Wednesday, 7 May 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन पोलीस वसाहतीचे भूमिपूजन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

नवीन पोलीस वसाहतीचे भूमिपूजन

 

            अहिल्यानगरदि. ६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे १०२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या आणि पोलीसांसाठी ३२० नवीन निवासस्थाने असलेल्या वसाहतीचेतसेच  राखीव पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

 

            यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेजलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेमाजी मंत्री रवींद्र चव्हाणविभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलाजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्करकार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते.

 

            यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नव्याने उभारण्यात येणारी पोलीस वसाहत व राज्य राखीव पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारती विषयी माहिती जाणून घेतली.

 

पोलिसांसाठी आवश्यक सुविधायुक्त वसाहत उभी राहणार

 

            पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर आठ निवासस्थाने याप्रमाणे ८० निवासस्थाने असून अशा एकूण चार इमारती उभारण्यात येत आहेत. पोलीस अंमलदार निवासस्थानामध्ये दोन बेडरुमहॉलकिचन असा ५० चौ.मी क्षेत्रफळ आहे. पार्किंगमध्ये सर्वत्र सोलरद्वारे विद्युत पुरवठा असून अंतर्गत रस्तेस्ट्रीट लाईटसांडपाणी शुद्धीकरण व्यवस्थाअग्निशमन व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत.

 

अशी आहे नवीन प्रशासकीय इमारत

नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीमध्ये शस्त्रागारराखीव पोलीस निरीक्षक कार्यालयटेंट हाऊसक्रीडा साहित्य कक्षबँड रुमबेल ऑफ आर्मस् आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi