Thursday, 30 January 2025

जल साक्षरता वाढीसाठी प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करावे जलसाक्षरता समन्वय समितीच्या बैठकीतील सूचना

 जल साक्षरता वाढीसाठी प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करावे

जलसाक्षरता समन्वय समितीच्या बैठकीतील सूचना

 

मुंबईदि. ३० : जीवनासाठी महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती असलेल्या पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी जलसाक्षरता महत्त्वाची आहे. जलसाक्षरता वाढवण्यसाठी प्रशिक्षणासोबतच कार्यशाळांचे आयोजनअशा सूचना राज्यस्तरीय जलसाक्षरता समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.

राज्यस्तरीय जलसाक्षरता समन्वय समितीची आढावा बैठक समितीचे अध्यक्ष तथा सचिव (लाक्षेवि) डॉ.संजय बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस मुख्य अभियंता (पा ) व सह सचिव संजीव टाटूउपसचिव (लाक्षेवी) तथा सदस्य सचिव महेंद्रकुमार वानखेडे उपस्थित होते. तर यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टीप्रकल्प उपसंचालकरा. ग्रा. वि. सं.यशदा पुणेचे श्री. पुसावळे व अन्य संबंधित अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

जल साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षीत जल सेवकांची फळी तयार करणे गरजेची आहे. जल सेवकजलदूतजलप्रेमीजल योद्धाजलनायकजलकर्मीना जल व्यवस्थापनाची योग्य माहिती मिळावी यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जावे. जल साक्षरता वाढीस लागावी म्हणून विविध सामाजिक संस्थाशाळामहाविद्यालये आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले जावेतअशा सूचना अध्यक्षांनी दिल्या.

जल व्यवस्थापनात लोकसहभाग वाढावा. गावागावात जलसाक्षरता वाढून शाश्वत जलसंधारणाच्या दिशेने ठोस पावले उचलली जावीत यासाठी जलसाक्षरता केंद्रे प्रभावीपणे कार्यान्वित होणे गरजेचे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जल साक्षरता कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीजलसंपदा  विभागाचे अधीक्षक अभियंताकार्यकारी अभियंता  यांनी सामन्याने कार्यक्रमाचा वर्षभरातील आराखडा व अहवालाचा आढावा घेऊन कार्यक्रम अंतिम करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यातअशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi