Monday, 4 August 2025

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न

 तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोन दिवशीय महसूल परिषदेचा समारोप

नागपूर दि.३: महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानतापारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणारा हा विभाग असून अधिक लोकाभिमुखतेसाठी महसूल परिषदेत अभ्यास गटांनी सादर केलेल्या शिफारशी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दिशादर्शक ठरतीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल परिषदेच्या समारोप प्रसंगी व्यक्त केला.

भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) नागपूर, येथे आयोजित महसूल परिषदेच्या दुसऱ्या दिवशी झालेला चर्चासत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमुख्य सचिव राजेश कुमारअपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगेमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीजमाबंदी आयुक्तनोंदणी महानिरीक्षकसर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी व महसूल विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कालानुरूप महसूल विषयक कार्यप्रणालीशी संबंधित धोरणात्मक बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून तंत्र कौशल्याच्या बळावर हा विभाग अधिकाधिक सक्षम व लोकस्नेही करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. या सर्व धोरणात्मक बाबींवर चर्चामंथन व मूल्यमापन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महसूल परिषदेचा समारोप मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi