Sunday, 28 April 2024

खर्च विभाग निवडणूक निरीक्षकांनी घेतला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आढावा

 खर्च विभाग निवडणूक निरीक्षकांनी घेतला

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आढावा


 


        मुंबई, दि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.


            या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, आयकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, खर्च विभागाचे नोडल अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


            श्री. चंदन, श्री. छत्रपती यांनी नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा घेत त्यांनी केलेल्या तयारीची माहिती करून घेतली. तसेच राजकीय पक्ष, उमेदवारांनी करावयाच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी निर्देश दिले.


            खर्च निरीक्षकांची नागरिक भेट घेऊ शकतात. त्यांचा संपर्क क्रमांक असा : श्री. राजकुमार चंदन (मोबाईल क्रमांक – 93214-05417) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव, तर श्री. किरण के. छत्रपती (मोबाईल क्रमांक - 8928571922) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 164- वर्सोवा, 165अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्वच्या खर्च निरीक्षणाशी संबंधित समस्यांबाबत तक्रारींसाठी संपर्क साधू शकतात, असे आवाहन खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक श्री. चंदन, श्री. छत्रपती यांनी केले आहे.


00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi