🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
*पांडुरंग स्तुतीची*
*काकडा आरतीची*
🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹
*बहिरा झालो या या जगी ॥*
*नाही ऐकिले हरिकीर्तन ।*
*नाही केले पुराण श्रवण ।*
*नाही वेदशास्त्र पठण ।*
*गर्भी बधिर झालो त्यागूने*
*नाही संतकीर्ती श्रवणी आली ।*
*नाही साधुसेवा घडियेली ।*
*पितृवचनासी पाठ दिधली ।*
*तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥*
*.... संत एकनाथ*
*गर्भात असतानाचा मूळ स्वभाव.. वृत्ती आणि नरदेह प्राप्त होताच जेव्हा मनुष्य संसाररत होतो, पितृवाचनाकडेही पाठ फिरवतो, या मानवी स्वभावाबद्दल संत एकनाथ यांचे हे खडे बोल काकडा आरतीवेळी हमखास ऐकू येतात. पण आजही गावोगाव होणारी काकडा आरती म्हणजे लोकं भक्ती प्रवण आहेत हेही तेव्हढेच सत्य आहे.*
*मराठी रंगभूमीची मुहुर्तमेढ १८४३ मध्ये अधिकृतपणे झाली असली तरीही वेदकाळापासूनची आमची सनातन परंपरा. अगदी लवकुशानेही प्रभू श्रीरामासमोरचे गायन असो वा आजही काकडा आरती होते हे या परंपरेची साक्ष.*
*या सृष्टीची रंगभूमी चालवणाऱ्याला इथे साद घातली जाते. रंगभूमीला अपेक्षित कलावंत.. वेषभूषा.. गायन.. वादन.. प्रेक्षक.. श्रद्धाभाव असे सारेच घटक इथे आहेत. संत नामदेव.. तुकोबा हे तर उत्कृष्ट कीर्तनकार. मंदिर असो वा उपलब्ध केलेली व्यवस्था हा रंगमंच.*
*भक्तीमार्ग सापडायला जन्मजन्मांतरीचा पुण्यसंचय हवा. पण संतसंगत लाभली की वाट सोपी होते. संत तुकाराम महाराजांनी तर म्हणलेय की जो परमेश्वराची भक्ती करत नाही, तो कितीही उच्चशिक्षीत विद्वान असला तरी त्याचे जळो शहाणपण. तो त्याच्या वंशाला कमीपणा आणतोय.*
*संतानी शब्दांत अमृतासम भक्तीरस मांडला. मग भक्त स्वतः त्याचा अनुभव घेऊन सुखावले. रोज पहाटेची काकड आरती हा त्याच आनंदाचा एक भाग. स्वतः संत तुकाराम महाराज हे आपले दैवत पांडुरंगासमोर ही काकडा आरती करत आहेत.*
🌹⚜🌸🔆🛕🔆🌸⚜🌹
*भक्तीचिया पोटी*
*बोध काकडा ज्योती*
*पंचप्राण जीवे भावे*
*ओवाळू आरती*
*ओवाळू आरती*
*माझ्या पंढरीनाथा*
*दोन्ही कर जोडोनि*
*चरणी ठेवितो माथा*
*काय महिमा वर्णू*
*आता सांगणे ते किती*
*कोटी ब्रम्हहत्या*
*मुख पाहता जाती*
*राही रखुमाई उभ्या*
*दोन्ही दो बाही*
*मयूर पिच्छे चामरे*
*ढाळिती ठायी*
*विटेसहित पाय*
*मनोभावे ओवाळू*
*कोटी रवी शशी*
*दिव्य उगवले हेळू*
*तुका म्हणे दीप घेऊन*
*उन्मनीची शोभा*
*विटेवरी उभा*
*दिसे लावण्यगाभा*
🌹⚜️🌸🔆🛕🔆🌸⚜️🌹
*रचना : संत तुकाराम* ✍️
*संगीत : स्नेहल भाटकर*
*स्वर : स्नेहल भाटकर*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*‼जय जय रामकृष्ण हरि‼*
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-०६.११.२०२४-*
🌻🌸🥀🔆🙏🔆🥀🌸🌻
No comments:
Post a Comment