राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्ती
राज्यात दि. 15.10.2024 ते दि. 04.11.2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या एकुण - 252.42 कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली आहे. यामध्ये रोख रक्कम - 63.47 कोटी तर 34,89,088 लिटर दारु ( 33.73 कोटी रुपये किमतीची) जप्त करण्यात आली. ड्रग्ज 38,24,422 ग्राम (32.67 कोटी रुपये किमतीचे.) मौल्यवान धातू 14,28,983 ग्राम (83.12 कोटी रुपये किमतीचे ), तर फ्रिबीज 34,634 (संख्या) 2.79 कोटी रुपये किमतीचे आणि इतर 8,79,913 (संख्या) 36.62 कोटी रुपये किमतीचे जप्त करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment