Saturday, 27 April 2024

इंडोनेशिया निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने साधला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संवाद लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची घेतली माहिती

 इंडोनेशिया निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने साधला   

                         मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संवाद

 

                     लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची घेतली माहिती

 

          मुंबईदि.२७ : इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली.  यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. 

       जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात लोकसभा २०२४ ची निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणेनियोजनबद्धरित्या पार पाडत आहे.  राज्यातील एकूण मतदार, मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा, मतदार जनजागृती आदींची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भेटी दरम्यान शिष्टमंडळाला  दिली.

       यावेळी इंडोनेशिया निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त इधाहम होलिक, सचिव बेनार्ड डेरमा वन सृष्टोनोउपमुख्य निवडणूक अधिकारी सुर्यदीअधिकारी रोबि लिओ अगुसमोह सकिर रंदिया, सायकीरसरहा गोकसीकौन्सिल जनरल तोल्ह उबादी, विजय तावडे, व्हिसा अधिकारी मोहमद  अख्यारराजेश पाड्याराज्याच्या निवडणूक विभागाचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यावेळी उपस्थित होते.

      मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी यावेळी  भारत निवडणूक आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांचे अधिकार व चालणारे कामकाज याविषयी देखील माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत स्वतंत्रपणे घेण्यात येतात.  राज्याची लोकसंख्यालोकसभा मतदार संघ, एकूण मतदान केंद्र, राज्यातील मतदानाचे टप्पे, टप्पा निहाय सुरू असलेली  निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र, बॅलेट युनिट ,कायदा व सुव्यवस्था, राजकीय पक्ष आणि आचारसंहिता, मतदान वाढवण्यासाठी राबवण्यात आलेले उपक्रम, राज्यात उभारलेले चेक पोस्ट, आधुनिक तंत्रज्ञानचा निवडणूक प्रक्रियेतील उपयोग  करून विविध ॲप आणि पोर्टल आयोगाने विकसित केलेले आहेत याबाबत सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली. 

                                                            0000

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi