Sunday, 11 May 2025

गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही,गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन गोशाळा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही

              — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

 

गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन

गोशाळा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

सिंधुदुर्गदि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असूनगोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाहीअसे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करंजेसाटमवाडी (ता. कणकवली) येथे ७० एकर जागेत उभारण्यात आलेल्या गोवर्धन गोशाळा कोकण प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.

 

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमाजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणेमत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेमाजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकरमाजी मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाणआमदार निलेश राणेजिल्हाधिकारी अनिल पाटीलसिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा नीलमताई राणेरविंद्र पाठकप्रमोद जठार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

            गोवर्धन गोशाळा कोकण हा प्रकल्प कै. तातू सीताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात आला असूनगावाच्या विकासासाठी गोमातेचे योगदान केंद्रस्थानी ठेवण्याचा संकल्प या प्रकल्पामागे आहे.

 

            यावेळी श्री. फडणवीस म्हणालेदेशातील एकूण गोशाळांपैकी उत्तम गोशाळा कोकणात तयार झाली आहे. या माध्यमातून एक अर्थव्यवस्था तयार होऊ शकते. शेतकऱ्यांना या गोशाळेच्या माध्यमातून व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देता येईलअशी व्यवस्था या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन केंद्रे आणि कृषी व पशुसंवर्धनाचे पर्यटन केंद्र म्हणूनदेखील येथे व्यवस्था करण्यात आली आहे. गोमातेचे महत्त्व आपल्या संस्कृतीत फार मोठे आहे. गोशाळा म्हणजे केवळ गायींचे संरक्षण नव्हेतर ती एक सामाजिकआर्थिक आणि पर्यावरणपूरक क्रांती आहे. गावाच्या विकासासाठी अशा प्रकल्पांची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गसंपन्न असूनअशा प्रकल्पांमुळे स्थानिकांना रोजगारशाश्वत शेती आणि नैसर्गिक जीवनशैलीची दिशा मिळेलअसेही त्यांनी मत व्यक्त केले.

 

            उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उपक्रम गोमाता संवर्धनासाठीचा मॉडेल प्रकल्प असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प दिशादर्शक तसेच मार्गदर्शक ठरेल. निसर्गाची मुक्त उधळण आणि संस्कृतीचा मुक्त ठेवा असलेल्या कोकणात गोमाता संवर्धनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. शेतकऱ्यांची समृद्धी साधणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. कोकणात धवल क्रांतीचा पाया घातला जात असूनपरिसरातील दूधही येथे संकलित केले जाणार आहे. त्यामुळे दूध व्यवसायालाही चालना मिळेलअशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

            प्रास्ताविकामध्ये खासदार नारायण राणे यांनी गायींचे विविध प्रकारत्यांच्या वैशिष्ट्यांची माहितीतसेच दूधशेणमूत्र या नैसर्गिक घटकांपासून मिळणाऱ्या उपयुक्त उत्पादनांबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणालेयेथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावेमुलांना चांगले शिक्षण मिळावेजिल्ह्यातून चांगले अधिकारी घडावेत व समृद्धी निर्माण व्हावीहा या प्रकल्पामागील हेतू आहे. गोमाता संवर्धन करून जिल्ह्यातील तरुणांनी शेतीपूरक उद्योगात सहभागी व्हावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

            माजी मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी या प्रकल्पासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात शालश्रीफळ व गोप्रतिमा (गोशाळेचे स्मृतिचिन्ह) देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत निलेश राणे यांनी केलेतर आभार नितेश राणे यांनी मानले. गोवर्धन गोशाळेच्या उभारणीसाठी आवश्यक योगदान दिलेल्या विविध सहभागी व्यक्तींचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi