Saturday, 29 June 2024

संस्थेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही

 


 

विधानपरिषद लक्षवेधी सूचना क्रमांक 3

 

संस्थेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ            

            मुंबईदि. 29 :अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या मुला-मुलींनी कॉलेजचे अध्यक्ष व व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात विद्यार्थ्यांनी केलेल आंदोलन लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतलेली आहे.कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार याची काळजी घेतली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत सांगितले.

          अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापन आणि विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी लक्षवेधी विधानपरिषद सदस्य  प्रा. राम शिंदे यांनी मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत विधानपरिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

        मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले कीरत्नदीप मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर रत्नापूर ता.जामखेड जिल्हा अहमदनगर मधील एकाच आवारात व इमारतीत विविध सात महाविद्यालये चालवली जातात.या संस्थेविरोधात ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांच्या हितानुसार निर्णय घेतला आहे तसेच संस्थेविरोधात प्राप्त तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई देखील सुरू आहे.संस्थेत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi