Tuesday, 12 November 2024

-li.आनंदी°पहाट.il-

 🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                       *२/२*


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

           *संत नामदेव महाराज*

                    *जयंतीची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

                     

🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹


  *हिताचिया गोष्टी सांगूं एकमेकां ।*

  *शोक मोह दु:खा निरसूं तेणें ॥*

  *एकमेकां करूं सदा सावधान ।*

  *नामीं अनुसं-धान तुटों नेदूं ।*

  *घेऊं सर्वभावें रामनाम दिक्षा ।*

  *विश्वासें सकळिकां हेंचि सांगों ।*

  *नामा ह्मणे शरण रिघों पंढरीनाथा ।*

  *नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥*

        *भारतीय संस्कृतीचा देशाप्रती एकात्मता भाव मनामनात रुजविण्यात संत परंपरेचे मोठे योगदान आहे. त्यांनी परमेश्वराविषयी विश्वास.. प्रेम, आपुलकी जागवली. भक्तीमार्गामुळे समाजात परस्पर संबंधात विश्वासाची.. प्रेमाची.. आपुलकीची नाती निर्माण झाली.*

        *संत नामदेव (१२७०-१३५०). जन्म नरसी नामदेव (हिंगोली) मराठवाडा, यांनी देशभर भक्तांची साखळीच जोडली.* 

        *"देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव".. म्हणणाऱ्या वारकरी संत भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांची आज जयंती.*

        *संत नामदेव यांचे बालपण पंढरपूरात गेले. त्यांना विठ्ठलाचा लळा लागला. संत विसोबा खेचर हे त्यांचे गुरु. तर संत चोखामेळा.. संत जनाबाई या शिष्या. बालपणापासूनच विठ्ठलाशी जिव्हाळ्याचे नाते असल्याने शेवटचा मुक्काम पंढरपूरला विठ्ठलाच्या महाव्दारीच केला.* 

        *उद्धव हे जसे श्रीकृष्णाचे सखा होते तशीच विठ्ठलाचा सखा म्हणून संत नामदेव यांची ओळख आहे. संत नामदेव हे संत ज्ञानदेवांचे समकालीन. संत ज्ञानदेवांच्या समाधीनंतर ५० वर्षे त्यांनी देशभर भागवत धर्माचा प्रसार केला.*

        *संत नामदेव हे कोमलहृदयी. बालपणी वडिलांनी मंदिरात देवाला नैवेद्य अर्पण करायला सांगितला तेव्हा देव तो खाण्याची वाट बघत ते उपाशी राहिले. कुत्र्याने त्यांच्या पोळ्या पळवल्या तर कोरड्या का खातो म्हणून तुपाची वाटी कुत्र्याला नेवून दिली. याच निर्मळ भक्तीभावामुळे विठ्ठलाने त्यांना आपले मानले.*

        *"नाचू कीर्तनाचे रंगी.. ज्ञान दीप लावू जगी" हे त्यांचे  जीवन ध्येय. त्यांनी समाजात एकोपा निर्माण केला. संत नामदेवांच्या कीर्तनात अनेक ग्रंथांचे संदर्भ यायचे. ते बहुश्रुत होते. देहभान विसरुन कीर्तन करायचे. त्यांच्या कीर्तनाने श्रोते भक्तीरसात न्हावून निघायचे. कीर्तनात असा काही रंग चढायचा की 'नामदेव कीर्तन करी, पूढे नाचे पांडुरंग' अशी अनुभूती यायची.*  

        *संत नामदेव यांनी ८० वर्षाच्या जीवनात अनमोल असे विपुल लेखन केले. भागवत धर्म प्रसार पंजाब पर्यंत केला. संत नामदेवाची अभंगगाथा (२५०० अभंग) शौरसेनी भाषेतही अभंग (१२५ पदे) लिहली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. तसेच आदि, समाधी व तीर्थावळी या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.*

        *संत नामदेवांनी भक्तीचे मर्म सहज शब्दांत सांगितलेय. ईश्वर प्राप्ती.. तो भेटणे म्हणजे जीवनात आमुलाग्र बदल होत जीवनात सुख.. समाधान.. शांतता.. आनंद लाभणे. ईश्वर प्राप्ती म्हणजे काय तर जीवातील सर्व वासना संपण्याची अवस्था प्राप्त होणे. हा विलक्षण आनंद संत नामदेवांनी अनुभवला. दर्शनासाठी व्याकुळते नंतर श्रीहरी दर्शनाचा आनंद म्हणजे चंद्र किरणे बघून चकोराला होणारा आनंद किंवा मेघ बघून उत्स्फुर्त नाचणाऱ्या मयुराचा आनंद. हाच मीरेच्या भक्तीतील आर्तभावाचे दर्शन घडविणारा संत नामदेव यांचा हा अभंग.*

        *आमच्या जीवनात भक्तीचा ज्ञानदीप जागविणाऱ्या जेष्ठ श्रेष्ठ भक्त शिरोमणी संत नामदेव यांना जयंती निमित्य त्रिवार वंदन.*

    *नामदेव ऐसा भक्त कलयुगी*

    *प्रमाण त्रिजगी दुजा नाही*

    *निरुपम नामा देवा आवडता*   

    *तयासी समता नाही दुजा*

    *शतकोटी ग्रंथ अभंग वदला*

    *शिरोमणि जाला भक्त एक*

    *तुकाविप्र म्हणे धन्य नामदेव*

    *.... तुकाविप्र (हे बीडचे पेशवाईतील संत)*

      

🌹⚜🌸🔆🛕🔆🌸⚜🌹

  

  *सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।*

  *पाहतांही भूक तहान गेली ॥१॥*


  *भेटली भेटली विठाई माऊली ।*

  *वासना निवाली जिवांतील ॥२॥*


  *चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।*

  *वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥*


  *नामा म्हणे पाप आणि ताप*

  *दुख: गेले ।*

  *जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥*


🌹⚜️🌸🔆🛕🔆🌸⚜️🌹


  *रचना : संत नामदेव महाराज*  ✍️

  *संगीत : वसंत देसाई*

  *स्वर : वाणी जयराम*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *‼जय जय रामकृष्ण हरि‼*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

              *-१२.११.२०२४-*


🌻🌸🥀🔆🙏🔆🥀🌸🌻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi