निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांची
जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास भेट
मुंबई, दि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास 26- मुंबई उत्तर मतदारसंघासाठी नियुक्त खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे, निवडणूक निरीक्षकांच्या संपर्क अधिकारी अनुपमा पाटील आदी उपस्थित होते. श्रीमती चौधरी या भारतीय राजस्व सेवेतील (आयआरएस) वरीष्ठ अधिकारी आहेत. 26- मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या 152- बोरीवली, 153- दहिसर आणि 154- मागाठणे मतदारसंघातील खर्चविषयक बाबींचे निरीक्षक म्हणून श्रीमती चौधरी काम पाहतील.
निवडणूक निरीक्षक श्रीमती चौधरी यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली. जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी श्री. गोहाड यांनी त्यांना माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहितीसह दैनंदिन सादर करण्यात येणाऱ्या अहवालांची माहिती दिली. माध्यम कक्षाचे कामकाज जाणून घेतल्यानंतर निवडणूक निरीक्षक श्रीमती चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.
00000
No comments:
Post a Comment