Thursday, 27 February 2025

राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकरिता नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन

 राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकरिता

नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन

 

मुंबईदि. 27 : भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची ४ व ५ मार्च२०२५ रोजी दोन दिवसांसाठी भारत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे परीषद आयोजित केली आहे.

 मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अध्यक्षतेखाली होणारी ही अशी पहिलीच परिषद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त यांनी अगदी प्रथमच या परिषदेकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांना नामनिर्देशीत करण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांना सूचित केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारीजिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी हे वैधानिक प्राधिकारी म्हणून राज्यजिल्हा व मतदार संघाकरीता महत्वाचे अधिकारी आहेत.

या दोन दिवसीय परीषदेतून राज्य तसेच केद्रशासीत प्रदेशांच्या अधिका-यांना विचारमंथन व परस्परांना आलेले अनुभव यातून शिक्षणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या दोन दिवसीय परीषदेच्या पहिल्या दिवशी आधुनिक निवडणूक व्यवस्थापनातील मुख्य क्षेत्रासह आयटी आर्किटेक्चरप्रभावी संप्रेषणसोशल मीडियाचा प्रसार वाढवणे आणि मतदान प्रक्रियेतील विविध अधिका-यांची वैधानिक भूमिका यासह प्रमुख मुद्यांवर चर्चा होईल. परीषदेच्या दुस-या दिवशी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी पहिल्या दिवशी झालेल्या मुद्देनिहाय चर्चेच्या अनुषंगाने आपला संबंधित कृती आराखडा सादर करतीलअसे भारत निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi