Wednesday, 7 May 2025

दिलखुलास' कार्यक्रमात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण बिरदेव डोणे यांची मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण बिरदेव डोणे यांची मुलाखत

 

मुंबईदि. ७: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत ५५१ वी रँक पटकावत उत्तीर्ण झालेले बिरदेव डोणे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. 'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार ८मे २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा- 2024 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत राज्यातून 90 हून अधिक उमदेवार उत्तीर्ण झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिरदेव सिद्धप्पा डोणे हे उत्तीर्ण झाले आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास कसा  करावाअभ्यासाचे नियोजन कसे करावेविषयांची निवड व मुलाखतीची तयारी कशी करावीतसेच या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्यांनी कशाप्रकारे अभ्यास व तयारी केली याविषयी 'दिलखुलासकायर्क्रमातून श्री. डोणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi