महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागामार्फत २०२४-२५ मध्ये
महसूल उल्लेखनीय वाढ
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत महसूल वृद्धीचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या वर्षी विभागाने रु.२,२५,३०० कोटींपेक्षा जास्त महसूल संकलित केला आहे, जो संपर्ण महाराष्ट्र राज्याच्या कर महसुलातील ६०% पेक्षा जास्त आहे. यामध्ये मागील वर्ष २०२३-२४ पेक्षा १३.६% वाढ झाली असून वर्ष २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नमुद रु. २,२१,७०० कोटी महसुलीचा अंदाज ओलांडला गेला आहे.
तक्ता १ : महाराष्ट्र राज्य कर विभागाची कामगिरी २०२४-२५ : रक्कम कोटी मध्ये
विभाग | २०२३-२४ वास्तविक वृद्धी | २०२४-२५ तात्पुरती | २०२३-२४ पेक्षा २०२४-२५ वाढ |
जीएसटी | १,४१,९७९ | १,६३,०१६ | १४.८ टक्के |
व्हॅट | ५३,३८० | ५९,२३१ | ११.० टक्के |
पीटी | २,९५३ | ३,०७२ | ४.० टक्के |
एकूण | १,९८,३१२ | २,२५,३१९ | १३.६ टक्के |
वाढ | १०.९ टक्के | १३.६ टक्के |
|
विभागाने विशेषतः वस्तू व सेवा कर (GST) कायद्याअंतर्गत येणाऱ्या महसुलात १४.८% वाढ दर्शविली आहे. त्याचबरोबर, संपूर्ण देशातील एकूण GST महसूल वाढीचा दर फक्त ८.६% असून महाराष्ट्रने या क्षेत्रात इतर राज्यांपेक्षा खूपच वेगाने प्रगती केली आहे.
या उल्लेखनीय यशामागे, करदात्यांच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने निरीक्षण करणाऱ्या आणि फॉलो- अप करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांचे परिश्रम आहेत.
No comments:
Post a Comment