कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक पदांचा
लवकरच निकाल जाहीर करणार
मुंबई दि. 29 : आय.बी.पी.एस संस्थेमार्फत सप्टेंबर 2023 मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. निकालाबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल घोषीत करण्यासाठी आय.बी.पी.एस संस्थेस कळविले गेले आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालय पुणेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानचंद्र गित्ते यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment