावेअसे आवाहन श्रीमती कुंदन यांनी यावेळी केले.

मुलांचे कल्याण व पुनर्वसनासाठी आणि केंद्र शासनाच्याराज्य शासनाच्या किंवा इतर कोणत्याही योजनेत समाविष्ट नाहीत अशा कार्यक्रमांची अंमलबजावणी करणेअनाथ, निराधार, परित्यागीत अशा बालकांच्या मोठ्या आजारांवरील शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय सहाय्यासाठी तरतूदउद्योजकता विषयक सहाय्यकौशल्य विकास प्रशिक्षण किंवा व्यवसाय प्रशिक्षण यासाठी तरतूदबाल न्याय अधिनियमान्वये समावेश असलेल्या मुलांकरिता विशेष व्यावसायिक सेवासमुपदेशकअनुवादकदुभाषीविशेष शिक्षकसमाजसेवकमानसिक आरोग्य सेवकव्यवसाय शिक्षण प्रशिक्षक यांची तरतूद करणे. या मुलांची सर्वंकष वाढविकास व कल्याणाकरीता सहाय्यभूत होण्यासाठी कोणताही इतर कार्यक्रम किंवा उपक्रमबालकांसाठी कार्यरत संस्थांतील मुलांच्या कल्याणासाठी असलेल्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांना सहाय्य करणे आदींसाठी या बाल न्याय निधीतून तरतूद करण्यात येते.

 

बाल न्याय निधी (जेजे फंड) खात्याचे परिचालन कर्ते :

DY-COMMI. (CHILD DEVELOP) AND MEM SECY & TRY MS CHILD FUND

Account No. 11099464354

State Bank of India- Pune Main Branch

Collector Office Compound, Pune

Branch Code: 454

IFSC-SBIN0000454

MICR:411002002

 

उपायुक्त (बाल विकास) तथा सदस्य सचिव नि कोषाध्यक्षराज्य बाल न्याय निधी

बँकेचे बचत खाते क्र. 11099464354

भारतीय स्टेट बँकपुणे मुख्य शाखा,

जिल्हाधिकारी कार्यालय आवारपुणे

शाखा कोड- 454

आयएफएससी कोड- SBIN0000454

मायकर कोड (एमआयसीआर):411002002


Featured post

Lakshvedhi