Wednesday, 2 April 2025

जिल्हा वार्षिक योजनेतून रेशीम शेतीला प्रोत्साहन

 जिल्हा वार्षिक योजनेतून रेशीम शेतीला प्रोत्साहन

राज्यातील तुती व टसर रेशीम शेतकऱ्यांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 75 टक्के इतक्या सवलतीच्या दरात अंडीपुंज पुरवठा करण्यात येत आहे. तसेच राज्यांतर्गत रेशीम शेतीचे नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना विद्या वेतनासह 15 दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

 रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषांना उत्पादनावर आधारित प्रोत्साहनपर अनुदानसूत उत्पादन अनुदान योजनाग्रामीण भागात रोजगार निर्मिती, रेशीम सुत उत्पादनासाठी आर्थिक साह्य, आधुनिक यंत्रसामुग्रीसाठी अनुदानमल्टी अँड रेलिंग युनिट 100 प्रति किलो अनुदानऑटोमॅटिक रेलिंग युनिट 150 रुपये प्रति किलोअनुदान टसर रीलींग युनिट 100 रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येत आहे. 

 यासाठी  केंद्र व राज्य सरकारच्या  योजनांचा उपयोग करून,योग्य तंत्रज्ञान,शेकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देऊन ग्रामीण, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या  उत्पन्न वाढीसाठी  त्यांना आर्थिक सक्षमता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचबरोबर आदिवासी,ग्रामीण भागात तुतीची लागवड आणि रेशीम उत्पादनामुळे स्थानिक पातळीवर मोठया प्रमाणत  रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे  विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi