Thursday, 30 January 2025

जे जे रुग्णालयातील नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस उपकरणाचे लोकार्पण

 जे जे रुग्णालयातील नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस उपकरणाचे लोकार्पण

 

मुंबईदि. 30 : इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर्स अँड वाइव्हस् असोसिएशन (IASOWA) यांनी ग्लॉकोमा आजाराचा धोका लक्षात घेता कावसजी जहांगीर नेत्र विभागग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालय समूह यांना ५ लाख रुपयांचे नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस यंत्र उपलब्ध करुन दिले आहे. याचे लोकार्पण मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते २९ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. ग्लॉकोमा आजाराचा सामना करण्यासाठी ओ. पी. डी. कावसजी जहांगीर नेत्र विभागजे. जे. रुग्णालययांना नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओ लेन्स उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुगणालय समूह यांनी IASOWA चे आभार व्यक्त केले.

ग्लॉकोमा हे संपूर्ण जगात अपरिवर्तनीय पण टाळता येणारे अंधत्वाचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे आणि ते जवळपास ८ टक्के जागतिक अंधत्वासाठी जबाबदार आहे. सन २०१० मध्ये संपूर्ण जगभरात ग्लॉकोमाचे प्रमाण ६०.५ दशलक्ष होते आणि २०२० पर्यंत ते ८० दशलक्ष झाले असल्याचा अंदाज आहे. संपूर्ण जगभरातील ३९.३६ दशलक्ष अंध लोकांपैकी तीन दशलक्षांहून अधिक लोक ग्लॉकोमामुळे अंध आहेत.

भारत हे जागतिक अंधत्वाच्या सर्वाधिक प्रादेशिक भारासाठी (२३.५%) जबाबदार आहे. ग्लॉकोमा हा मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) आणि अपवर्तक दोष (रेफ्रॅक्टिव्ह एरर) नंतर अंधत्वाचे तिसरे प्रमुख कारण आहे. ग्लॉकोमाचे प्रमाण ११.९ दशलक्ष असून त्यात अंधत्वाचे प्रमाण ८.९ दशलक्ष आहे. ग्लॉकोमा १२.८% अंधत्वासाठी जबाबदार आहे.

मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दरमहा सुमारे १५०-२०० ग्लॉकोमा रुग्ण पाहिले जातात. डोळ्यांमधील वाढलेला दाब (Intraocular Pressure - IOP) हे ग्लॉकोमाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

ग्लॉकोमा निदानासाठी वापरले जाणारे उपकरणे :

              नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर (Non-Contact Tonometer - NCT) : हे एक उपकरण आहे जे डोळ्यांचा दाब (IOP) लवकर आणि डोळ्याला थेट स्पर्श न करता सहजपणे तपासते. यामुळे रुग्णाला अधिक आराम मिळतोतांत्रिक सहायकावरील अवलंबित्व कमी होते आणि संसर्गाचा धोका टाळता येतो.

             गोनिओस्कोपी (Gonioscopy) : हा एक नियमित तपासणीचा प्रकार आहेज्याद्वारे आईरिस आणि कॉर्निया यामधील कोन (Iridocorneal Angle) मोजला जातो. गोनिओलेंस (Gonioscope) व स्लिट लॅम्प किंवा ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या मदतीने हे परीक्षण केले जाते. ग्लॉकोमाचे निदान व उपचार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

            नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर आणि गोनिओलेंस हे ग्लॉकोमाचे त्वरित निदान आणि उपचार करण्यासाठी अतिशय उपयुक्त उपकरणे आहेत.

ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालय समूहमुंबई हे १८० वर्षांच्या गौरवशाली इतिहास असलेले एक प्रतिष्ठित आणि अग्रगण्य वैद्यकीय संस्थान आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे चालवली जाणारी ही सर्वात जुनी वैद्यकीय संस्था असूनयेथे वैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. तसेचया रुग्णालयात सर्वसामान्य आरोग्य सेवेपासून सुपर-स्पेशॅलिटी आणि तृतीयक आरोग्य सेवेपर्यंत रूग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवली जातात.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi