Tuesday, 19 November 2024

सक्षम ॲप

 सक्षम ॲप

            भारतीय निवडणूक आयोग दिव्यांग नागरिकांसाठी (पीडब्ल्यूडी) मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता  हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

            निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नावपत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईलत्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्थाव्हीलचेअरसहाय्यकमदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.

            सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थानमतदान केंद्रउपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.

 गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp

ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568

मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी प्रवेशसुविधा रॅम्पच्या माध्यमातून सुलभ केली जाणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेत मदतीशिवाय सहभाग घेता यावा यासाठी ब्रेल चिन्हे असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) देखील उपलब्ध असतील. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिकामतदार स्लिप ब्रेल लिपीमध्ये वाटण्यात आलेली आहे. अंध मतदारांकरिता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ब्रेल डमीडमी मतपत्राला प्रत्येक मतदार केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त १० कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi