Monday, 3 February 2025

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला; वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

 मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला;

वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

 

मुंबईदि. ३ : मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव दि.५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयदादर (पू.) येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथोत्सवाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १ या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर "लेखक तुमच्या भेटीला" आणि "एका संगीतकाराची मुशाफिरी" या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दि. ६ फेब्रुवारी रोजी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनव्याख्याने आणि परिसंवाद होणार आहेत. तसेच "शब्दव्रती" या कार्यक्रमात निवडक मराठी कवयित्रींच्या कविता सादर केल्या जातील. याशिवायग्रंथालयातील महत्त्वपूर्ण घटकांचा प्रातिनिधिक गौरव करून ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.

मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आणि परिसंवाद होणार आहेत. दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा मुंबईकर नागरिकग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारीमुंबई शहर शशिकांत काकड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi