Tuesday, 1 April 2025

आंबा निर्यातप्रश्नी नवीन नियमावली करू

 आंबा निर्यातप्रश्नी नवीन नियमावली करू

- कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल

 

मुंबईदि. 25 : कोकणातील आंबा हा जगामध्ये निर्यात केला जातो. शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य ते प्रबोधनव्यवस्थापनमार्गदर्शन करण्याचे काम कृषी विद्यापीठामार्फत केले जाते. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना कीटक नाशकेऔषध फवारणी याचबरोबर निर्यात करताना घ्यावयाची काळजीयाबाबत कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक नियमावली केली जाईलअशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी लक्षवेधीच्या उत्तरात दि.

विधानपरिषद सदस्य श्रीमती चित्रा वाघप्रवीण दरेकरसंजय केनेकरसुनील शिंदे यांनी राज्यातील आंबा व काजू पिकाच्या निर्याती संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होतीत्यास राज्यमंत्री जयस्वाल यांनी उत्तर दिले.

राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले कीकोकणातील आंबा उत्पादनाबरोबरच राज्यात वेगवेगळ्या पद्धतीची पिके घेतली जातात. राज्यातील पिकाचे लागवड क्षेत्रानुसार कृषी विद्यापीठामार्फत संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग समन्वय करेलअशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi