Monday, 1 April 2024

हत्तींशी बोलणारा माणूस - श्री आनंद शिंदे. यांच्याशी संवादातून हत्तींविषयीचे अनोखे विश्व उलगडले.

 हत्तींशी बोलणारा माणूस - 

श्री आनंद शिंदे. यांच्याशी संवादातून हत्तींविषयीचे अनोखे विश्व उलगडले.

त्यांच्या कडून मिळालेली माहिती :

*हत्ती त्याच्या वयाच्या पंधराव्या दिवसापासून पुढे भेटलेल्या माणसांची आयुष्यभर स्मृती ठेवतात.

 *सात किलोमीटर पर्यंत त्यांना त्यांचे सहकारी किंवा खाद्य कोणत्या दिशेस आहे हे कळते. नर हत्तीने जोराने जमिनीवर पाय आपटल्यास किंवा विशिष्ट आवाज काढल्यास सात किलोमीटर पर्यंतच्या त्याच्या सहकारी हत्तींना मेसेज जातो.

 *कितीही मोठ्या कालावधी नंतरही ते एकदा भेटलेल्या व्यक्तीस पुन्हा लगेच ओळखतात.

 *हत्तींना संख्या मोजता येतात.

 *एका कळपात 20 पेक्षा जास्त हत्तींना राहता येत नाही. असा त्यांचा नियम आहे. *कळपाच्या प्रमुखाकडून बारा वर्षांवरील हत्तींना वेगळा कळप करण्यास भाग पाडले जाते. अक्षरशः हकलले जाते. याचे कारण कौटुंबिक नात्यांमध्ये शरीर संबंध येऊ नयेत. 

*त्यांच्या कळपात आई, बहीण, मावशी, आत्त्या, काकी, मामी अशी सर्व नाती ओळखली आणि सांभाळली जातात. 

 *हत्ती त्याच्याशी जवळीक असणाऱ्या व्यक्तींची खोड काढतात, छेड काढतात, रुसतात, हसतात, रडतात, खेळतात, समजूत काढतात, काळजी घेतात. 

*तब्येत ठीक नसलेल्या हत्तीस गोंजारतात. त्याला आजार विसरवायचा प्रयत्न करतात.

 *लहान पिलास इतर हत्ती सोंडेने पाणी घेऊन आंघोळ कशी करायची ते शिकवतात.

 *हत्तींना स्वतःचा व इतरांचा मान, अपमान, सन्मान, कळतो.

 *चार तासांपेक्षा जास्त वेळ ते पिलांना किंवा इतर हत्तींना झोपू देत नाहीत. कारण त्यांच्या वजनाने त्यांची हृदय क्रिया बंद पडण्याचा धोका असतो. याचे ज्ञान त्यांना आहे.

 *सोंडेने, कानाने, पायाने, डोक्याने ते त्यांच्या विविध भावना प्रकट करतात.

 *लहान पिल्ले त्यांची देखभाल करणाऱ्या माहुतास वडिलांप्रमाणे मानतात. वडील - मुलगी या नात्याप्रमाणे बिलगतात. 

*त्यांना सोडून जाताना किंवा निरोप घेताना ते अत्यंत दुःखी व अस्वस्थ होतात. पिलांच्या विरहाने अनेक दिवस अन्न त्याग करतात.

 *हत्तींच्या सोबत नेहमी वावरणाऱ्या माणसास जवळपास असलेला वाघही काही इजा अथवा हल्ला करीत नाही.

 *लॉरेन नावाच्या हत्तीप्रेमीची कहाणी अद्भुत आहे. तो एकदा परदेशी गेला असता तेथेच त्याचा मृत्यू झाला. इकडे हत्तींना जाणीवेने हे कळून आले. त्याचा मृतदेह घरी आणल्यावर त्याच्या अंत्य दर्शनासाठी व त्याच्या पत्नीचे सांत्वनासाठी हत्तींचा कळप 120 किलोमीटर अंतर चालून त्याच्या घरी आला होता. *इतकेच नव्हे तर त्यानंतर बरोबर 365 दिवसांनी लॉरेनच्या प्रथम स्मृतीदिना दिवशी त्याला श्रद्धांजली वाहण्यास पुन्हा तो हत्तींचा कळप त्याच्या घरी उपस्थित झाला होता.

🐘🙏🙏🙏🐘

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi