Wednesday, 2 April 2025

माधव नेत्रालयाने जनतेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्तम कार्य केले

 संघटनसमर्पण आणि सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार

–  प्रधामंत्री नरेंद्र मोदी

माधव नेत्रालयाने जनतेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्तम कार्य केले

माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्वाची नेत्र संस्था ठरेल

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

      माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

 

नागपूरदि. 30 : संघटनसमर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावाअसे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेगोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कसोशीने कार्य करीत आहेमाधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य केल्याचे गौरवोद्गारत्यांनी काढले

        नागपूर येथील हिंगणा रोडवरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होतेकेंद्रीय रस्ते वाहतूक  महामार्ग मंत्री नितीन गडकरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉमोहन भागवतस्वामी अवधेशानंद गिरीस्वामी गोविंद देव गिरीमाधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉअविनाशचंद्र अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते.

      प्रधानमंत्री श्रीमोदी म्हणाले कीगेल्या दशकात ग्रामीण भागात लाखो आयुष्मान भारत केंद्रे उभारण्यात आलीकोट्यवधी लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्याटेलिमेडिसिनद्वारे उपचार  आरोग्य सेवा सशक्त करण्यात आल्याएम्ससारख्या संस्थांची संख्या तिपटीने वाढविण्यात आलीस्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच देशात वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिलेवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेतयोग आणि आयुर्वेदालाही जगात मानाचे स्थान मिळाले आहेआरोग्य सेवेपासून कुणी वंचित राहू नये असे शासनाचे धोरण असून त्यानुसार सक्षमपणे कार्य सुरू असल्याने त्यांनी सांगितले. 

     आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आलेआरोग्य क्षेत्रातील सुधारणांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे.  द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत नेत्रालयाने अंध:कार दूर करीत लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहेप्रीमियम सेंटरमुळे या नेत्रालयाच्या कार्याचा विस्तार होऊन त्यास गती मिळेलतसेच देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीतही या संस्थेचे भरीव योगदान राहील.

विदर्भातील थोर संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे जन्मतः अंध होतेमात्र अंधत्वावर मात करीत त्यांनी ज्ञानाची दृष्टी विकसित केलीदृष्टी बोधातून येते  विवेकातून प्रगट होते याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहेसंत ज्ञानेश्वरसंत तुकारामसंत नामदेवसंत एकनाथ अशा देशातील संतांनी भारताला एकसंध ठेवत उत्तम शिकवण दिलीमाधव नेत्रालयानेही त्यांच्या विचारांची कास धरत कार्य केले आहेसमाजसेवेचे हे कार्य अव्याहत पुढे जावेअशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi