*🔴 सहवास हा चांगल्या व्यक्तीचा आणि चांगल्या गोष्टीचा हवा 🟤*
========
🍇 *दहा मिनिटे*.. बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे, हे कळेल...
🍇 *दहा मिनिटे*.. बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे, हे समजेल...
🍇 *दहा मिनिटे*..
साधू संन्याशा समोर बसा, आपल्या जवळील सर्वकाही दान करून टाकावे, असे वाटेल...
🍇 *दहा मिनिटे*.. राजकारणी पुढाऱ्या समोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे, कळून येईल...
🍇 *दहा मिनिटे*..
विमा एजंट समोर बसा, जगण्या पेक्षा मेलेले केव्हाही बरे, असे वाटेल...
🍇 *दहा मिनिटे*.. व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे, असे वाटेल...
🍇 *दहा मिनिटे*... शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे, हे समजेल...
🍇 *दहा मिनिटे*.. चांगल्या शिक्षकासमोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे, अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल...
🍇 *दहा मिनिटे*... शेतकरी, कामगार यांच्यासमोर बसा, त्यांच्या काबाडकष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता, असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल...
🍇 *दहा मिनिटे*..
सैनिकासमोर बसा, तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे, याचा साक्षात्कार होईल...
🍇 *दहा मिनिटे*...
माऊलींच्या वारीत चाला, आपोआप तुमचा अहंकार, मी पणा गळून पडेल...
🍇 *दहा मिनिटे*.. मंदिरा मध्ये बसा, मनाला मनःशांती मिळेल...
🍇 *दहा मिनिटे*... लहान बालकाशी खेळा, नि:स्वार्थ प्रेमाचा अनुभव मिळेल...
🍇 *दहा मिनिटे*..
आई वडिलां सोबत बसा, त्यांनी तुमच्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होईल...
*❣️सहवास कुणाचा, हे खूप महत्त्वाचं असतं..!❣️*
🌹🌹🌹🙋♂️🙋♂️🌹🌹
No comments:
Post a Comment