Friday, 15 November 2024

शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

 शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील

११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

            मुंबईदि. १४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर२०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेअंतर्गत शिवडी विधानसभा मतदारसंघात ११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग अशा एकूण १३० मतदारांनी गृह टपाली मतदान केले.  

             मुंबई शहर जिल्ह्यातील शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २२६ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी ११५  मतदारांनी तर ३४ पैकी १५ दिव्यांग मतदारांनी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. प्रपत्र १२ ड भरून जमा केलेल्या एकूण १३० अर्जदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

             मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.           

****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi